Home Blog Page 3580

पुणे महानगरपालिकेत लोकशाही दिन संपन्न

0

पुणे महानगरपालिकेत आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला.

आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात ५७ निवेदने प्राप्त झाली. बांधकाम विभागाशी संबंधित २३ निवेदने प्राप्त झाली तर अन्य विभागांचे ३४ निवेदने प्राप्त झाली.

सुनावणी झालेल्या प्रकरणी अर्जातील माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्यांशी मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तसेच  अति.महा.आयुक्त(विशेष) ओमप्रकाश बकोरीया व अति.महा.आयुक्त(इस्टेट) राजेंद्र जगताप यांनी चर्चा केली.

निवेदनातील तक्रारी निहाय विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे आदेश मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रमुख अभियंता विवेक खरवडकर, सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त सुहास मापारी, समाज विकास मुख्य अधिकारी हनुमंत नाझीरकर, उद्यान प्रमुख अशोक दि. घोरपडे, सतीश कुलकर्णी उपायुक्त (भूसंपादन), डॉ. संजय वावरे,महापालिका सहआयुक्त उमेश माळी, प्रभारी अभियंता प्रविण गेडाम, कार्यकारी अभियंता प्रसाद भांगे, अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता मदन आढारी, अधीक्षक अभियंता वि.गो.कुलकर्णी,  उपायुक्त अनिल पवार,सहमहापालिका आयुक्त विलास कानडे, उपायुक्त माधव के. जगताप, उपायुक्त मधुकांत वि. गरड, सहमहापालिका आयुक्त विजय दहीभाते, सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते.

सिलेंडरच्या स्फोट झाल्याने तीन घरे जळाली

0

पुणे कॅम्प नवा मोदीखाना भागातील कुंभारबावडी भाजी मार्केट जवळील लोकवस्तीमधील सिलेंडरच्या स्फोट झाल्याने तीन घरे जळाली . दुपारी बाराच्या सुमारास हा सिलेंडर स्फोट झाला . त्यावेळेस जवळील भाजी विक्रेत्यांना धूर आणि आगीचे लोट दिसले . विक्रेत्यांनी आरडा ओरड केल्याने त्यांनी तात्काळ वस्ती मधील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढले . तो पर्यंत आगीने बाजूकडच्या घरांना घेरले होते , त्यामुळे बाजूची घरे जाळून खाक झाली , सर्व घरातील सामानाचे कोळसा झाला होता . यामध्ये रमेश कोपेल्लू , किसन बनसोडे , संदीप जगताप आदीची घरे जळाली . किसन बनसोडे यांच्या घरातील सिलेंडरचा  स्फोट झाला होता . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमनच्या दोन्ही गाड्यांनी आग विझविली तर अग्निशमन कर्मचारी यांनी  बाजुकडच्या घरातील सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. यावेळी घटनास्थळी   पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक अतुल गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते निलेश कणसे , बिल्लू सारवान , संजय जाधव , शिल्पा कांबळे , मार्शल जेकब आदींनी सामान सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले

mail.google.com

पुणेकर भक्तांच्या योगदानाने तंजावर येथील वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज संध्या मंडपाचा जीर्णोद्धार

0
2

पुणे :
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी (टेंब्ये स्वामी) यांच्या 101 पुण्यतिथी समाधी शताब्दी वर्ष निमित्त तंजावर तामिळनाडू येथील त्यांच्या संध्या मंडपाचा जीर्णोद्धार झाला. पुणेकर भक्तांच्या योगदानानंतर पूर्णत्वास गेलेल्या या संध्या मंडपाचे ठिकाणी पादुका स्थापन कार्यक्रम मोरेश्‍वर बुवा जोशी (चर्‍होलीकर) महाराज यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमासाठी श्री शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज, गणेश स्वरूपानंदगिरी महाराज (चेन्नई), डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख (पुणे) तसेच महाराष्ट्र, कर्नाटकमधील स्वामीभक्त उपस्थित होते.
श्री महागणेश अधिष्ठान विश्‍वस्त न्यासाने संयोजन केले.

