Home Blog Page 3601

दक्षिणात्य निधीची मराठीत धम्माल

0

 

मराठी चित्रपटसृष्टीतल्या आमुलाग्र बदलांनी इतर भाषिक प्रेक्षकानांही आपल्याकडे आकर्षित केले आहे. अभिनय आणि कलागुणांना नेहमीच अग्रगण्य स्थान देणाऱ्या मराठी चित्रसृष्टीत अमराठी कलाकारांचा सातत्याने वावर आढळतो. मराठी चित्रपटक्षेत्रात येणाऱ्या या कलावंतांमध्ये आत्ता आणखी एक नाव नोंदवले जाणार आहे. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री निधी ओझा हिची आत्ता मराठीत एन्ट्री होत असून ‘टाईम बरा वाईट’ या चित्रपटात तिच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळणार आहे.

 

घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच कधी चांगल्या तर कधी वाईट वेळेशी सामना करावा लागला आहे. धावपळीच्या दुनियेत वेळेचे महत्त्व कुणालाच टाळता येत नाही. हाच धागा पकडत ‘टाईम बरा वाईट’ हा नवा अॅक्शनपट येत आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिध्द संकलक राहुल भातणकर यांनी या चित्रपटाद्वारा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

 

नेहमीच्या परिघाबाहेरील वेगळा कथाविषय ‘टाईम बरा वाईट’ सिनेमात प्रेक्षकांना पहाता येणार असून मराठीतील अनेक मातब्बर कलाकार यात एकत्र आले आहेत. ‘वी. आर. जी. मोशन पिक्चर्स’ निर्मितीसंस्थेचे विजय गुट्टे प्रस्तुत आणि बाहुल चौधरी, अनुराग श्रीवास्तव सहनिर्मित या चित्रपटात आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, भूषण प्रधान, सतीश राजवाडे, निधी ओझा, सिद्धार्थ बोडके, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. १९ जूनपासून ‘टाईम बरा वाईट’ सर्वांच्या मनोरंजनास सज्ज आहे.

तर… अर्धी मुंबई जळाली असती …?

0
मुंबई- ‘एचपीसीएल’च्या तेल पाइपलाइनला शनिवारी सायंकाळी लागलेली आग आटोक्यात आणण्यात मुंबई अग्निशमन दलाला रविवारी सकाळी यश आले. ही आग शेजारीच असलेल्या अन्य तेल कंपन्यांच्या इंधन टाक्यांपर्यंत पसरली असती तर चक्क अर्धी मुंबई जळाली असती, अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.  या आगीत पाइपलाइनमधील ७० हजार लिटर पेट्रोल मात्र तेल कंपन्यांच्या तंत्रज्ञांना आग लागलेली पाइपलाइन इतर पाइपलाइनपासून वेगळी करण्यात यश आले. मात्र, पाइपलाइन पूर्ण पेट्रोलने भरलेली असल्यामुळे काही केल्या आग विझत नव्हती. शिवडी-वडाळा परिसरात मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) आहे. येथे इंडियन ऑॅइल, भारत पट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मोठमोठ्या इंधन टाक्या आहेत. आग पसरून या इंधन टाक्यांपर्यंत पोहोचली असती, तर सीएसटीपर्यंतची मुंबई जळाली असती, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी सांगितले.
आग इतकी मोठी होती की पोर्ट ट्रस्टच्या परिसरातील एक किमीच्या परिघातील तिवरांना (मँग्रोव्ह) आग लागल्याचे रविवारी सकाळी दिसून आले. सुमारे १३ तास भडकणाऱ्या या आगीत पाइपलाइनमधील ७० हजार लिटर पेट्रोल जळाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शनिवारी शिवडीजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम चालू होते. सदर काम चालू असताना सायंकाळच्या सुमारास आग लागली. ‘एचपीसीएल’ला आग आटोक्यात आणता आली नाही. त्यानंतर बीपीसीएल कंपनीची मदत घेण्यात आली, परंतु आग वाढतच गेली. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.
पेट्रोलच्या पाइपलाइनची आग विझत नसल्याने ती विझविण्यासाठी फोम टेंडर्सचा वापर करण्यात आला. तेलकणांभोवती फोमचे अावरण तयार होऊन त्यांचा ऑक्सिजनशी संपर्क तुटतो म्हणून तेलविहिरींच्या आगीत फोम वापरतात.

