Home Blog Page 3588

टोल भरूनही मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर जीव धोक्यात – दरड कोसळल्याने २ ठार

0

मुंबई – मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळल्याने या मार्गावरून जाणाऱ्या एका कारवर एक मोठ्ठा दगड कोसळल्याने त्यात दोन जण ठार झाल्याचे वृत्त आहे.यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल 9 तासांनंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेत डोंबिवलीचे शशिकांत धामणकर आणि भाईंदरचे दिलीपभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे तसंच या घटनेत तीन महिलाही जखमी झाल्या आहे.  पोकलेन पोहचण्यास विलंब होत असल्याने आणि घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड हटवण्यास अडचणी येत आहेत.दरड कोसळल्याने मार्गावर मोठ्याप्रमाणावर दगडे आणि मातीचा ढिगारा तयार झाला  .
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडोशी येथील बोगद्या जवळ ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप मृतांची आणि जखमींबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. कार रस्त्यावरून जात असताना मोठे दगड थेट कारवर पडल्याने ही दुर्घटना घडल्याचेही पोलिसांनी सांगितले.दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगर्ती मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही शहरांतील प्रवाशांची सोय करण्यासाठी आज (रविवार) पुणे आणि मुंबई दरम्यान रात्री आठ वाजता सोळा डब्यांच्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली
यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २२ जूनला दरड कोसळल्याची घटना घडली होती. यामुळे एक्स्प्रेस वे २४ तास बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा दरड कोसळल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय

पंतप्रधानांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिस आणि’ आप ‘मध्ये संघर्ष

0

arvind-kejriwal-s_650_071915110216 aap-protest-759-2

नवी दिल्ली – पंतप्रधानांच्या अखत्यारीत असलेले दिल्ली पोलिस आणि आप पार्टी यांच्यात आता संघर्ष रंगतो आहे . पोलिस कायदा सुव्यवस्था राखण्याऐवजी राजकारण जास्त करीत आहेत असा आरोप करीत दिल्ली पोलिस आमच्या अखत्यारीत द्या अशी मागणी आप्चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे दिल्लीतील ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या अक्त्यारीत असलेल्या पोलिस आयुक्तांना एकीकडे समन्स पाठवले आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्ली पोलिसांच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलकांवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसानी पाण्याचे फवारे चा वापर केला. या प्रकरणामुळे दिल्ली पोलिस आणि केजरीवाल सरकार यांच्यात नव्याने संघर्ष निर्माण झाला आहे. त्यापूर्वी शुक्रवारी केजरीवाल यांनी पोलिसांसाठी अपशब्दांचा वापर केला होता. पोलिस आयुक्तांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
दिल्लीच्या आनंदपर्वत परिसरात 19 वर्षांच्या मिनाक्षी नावाच्या तरुणीची हत्या आणि दिल्लीतील ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांना समन्स पाठवण्यात आले आहेत. यात पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान आपच्या यूथ विंगच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी पोलिसानी वॉटर कॅनन चा वापर केला.
दिल्लीचे गृहमंत्री सत्येन्द्र जैन यांनीही पोलिस आयुक्त बीएस बस्सी यांना पत्र लिहून 48 तासांत याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. पीडितेने अनेकवेळा तक्रार करूनही आनंद पर्वत मर्डर केसमध्ये आरोपींच्या विरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? अशी विचारणा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच आधी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतही उत्तर मागवण्यात आले आहे. शनिवारी हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचलेल्या केजरीवाल यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. तसेच मीनाक्षी यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. दिल्ली पोलिस पंतप्रधानांच्या अख्त्यारित येतात. त्यामुळे त्यांनी याबाबत काहीतरी करावे अन्यथा दिल्ली पोलिस आमच्या ताब्यात द्यावे, असे केजरीवाल म्हणाले.गुरुवारी दोन आरोपी जयप्रकाश आणि त्याच्या भावाने 11 वीची विद्यार्थीनी असलेल्या मिनाक्षीच्या चेहरा, छाती आणि पोटावर चाकूने 35 वेळा वार केले होते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची आईही चांगलीच जखमी झाली होती. त्या दोघांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मिनाक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मिनाक्षीने 2013 मध्ये या दोघांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली होती.

‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

0

mail.google.com

पुणे :
  पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. पक्ष कार्यालयात आनंद रिठे (सामाजिक न्याय विभाग, पुणे शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 यावेळी शंकर शिंदे, राजूशेठ गिरे, सुरेश पवार, अ‍ॅड.औदुंबर खुने-पाटील, संदीप थोरात, अविनाश वेल्हाळ, संग्राम होनराव, योगेश वराडे आदी उपस्थित होते.

जनतेसाठी ‘स्मार्ट सिटी संवाद’ खा. शिरोळेयांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन

0
पुणे :-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० स्मार्ट सिटीच्या ध्येयामध्ये पुण्याचाही सहभाग व्हावा या उद्देशाने  चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए), कॉनफेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ पुणे (क्रेडाई) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या पुढाकाराने स्मार्ट सिटी संवाद ही वेबपोर्टल तयार करण्यात आले. जनतेशी संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी  स्मार्ट सिटी संवाद या वेबसाईटचे आज  खा.अनिल शिरोळे यांच्या हस्ते  उद्घघाटन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार,पुणे विद्यापीठाचे डॉ. करमरकर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया उपस्थित होते.  www.smartcitysamvad.org या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.
 
महाराष्ट्र सरकारला यासाठी १० शहरांची नामांकन द्यावयाची आहेत. त्यातूनच मग पुढे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येतील मग यातील विजेत्यांचा सहभाग पुढे देश पातळीवरील स्पर्धेसाठी होणार आहे. आपल्या शहराच्या प्रगतीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेने या उद्देशात सहभागी होण्यासाठी या साईटची निर्मिती केली असून त्याद्वारे लोकांच्या सूचनांना आणि विचारांना लक्ष्यात घेऊन त्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिकांना नियमित स्वरुपात दिल्या जाणार आहेत. 
 
खा. अनिल शिरोळे यांनी अशा पद्धतीचा पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केले व म्हणाले सरकारचा असा मनोदय आहे कि स्मार्ट सिटी हि कागदी योजना न राहता चळवळ बनावी. या पुढाकारामुळे हि चळवळ प्रभावशाली होईल. पुण्याची ओळख स्मार्ट सिटी म्हणून व्हावी यासाठी लोकांनी जास्तीत जास्त सक्रियतेने सहभाग घ्यावा. 
स्मार्ट सिटीच्या या प्रकल्पासाठी पुण्याचे काम कौतुकास्पद असल्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असल्याचे मत पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. तसेच पुण्याची स्मार्ट सिटी म्हणून प्रतिमा तयार करण्याचे प्रयत्न  राष्ट्रीय स्तरावर इतरांसाठी आदर्श ठेवण्यासारखे आहेत असेही ते म्हणाले.
 
कटारिया पुढे म्हणाले, स्मार्ट सिटीबद्दलच्या आमच्या कल्पना काय आहे  त्यावर नागरिकांनी आपले विचार, सूचना तसेच मते आमच्या पर्यंत पोहोचवावे. त्यातील विशेष सूचना सरकार पर्यंत पोहोचवण्यात येतील व त्याची दखल  घेतल्याचे कळवण्यात येईल
या वेबसाईटवर स्मार्ट सिटीबद्दलच्या संकल्पना काय आहे,त्यावर आधारित ताज्या घडामोडींविषयीची माहिती,त्याविषयी तज्ञानांचे मत आणि विचार यासर्व गोष्टी वेबसाईटवर असणार  आहेत अशी माहिती सीएमडी पोझीव्ह्यूव चे नॉलेज पार्टनर सी. ए. विनीत देव यांनी दिली.

मुंबई डबेवाल्यांप्रमाणे व्यवस्थापन क्षेत्रात ‘कार्य ही उपासना आणि ग्राहक म्हणजे देव’ हा मंत्र जपा! : डॉ.पवन आगरवाल

