नवी दिल्ली –मॅगी वरील बंदी आणि रामदेवबाबांची मॅगी यावर आता बरेच विचारमंथन सुरु झाले आहे आणि विनोद हि झडू लागले आहेत त्याला कारण हि तसेच झाले ते म्हणजे … विष पेरणाऱ्या कंपन्यांची देशाला गरज नाही,अशी टीका करीत रामदेवबाबा यांनी पतांजली नूडल्स ची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वीच केली होतीत् यामुळे भारतभरातून नेस्लेच्या मॅगीला ‘चले जाव ‘ केल्यानंतर आता लवकरच रामदेवबाबा मॅगी भारतात सर्वत्र पोहोचणार आहे .हे वृत्त वाऱ्या प्रमाणे पोहोचले
देशभरातील बाजारपेठांमध्ये लवकरच मॅगीला पर्याय म्हणून आरोग्यदायी आणि सुरक्षित नूडल्स आणण्यात येतील, असे खुद्द योगगुरू रामदेव बाबा यांनीच जाहीर केले आहे अर्थात या पतांजली नूडल्समध्ये मैद्याचे प्रमाण कमी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. टू मिनिट्स नुडल्स’ अशी टॅगलाइन वापरत अल्पावधीतच घराघरात पोहोचलेल्या ‘मॅगी’त शिसे आणि शरीराला अपायकारक घटक अधिक प्रमाणात आढळून आल्याने देशातील विविध राज्यांनी मॅगीला बंदी घातली. त्यानंतर नेस्ले इंडिया या कंपनीनेच देशातील दुकानांतून मॅगीची पाकिटे परत मागवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मॅगीला पर्याय म्हणून बाजारात लवकरच स्वदेशी आणि सुरक्षित मॅगी नुडल्स आणण्यात येईल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितले. मुलांच्या जीभेवर मॅगीची रेंगाळणारी चव आणि त्यांच्या आवडीचे नुडल्स पुन्हा बाजारात घेऊन येईल, असे आश्वासनही रामदेवबाबांनी दिले. पंताजली नुडल्समध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक घटक नसतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मॅगी वादावर बोलताना रामदेवबाबा यांनी संबंधित कंपनीने देशवासियांची माफी मागितली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मॅगीविरोधात सरकारने कठोर पावले उचलल्यास कंपनीला लवकरच पॅक-अप करावे लागेल, असेही ते म्हणाले. विष पेरणाऱ्या कंपन्यांची देशाला गरज नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मॅगीबरोबरच मुलांच्या आवडीचे बॉर्नविटा, हॉर्लिक्ससारखाच पॉवरविटा बाजारात आणणार असल्याचे सांगितले.