Home Blog Page 557

‘जीनोम टू ओम’ विज्ञानाकडून मेटासायन्सचे संक्रमण शोधतोयूजीसीचे- माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन

पुणे, दि.२ डिसेंबर: “आधुनिक आणि तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगती मुळे आपले जीवन अधिक आरामदायी बनले आहे. परंतु ते अधिक निरोगी किंवा शांततेचे नाही. जीनोम टू ओम हे आधुनिक विज्ञानाकडून मेटासायन्सकडे इच्छित संक्रमण शोधून काढतो. जीवनाच्या सर्व पैलूंमधील परस्परसंबंध ओळखून नैतिक आणि आध्यात्मिक अंतदृष्टी यांचे मिश्रण करते. हे सर्वांगीण वैज्ञानिक दृष्टिकोनावर जोर देते.” असे विचार यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘जीनोम टू ओम’ या विषयावर ते बोलत होते.
सत्राच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. चौधरी व डॉ.अनिल हिवाळे उपस्थित होते.
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले,“ जीनोम गतिशील आधुनिक विज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो तर ओम वैश्विक चेतनेला अंतिम वास्तव म्हणून मूर्त रूप देतो. हे पुस्तक प्रायोगिक ज्ञान आणि उच्च शहाणपणा यांच्यातील अंतर भरून काढण्याचा एक प्रयत्न आहे. जीनोम टू ओम हे मेटा सोसायटीच्या अर्थपूर्ण प्रगतीची आशा देते आणि वैज्ञानिक प्रगती आणि कालातील मानवी मूल्ये यांच्यात सामंजस्याने पुढे जाण्याची आशा देते. तसेच सार्वत्रिक शांतता आणि कल्याणासाठी विविधतेमध्ये एकता शोधण्याच्या आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रवास सुरू ठेवण्यासाठी जीवनाचा ओम मार्ग आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन होणे गरजेचे आहे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते. सृष्टीवरील सर्व धर्म हे मानवाला कसे जगावे आणि कसे जगू नये याची शिकवण देतात. ओम यामध्ये संपूर्ण विश्वाचे ज्ञान समावलेले आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात शिवव्याख्याते प्रा. नितिन बालगुडे पाटील यांनी ‘ मराठा तितुका मेळवावा’ या विषयावर सांगताना, छत्रपती शिवरायांचा काळच डोळ्यासमोर उभा केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी बरोबरच आजच्या काळात त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितले. छत्रपती राजांनी ज्या पद्धतीने राज्य कारभार केला ती पद्धत आज अस्तित्वात आणावी. तसेच राजांनी ज्या पद्धतीने संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केले तसेच आज प्रत्येक मराठी व्यक्ती ने देशात कुठेही काम करावे. असा सल्ला ही त्यांनी दिला.
तत्पूर्वी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी प्रेम आणि विश्वास या गोष्टीवर भर देऊन आज प्रत्येकाला प्रेमाची गरज का आहे हे सांगितले. प्रेमाच्या भावनेने शरीरात होणार्‍या हालचालीचे विस्तृतीकरण केले. त्यामुळे व्यक्तीची मन स्थिती किती उत्तम राहते हे समजावले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पात्रे आणि डॉ. यांनी आभार मानले.

रक्तास जात, पात, धर्म नसुन, रक्तदान मानवता धर्म शिकवतो ⁃ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी

स्व.एस एस धोत्रे फौंडेशन तर्फे रक्तदान शिबीरात ७५ जणांचे रक्तदान..!
पुणे –
पुणे शहरात ‘रक्ताचा तुटवडा’ असल्याने रक्तदान शिबीर वरदान ठरते आहे मात्र रक्तास जात, पात, धर्म नसल्याने रक्तदानाचे संस्कार मानवता धर्म शिकवत असल्याचे उदगार काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे नेते, संस्थापक अध्यक्ष स्व. संगण्णाजी धोत्रे व स्व. संजयजी धोत्रे यांचे स्मरणार्थ मॉडेल कॉलनी छ. शिवाजी महाराज नगर येथील ‘एस. एस. धोत्रे फाऊंडेशन’ वतीने आयोजित ‘रक्तदान शिबिराचे’ उद्घाटन काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे हस्ते झाल्या प्रसंगी ते बोलत होते. सामाजिक व मानवी गरजेची हाक लक्षांत घेऊन तत्परतेने रक्तदान करणाऱ्या तरुण – तरुणींना धन्यवाद देत अभिनंदन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिबिराचे संयोजक – निमंत्रक विक्रांत धोत्रे (उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर युवक काँग्रेस) व धोत्रे कुटुंबीयांनी ऊपस्थितांचे स्वागत केले.
वडार समाजाचे नेते स्व. शिव्वाण्णा धोत्रे यांचे पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, इंटक कामगार संघटनेचे कायदे सल्लगार ॲड. फैयाज शेख, राकेश विटकर, शहर काँग्रेस सरचिटणीस संजय मोरे, भाजप युवा मोर्चाचे हेमंत डाबी, सौ पौर्णिमा भगत, अदिती निकम, अण्णा भंडगर, सुरेश सपकाळ, अपर्णा कुऱ्हाडे, प्रा. रोहित आळंदीकर, नरेश आवटे, सौ वैशाली धोत्रे इ उपस्थित होते..!
माजी आमदार रविंद्र धंगेकर, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली असता त्यांचे हस्ते “रक्तदात्यांस सर्टिफिकेट व स्व एस एस धोत्रे यांचे स्मरणार्थ भेट वस्तु” देऊन सन्मानित करण्यात आले.धंगेकर यांनी संयोजकांचे सामाजिक उपक्रमा बद्दल कौतुक केले.
सुत्र संचालन – ॲड फैयाज शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक श्री विक्रांत धोत्रे यांनी केले. रक्तदान शिबिराचे संकलन “अक्षय ब्लड बँकेने” केले. सदर शिबिरात ७५ रक्त बाटल्यांचे संकलन झाले. डॅा राजकुमार आणि त्यांचे सहकारी पल्लवी महांडवे, प्रीती पवार, प्रणाली होले, प्रणय घाडगे, नवनाथ कानडे इ मेडीकल टिम चे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिराचे यशस्वी करण्यात राहुल शिंदे, साहिल शिंदे, इंद्रनील मराठे, जैष्णवी धोत्रे, सचिन धोत्रे, नरेश आवटे, यशवंत इरकल, रुपाली ठाकरे, प्रशांत शेट्टी, विकास सोनावणे, अनुष्का बुरगुटे, विद्या जाधव, सिकंदर शेख,आकाश सुरवसे,इ चे सहकार्य लाभले.
तसेच ट्रस्टचे कार्यकर्ते इंद्रनील मराठे, रुपाली ठाकरे, राहुल शिंदे, शुभम साबळे, रोहित शर्मा, आकाश सुरवसे, सोमनाथ निळ, प्रमोल पाटील, शुभम सावळे, विकास सोनवणे, अनुष्का बुरगुटे,आदित्य जरड, श्रावस्ती कांबळे, विद्या जाधव, अजिंक्य जोगदंड, यशोधन मोरे, विशाल भोर, प्रद्ध्युम स्वामी, प्रज्वल सुवर्ण, गणेश पवार व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५ कि.मी., १० कि.मी. व व्हीलचेअर स्पर्धेला पुणेकरांचा प्रतिसाद

पुणे– ३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३.०० वाजता ‘नाइट मॅरेथॉन’ म्हणून सुरू झाल्यानंतर सकळी ६.३० वाजता १० कि.मी, सकाळी ७.०० वाजता ५ कि.मी आणि ३ कि.मी..व्हीलचेअर स्पर्धा पार पडल्या. यास पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.छत्रपती संभाजीनगरचे लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक संदीप अटोळे व बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी १० कि.मी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ५ कि.मी आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी व्हीलचेअर स्पर्धेला फ्लॅग ऑफ केला. त्यानंतर यास्पर्धांना प्रारंभ झाला.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ३८ वर्षे चालू आहे हे कौतुकास्पद असून, पुणे महानगरपालिकेत सत्ताबदल झाला तरी या मॅरेथॉनला पुणे महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहिले व राहील..मी पुण्याचा खासदार म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सदैव सहकार्य करेन, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यानिमित्त दिली.
१० कि.मी पुरुष गटात प्रथम क्रमांक अभिनंदन सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक युनूस शहा आणि तृतीय क्रमांक नरेंद्र सिंग यांना मिळाला. १० कि.मी महिला गटात प्रथम क्रमांक रिया धोत्रे, द्वितीय क्रमांक साक्षी भंडारी आणि तृतीय क्रमांक शिवानी चौरसिया यांना मिळाला.
५ कि.मी पुरुष गटात प्रथम क्रमांक सौरभ मेहरा, द्वितीय क्रमांक उत्तम पाटील आणि तृतीय क्रमांक ओमकार जाधव यांना मिळाला. ५ कि.मी महिला गटात प्रथम क्रमांक मानसी यादव, द्वितीय क्रमांक वैष्णवी सावंत आणि तृतीय क्रमांक प्रिया गुळवे यांना मिळाला.
३ कि.मी व्हीलचेअर स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक सोमनाथ यादव, द्वितीय क्रमांक गिरीश सव्वाशेर आणि तृतीय क्रमांक ओम शिंदे यांना मिळाला. ३ कि.मी. व्हीलचेअर महिला गटात प्रथम क्रमांक भाग्यश्री माझिरे, द्वितीय क्रमांक तृप्ती चोरडिया आणि तृतीय क्रमांक कोमल माळी यांना मिळाला.

या सर्व स्पर्धा सणस ग्राऊंड येथून सुरू झाल्या. १० कि.मी. स्पर्धा सणस मैदान – सारसबाग – सिंहगड रस्तामार्गे हिंगणे चौक येथून परत, ५ कि.मी स्पर्धा सणस ग्राऊंड – सिंहगड रस्ता – पानमळा व परत आणि व्हीलचेअर स्पर्धा सणस मैदान – सिंहगड रस्ता तेथून दांडेकर पूल तेथून परत अशा संपन्न झाल्या. या संपूर्ण मार्गावर पुणेकरांनी मोठी गर्दी करून स्पर्धकांना टाळ्याचा कडकडाट करीत प्रोत्साहन दिले.