0
पुणे :
  ‘मुंबईचा डबेवाला ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे सेवा देऊन समाधानी कसे करता येईल याकडे अधिक लक्ष देतो आणि त्याप्रमाणे व्यवस्थापन करून आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. डबेवाल्यांची कार्यप्रणाली म्हणजे ‘कार्य ही उपासना आणि ग्राहक म्हणजे देव’अशी असते. त्यांच्या या कार्यप्रणालीमुळे ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ला सहा वेळा ‘सिग्मा आयएसओ’ चे प्रमाणपत्र मिळाले आहे.त्यांच्या अचूक व्यवस्थापनाचा आदर्श व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे’ असे डॉ.पवन आगरवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
भारती विद्यापीठच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) एमबीए, एमसीए च्या नवीन बॅच 2015-17 च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘ओरिएंटेशन प्रोग्राम’मध्ये ‘पुरवठा साखळी व्यवस्थापनातील गुणवत्ता’ या विषयावर डॉ. पवन आगरवाल हे मार्गदर्शन करताना बोलत होते.
मानवी मुल्यांबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, ‘मुंबईचा डबेवाला हा प्रमाणपत्र मिळविण्याच्या उद्देशाने काम न करता ग्राहकांच्या सेवेसाठी काम करतो.अशिक्षित असला तरी अचूकतेचे जागतिक मानदंड पूर्ण करतो. यातुन व्यवस्थापनशास्त्र शिकता येण्यासारखे आहे.’ व्यवस्थापन, मुंबई डबेवाल्यांची कार्यपद्धत याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना डॉ. पवन आगरवाल यांनी सविस्तर उत्तरे दिली.
 भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा ‘ओरिएंटेशन प्रोग्राम’ ‘अभिजीतदादा कदम ऑडीटोरियम’मध्ये संपन्न झाला.
 प्रा. डॉ. एच जी. अभ्यंकर, डॉ. अजित मोरे, यांनी स्वागत केले. जयटिळक मुजुमदार (जीएम सेल, भारती एअरटेल), डॉ. उज्वल भट्टाचार्यजी (संचालक, एच आर, जीकेएन सिंटर मेटल इंडिया), विजय नायर (एचआर महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चर्स), रिचा मेदीरत्त्ता आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 स्वत:चे करिअर, स्वत:ची प्रगती हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता आपल्या ज्ञानाचा उपयोग करून समाज आणि देशाच्या समस्या सोडविण्यामध्ये कार्पोरेट क्षेत्राचे योगदान कसे वाढविता येईल या प्रमुख हेतूने या ओरीएंटेशन प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईत तीन पत्रकारांवर हल्ला- एका पत्रकाराचा मृत्यू…

0
मुंबई- मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये गुरुवारी रात्री तीन पत्रकारांवर हल्ला झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविणाऱ्या राज्यात नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर माहिती अधिकार क्षेत्रातील  कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह कोणाच्याही जीविताची शाश्वती आता उरलेली नाही असे हळूहळू स्पष्ट होते आहे
हे तीनही पत्रकार काल रात्री पोलिसांनी छापा मारलेल्या बारचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळीच एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मुंबईत मारहाण करण्यात आली होती. त्याचसोबत कॅमे-याची तोडफोड करून कॅमेरामनलाही मारहाण झाली होती. 24 तासांत 5-6 पत्रकारांवर मुंबईसारख्या महानगरात हल्ला झाल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राघवेंद्र दुबे असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव असून, ते मीरा-भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक होते. तर, शशी शर्मा आणि संतोष मिश्रा हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णलयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी एका बारवर छापा टाकला. बारवर टाकलेल्या धाडीची बातमी कव्हर करण्यासाठी पत्रकार तेथे गेले होते. रात्री 1 वाजता पोलिसांनी मीरा भाईंदर रोडवरील व्हाइट हाऊस बिअर बारवर टाकलेल्या धाडीत 15 मुलींना ताब्यात घेतले होते. यावेळी घटना स्थळी शशी शर्मा आणि संतोष मिश्रा वार्तांकनासाठी हजर होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर या दोघांवर हल्ला केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी राघवेंद्र दुबे हे मीरा रोड पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी तेथे अनेक बार मालक उपस्थित होते. त्यावेळी पोलिस, बारमालक आणि दुबे यांच्यात बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास दुबे यांचा मृतदेह एस. के. स्टोन चौकीजवळ ठिकाणी आढळून आला. त्यावेळी दुबे यांच्या डोक्याला मार लागल्याचे दिसून आले. या घटनेत बारमालकांचा सहभाग असावा असे प्रथमदर्शिनी दिसत आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना सलमान खान चा पाठिंबा