मॅगी नकोच – दारू , तंबाखू बिनधास्त घ्या । अजब सरकारचा गजब खुलासा

0
नवी दिल्ली-
मॅगी आरोग्याला अपायकारक आहे म्हणून मॅगीवर बंदी घातली , दारू , सिगारेट -तंबाखू , पानमसाला याचे काय ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित झाल्यानंतर अजब सरकारने गजब खुलासा अन्न सुरक्षा व दर्जा नियंत्रण प्राधिकरणाचे मार्फत केला आहे दारू, पान  मॅगी, सुपारीसारखे पदार्थ त्यावरील धोक्याच्या वैधानिक इशाऱ्यामुळे असुरक्षित मानण्याचे कारण नाही, असे अन्न सुरक्षा व दर्जा नियंत्रण प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) म्हणणे आहे. शिवाय आता दारूच्या जाहिरातीही बिनदिक्कतपणे सुरु झाल्या आहेत
.तंबाखू, दारूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असते, हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरजच नसल्याची भूमिका आता घेतली जात आहे.
सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड्स रेग्युलेशन २०१५ अंतर्गत तयार केलेल्या प्रस्तावात वैधानिक इशारा हा धोका नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले असून, त्यावर लोकांची मते मागवली आहेत. मॅगीतील घटक व दर्जावरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एफएसएसएआयन हा ‘सुरक्षे’चा नवा प्रस्ताव तयार केला आहे. दर्जावरून, वा पदार्थातील घटकांमुळे जिवाला धोका असण्याची भीती असल्यास संबंधित उत्पादन परत मागवण्याची कायदेशीर तरतूद असते. त्यादृष्टीनेच या इशाऱ्याबाबत पुनर्स्पष्टीकरण करण्यात येणार आहे. संबंधित उत्पादन परत मागवताना उत्पादित झालेला लॉट, बॅच किंवा कोडचा विचार केला जातो. माल परत घेण्याची जबाबदारी उत्पादकाची असते, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.

दारू पिवून बड्या बड्या लोकांनी केलेले अपघात – दारूने बडा -छोटा अशा सर्वांचीच उध्वस्त केलेली संसारे ; तंबाखूने राष्ट्रवादी च्या नेत्याचा घेतलेला बळी , अशा सर्व गोष्टी जगजाहीर असताना या उत्पादनांवर जर बंदी आणली जात नाही तर केवळ रामदेवबाबांना  संधी मिळावी नव्या उत्पादनाची म्हणून मॅगीवर बंदी घातली गेली आहे काय ? असा सवाल आता जनतेच्या मनात तग धरू लागला आहे

नाशिक मध्ये वृत्तपत्राच्या कार्यालयात घुसून पत्रकाराला मारहाण

0

नाशिक: येथील  ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राच्या कार्यालयावर चार ते पाच अज्ञातांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार संदीप जाधवला बेदम मारहाण करण्यात आली.अवैध धंद्यांच्या विरोधात बातमी दिल्याचा रागातून हा हल्ला करण्यात आला आहे

या मारहाणीत संदीप जाधव जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.नाशिकमधील दिवसेंदिवस वाढते अवैध धंदे याबाबत वृत्त देण्यात आलं होतं. यामुळे चिडून अवैध धंदे असणाऱ्या काही समाजकंटकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला

वादग्रस्त ललित मोदी प्रकरण – ‘चाहिये ती इस्तीफा दे दु ? या सवालानंतर भाजपा सुषमा स्वराजांच्या पाठीशी …

0

नवी दिल्ली
-वादग्रस्त ललित मोदीला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी आपण मानवतावादी भूमिकेतून ललितला मदत करण्याचे कबुल केले आणि सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत फोनवर चर्चा करताना मंत्रिपदाच्या राजीनाम्याची तयारीही दर्शविल्याचे वृत्त आहे .त्यानंतर  गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे सुषमा यांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, काँग्रेसने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजवर इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) चे माजी कमिशनर ललीत मोदी यांना मदत केल्याचा आरोप आहे. ईडीचे आरोपी ललीत मोदी यांना सुषमा स्वराज मदत करत आहेत. या संबंधी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने ईमेल आणि कागदपत्रे असल्याचाही दावा केला आहे. ललीत मोदी यांना ब्रिटनमधून बाहेर काढण्यासाठी सुषमा स्वराज यांनी स्वतः मदत करण्याचा प्रयत्न केला होता. २०१३ मध्ये लोकसभेत अपक्ष नेतेपदी असताना सुषमा स्वराज यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या ब्रिटनमधील प्रवेशासाठी ललीत मोदी यांची मदत घेतली होती, आणि त्याच्या बदल्यात त्यांनी ललीत मोदी यांची मदत केल्याचा आरोप करण्यात  आला.

ललीत मोदी यांच्याशी असलेल्या  संबधांची बातमी बाहेर येताच अपक्षाकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आणि काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, सुषमा स्वराज यांनी ललीत मोदी यांना मदत करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी जोरदार मागणी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वराज यांनी फोनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून आपल्या राजीनाम्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, सुषमा स्वराज यांनी जे केलं ते योग्य होतं आणि मला ते योग्यच वाटतं. सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना केलेली मदत ही मानवतावादी दृष्टिकोनातून केलेली मदत होती.

 

माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घरावर छापे …

0

मुंबई –   माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरांवर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत देशपांडे यांच्या घरातून कोट्यावधींचा ऐवज हाती लागला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  (एसीबी) अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे . शनिवारी सायंकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीने आपली कारवाई  एसीबीचे अतिरिक्त आयुक्त किशोर जाधव यांच्या नेतृत्वाखील ही कारवाई तीव्र केली आहे. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते आणि त्यांचे नावही या घोटाळ्याशी जोडले गेले होते. त्यामुळेच एसीबीने त्यांच्या घरांवर छापा टाकला आहे.पोलिसांनी मुंबई आणि औरंगाबादमधील घरांची झडती घेतली असता त्यात दीड किलो सोने, २७ किलो चांदी, २.५ कोटी रुपयांचे फिक्स डिपॉजिट आणि बॉन्ड्स, अनेक गुंतवणूक कंपन्यांचे ६ हजार शेअर्स असा ऐवज देशपांडेंकडे असल्याचे उघड झाले.
देशपांडे यांच्या घरातून सापडलेल्या ऐवजाशिवाय त्यांची मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबादमध्ये आणखीही मालमत्ता आहे. दोन दुकाने, पुणे आणि औरंगाबादमध्ये पाच एकर जमीन त्यांच्या नावावर आहे, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्रातील कित्येक मोठे प्रकल्प जसे पुणे सातारा रस्त्यावरील खंबाटकी टोल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई अहमदाबाद गोल्डन कबॉड्रंगल चारपदरी रस्त्याचे काम, वरळी बांद्रा सिलिंकचे प्रशासन अशी कामं त्यांनी केली आहेत. देशपांडे त्यांची १५ ऑक्टोबर, २०१० पासून राज्य माहिती आयुक्त या पदावर नियुक्ती झाली असून ते औरंगाबाद विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत.
दरम्यान, देशपांडे यांच्यावरील कारवाईने भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्या असल्याचे मानले जाते देशपांडे यांच्या घरात महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

दादा कोंडकेंवर चित्रपट काढायला निघालेल्या अक्षयकुमारला -उषा चव्हाणांचा सज्जड ईशारा

0
खरे तर दादा कोंडके यांच्यासारखा  सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द ,, दादांनी प्रेक्षकांना हसव हसव हसविले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडविले देखील … त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे  दादा कोंडके सारखे कलावंत मात्र नाहीत . आणि सध्याच्या युगात अशा…  दादा कोंडके यांचे एकटा  जीव सदाशिव , सोंगाड्या, रामराम गंगाराम , पांडू हवालदार । असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत ,जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट -गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके नावाची गाथा कोणी बंदच करून ठेवली आहे एका महान मराठी कलावंताची मृत्युनंतरही कशी शोकांतिका होवू शकते तेच यातून दिसते आहे .

‘७२मैल : एक प्रवास’ या चित्रपटाद्वारे मराठीत पाऊल ठेवलेला बाॅलीवूडचा अभिनेता अक्षयकुमार अाता दिवंगत अभिनेते दादा काेंडके यांच्या अायुष्यावर अाधारित ‘दादा’ हा चित्रपट काढू इच्छित आहे संजय जाधव यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी दिल्याचे वृत्त अाहे. पण  अभिनेत्री उषा चव्हाण यांनी या निर्मितीवर अाक्षेप घेतला अाहे. जानेवारी २०१६ मध्ये  हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे अक्षयने ट्विटरवरून जाहीर केले होते . अक्षयच्या ‘गेझिंग गोट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात सध्या संहितेवर काम सुरू आहे. पण दुसरीकडे ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ने ‘दादा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांसह संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. दादांच्या नावावर अथवा जीवनावर चित्रपट काढण्याचा अधिकार फक्त प्रतिष्ठानला आहे, असे ट्रस्टच्या विश्वस्त उषा चव्हाण यांनी म्हटले आहे. कुणाला अशा स्वरूपाचा चित्रपट करायचा असेल, तर त्यांनी आधी ट्रस्टची रीतसर लेखी परवानगी घेतली पाहिजे अन्यथा ते गुन्हेगारी कृत्य ठरेल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्रातील तरतुदींनुसार १९९८ मध्ये दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. वसंत भालेकर, उषा चव्हाण, संग्राम शिर्के, हृदयनाथ कडू देशमुख, अफरिन चौगुले, सायली वडारकर आणि ललिता वाकणकर हे ट्रस्टचे विश्वस्त आहेत. दादांच्या मृत्युपत्रातील पान क्रमांक १३ अन्वये दादांच्या जीवनावर वा चरित्रावर चित्रपट काढण्याचे सर्व अधिकार ट्रस्टकडे आहेत. त्यामुळे अक्षयकुमार तसेच अश्विनी यार्दी यांनी ज्या ‘दादा’ चित्रपटाची घोषणा केली आहे, ती बेकायदेशीर आहे. त्यांना तसे करण्याचे अधिकार नाहीत. चित्रपट काढायचाच असेल, तर तशी रीतसर परवानगी त्यांना ट्रस्टकडून घ्यावी लागेल अन्यथा हे गुन्हेगारी कृत्य ठरेल, अशी स्पष्ट भूमिका उषा चव्हाण यांनी मांडली आहे.
 दादांच्या नावाचे भांडवल करून कोट्यवधी कमावणाऱ्यांना ट्रस्टतर्फे कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ट्रस्टशिवाय कोणालाही दादांवर चित्रपट काढण्याचा अधिकार नाही. अक्षयकुमार, अश्विनी यार्दी यांना असे कुठलेही अधिकार नाहीत.अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे वृत्त आहे 

गजेंद्र चव्हाणांच्या निवडीने एफ टी आय मध्ये राजकीय हस्तक्षेप

0

पुणे-  फिल्म टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय)  अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची सरकारने नियुक्ती केली आहे. मात्र,  एफटीआयआयच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. गजेंद्र यांच्या निवडीला  विद्यार्थ्यांनी निषेध केला असून त्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.
गजेंद्र हे भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत, त्यामुळे गजेंद्र चौहानांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. जो कधीही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. गजेंद्र चौहान यांनी कलाकार म्हणून महाभारत मालिकेत युधिष्ठीर ची भुमिका साकारली होती. अनेक मालिकांतून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिकाही साकारल्या आहेत. त्यानंतर २००४ पासून ते भाजपचे पूर्णवेळ सदस्य झाले त्यामुळे यापूर्वी विख्यात कलाकारांनी भुषवलेल्या एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची गरिमा सरकार गजेंद्र चौहान यांची राजकीय नियुक्ती करुन खराब करत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
एफटीआयच्या अध्यक्षपदी गीतकार गुलझार, दिग्दर्शक शाम बेनेगल आणि अधूर गोपालकृष्णन यांची नावेही चर्चेत होती.