न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई

पुणे, दि. 2: महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची भूमी असून त्याला समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे; न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी, न्यायानंतर संबंधित व्यक्तींच्या चेहऱ्यावर आंनद व समाधानाची भावना दिसली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (नालसा) कार्याध्यक्ष भुषण गवई यांनी केले.

पुणे येथे 30 नोव्हेंबर रोजी आयोजित एकदिवसीय विभागीय मध्यस्थी परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे कार्याध्यक्ष अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती रेवती मोहिते-ढेरे, रवींद्र घुगे, नितीन सांभरे, भारती डांगरे, अमित बोरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई चे सदस्य सचिव समीर अडकर. तसेच चेतन भागवत, श्रीपाद देशपांडे, सागर इंगळे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती गवई म्हणाले, भारतीय राज्यघटनेत न्यायाचा हक्काला मुलभूत हक्क मानला आहे. देशात महाराष्ट्राची न्यायपालिका देशात अतिशय चांगली न्यायपालिका म्हणून ओळखली जाते, याचा आम्हाला अभिमान आहे. देशात विविध कायदे निर्माण करुन गावागावातील तंटे सर्वांनुमते मिटवून सकारात्क मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मध्यस्थींनी दोन व्यक्ती, संस्थामधील मतभेद दूर करुन समान न्याय मिळेल यादृष्टीने प्रयत्य करावे. न्यायपालिकेत व्यक्तींना न्याय देतांना तो कमी वेळेत व कमी खर्चासोबतच चांगल्यारितीने न्याय देण्यावर भर दिला पाहिजे, हे उद्दिष्ट साध्य करण्यावर सकारात्म दृष्टीकोन अंगीकारत मध्यस्थीची महत्वाची भूमिका पार पाडावी. राज्यात मध्यस्थीची सुरू असलेली चळचळ यशस्वी करण्याकरीता प्रयत्न करावे. याकरीता अंगी इच्छा, तळमळ असावी लागते, असेही न्यायमुर्ती गवई म्हणाले.

श्री. वराळे म्हणाले, पुणे ही संताची भूमी असून या भूमीला संताची शिकवण लाभलेली आहे. समाजात विषमता दूर करुन समता प्रस्थापित करण्यासोबच वंचिताना न्याय देणे ही संताची शिकवणीप्रमाणेच आपल्या संविधानाचे तत्व आहे. यादृष्टीने समाजातील वंचिताना न्याय देण्यासोबतच विषमता दूर करण्याकरीता प्रयत्न करावे. नालसा उद्धघोष गीताच्या माध्यमातून ‘न्याय सर्वांसाठी’ ही संकल्पना सर्वत्र रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातून विधीसेवेचा उद्देशही व्यक्त होत आहे, असेही श्री. वराळे म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे (मालसा) मराठी भाषेतील उद्धघोष गीत, मध्यस्थी हस्तपुस्तिका तसेच विधी सेवा हस्तपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले त्याच बरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या समाज माध्यमांचे ई-लोकार्पण करण्यात आले.

निवडणूक संपताच एसटीची भाडेवाढ, लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव योजनेवरही संशय.

राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपा युती कडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम: नाना पटोले

काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध, कंत्राटी भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू.

मुंबई, दि. २ डिसेंबर २०२४
राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता. मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर करून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता. यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या करनी व कथनीत फरक असतो. आताही अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात तहसीलदार व नायब तहसीलदार पदाचीही कंत्राटी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांच्या कंपनीला दिली जातात. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीने नोकर भरतीचे आश्वासनही दिले होते त्याचा भाजपाला विसर पडलेला दिसत आहे. राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही.
निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापनाही झालेली नाही तरी लगेच एस. टी. महामंडळाने तिकटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले असून कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देतील, असे वाटत नाही असेही नाना पटोले म्हणाले.

लाडक्या बहिणींना सरकार २१०० रुपये देणार की नाही? सरकारला जेरीस आणू – रोहित पवार

पुणे-निवडणुकीच्या तोंडावर सरसकट १५०० रुपये दरमहा लाडक्या बहिणींना देणारे सरकार आता त्याच पद्धतीने म्हणजे ज्यांना पूर्वी दिलेत त्यांना न वगळता २१०० रुपये दरमहा देणार कि नाही ? यावरून आम्ही सरकारला धारेवर धरू असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे .

सरकारने लाडकी बहीण योजना काढली परंतु आता भाजप त्यामध्ये सर्शत अटी टाकण्याचा विचार करत आहे. सरकार २१०० रुपये महिलांना देणार की नाही, ज्या वंचित महिला योजनेपासून दूर राहिल्या त्यांना आगामी काळात समाविष्ट केले जाणार की नाही, याबाबत अधिवेशनात आम्ही मुद्दे मांडणार आहे. परंतु अधिवेशन कधी होणार, आम्हाला बोलण्याची संधी दिली जाणार का? हे प्रश्न आहे. सरकारला सहा महिने कामासाठी दिले पाहिजे. लोकांच्या खिशातून सरकार पैसे काढणार का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. बेरोजगारी, महागाई. भ्रष्टाचार याबाबत आगामी काळात आम्ही सरकारला जाब विचारत राहणार आहे.

