फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदी गजेंद्र चौहान हेच राहतील त्यांचे अध्यक्षपद ज्यांना मान्य नसेल आणि त्याविरुध्द बंद करतील त्यांना संस्थेतून बडतर्फ केले जाईल असा हुकुमशाही इशारा आज देण्यात आल्याचे वृत्त आहे . सिनेसृष्टीतील मान्यवर तसेच इंदिरा गांधी यांचे नातू , राजीव गांधी यांचे पुत्र आणि अन्यसर्वच राजकीय नेत्यांचा सर्व विद्यार्थ्यांचा विरोध मोडून काढीत देण्यात आलेल्या या इशाऱ्याने आगामी वातावरणाची चाहूल लागते आहे .
एफटीआयआयच्या संचालक मंडळावरील नियुक्त्या केंद्र सरकारने जाहीर केल्यापासून गेली 35 दिवस एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह राहुल सोलापूरकर, अनघा घैसास, नरेंद्र पाठक, हरीश गुप्ता या सदस्यांच्या नियुक्तीलाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे.आपल्या मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना एफटीआयआय प्रशासनाने इशारा दिला आहे. आंदोलन थांबवा अन्यथा संस्थेतून कायमचे बडतर्फ करू अशी धमकी संचालक डी. जे. नरेन यांनी दिला आहे. विविध मागण्यांसाठी एफटीआयआयमधील विद्यार्थी 11 जूनपासून आंदोलन करीत आहे.