“इंटरनॅशनल पार्लमेंटरी फोरम’च्या “नवीनीकरणीय उर्जा’ चर्चासत्रात खासदार वंदना चव्हाण यांचा सहभाग

0
पुणे :
“इंटरनॅशनल पार्लमेंटरी फोरम ‘आयोजित “नवीनीकरणीय उर्जा’ या लुक्रेन स्विर्त्झर्लंड येथील चर्चासत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष ऍड. वंदना चव्हाण सहभागी झाल्या आहेत. जगभरात “नवीनीकरणीय ऊर्जा’ (रिन्युएबल एनर्जी) वापर वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारांना एकत्रित कोणते प्रयत्न करता येतील, या बद्दल या परिषदेत उहापोह होत आहे.
“भारत’, “युरोप’, “आफ्रिका’, “चीन’, “पाकिस्तान’, “मध्य पूर्व, बांग्लादेश’ अशा एकूण वीस देशांतून संसद सदस्य सहभागी झाले आहे. भारतातून डॉ. संजय जयस्वाल, ऍड. वंदना चव्हाण, ए. यू. सिंग, आनंद भास्कर कोपलू, उपेंद्र त्रिपाठी (केंद्रीय सचिव) सहभागी झाले आहेत.
12 आणि 13 जून रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आंध्रात बस नदीत पडून 21 भाविक ठार

0
हैदराबाद – देवदर्शनाहून परतणारी भाविकांची बस गोदावरी नदीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 21 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 9 मुलांचा समावेश आहे. विशाखापट्टणजवळ आज सकाळी हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, विशाखापट्टणम्‌ जिल्हयातील अच्युतापुरम्‌ गावातील काही भाविक खासगी बसने तिरूपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. दर्शनानंतर गावाकडे परतत असताना राजामंदुरीजवळ या बसला अपघात घडला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस देवालेश्वरम्‌ पुलावरून गोदावरी नदीत कोसळली. त्यात 21 भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या बचावपथकाने एका मुलाला वाचविण्यात यश मिळविले.

वंदना चव्हाणांवर टीकास्त्र सोडत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित बाबर यांचा राजीनामा – राष्ट्रवादी मध्ये खळबळ

0
पुणे-राष्ट्रवादीच्या , विद्यमान अध्यक्षा  माजी महापौर खा. अॅड. वंदना चव्हाण  यांच्या वर घण घणाती आरोप करीत् शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित बाबर यांनी शुक्रवारी राजीनामा दिला.पर्यावरण प्रेमी आणि प्रामाणिक अशी प्रतिमा असलेल्या वंदना चव्हाणांवर अशा रीतीने आरोप झाल्याने राष्ट्रवादी आणि एकूणच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . याबाबत अंकुश काकडे आणि सुभाष जगताप , महापौर धनकवडे तसेच प्रकाश कदम अश्विनी कदम अप्पा रेणुसे , विशाल तांबे आदी नेत्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही
 दरम्यान
किती आले
प्रतिगाम्यांचे वादळ
तरी डगमगणार नाही …
सिंहाने दोन पाऊले मागे घेतली तर याचा अर्थ सा नाही की त्याने माघार घेतली…याउलट जेव्हा तो अति आक्रमक पवित्रातअसतो तेव्हा तो झङप टाकतो…”हे विरोधकांनी लक्षात ठेवावे”
अशा प्रकारची आव्हाने  बाबर यांच्या कार्यकर्त्यांच्या नावे सोशल मिडिया द्वारे वंदना चव्हाण यांना दिली जात असल्याचे वृत्त आहे
बाबर यांच्या जागेवर यापूर्वीही अन्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला गेला; पण वरिष्ठ नेत्यांनीच त्यावेळी त्यांची पाठराखण केली होती.
गेल्या दोन वर्षांपासून बाबर युवक राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी कार्यरत आहेत. मध्यंतरी त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती; पण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यात हस्तक्षेप केल्याने बाबर यांचे पद कायम राहिले. मात्र, त्यानंतरही शहराध्यक्षांकडून पाठिंबा मिळत नसल्याने अखेर शुक्रवारी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा फॅक्सद्वारे पाठवून दिला आहे. पुढील दोन दिवसांत पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून राजीनामा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.चव्हाण यांच्या कडून मनमानी कारभार सुरू असल्याने संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असल्याची तक्रारही त्यांनी केली; तसेच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादीच्या दक्षिण विभागातील मातब्बर नेत्यांमध्ये एका हुशार नेत्याने भांडणे लावून दिल्याची चर्चा आहे त्यामुळे वंदना चव्हाण यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे असेही काहींचे म्हणणे आहे . दक्षिण पुण्यात महापौर – स्थायी समिती अध्यक्ष – सभागृह नेता आणि युवक अध्यक्ष अशा पदांचे वाटप होवूनही दक्षिण पुण्यातील अन्य  नगरसेवक  मंडळी या पदाधीकाऱ्यांचे नेतृत्व मान्य करताना दिसत नाहीत . प्रत्येकाने सावता सुभा मांडला आहे . असे हि दिसून आल्याचा दावा करण्यात येतो आहे