रोहित पवार म्हणाले, महायुतीच्या नेत्यांना सर्व राज्यातील विविध ठिकाणी समान आसपास मते मिळाल्याचे ईव्हीएम मशीन मधून दिसून येते. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हे ईव्हीएम बाबत खुलासा करण्यासाठी पुढाकार घेत आहे. नागरिकांच्या देखील ईव्हीएम बाबत शंका असून त्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी दूर केल्या पाहिजे. महायुतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असून नऊ दिवसानंतर राज्याला मुख्यमंत्री मिळत नाही किंवा मंत्रीमंडळ विस्तार होत नाही, त्यामुळे लोकांनी मते देऊन चूक केली का? असे वाटू लागले आहे.

बसच्या दरात १४ टक्के वाढ करण्याच प्रस्ताव एसटी महामंडळाकडे आला आहे. व्यवसायिक गॅस १६ टक्के वाढ झाली असल्याने १७२ रुपयाने सदर गॅस महागलेला आहे. योजनादूत यांना दोन महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. महायुतीला ईव्हीएमने मदत केल्याने बाकी लोकांची काही मदत झाली नाही, असे त्यांना वाटत आहे. न्यायालयाच्या भरतीत देखील कंत्राटी भरती होणार आहे, याला आमचा विरोध असणार आहे.

राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा महासागर

आज नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण दुःखी, नितीन गडकरी यांच्या विधानाची चर्चा

नागपूर-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक विधानांसाठी कायमच चर्चेत असतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. नितीन गडकरी यांनी राजकारणाला ‘असंतुष्ट आत्म्यांचा महासागर’ अशी उपमा दिली आहे. राजकारणात प्रत्येक व्यक्ती दु:खी असतो आणि नेहमीच सध्याच्या पदापेक्षा वरच्या पदाची आकांक्षा बाळगतो, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नागपूर येथे रविवारी ‘जीवनाचे 50 स्वर्णिय नियम’ या पुस्तकाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर रोखठोक भाष्य केले. राजकारणात महत्त्वाकांक्षा कशी वाढली आहे, याची व्याख्याही त्यांनी केली.

नितीन गडकरी म्हणाले, राजकारण संतुष्ट आत्म्यांचा महासागर आहे. राजकारणात सर्वच लोक दु:खी आहेत. नगरसेवकाला नाराज असतो कारण त्याला आमदार होता नाही आले. एक आमदार यासाठी नाराज असतो कारण त्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. मंत्री दु:खी असतो कारण त्याला चांगले खाते भेटत नाही आणि ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. तर मुख्यमंत्री देखील तणावात असतो कारण पक्षश्रेष्ठी त्यांना कधी ठेवतील आणि बाजुला करतील याची त्याला भीती असते, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जीवन हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असो, जीवन आव्हाने आणि समस्यांनी भरलेले असते. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ समजून घ्यावे लागेल.

नितीन गडकरी म्हणाले की, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक कोट आठवतो, ज्यात म्हटले आहे की, ‘माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो संपत नाही. जेव्हा तो हार मानतो तेव्हा तो संपतो. नितीन गडकरी यांनी आनंदी जीवनासाठी चांगल्या मानवी मूल्यांवर आणि संस्कारांवर भर दिला. जीवन जगण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपले आदर्श आणि नियम सांगताना ‘व्यक्ती, पक्ष आणि पक्ष तत्त्वज्ञान’ याचे महत्त्व अधोरेखित केले.

८ डिसेंबर  रोजी कोथरूड मध्ये  गांधी दर्शन शिबीर

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ८  डिसेंबर  २०२४ रोजी सकाळी साडेनऊ  ते सायंकाळी साडेपाच  या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या  सभागृहात हे शिबीर होणार आहे. गांधी पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमार प्रशांत  (जयप्रकाश व महात्मा गांधी  यांचे आंदोलन ),महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी  (गांधी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक), साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ (युवकांसमोरील आव्हाने) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे १६ वे शिबीर आहे. 
अधिक माहितीसाठी  एड.स्वप्नील तोंडे (९९२३५२३२५४) तेजस भालेराव (९१७२४८७०१९),सचिन पांडुळे (९०९६३१३०२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी दोनशे रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे .स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे युवक युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना प्रवेश शुल्क ऐच्छिक आहे.
समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे शिबिर आयोजित केले गेले आहे.या शिबिरात सत्य,अहिंसा,सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यासारख्या गांधीजींच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांवर सखोल चर्चा होईल.गांधीवादी विचारसरणी आजच्या जगातदेखील  कशी उपयुक्त ठरू शकते, यावर प्रकाश टाकला जाईल, त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.  

भाजपा नेता मोहित कंबोजची X वर जाहीर धमकी:गजाभाऊ नामक युझरला म्हणाले – कुठेही असला तरी उचलून आणणार;प्रत्युत्तर आले,’ बापाला सोबत घेऊन ये, मी पण वाट बघतोय…

मुंबई-भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गजाभाऊ यांना धमकी दिली आहे. कुठेही असला तरी, उचलून आणणार, अशी धमकी मोहित कंबोज यांनी गजाभाऊला दिली. तर मोहित कंबोज यांच्या धमकीचे आवाहन गजाभाऊने स्वीकारले आहे. येताना एकटा येऊ नकोस बापाला सोबत घेऊन ये, मी पण वाट बघतोय, असे प्रत्युत्तर गजाभाऊने दिले आहे. या दोघांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/mohitkamboj_/status/1863268323540283512

गजाभाऊ हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्याचे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 27 हजार फॉलोवर्स आहेत. गजाभाऊ सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधत असतो. तर मोहित कंबोज हे भाजप नेते असून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.