0

मुंबई

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात बॉलिवूडचा सुप्पर अभिनेता सलमान खान यानेही  गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमाननं पाठिंबा दर्शवला असून चौहान यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मत व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा देणाऱ्या प्रशासनाला मात्र याबाबत काहीच म्हणायचे नसल्याचे दिसते
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारनं ‘महाभारत’फेम गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केली आहे. मात्र, चौहान हे या पदास पात्र नसल्याचं सांगत संस्थेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियुक्तीविरोधात महिन्याहून अधिक काळापासून आंदोलन उभारले आहे. बॉलिवूडमधील नामवंत नट-नट्यांनीही विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरत चौहान यांच्या नियुक्तीवर फेरविचार करण्याची मागणी सरकारकडं केली आहे. सलमाननंही त्यांच्याच सुरात सूर मिसळला आहे. ‘हिंदी चित्रपटसृष्टी आज ज्या स्थानी आहे, ते स्थान मिळवण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळं त्यांच्या भावना समजून घेऊन चौहान यांनी स्वत:हून बाजूला व्हायला हवं,’ असं सलमान म्हणाला.

याआधी अनुपम खेर, ऋषी कपूर, नवाझुद्दिन सिद्दिकी, निर्माते कुंदन शाह, अदूर गोपालकृष्णन, सुधीर मिश्रा अशा अनेक दिग्गजांनी चौहान यांच्या नियुक्तीवर असमाधान व्यक्त केलं आहे. आता पंतप्रधान मोदींशी जवळीक असलेल्या सलमाननंही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानं सरकार काय निर्णय घेते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘‘आपत्कालीन प्रसंगी प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर कार्यशाळा संपन्न

0
2
पुणे -महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने तळेगाव, सुद्रुंबे येथील नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स या प्रशिक्षण संस्थेत प्रसार माध्यम प्रतिनिधींकरिता ‘‘आपत्कालीन प्रसंगी प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी एनडीआरएफ चे कमांडंट आलोक अवस्थी यांनी एनडीआरएफच्या  राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्कालीन प्रसंगी एनडीआरएफने केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवांविषयी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपत्कालीन घटनांविषयी माहिती सांगितली.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेटराजेंद्र जगताप) यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापना संदर्भात करावयात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत व उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती सांगितली.
विविध आपत्कालीन प्रसंगी कशाप्रकारे उपाय योजना कराव्यात, कोणती काळजी घ्यावी, काय करावे, काय करु नये या संदर्भात प्रसारमाध्यमांची भूमिका कोणती राहील या संदर्भात डेप्युटी कमांडंट पंडित इथापे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र इमर्जन्सी सव्र्हिसेसच्या वतीने डॉ. राजेंद्र जगताप यांनी आपत्कालीन प्रसंगी घडणाèया घटना तसेच श्वसनक्रिया बंद होणे, हृदयविकाराच्या घटना अशा प्रसंगी तातडीने करावयाच्या उपाय योजना संदर्भात तसेच महाराष्ट्र इमर्जन्सी सेवे अंतर्गत मोफत सेवेच्या आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्स १०८ विषयी सविस्तर माहिती सांगितली.
कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी श्री. गणेश सोनुने यांनी केले.

केंद्रीय कौशल्य विकास योजनेअंतर्गत १० वर्षामध्ये पुण्यात १ लाख कामगारांना प्रशिक्षण

0

2 3

 
पुणे:-  केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजना व कुशल उपक्रमाअंतर्गत येत्या १० वर्षामध्ये  देशभरात २० लाख तर  पुण्यात १ लाख कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे  कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत पुण्यातील १६७ साईटवर किमान २२७७७ कारागिरांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. 
 
“प्रशिक्षित कामगारांचा वाढता रोजगार आणि त्यांच्या कामामध्ये आलेली निपुणता हेच कुशलचे खरे उद्दिष्ठ आहे. लहान उपक्रमाचे स्वरूप आज मोठ्या चळवळीत रुपांतर होताना बघून अतिशय समाधान वाटले असल्याची भावना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केली.  
 
तसेच स्वतःच्या कामात आलेले चांगले बदल व कौशल्य विकसाबरोबरच त्यांच्या उत्पादन क्षमतेतही वाढ झाली असल्याची भावना उपस्थित प्रशिक्षित कामगारांनी व्यक्त केली.   
 
