माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घरावर छापे …

Date:

मुंबई –   माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरांवर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत देशपांडे यांच्या घरातून कोट्यावधींचा ऐवज हाती लागला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  (एसीबी) अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे . शनिवारी सायंकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीने आपली कारवाई  एसीबीचे अतिरिक्त आयुक्त किशोर जाधव यांच्या नेतृत्वाखील ही कारवाई तीव्र केली आहे. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते आणि त्यांचे नावही या घोटाळ्याशी जोडले गेले होते. त्यामुळेच एसीबीने त्यांच्या घरांवर छापा टाकला आहे.पोलिसांनी मुंबई आणि औरंगाबादमधील घरांची झडती घेतली असता त्यात दीड किलो सोने, २७ किलो चांदी, २.५ कोटी रुपयांचे फिक्स डिपॉजिट आणि बॉन्ड्स, अनेक गुंतवणूक कंपन्यांचे ६ हजार शेअर्स असा ऐवज देशपांडेंकडे असल्याचे उघड झाले.
देशपांडे यांच्या घरातून सापडलेल्या ऐवजाशिवाय त्यांची मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबादमध्ये आणखीही मालमत्ता आहे. दोन दुकाने, पुणे आणि औरंगाबादमध्ये पाच एकर जमीन त्यांच्या नावावर आहे, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्रातील कित्येक मोठे प्रकल्प जसे पुणे सातारा रस्त्यावरील खंबाटकी टोल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई अहमदाबाद गोल्डन कबॉड्रंगल चारपदरी रस्त्याचे काम, वरळी बांद्रा सिलिंकचे प्रशासन अशी कामं त्यांनी केली आहेत. देशपांडे त्यांची १५ ऑक्टोबर, २०१० पासून राज्य माहिती आयुक्त या पदावर नियुक्ती झाली असून ते औरंगाबाद विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत.
दरम्यान, देशपांडे यांच्यावरील कारवाईने भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्या असल्याचे मानले जाते देशपांडे यांच्या घरात महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...