मोहित कंबोज यांनी गजाभाऊला उचलून नेण्याचा इशारा दिला आहे. तर गजाभाऊने देखील मोहित कंबोज यांचे आवाहन स्वीकारले आहे. येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये. मी पण वाट बघतोय, असे उत्तर गजाभाऊने दिले आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मोहित कंबोज यांच्या अकाउंटवरून धमकी देऊ नये, असे गजाभाऊने म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस ओरिजिनल अकाउंट येऊन धमकी दे, असल्या बाहेरच्या भैयाकडून धमक्या देऊ नकोस, असे ट्वीट केले आहे.

एका परप्रांतीयाने मराठी माणसाला धमकी दिल्यामुळे सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. सोशल मीडिया युजर्स गजाभाऊच्या समर्थनार्थ मोहित कंबोज विरोधात ट्वीट करत आहेत, तर मोहित कंबोज समर्थकांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या ईव्हीएमच्या महाघोटाळ्याबद्दल बोलत रहा, या सर्व गोष्टीवरून लक्ष हटविण्यासाठी भरपूर प्रयत्न करतील, असे आवाहन गजाभाऊने केले होते.

कोण आहे गजाभाऊ?

गत काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गजाभाऊ हे एक्स हँडल तुफान चर्चेत आहे. भाजप व महायुतीमधील घटक पक्षांवर टीका करत या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. ‘जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग’ असे या हँडलच्या बायोमध्ये नमूद आहे. हे एक व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.

मोहित कांबोज आणि देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांची जवळीक देखील X वर दिसून येते …

https://twitter.com/mohitkamboj_/status/1860251004505325866

वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ – आमदार हेमंत रासने.

देव दिवाळी व हेमंतभाऊ आमदार झाल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट तर्फे वैकुंठ स्मशानभूमीत साहित्य भेट – संदीप खर्डेकर.

पुणे-वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ असे सांगतानाच ” अधिकाऱ्यांनी येथे काय साहित्य व इतर सुधारणा करायच्या आहेत त्याची यादी त्वरित द्यावी ” अश्या सूचना नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी दिल्या.
आज देव दिवाळी च्या निमित्ताने आणि हेमंतभाऊ आमदार पदी निवडून आल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट च्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत विविध उपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,माजी नगरसेवक राजेश येनपुरे,ग्लोबल ग्रुप चे संजीव अरोरा, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे मनोज हिंगोरानी,मनपा विद्युत विभागाच्या प्रभारी मुख्य अभियंता मनीषा शेकटकर,उपअभियंता जयदीप अडसूळ,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त सतीश कोंढाळकर व विद्युतदाहिनीतील कर्मचारी उपस्थित होते.
आमचे स्नेही मित्र हेमंत रासने यांचा पोटनिवडणूकीतील पराभव जिव्हारी लागला होता असे संदीप खर्डेकर म्हणाले.
ही सल भरून निघाल्यावर फ्लेक्स लावून अभिनंदन करण्यापेक्षा लोकोपयोगी कार्य करून हेमंतभाऊंचे अभिनंदन करावे, शुभेच्छा द्याव्यात असा विचार करून आज देवदिवाळी च्या दिवशी वैकुंठ स्मशानभूमीत कपाट, टेबल खुर्च्या व इतर साहित्य भेट देताना मनस्वी आनंद होत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
वैकुंठात सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून मी ही मदत कार्य करत असतो मात्र संदीप खर्डेकर हे गेली पस्तीस वर्षे (35 ) वैकुंठात सेवाकार्य करत असतात याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो अश्या शब्दात हेमंत रासने यांनी क्रिएटिव्ह फौंडेशन चा गौरव केला. तसेच मनपा च्या अधिकारी मनीषा शेकटकर यांना ” रक्षा विसर्जनासाठीचा गाडा व अन्य आवश्यक साहित्य मी उपलब्ध करून देईन ” असे सांगतानाच, वैकुंठातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
भावी काळात शहरातील सर्वच स्मशानभूमीत जे जे साहित्य लागेल ते नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने देण्यात येईल असे मनोज हिंगोरानी व सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले तर सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन केले.

उपमुख्यमंत्रीपद : काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्याबदल्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार असून त्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगली होती. यावर खुद्द श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत सांगितले. श्रीकांत शिंदे यांच्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.

