ग्राहक संबंध उंचावण्यात 100,000 हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या भूमिकेची ओळख
मुंबई२ डिसेंबर २०२४,: भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने त्यांच्या प्रसिद्ध ‘दिल से ओपन’ मोहिमेचा पुढचा भाग सादर केला आहे. हा नवीन टप्पा ‘हर राह दिल से ओपन’ या नावाने ओळखला जातो आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या 100,000 हून अधिक बँकर्सच्या समर्पणाला सलाम करतो. व्यवहार-केंद्रित बँकिंगच्या युगात ग्राहक-प्रथम दृष्टिकोन आणि नातेसंबंधांवर भर देणारी ही मोहीम 2019 मध्ये सुरू झाली होती. ‘दिल से ओपन’ तत्त्वज्ञानाचे मूल्य या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. आपलेपणाची भावना, सहानुभूती, दयाळूपणा आणि खुलेपणा ही ॲक्सिस बँकेची मूल्यं या मोहिमेतून बळकट होतात.
जनरेशन Z च्या डिजिटल-प्रथम आवडीनिवडींपासून भारत आणि शहरी समुदायांच्या विशिष्ट गरजांपर्यंत, 2024 ची ही मोहीम बँकेच्या मूलभूत मूल्यांना बदलत्या गतीशीलतेशी जुळवून घेताना दाखवते. नवीन मोहीम, ‘हर राह दिल से ओपन’ ही पाच फिल्म्सच्या माध्यमातून सादर केली गेली आहे. त्यात पगारदार, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, उच्च-मूल्य वर्गीय ग्राहक आणि भारतातील ग्राहक अशा वेगवेगळ्या ग्राहक गटांवर लक्ष केंद्रित केले आहे. या फिल्म्समध्ये ॲक्सिस बँकचे कर्मचारी 5,577 शाखांच्या विस्तृत जाळ्यामधून कार्यरत राहून ग्राहकांच्या विविध प्रकारच्या आर्थिक गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कसे कटिबद्ध आहेत हे दाखवले आहे. ही मोहिम सिटी बँकेच्या एकत्रीकरणामुळे मजबूत झालेल्या ॲक्सिस बँकेच्या कार्यशक्तीचाही उत्सव साजरा करते. त्यामुळे बँकेची ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याची क्षमता वाढली आहे.
या घोषणेबाबत बोलताना ॲक्सिस बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर राजीव आनंद म्हणाले, “आम्ही नेहमीच आमच्या मूल्यांशी बांधील असलेली संस्था म्हणून कार्यरत आहोत. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनासाठी असलेली आमची कटिबद्धता आमच्या अद्वितीय मूल्य प्रस्तावाचा आधार आहे. आपण सतत बदलत्या आणि आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात प्रवास करत असताना कितीही परिक्षेत्र बदलले तरी ग्राहकांना प्रथम स्थान देणारी संस्थाच नेहमी सुसंगत राहील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे.”
या मोहिमेबद्दल प्रतिक्रिया देताना ॲक्सिस बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुप मनोहर म्हणाले, “आमची ‘दिल से ओपन’ मोहीम, ‘हर राह दिल से ओपन’ ही आमच्या बँकेला आकार देणाऱ्या मूल्यांचा आणि आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ग्राहकांप्रति असलेल्या बांधीलकीचा उत्सव आहे. ॲक्सिस बँकेत आम्हाला विश्वास आहे की बँकिंग म्हणजे केवळ व्यवहार नाही तर ही गोष्ट मानवी संबंधांबद्दल आहे. आमच्यापैकी बरेचसे बँकर्स ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी अखंडपणे, पडद्यामागे राहून काम करतात. सध्याच्या जगात तंत्रज्ञान सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी असताना, महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना आमची कार्यशक्ती हीच खरा बदल घडवते यावर आमचा विश्वास आहे.”
जसजसे बँकिंग क्षेत्र बदलत आहे आणि ग्राहकांच्या अपेक्षा विकसित होत आहेत, तसतसे ॲक्सिस बँकेचे ‘दिल से ओपन’ तत्त्वज्ञान उत्कृष्ट ग्राहक अनुभवाच्या मुळाशी अर्थपूर्ण मानवी संबंध महत्त्वाचे असतात या विश्वासाला मजबूत करत आहे.
ही मोहीम लोवे लिंटास यांनी संकल्पित केली असून ती टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर चालवली जाईल.