‘कुशल’तर्फे २०११ पासून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जात आहे.  ‘कुशल’ने आतापर्यंत २२ हजारांहून अधिक कामगारांना प्रशिक्षित करून उल्लेखनीय यश संपादन केले असल्याची माहिती क्रेडाई कुशलचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी यावेळी दिली. कुशल दिनाच्या निमित्ताने प्लंबिंग, पेंटीग, शटरींग अशा  विविध क्षेत्रातील कामगार, कंत्राटदार तसेच सुपरवायसर आदींचा सत्कार करण्यात आला. 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित अचलारे यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर बेलवलकर यांनी केले. यावेळी  कुशलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  जे. आर. शर्मा, फिनोलेक्सचे नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

आरोग्य संचालनालय कार्यालयाचे स्थलांतराला विरोध – पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्ट सबओर्डीनेट सर्विसेस असॊसिएशनच्यावतीने निदर्शने आंदोलन

0

पुणेपुणे स्टेशन येथील आरोग्य संचालनालय कार्यालयाचे स्थलांतराला  विरोध करण्यासाठी  पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्ट सबओर्डीनेट सर्विसेस असॊसिएशनच्यावतीने निदर्शने  आंदोलन करण्यात आली .  हे आंदोलन गुरुवार , १६ जुलै २०१५ रोजी सकाळी  ११. ३० वाजता , मध्यवर्ती इमारत (सेन्ट्रल बिल्डिंग ) प्रवेशद्वार , हॉटेल सेन्ट्रल जवळ  करण्यात आले . . शासन परिपत्रकाच्या विरोधात सर्व कर्मचारी घोषणा देऊन निदर्शने करणार आली

या  निदर्शने  आंदोलन पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्ट सबओर्डीनेट सर्विसेस असॊसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार गुड्मेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . निदर्शने  आंदोलन नंतर साधु वासवानी चौक , कौसील हॉल , बंडगार्डन रोडमार्गे कर्मचारी बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेला . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन देण्यात आले .

 

दादा विधानभवनात तर ताई पंढरीच्या वारीत …

0

(पहा  फोटो …. )

पुणे- राष्ट्रवादीचे युवा नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जितेंद्र आव्हाड आणि सहकाऱ्यांसमवेत विधानभवनात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी , मागण्यांसाठी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलने करीत असताना खासदार सुप्रिया ताई सुळे मात्र पंढरीच्या वारीत गोरगरीब भाविकांबरोबर मिसळत आहेत प्रत्यक्ष वारीत अधून मधून सहभागी होणाऱ्या सुप्रिया सुळे यंदा वारीत भलत्याच सक्रिय आणि खुश दिसत आहेत विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीस निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन आज त्यांनी वाल्हे, पुरंदर इथे घेतले. बारामती मतदारसंघातून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जात असते. पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत चालतांना, संवाद साधतांना मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आज या वारी‬ सोबत चालतांना तुळशीवृंदावन घेऊन निघालेल्या , संपूर्ण पालखीला स्वयंपाक करून प्रेमाने जेवू घालणाऱ्या महिला यांच्यासोबत गप्पा मारतांना अतिशय छान वाटले अत्यंत आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्या सगळ्यांची काळजी घेत होत्या.असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे तर ‎पाटस‬ इथे त्यांनी  संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसोबत वारीत चालतांना अतिशय छान वाटत होते. या वारीत सुरेखा जगताप या अंगणवाडीत आशाताईच काम करणाऱ्या महिलेसोबत फुगडीही खेळली. दरवर्षी वारीत चालतांना मानसिक समाधान मिळते ते नक्कीच ऊर्जादायी असते.असे सुळे यांनी म्हटले आहे

1610964_992230104142320_6625525195662180860_n 10393925_992281707470493_8332494260389650827_n 10981850_992229650809032_8077039680733600058_n 10982086_992230000808997_6892842099803221246_n 10989220_820936628014129_3662087755377308308_n 11012706_820936531347472_4271031799291206293_n 11695780_992281367470527_5593575052224549312_n 11742994_992281110803886_1971083270133726073_n 11745409_992280900803907_8077750837127511451_n 11745504_992280994137231_1064764184834419426_n 11753708_992281474137183_6656177990391449538_n 11754282_992281297470534_8934230587898493251_n 11755868_992281177470546_4427096048954832526_n 11760169_820936318014160_4077741134346084351_n 11760313_992282010803796_5850672143563055512_n Congress - NCP protest 1 Congress - NCP protest Jitendra awhad