श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय पदाबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांना धोक्यांची जाणीव:त्यामुळेच त्यांनी होम मिनिस्ट्रीचा आग्रह धरला -रोहित पवार

भाजपचा शतप्रतिशतच्या दिशेने प्रवास

पुणे-काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भविष्यातील धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. भाजप यावेळी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

रोहित पवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचा दावा केला. भाजपकडून यंदा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत. त्यांचा अनुभवही मोठा आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल असा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांना भविष्यातील धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून निश्चितच फडणवीस यांच्यापेक्षा चांगले काम केले आहे.रोहित पवार पवार पुढे म्हणाले, आपल्या पक्षातील कोणत्या आमदाराला मंत्रीपदासाठी संधी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार त्या – त्या पक्षाच्या प्रमुखाच असतो. पण या ठिकाणी सर्वकाही दिल्लीचे नेते ठरवत आहेत. 2029 मध्ये शतप्रतिशत भाजप या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे मंत्रीही सध्या भाजपचेच लोक ठरवताना दिसून येत आहेत.

रोहित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 88.06, तर महायुतीचा 81 टक्के होता. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच हा रेट 30 टक्क्यांच्या आसपास होता. भाजपने या निवडणुकीत 100 आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील 95 निवडून आले. या निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. पण काही ठिकाणी ईव्हीएममध्ये फेरफार करून विजय मिळवल्याचे दिसून येत आहे. विशेषतः भाजपचे उमेदवार असलेल्या जागेवर 10 टक्के, तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे उमेदवार उभे असलेल्या जागेवर 8 टक्के फेरफार झाल्याचा अंदाज आहे.

सोलापूरच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान-सोलापूरच्या एका गावात बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. त्यातून सत्य परिस्थिती पुढे येईल. अन्यही काही ठिकाणी भाजप उमेदवारांना एकसमान मतदान झाले आहे. हा केवळ योगायोग नाही. त्यात काहीतरी गडबड आहे. काँग्रेस ईव्हीएमच्या मुद्यावर आता पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरे यांचा पक्षही या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेईल असे वाटते.

आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘क्षण प्रेमाचे..गोड गुलाबी आठवणींचे’…असं म्हणत या चित्रपटाचे रोमँटिक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.   

असं म्हणतात, ‘पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही,’  प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘इलू इलू’ हा चित्रपट प्रत्येकाला नक्कीच नॉस्टॅलजिक करेल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके व्यक्त करतात.    

वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे,  गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात असून हॉलीवूड आणि बॉलीवूड गाजवलेला एक लक्षवेधी चेहरा या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चेहरा नेमका कोणाचा? याचा उलगडा लवकरच होणार आहे.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

ॲक्सिस बँकेतर्फे  ‘हर राह दिल से ओपन’ चे अनावरण

ग्राहक संबंध उंचावण्यात 100,000 हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या भूमिकेची ओळख

 मुंबई२ डिसेंबर २०२४,: भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने त्यांच्या प्रसिद्ध ‘दिल से ओपन’ मोहिमेचा पुढचा भाग सादर केला आहे. हा नवीन टप्पा ‘हर राह दिल से ओपन’ या नावाने ओळखला जातो आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या 100,000 हून अधिक बँकर्सच्या समर्पणाला सलाम करतो. व्यवहार-केंद्रित बँकिंगच्या युगात ग्राहक-प्रथम दृष्टिकोन आणि नातेसंबंधांवर भर देणारी ही मोहीम 2019 मध्ये सुरू झाली होती. ‘दिल से ओपन’ तत्त्वज्ञानाचे मूल्य या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. आपलेपणाची भावना, सहानुभूती, दयाळूपणा आणि खुलेपणा ही ॲक्सिस बँकेची मूल्यं या मोहिमेतून बळकट होतात.

जनरेशन Z च्या डिजिटल-प्रथम आवडीनिवडींपासून भारत आणि शहरी समुदायांच्या विशिष्ट गरजांपर्यंत, 2024 ची ही मोहीम बँकेच्या मूलभूत मूल्यांना बदलत्या गतीशीलतेशी जुळवून घेताना दाखवते. नवीन मोहीम, ‘हर राह दिल से ओपन’ ही पाच फिल्म्सच्या माध्यमातून सादर केली गेली आहे. त्यात पगारदार, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, उच्च-मूल्य वर्गीय ग्राहक आणि भारतातील ग्राहक अशा वेगवेगळ्या ग्राहक गटांवर लक्ष केंद्रित केले आहे. या फिल्म्समध्ये ॲक्सिस बँकचे कर्मचारी 5,577 शाखांच्या विस्तृत जाळ्यामधून कार्यरत राहून ग्राहकांच्या विविध प्रकारच्या  आर्थिक गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कसे कटिबद्ध आहेत हे दाखवले आहे. ही मोहिम सिटी बँकेच्या एकत्रीकरणामुळे मजबूत झालेल्या ॲक्सिस बँकेच्या कार्यशक्तीचाही उत्सव साजरा करते. त्यामुळे बँकेची ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याची क्षमता वाढली आहे.

या घोषणेबाबत बोलताना ॲक्सिस बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर राजीव आनंद म्हणाले,  “आम्ही नेहमीच आमच्या मूल्यांशी बांधील असलेली संस्था म्हणून कार्यरत आहोत. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनासाठी असलेली आमची कटिबद्धता आमच्या अद्वितीय मूल्य प्रस्तावाचा आधार आहे. आपण सतत बदलत्या आणि आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात प्रवास करत असताना कितीही परिक्षेत्र बदलले तरी ग्राहकांना प्रथम स्थान देणारी संस्थाच नेहमी सुसंगत राहील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे.”

