कलर्स मराठीवर’कन्यादान ‘ हि मालिका बंद होवून ‘असं सासर सुरेख बाई’ ही नवी मालिका २७ जुलैपासून सुरू होतेय.
संतोष जुवेकर आता घरोघरी …
कधी काळी चरितार्थासाठी घरोघरी फिरलेला संतोष जुवेकर आता छोट्या पडद्यावरून घरोघरी झळकणार आहे आणि कौतुकाने त्याचे चाहते त्याची मालिका टी व्ही वर पाहणार आहेत . अर्थात हि मालिका ‘कलर्स ‘च्या मराठी वाहिनीला मोठ्ठा टी आर पी मिळवून देईल असा विश्वास अनेकांना वाटतो आहे ते केवळ संतोष जुवेकर च्या छोट्या पडद्यावरील पुर्नआगमनानेच … आणि या मालिकेची कथा हि वेगळी आहे . शिवाय संतोष च्या जोडीला नायिका आहे ती ‘माझिया प्रियेला प्रीत कळेना ‘ या मालिकेतील अभिजित खांडकेकर ची नायिका असलेली मृणाल दुसाणीस…
वादळवाट , या गोजिरवाण्या घरात या मालिकांमध्ये संतोष ने फार पूर्वी काम केले आहे पण त्यानंतर मोठ्ठ्या पडद्यावरून खऱ्या अर्थाने त्याची कारकीर्द उजळली आणि आता तो सध्या टौप टेन मधील एक असा नामांकित -आणि खास मोठ्ठा चाहता वर्ग असलेला अभिनेता मानला जातो . त्याची लोकप्रियता आणि आगळी वेगळी कथा , मृणाल ची साथ या अशी वैशिष्ट्ये असलेली हि मालिका ‘कलर्स मराठी ‘ ला मालिकेच्या दुनियेत किती पुढे नेतील हे येणारा काळ च स्पष्ट करणार आहे
कलर्स मराठीवर’कन्यादान ‘ हि मालिका बंद होवून ‘असं सासर सुरेख बाई’ ही नवी मालिका २७ जुलैपासून सुरू होतेय.
कलर्स मराठीवर’कन्यादान ‘ हि मालिका बंद होवून ‘असं सासर सुरेख बाई’ ही नवी मालिका २७ जुलैपासून सुरू होतेय.
मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी यांनी सांगितलं कि,ही मालिका आपल्याला संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानिस ह्या जोडीचे रोमँटिक जीवन आणि त्यांचं सासरं दाखवणारं आहे. नेहमी आपण सासू-सुनांचे हवेदावे किंवा कुरघोडी करणा-या सासरच्या मंडळींना पाहतो. पण हे सासरं बाकी मालिकांमधल्या सासरपेक्षा वेगळं दाखविण्याचा प्रयत्न यातून होणार आहे . सासरची ओढ असलेले हे दोघे नवरा-बायको आहेत. “माहेरच्यांचं कौतुक प्रत्येक बाई आणि प्रत्येक पुरूषाला असते, त्यात काही नवीन नाही. पण जर एखाद्या जोडप्याला आपल्या माहेरच्यांच्या ऐवजी सासरच्यांच कौतुक अधिक असेल तर?… ह्या मालिकेच्या निर्मिती मागे.अशा स्वरूपाचा वेगळा विचार आहे
,”असं सासर सुरेख बाई हे भोंडल्याचं गाणं आहे. आणि त्यातून ही ओळ आम्ही मालिकेसाठी घेतली आहे. सासरं म्हटलं की ते मुलीचंच असतं,असंच नेहमी आपल्या डोक्यात असतं. अहो, पण पुरूषांनाही सासरं असतंच की. हे आपण ब-याचदा मालिकांमध्ये विसरतो. अनेक मुलांचीही लग्न करतेवेळी अनेक स्वप्न असतात. त्यांच्याही सासरच्या काही कल्पना असतात. काहींना आपलं सासर खूप श्रीमंत असावं, असं वाटतं. आणि या मालिकेतला यश अशी स्वप्न पाहणारा आहे. यश दहा बाय दहाच्या चाळीतल्या खोलीत रहाणारा आहे. आणि आजकालच्या महागाईच्या जगात चाळीतून मोठ्या घरात जाणं किती कठीण आहे, ते तुम्हां-आम्हां सर्वांनाच माहित आहे. यशला म्हणूनच कुठेतरी आपल्या आशा-आकांक्षाना आपल्या श्रीमंत सासरंच पाठबळ हवंय. पण नेमकी त्याला जी बायको मिळते, ती मोठ्या घरापेक्षा लहान घरातच मानाने आणि सुखी संसार करायला आसूसलेली असते. यशला त्याच्या सासरचं कौतुक असतं, तर त्याच्या बायकोला तिच्या सासरचं कौतुक”अशा कथानकाची हि मालिका आणि मराठीत उत्तम नावलौकिक असलेला अभिनेता संतोष जुवेकर या मालिकेचा नायक आहे संतोष चा महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे तो या मालिकेला उचलून धरेल आणि घराघरातून संतोष ची मालिका म्हणून ती पहिली जाईल असेही समीक्षकांचे म्हणणे आहे