 

 

वेताळ टेकडीवर १०० झाडे लावली

0

पुणे- महापालिका उद्यान विभाग आणि टाइम्स फौन्डेशन  च्या वतीने एरंडवणे  येथील वेताळ  टेकडी अे आर आय संस्था परिसरात १०० झाडे लावण्यात आली . यावेळी महापालिकेचे वृक्ष अधिकारी मोहन ढेरे उद्यान विभाग अधिकारी प्रीती सिन्हा आणि टाइम्स फौन्डेशन चे अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः हि झाडे लावली असे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी कळविले आहे

Sony launches Xperia™ C4- the next generation “selfie smartphone”

  Capture your best selfies with a high-quality 5MP front camera and a raft of fun Xperia camera apps

·         Enjoy entertainment to the fullest with a large 5.5” Full HD screen powered by Sony’s BRAVIA® TV technologies

·         Super-fast Octa-core processor makes multi-tasking easy, without running out of power

Pune, 12thJune, 2015 Sony India today introduced Xperia™ C4 – Sony’s next generation PROselfie smartphone, the ultimate phone for selfie lovers. The phone features best in class 5MP front camera, a Full HD display and superior performance. The new power packed Xperia™ C4 is equipped with super-fast Octa-core processor which makes multi-tasking easy, without running out of power.

We all like a high-profile selfie – so go ahead and get snapping:

The Xperia™ C4 produces perfect selfies with a 5 MP wide-angle front camera (25mm wide angle lenses) that allows you to capture more in the frame. You can now stage the perfect selfie, getting everything – and everyone – in shot. Sony’s Exmor RTM for mobile sensor, soft LED flash and HDR features means the pictures will always be stunning, even in those ‘hard to perfect’ low light conditions. Superior auto automatically optimises settings to give you the best possible picture and SteadyShot™ technology compensates for any camera shake.

With 13MP, autofocus and HDR packed in there is no compromise on the rear camera, which delivers great shots for those rare moments you’re not in the picture.

You will also be able to get even more fun out of your smartphone with a suite of creative camera apps such as Style portrait with styles including ‘vampire’ and ‘mystery’ to add a unique edge to your selfie. To enhance your pictures further, the Xperia™ C4 comes loaded with selfie camera apps. AR mask effect incorporates themes that let you easily give your selfie a twist by letting you place a different face over your own face or others’ faces while you snap a selfie.

Experience your entertainment in Full HD

 

Now you can enjoy every picture and every video in detail with Xperia C4’s 5.5” Full HD display. Watching movies on your smartphone is more enjoyable thanks to Sony’s TV technology – such as Mobile BRAVIA® Engine 2 and super vivid-mode – which offers amazing clarity and colour brightness. Enjoy viewing from any angle with IPS technology.

Great video deserves great audio to match, so Xperia C4 features Sony’s audio expertise to deliver crisp and clear audio quality. With or without headphones, you can sit back and enjoy your favourite entertainment in all its glory.

The design of Xperia C4 has also been crafted with precise detail and care to ensure every aspect amplifies the sharp and vivid display. A minimal frame around the scratch-resistant screen enhances both the viewing experience and the smartphone design, while its lightweight build feels comfortable in the hand.  Xperia C4 comes in a choice of white, black and a vibrant mint.

Superior performance, with a power-packed battery that just keeps going

 Whether you’re running multiple apps, checking Facebook, snapping selfies or listening to the best music – you can do it all at lighting speed thanks to Xperia C4’s impressive Octa-core processor.  Powered by an efficient 64-bit Octa-core processor, Xperia C4 makes it easier than ever to multitask and switch between your favourite apps, without affecting performance. Ultra-fast connectivity with 4G capabilities means it’s quicker than ever to download your favourite audio or video content and surf the web without lag.

The large battery (2,600mAh) provides over eight hours of video viewing time, while Battery STAMINA Mode 5.0 ensures you have complete control over how your battery is used.

Xperia C4 is compatible with Sony NFC-enabled devices including SmartBandTalk (SWR30)

Xperia C4 will be available in all Sony Center, Xperia stores and major electronic stores across India.