विरोधकांच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून पत्रकार- छायाचित्रकारांना प्रतिबंध

0
पावसाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी हि गोंधळ
मुंबई- शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, गिरणी कामगारांना घरे द्या, या मागण्यांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीला सत्ताधारी सदस्यांनीही जोरदार घोषणा देत प्रत्त्युत्तर दिल्याने विधानसभेचे कामकाज बुधवारी दोनदा तहकूब झाले. राज्य सरकारची भूमिका नकारात्मक असल्याने सांगून, त्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विरोधकांनी दिवसभर कामकाजात भाग घेतला नाही. त्या काळात सत्ताधाऱ्यांनी काही विधेयके मंजूर केली. दरम्यान राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा सलग तिसरा दिवस गदारोळाने गाजत असताना, तिसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही कारभाराचा नमुना समोर आला आहे.विरोधकांनी सुरु केलेलं आंदोलन माध्यमांनी प्रसारीत करु नये, यासाठी विधानभवनात माध्यमकर्मींना हटवण्यात आलं. सरकारच्या या निर्णयमामुळे विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. अजित पवारांनी तर भाजपला लालकृष्ण अडवाणींच्या वक्तव्याची आठवण करून दिली.ते म्हणाले विधिमंडळातील पत्रकारांना वार्तांकन करण्यापासून रोखणे ही हुकूमशाही आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी देशात पुन्हा आणीबाणीची परिस्थिती येऊ शकते असं म्हणाले होते. आज पावसाळी अधिवेशनात माध्यमांना ज्याप्रकारे अटकाव केला जात आहे त्यामुळे त्याचीच प्रचिती येत आहे. उद्धव ठाकरेंनीही आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी केल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
11012706_820936531347472_4271031799291206293_n 11760169_820936318014160_4077741134346084351_n
पूर्वी रोज सकाळी विधानसभा अध्यक्ष, सर्व पक्षांचे गटनेते यांची बैठक व्हायची. दिवसभराच्या कामकाजाची दिशा ठरवली जायची. आता मात्र तसे होत नाही. आम्ही कधीही सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणलेला नाही. पण सरकार महत्त्वाची बिले पास करताना विरोधकांना विश्वासात घेत नसेल तर विरोधकांनी तरी काय करायचे? म्हणूनच आज प्रतिकात्मक दिंडी काढून आम्ही सरकारचा निषेध केला

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘दुष्काळी स्थिती असल्याने, राज्यात रोज दहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. वीज जोडणी मिळत नाही. बॅंका कर्ज देत नाहीत. शेतीमालाला भाव नाही. ऊस, दूध यांचे भाव पडले. राज्यसरकारची भूमिका शेतकऱ्यांना आधार देण्याची नाही. शासनाची भूमिका नकारात्मक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. या सरकारच्या भुमिकेचा निषेध करण्यासाठी आम्ही सभात्याग करीत आहोत.‘
जयंत पाटील म्हणाले, ‘गिरणी कामगारांना घरे देण्याचे काम या सरकारने केले नाही. आमच्या सरकारने एक लाख घरे देण्याचा निर्णय घेतला होता.‘ महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले, ‘मुख्यमंत्री निधी आयोगाच्या बैठकीला गेले आहेत. राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. ते जाहीर करण्यात येतील.‘
\राज्यातील पाणीटंचाई, बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांबाबत अनेक आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, ‘मे महिन्यात राज्यात 2358 टॅंकरद्वारे 1998 गावांना व 2607 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला. राज्यातील 2496 पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यापैकी 1146 योजना कालबाह्य झाल्या आहेत. वीजबिल ग्रामपंचायतीने न भरल्याने 63 योजना बंद आहेत. या बाबत काही धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. पाणीपुरवठा योजनांचा राज्यस्तरावर आढावा घेतला जाईल, त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल. बंद पडलेल्या योजनांची चौकशी केली जाईल. गैरव्यवहार आढळल्यास कारवाई केली जाईल.‘

स्मार्ट सिटी करिता पुणेकरांकडून १ लाख १ हजार २११ सूचना

0
पुणे महानगरपालिकेच्या वतीने संगणक व करिअर क्षेत्रातील विविध संधी या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन.
पुणे-

पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत नागरिकांकडून विविध विकास कामांकरिता ऑनलाईन सूचना व नागरिकांची मतं मागविण्यात आलेली होती. त्यानुसार आज सायंकाळपर्यंत सुमारे १ लाख १ हजार ६४६ नागरिकांनी संपर्क साधला. तसेच सुमारे १ हजार २११ सूचना नागरिकांकडून प्राप्त झाल्या.अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी दिली दरम्यान पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत युवक कल्याणकारी योजना अंतर्गत ‘हॅलो माय फ्रेंड‘ उपक्रम राबविणेत येत आहे. तरूण-तरूणींना संगणक व करिअर क्षेत्रातील विविध प्रकारच्या संधी, तसेच मानसिक ताणतणाव या विषयावर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.असे सांगून ते म्हणाले .,
मार्गदर्शना अंतर्गत ‘संगणक क्षेत्रातील करिअर संधी‘ या विषयावर ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दिपक शिकारपूर, ‘करिअर क्षेत्रातील विविध प्रकारच्या नवीन संधी‘ या विषयावर ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक व माजी संचालक PUMBA डॉ. शरद जोशी, तसेच ‘मानसिक ताणतणाव‘ या विषयावर मानसिक आरोग्य कौन्सिलर डॉ. सचिन ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत.
वरीलप्रमाणे मार्गदर्शन शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०१५ रोजी सकाळी ११.३० वा. पुणे महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी, महात्मा फुले वस्तू संग्राहलया समोर, घोले रस्ता, शिवाजीनगर, पुणे-०५ या ठिकाणी आयोजित केलेले आहे.

 

एफटीआयआय बाबत हुकुमशाही फतवा –

0
पुणे-
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदी गजेंद्र चौहान हेच राहतील त्यांचे अध्यक्षपद ज्यांना मान्य नसेल आणि त्याविरुध्द बंद करतील त्यांना संस्थेतून बडतर्फ केले जाईल असा हुकुमशाही इशारा आज देण्यात आल्याचे वृत्त आहे . सिनेसृष्टीतील मान्यवर तसेच इंदिरा गांधी यांचे नातू , राजीव गांधी यांचे पुत्र आणि अन्यसर्वच  राजकीय नेत्यांचा सर्व विद्यार्थ्यांचा विरोध मोडून काढीत देण्यात आलेल्या या इशाऱ्याने आगामी वातावरणाची चाहूल लागते आहे .
एफटीआयआयच्या संचालक मंडळावरील नियुक्त्या केंद्र सरकारने जाहीर केल्यापासून गेली 35 दिवस एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह राहुल सोलापूरकर, अनघा घैसास, नरेंद्र पाठक, हरीश गुप्ता या सदस्यांच्या नियुक्तीलाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे.आपल्या  मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना एफटीआयआय प्रशासनाने इशारा दिला आहे. आंदोलन थांबवा अन्यथा संस्थेतून कायमचे बडतर्फ करू अशी धमकी संचालक डी. जे. नरेन यांनी दिला आहे. विविध मागण्यांसाठी एफटीआयआयमधील विद्यार्थी 11 जूनपासून आंदोलन करीत आहे.
 विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला चित्रपट क्षेत्रातील मंडळींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तर, FTII च्या संचालकपदावरून फिल्ममेकर झानु बरुआ आणि सिनेमेटोग्राफर संतोष सिवान, अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी राजीनामा दिला होता. याचबरोबर ऋषी कपूर, अनुपम खेर, रणबीर कपूर यांनीही गजेंद्र चौहानांच्या निवडीला विरोध केला आहे. एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळाला आहे. देशातील विविध राजकीय पक्षांनीही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे. तरीही चौहान यांची नियुक्ती मागे घेतली जाणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे.

