डिजिटल छळही आता लैंगिक छळ, विनयभंगाच्या श्रेणीत; विधेयक मंजूर:महिला सुरक्षेसाठी फडणवीस आक्रमक

Date:

मुंबई –

महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६ एकमताने मंजूर केले. या विधेयकाद्वारे शक्ती विधेयकात अशा तरतुदींचा समावेश केला जाईल. त्यामुळे ॲसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख संरक्षित केली जाईल आणि डिजिटल लैंगिक छेडछाडीसाठी तुरुंगवासाची तरतूद सुनिश्चित केली जाईल.

शक्ती विधेयक २०२० मध्ये राज्य विधानमंडळाने मंजूर करून राष्ट्रपतींच्या संमतीसाठी केंद्राकडे पाठवले होते. तेव्हा भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील तरतुदी एकत्र करून केंद्र असा एक कायदा करत असल्याची माहिती राज्याला दिली होती. राष्ट्रपतींनी ते विधेयक परत पाठवले होते. राज्यासंदर्भात भारतीय न्याय संहितेत सुधारणांची आवश्यकता आहे का, समिती स्थापन केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या विधेयकात तीन वर्ष शिक्षेसह दंड प्रस्तावित

गुन्ह्याची व्याप्ती : पूर्वी केवळ शारीरिक छळ किंवा प्रत्यक्ष विनयभंगावर लक्ष केंद्रित होते, मात्र आता टेलिफोन, ईमेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मानसिक आणि डिजिटल छळालाही ‘लैंगिक छळ’ विनयभंग श्रेणीत आणून त्याचे गांभीर्य वाढले आहे. विधेयक २०२६ मध्ये तीन वर्षे शिक्षेसह दंड प्रस्तावित आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा

मुंबई | प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...