मुंबई-भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गजाभाऊ यांना धमकी दिली आहे. कुठेही असला तरी, उचलून आणणार, अशी धमकी मोहित कंबोज यांनी गजाभाऊला दिली. तर मोहित कंबोज यांच्या धमकीचे आवाहन गजाभाऊने स्वीकारले आहे. येताना एकटा येऊ नकोस बापाला सोबत घेऊन ये, मी पण वाट बघतोय, असे प्रत्युत्तर गजाभाऊने दिले आहे. या दोघांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
गजाभाऊ हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्याचे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 27 हजार फॉलोवर्स आहेत. गजाभाऊ सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधत असतो. तर मोहित कंबोज हे भाजप नेते असून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.
मोहित कंबोज यांनी गजाभाऊला उचलून नेण्याचा इशारा दिला आहे. तर गजाभाऊने देखील मोहित कंबोज यांचे आवाहन स्वीकारले आहे. येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये. मी पण वाट बघतोय, असे उत्तर गजाभाऊने दिले आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मोहित कंबोज यांच्या अकाउंटवरून धमकी देऊ नये, असे गजाभाऊने म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस ओरिजिनल अकाउंट येऊन धमकी दे, असल्या बाहेरच्या भैयाकडून धमक्या देऊ नकोस, असे ट्वीट केले आहे.
एका परप्रांतीयाने मराठी माणसाला धमकी दिल्यामुळे सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. सोशल मीडिया युजर्स गजाभाऊच्या समर्थनार्थ मोहित कंबोज विरोधात ट्वीट करत आहेत, तर मोहित कंबोज समर्थकांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या ईव्हीएमच्या महाघोटाळ्याबद्दल बोलत रहा, या सर्व गोष्टीवरून लक्ष हटविण्यासाठी भरपूर प्रयत्न करतील, असे आवाहन गजाभाऊने केले होते.
कोण आहे गजाभाऊ?
गत काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गजाभाऊ हे एक्स हँडल तुफान चर्चेत आहे. भाजप व महायुतीमधील घटक पक्षांवर टीका करत या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. ‘जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग’ असे या हँडलच्या बायोमध्ये नमूद आहे. हे एक व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.
मोहित कांबोज आणि देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांची जवळीक देखील X वर दिसून येते …