संतोष जुवेकर आता घरोघरी …

0
कधी काळी चरितार्थासाठी घरोघरी  फिरलेला संतोष जुवेकर आता छोट्या पडद्यावरून घरोघरी झळकणार आहे आणि कौतुकाने त्याचे चाहते त्याची मालिका टी व्ही वर पाहणार आहेत . अर्थात हि मालिका ‘कलर्स ‘च्या मराठी वाहिनीला मोठ्ठा टी आर पी मिळवून देईल असा  विश्वास अनेकांना वाटतो आहे ते केवळ संतोष जुवेकर च्या छोट्या पडद्यावरील पुर्नआगमनानेच … आणि या मालिकेची कथा हि वेगळी आहे . शिवाय संतोष च्या जोडीला नायिका आहे ती ‘माझिया प्रियेला प्रीत कळेना ‘ या मालिकेतील अभिजित खांडकेकर ची नायिका असलेली मृणाल दुसाणीस…
वादळवाट  , या गोजिरवाण्या घरात  या मालिकांमध्ये संतोष ने फार पूर्वी काम केले आहे पण त्यानंतर मोठ्ठ्या पडद्यावरून खऱ्या अर्थाने त्याची कारकीर्द उजळली आणि आता तो सध्या टौप टेन मधील एक असा नामांकित -आणि खास मोठ्ठा चाहता वर्ग असलेला अभिनेता मानला जातो . त्याची लोकप्रियता आणि आगळी वेगळी कथा , मृणाल ची साथ या अशी वैशिष्ट्ये असलेली हि मालिका ‘कलर्स मराठी ‘ ला मालिकेच्या दुनियेत किती पुढे नेतील हे येणारा काळ च स्पष्ट करणार आहे
कलर्स मराठीवर’कन्यादान ‘ हि मालिका बंद होवून ‘असं सासर सुरेख बाई’ ही नवी मालिका २७ जुलैपासून सुरू होतेय.
मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी यांनी  सांगितलं कि,ही मालिका आपल्याला संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानिस ह्या जोडीचे  रोमँटिक जीवन  आणि त्यांचं सासरं दाखवणारं आहे. नेहमी आपण सासू-सुनांचे हवेदावे किंवा कुरघोडी करणा-या सासरच्या मंडळींना पाहतो. पण हे सासरं बाकी मालिकांमधल्या सासरपेक्षा वेगळं  दाखविण्याचा प्रयत्न यातून होणार आहे . सासरची ओढ असलेले हे दोघे नवरा-बायको आहेत. “माहेरच्यांचं कौतुक प्रत्येक बाई आणि प्रत्येक पुरूषाला असते, त्यात काही नवीन नाही. पण जर एखाद्या जोडप्याला आपल्या माहेरच्यांच्या ऐवजी सासरच्यांच कौतुक अधिक असेल तर?… ह्या मालिकेच्या निर्मिती मागे.अशा स्वरूपाचा वेगळा विचार आहे
,”असं सासर सुरेख बाई हे भोंडल्याचं गाणं आहे. आणि त्यातून ही ओळ आम्ही मालिकेसाठी घेतली आहे. सासरं म्हटलं की ते मुलीचंच असतं,असंच नेहमी आपल्या डोक्यात असतं. अहो, पण पुरूषांनाही सासरं असतंच की. हे आपण ब-याचदा मालिकांमध्ये विसरतो. अनेक मुलांचीही लग्न करतेवेळी अनेक स्वप्न असतात. त्यांच्याही सासरच्या काही कल्पना असतात. काहींना आपलं सासर खूप श्रीमंत असावं, असं वाटतं. आणि या मालिकेतला यश अशी स्वप्न पाहणारा आहे. यश दहा बाय दहाच्या चाळीतल्या खोलीत रहाणारा आहे. आणि आजकालच्या महागाईच्या जगात चाळीतून मोठ्या घरात जाणं किती कठीण आहे, ते तुम्हां-आम्हां सर्वांनाच माहित आहे. यशला म्हणूनच कुठेतरी आपल्या आशा-आकांक्षाना आपल्या श्रीमंत सासरंच पाठबळ हवंय. पण नेमकी त्याला जी बायको मिळते, ती मोठ्या घरापेक्षा लहान घरातच मानाने आणि सुखी संसार करायला आसूसलेली असते. यशला त्याच्या सासरचं कौतुक असतं, तर त्याच्या बायकोला तिच्या सासरचं कौतुक”अशा कथानकाची हि मालिका आणि मराठीत उत्तम नावलौकिक असलेला अभिनेता संतोष जुवेकर या मालिकेचा नायक आहे संतोष चा महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे तो या मालिकेला उचलून धरेल आणि घराघरातून संतोष ची मालिका म्हणून ती पहिली जाईल असेही समीक्षकांचे म्हणणे आहे