‘७२मैल : एक प्रवास’ या चित्रपटाद्वारे मराठीत पाऊल ठेवलेला बाॅलीवूडचा अभिनेता अक्षयकुमार अाता दिवंगत अभिनेते दादा काेंडके यांच्या अायुष्यावर अाधारित ‘दादा’ हा चित्रपट काढू इच्छित आहे संजय जाधव यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी दिल्याचे वृत्त अाहे. पण अभिनेत्री उषा चव्हाण यांनी या निर्मितीवर अाक्षेप घेतला अाहे. जानेवारी २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे अक्षयने ट्विटरवरून जाहीर केले होते . अक्षयच्या ‘गेझिंग गोट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात सध्या संहितेवर काम सुरू आहे. पण दुसरीकडे ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ने ‘दादा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांसह संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. दादांच्या नावावर अथवा जीवनावर चित्रपट काढण्याचा अधिकार फक्त प्रतिष्ठानला आहे, असे ट्रस्टच्या विश्वस्त उषा चव्हाण यांनी म्हटले आहे. कुणाला अशा स्वरूपाचा चित्रपट करायचा असेल, तर त्यांनी आधी ट्रस्टची रीतसर लेखी परवानगी घेतली पाहिजे अन्यथा ते गुन्हेगारी कृत्य ठरेल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
दादा कोंडकेंवर चित्रपट काढायला निघालेल्या अक्षयकुमारला -उषा चव्हाणांचा सज्जड ईशारा
खरे तर दादा कोंडके यांच्यासारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द ,, दादांनी प्रेक्षकांना हसव हसव हसविले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडविले देखील … त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे दादा कोंडके सारखे कलावंत मात्र नाहीत . आणि सध्याच्या युगात अशा… दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव , सोंगाड्या, रामराम गंगाराम , पांडू हवालदार । असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत ,जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट -गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके नावाची गाथा कोणी बंदच करून ठेवली आहे एका महान मराठी कलावंताची मृत्युनंतरही कशी शोकांतिका होवू शकते तेच यातून दिसते आहे .
दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्रातील तरतुदींनुसार १९९८ मध्ये दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. वसंत भालेकर, उषा चव्हाण, संग्राम शिर्के, हृदयनाथ कडू देशमुख, अफरिन चौगुले, सायली वडारकर आणि ललिता वाकणकर हे ट्रस्टचे विश्वस्त आहेत. दादांच्या मृत्युपत्रातील पान क्रमांक १३ अन्वये दादांच्या जीवनावर वा चरित्रावर चित्रपट काढण्याचे सर्व अधिकार ट्रस्टकडे आहेत. त्यामुळे अक्षयकुमार तसेच अश्विनी यार्दी यांनी ज्या ‘दादा’ चित्रपटाची घोषणा केली आहे, ती बेकायदेशीर आहे. त्यांना तसे करण्याचे अधिकार नाहीत. चित्रपट काढायचाच असेल, तर तशी रीतसर परवानगी त्यांना ट्रस्टकडून घ्यावी लागेल अन्यथा हे गुन्हेगारी कृत्य ठरेल, अशी स्पष्ट भूमिका उषा चव्हाण यांनी मांडली आहे.
दादांच्या नावाचे भांडवल करून कोट्यवधी कमावणाऱ्यांना ट्रस्टतर्फे कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ट्रस्टशिवाय कोणालाही दादांवर चित्रपट काढण्याचा अधिकार नाही. अक्षयकुमार, अश्विनी यार्दी यांना असे कुठलेही अधिकार नाहीत.अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे वृत्त आहे