 

Model Price Color Availability
Xperia C4 Rs. 29,490/-. White, Black and Vibrant Mint. 12th  June, 2015

 

 

लोणीकरांनंतर आता छगन भुजबळ यांच्यावरही … शिक्षणाची माहिती चुकीची दिल्याचा आरोप

0

मुंबई :शिक्षणाच्या पात्रतेची कोणतीही अट निवडणूक लढविण्यासाठी नसतानाही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत चुकीची  माहिती दिल्याचा आरोप आता महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पर्यंत हि येवून ठेपला आहे  भुजबळ यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले  आहे. मुंबईतील चेंबूर पोलिसांकडे छगन भुजबळांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या मुंबईतील नेत्या प्रिती मेनन यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

आप चे दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना बनावट पदवी प्रकरणी अटक झाली. त्यानंतर महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रतिज्ञापत्रातील शैक्षणिक माहिती बाबत अडचणीत आले . हे दोन्ही प्रकऱणं ताजी असताना आता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर तफावतअसलेली शैक्षणिक अहर्ता दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत.मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे (MET) संकेतस्थळ व निवडणुकीचे प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या शैक्षणिक माहितीमध्ये तफावत असल्याचं प्रिती मेनन यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत असल्याचा दावा केला आहे.छगन भुजबळ यांनी मात्र प्रिती मेनन यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. शिवाय कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. कोणतेही बनावट डिग्री घेतली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

आता यापुढे खा ‘रामदेवबाबा मॅगी’ अर्थात पतांजली नूडल्स…

0

नवी दिल्ली –मॅगी वरील बंदी आणि रामदेवबाबांची मॅगी यावर आता  बरेच विचारमंथन सुरु झाले आहे आणि विनोद हि झडू लागले आहेत त्याला कारण हि तसेच झाले ते म्हणजे … विष पेरणाऱ्या कंपन्यांची देशाला गरज नाही,अशी टीका करीत रामदेवबाबा यांनी पतांजली नूडल्स ची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वीच केली होतीत् यामुळे  भारतभरातून नेस्लेच्या मॅगीला ‘चले जाव ‘ केल्यानंतर आता लवकरच रामदेवबाबा मॅगी भारतात सर्वत्र पोहोचणार आहे .हे वृत्त वाऱ्या प्रमाणे  पोहोचले
देशभरातील बाजारपेठांमध्ये लवकरच मॅगीला पर्याय म्हणून आरोग्यदायी आणि सुरक्षित नूडल्स आणण्यात येतील, असे खुद्द योगगुरू रामदेव बाबा यांनीच जाहीर केले आहे  अर्थात या  पतांजली नूडल्समध्ये मैद्याचे प्रमाण कमी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. टू मिनिट्स नुडल्स’ अशी टॅगलाइन वापरत अल्पावधीतच घराघरात पोहोचलेल्या ‘मॅगी’त शिसे आणि शरीराला अपायकारक घटक अधिक प्रमाणात आढळून आल्याने देशातील विविध राज्यांनी मॅगीला बंदी घातली. त्यानंतर नेस्ले इंडिया या कंपनीनेच देशातील दुकानांतून मॅगीची पाकिटे परत मागवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मॅगीला पर्याय म्हणून बाजारात लवकरच स्वदेशी आणि सुरक्षित मॅगी नुडल्स आणण्यात येईल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितले. मुलांच्या जीभेवर मॅगीची रेंगाळणारी चव आणि त्यांच्या आवडीचे नुडल्स पुन्हा बाजारात घेऊन येईल, असे आश्वासनही रामदेवबाबांनी दिले. पंताजली नुडल्समध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक घटक नसतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मॅगी वादावर बोलताना रामदेवबाबा यांनी संबंधित कंपनीने देशवासियांची माफी मागितली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मॅगीविरोधात सरकारने कठोर पावले उचलल्यास कंपनीला लवकरच पॅक-अप करावे लागेल, असेही ते म्हणाले. विष पेरणाऱ्या कंपन्यांची देशाला गरज नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मॅगीबरोबरच मुलांच्या आवडीचे बॉर्नविटा, हॉर्लिक्ससारखाच पॉवरविटा बाजारात आणणार असल्याचे सांगितले.