नाशिक: येथील ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राच्या कार्यालयावर चार ते पाच अज्ञातांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार संदीप जाधवला बेदम मारहाण करण्यात आली.अवैध धंद्यांच्या विरोधात बातमी दिल्याचा रागातून हा हल्ला करण्यात आला आहे
या मारहाणीत संदीप जाधव जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.नाशिकमधील दिवसेंदिवस वाढते अवैध धंदे याबाबत वृत्त देण्यात आलं होतं. यामुळे चिडून अवैध धंदे असणाऱ्या काही समाजकंटकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला