महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के कर सवलत हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा

Date:

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रक २०२६-२७ वर सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया

आज सादर झालेले पुणे महानगरपालिकेचे २०२६-२७ चे अंदाजपत्रक हे विकसित पुण्याच्या दिशेने भक्कम पाऊल आहे. दूरगामी, शाश्वत आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वावर आधारित असलेले हे अंदाजपत्रक पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वप्नातील ‘ग्रोथ हब’ म्हणून पुण्याला सक्षम करणारे आहे.

महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के कर सवलत हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा असून, प्रत्येक कुटुंबासाठी दिलासादायक आहे. महसूलवाढीसाठी स्वतंत्र समिती, विशेष कक्ष आणि करसंकलनावर दिलेला भर महापालिकेची आर्थिक ताकद वाढवेल.

शिक्षण क्षेत्रात ७५ ‘रोल मॉडेल’ शाळा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, तर क्रीडा क्षेत्रात ‘फिट पुणे, फिट इंडिया’ अंतर्गत क्रीडा नर्सरीसारखे उपक्रम भविष्यातील पिढी घडविणारे आहेत. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन, रिव्हरफ्रंट प्रकल्प, गृहनिर्माण योजना आणि वाहतूक सुधारणा यामुळे पुणेकरांचे जीवनमान अधिक उंचावणार आहे.तसेच लोहगाव येथे उभारण्यात येणारा ‘भारत मंडपम’ प्रकल्प पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे अधिवेशन व प्रदर्शन केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा ठरेल.

हे अंदाजपत्रक पुणेकरांच्या अपेक्षांना न्याय देणारे असून, पुण्याला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत शहर बनविण्याचा ठोस संकल्प यातून दिसून येतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा

मुंबई | प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...