या मोहिमेबद्दल प्रतिक्रिया देताना ॲक्सिस बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुप मनोहर म्हणाले, “आमची ‘दिल से ओपन’ मोहीम, ‘हर राह दिल से ओपन’ ही आमच्या बँकेला आकार देणाऱ्या मूल्यांचा आणि आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ग्राहकांप्रति असलेल्या बांधीलकीचा उत्सव आहे. ॲक्सिस बँकेत आम्हाला विश्वास आहे की बँकिंग म्हणजे केवळ व्यवहार नाही तर ही गोष्ट मानवी संबंधांबद्दल आहे. आमच्यापैकी बरेचसे बँकर्स ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी अखंडपणे, पडद्यामागे राहून काम करतात. सध्याच्या जगात तंत्रज्ञान सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी असताना, महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना आमची कार्यशक्ती हीच खरा बदल घडवते यावर आमचा विश्वास आहे.”

जसजसे बँकिंग क्षेत्र बदलत आहे आणि ग्राहकांच्या अपेक्षा विकसित होत आहेत, तसतसे ॲक्सिस बँकेचे ‘दिल से ओपन’ तत्त्वज्ञान उत्कृष्ट ग्राहक अनुभवाच्या मुळाशी अर्थपूर्ण मानवी संबंध महत्त्वाचे असतात या विश्वासाला मजबूत करत आहे.

ही मोहीम लोवे लिंटास यांनी संकल्पित केली असून ती टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर चालवली जाईल.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचा ‘सल्लागार स्टॅक’ ICICI Pru Edge ने एजंट उत्पादकतेत 37% ची वाढ केली

·      व्यापक ग्राहक आधारापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेमुळे उच्च कमाई वाढवते

·      भागीदारीसाठी कंपनीला सर्वोत्तम जीवन विमा कंपनी म्हणून स्थान देते

·      98.1% पात्र सल्लागार त्याच दिवशी स्टॅक सशुल्क कमिशन वापरतात

·      अंदाजे 61% शीर्ष सल्लागार स्टॅकचे सक्रिय वापरकर्ते आहेत

·      ग्राहकांना पेपरलेस खरेदी प्रवास ऑफर करण्यासाठी सल्लागारांना सक्षम करते

मुंबई, 2 डिसेंबर, 2024: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने ऑफर केलेला IPRU Edge, एक सर्वसमावेशक ‘सल्लागार स्टॅक’ मुळे H1-FY2025 मध्ये एजंट उत्पादकतेत 37% वाढ झाली आहे, परिणामी त्यांची कमाई वाढली आहे.

‘ॲडव्हायझर स्टॅक’ कंपनीच्या 2 लाख एजंट्सच्या सल्लागार नेटवर्कला त्यांचा व्यवसाय कार्यक्षमतेने वाढवण्यासाठी, ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी आणि वर्धित ग्राहक अनुभव देण्यासाठी सक्षम करते. विशेष म्हणजे, ~61% कंपनीचे शीर्ष स्तरावरील सल्लागार आता स्टॅकचे सक्रिय वापरकर्ते आहेत, त्यांच्यासाठी व्यवसायाच्या यशाचे मुख्य सक्षमकर्ता म्हणून त्यांची भूमिका अधिक भक्कम होते.

IPRU Edge, हे सहज जाता-जाता काम करण्यासारखे आहे. जे एजंटना प्रशासकीय गोष्टींमध्ये अडकवण्यापेक्षा नवीन ग्राहक संपादनांवर प्रयत्न केंद्रित करण्यास सक्षम करतात. नवीन व्यवसाय लीड्समध्ये एजंट प्रवेश मिळवतात, सोशल मीडियाद्वारे मागणी निर्माण करतात आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करतात. तसेच, ते त्यांना त्यांचा व्यवसाय आणि कमाई पाहण्यास सक्षम करते. IPRU Edge द्वारे मिळालेले हे समर्थन कंपनीला सल्लागारांसाठी भागीदारी करण्यासाठी सर्वोत्तम जीवन विमा कंपनी म्हणून स्थान देते.

OCR तंत्रज्ञानासह एम्बेड केलेला सल्लागार स्टॅक, रिअल-टाइम केवायसी प्रमाणीकरणासह पेपरलेस प्रवास सुलभ करतो ज्यामुळे कार्यक्षमता वाढते. हे लहान शहरे आणि खेड्यांमधील एजंटना मोठ्या प्रमाणात मदत करते. परिणामी, ते त्यांना ग्राहकांना त्रास-मुक्त अनुभव देतात.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे उत्पादन आणि विपणन प्रमुख श्रीनिवास बालसुब्रमण्यन म्हणाले, “ॲडव्हायझर स्टॅक किंवा आयपीआरयू एज आमच्या सल्लागार नेटवर्कला शक्तिशाली टूल्स आणि वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश देते ज्यामुळे त्यांना प्रशासकीय कामकाजाऐवजी महसूल निर्मितीच्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत होते. स्टॅक सल्लागारांना नवीन व्यवसायात लॉग इन करण्यास मदत करते, त्यांना आघाडीच्या संधी, मागणी निर्माण करणे, ग्राहक सेवा काही पर्यायांची नावे देण्यास मदत करते.

आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की, IPRU Edge वापरणाऱ्या सल्लागारांनी H1-FY2025 मध्ये रिटेल वेटेड प्राप्त प्रीमियममध्ये एजन्सी चॅनेलच्या योगदानामध्ये उत्पादनात 37% वाढ आणि वार्षिक 49% वाढ दर्शविली आहे.

निवडक सल्लागारांना त्याच दिवशी कमिशन देणारी आमची देशातली पहिली जीवन विमा कंपनी आहे. उल्लेखनीय म्हणजे, IPRU Edge वापरणाऱ्या पात्र एजंटांपैकी 98.1% यांना त्याच दिवशी कमिशन दिले गेले.

सर्वात वितरक-अनुकूल जीवन विमा कंपनी बनण्यासाठी, आम्ही तंत्रज्ञान उपाय लागू केले आहेत, ज्यामुळे आम्ही अंदाजे 50% पॉलिसी जारी करण्यात सक्षम झालो आहोत. H1-FY2025 मध्ये व्यवसायाच्या बचत लाइनसाठी पहिल्याच दिवशी एवढ्या पॉलिसी काढण्यात आल्या.

सल्लागार स्टॅक एजंट्सना विविध ग्राहक सेवा व्यवहार करण्यास अनुमती देतो जे ग्राहकांना सोयी प्रदान करते आणि एजंटना दीर्घकालीन मजबूत संबंध निर्माण करण्यास मदत करते.”

श्रीश्रीनिवास शेवटी म्हणाले, “याच कालावधीत आयपीआरयू एज वापरणाऱ्या सल्लागारांचे 13व्या आणि 25व्या महिन्यातील चिकाटीचे प्रमाण अनुक्रमे 91.7% आणि 89.6% होते. एकूण एजन्सी चॅनेल 13व्या आणि 25व्या महिन्याच्या सातत्य गुणोत्तरांच्या तुलनेत हे जास्त आहे जे अनुक्रमे 90.0% आणि 86.7% होते.

आम्हाला विश्वास आहे की, IPRU Edge चे यश हे कंपनीच्या सल्लागारांना विम्याच्या गरजा पूर्ण नसलेल्या उद्योगात भरभराटीसाठी सर्वोत्तम-इन-क्लास साधने आणि तंत्रज्ञान प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

सल्लागार स्टॅक प्रशिक्षण आणि विकासासाठी एक आवश्यक व्यासपीठ म्हणून देखील कार्य करते, सल्लागारांना प्रक्रिया आणि उत्पादन ऑफरशी संबंधित विशेष सामग्रीचा फायदा होतो. शिकण्यावर सतत हा फोकस ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज राहण्याची खात्री देतो. जलद डिजिटलायझेशनमुळे प्रक्रिया सुलभ करणाऱ्या, कार्यक्षमतेत सुधारणा करणाऱ्या आणि आमच्या सल्लागारांना वेगळा दृष्टिकोन प्रदान करणाऱ्या साधनांची वाढती गरज आहे.

IPRU Edge आमच्या सल्लागारांना यासह समर्थन देते:

·         नवीन व्यवसाय:

·                     व्यवसाय आणि सेवा दोन्ही संधींसाठी लीडसह मदत करते

·                     सानुकूलित उत्पादन सामग्री पोस्ट करून सोशल मीडियाद्वारे मागणी निर्माण करण्याची संधी प्रदान करते

·                     नवीन व्यवसाय लॉगिनसह सल्लागार कार्यक्षमतेत सुधारणा करते – इश्यूअन्सचा मागोवा घेणे सुरू करा

·                      सल्लागाराची क्षमता निर्माण करते – महसूल व्युत्पन्न करणाऱ्या घडामोडींमध्ये वेळ घालवते

·         स्वयंसेवा :

·                     व्यवसाय आणि कमाईचे विहंगावलोकन देते

·                     डिजिटल बिझनेस कार्ड तयार करण्याची सुविधा देते

·                      बक्षिसे आणि ओळख याविषयी माहिती देते

·         ग्राहक सेवा:

·                     सल्लागारांना शेअर पर्यायासह क्लायंट-स्तरीय पोर्टफोलिओचे सर्वसमावेशक दृश्य मिळते

·                     नूतनीकरण प्रीमियम पेमेंटसाठी स्मरणपत्रे ग्राहकांसोबत पेमेंट लिंक शेअर करण्याच्या पर्यायासह

·                     पॉलिसी दस्तऐवज, टॅक्स स्टेटमेंट, फंड व्हॅल्यू, स्विचिंग इत्यादी स्टेटमेंटसह जाता-जाता सेवा प्रदान करते.

·                      ‘माय टास्क’ टॅब वापरून कार्ये व्यवस्थापित करण्याचा पर्याय ग्राहक संवाद आणि प्रतिबद्धता प्रभावीपणे सक्षम करते

ॲप आता iOS आणि Android दोन्ही उपकरणांवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सर्व विमा सल्लागारांना हे विनामूल्य आहे, तसेच ज्यांना त्यांच्या सेवा ऑफर आणखी वाढवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रीमियम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.