(पहा फोटो …. )
पुणे- राष्ट्रवादीचे युवा नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जितेंद्र आव्हाड आणि सहकाऱ्यांसमवेत विधानभवनात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी , मागण्यांसाठी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलने करीत असताना खासदार सुप्रिया ताई सुळे मात्र पंढरीच्या वारीत गोरगरीब भाविकांबरोबर मिसळत आहेत प्रत्यक्ष वारीत अधून मधून सहभागी होणाऱ्या सुप्रिया सुळे यंदा वारीत भलत्याच सक्रिय आणि खुश दिसत आहेत विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीस निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन आज त्यांनी वाल्हे, पुरंदर इथे घेतले. बारामती मतदारसंघातून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जात असते. पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत चालतांना, संवाद साधतांना मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आज या वारी सोबत चालतांना तुळशीवृंदावन घेऊन निघालेल्या , संपूर्ण पालखीला स्वयंपाक करून प्रेमाने जेवू घालणाऱ्या महिला यांच्यासोबत गप्पा मारतांना अतिशय छान वाटले अत्यंत आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्या सगळ्यांची काळजी घेत होत्या.असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे तर पाटस इथे त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसोबत वारीत चालतांना अतिशय छान वाटत होते. या वारीत सुरेखा जगताप या अंगणवाडीत आशाताईच काम करणाऱ्या महिलेसोबत फुगडीही खेळली. दरवर्षी वारीत चालतांना मानसिक समाधान मिळते ते नक्कीच ऊर्जादायी असते.असे सुळे यांनी म्हटले आहे