नाशिकच्या मान्यवरांचा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश

0
mail.google.com
पुणे :
पुणे येथील संकल्प कार्यालयातील रासप प्रदेश कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या शिबिरात नाशिक येथील व्यवस्थापक गोपाल अरखडे, व्यावसायिक विलास कांगुणे, संतोष भालेराव, शीतलकुमार वलवाडीकर, विरेंद्र शिंदे, व्यवस्थापक रावसाहेब सानप, विजय गोसावी यांनी रासपमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी महाप्रदेश महासचिव बाबासाहेब दोडतले, महिला अध्यक्षा कैलास कोळसे-पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव सुदर्शन उगले, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमख बापूसाहेब शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री बाळासाहेब गिधाड, नाशिक शहराध्यक्ष राजेंद्र पोथारे, नाशिक शहरसंपर्क प्रमुख कैलास होळनोर, नाशिक शहर कोषाध्यक्ष भागवत रूपनर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

बेरोजगार विद्युत अभियंत्यांच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद

0

पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलाने सोमवारी (दि. 3) आयोजित केलेल्या बेरोजगार विद्युत अभियंत्यांच्या

मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

देखभाल व दुरुस्तीची कामे थेट लॉटरी पद्धतीने देण्यासाठी तसेच फिडर व्यवस्थापक म्हणून नेमणुकीबाबत

बेरोजगार विद्युत अभियंत्यांसाठी रास्तापेठ येथील महावितरणच्या प्रशासकीय इमारतीत हा मेळावा झाला. प्रभारी

मुख्य अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत यांनी या दोन्ही योजनांची सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली. यावेळी

अधीक्षक अभियंता श्री. शिवाजी चाफेकरांडे व श्री. अंकुश नाळे यांची उपस्थिती होती. बेरोजगार विद्युत अभियंत्यांना

महावितरणमधील कंत्राटदार म्हणून नोंदणीची प्रक्रिया, योजनांतील तांत्रिक कामांचे स्वरुप आदींबाबत माहिती देण्यात

आली. तसेच विद्युत अभियंत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या मेळाव्यात सहभागी झालेल्या 144

बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने थेट कामे व फिडर व्यवस्थापक या दोन्ही योजनांचे सविस्तर माहितीपत्रक

बेरोजगार विद्युत अभियंत्यांना पहिल्या वर्षी प्रत्येकी 10 लाख रुपयापर्यंतची वार्षिक 50 लाखांची कामे मिळणार आहे.

ही कामे मुदतीत पूर्ण केल्यानंतर दुसर्‍या वर्षी 15 लाखांपर्यंतची एकूण वार्षिक पाच कामे अशी एकूण 75 लाखांपर्यंतची

कामे देण्यात येणार आहे. तसेच वाणिज्यिक व वितरणाची अधिक हानी असलेल्या वाहिन्यांवर फिडर व्यवस्थापक म्हणून

बेरोजगार विद्युत अभियंता किंवा सेवानिवृत्त अभियंते यांची नेमणूक करण्यात येणार आहे. फिडर व्यवस्थापक म्हणून

संबंधीत वाहिनीवरील मीटर रिडींग, बील वाटप, नवीन वीजजोडणी, वीजचोरीविरोधात कारवाई व सर्वसाधारण

देखभाल अशी कामे दिली जाणार आहे. महावितरणमधील या दोन्ही योजनांचा बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी लाभ

घ्यावा व पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत विभागीय कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता श्री.

भालचंद्ग खंडाईत यांनी केले.

पहिल्यांदाच मराठी चित्रपटात भाषेचा त्रिवेणी संगम – झरी

0

2 3 4

भाषा ही मैला-मैलावर बदलत जाते, परंतु कलाप्रकरात म्हणजेच नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसते ती प्रमाणभाषा (मराठी), परंतु वास्ताविकतेच्या भावदर्शनासाठी लेखक-दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी तुकाराम बिडकर, राधा बिडकर, कुंदन ढाके यांच्या टी.एच. फिल्म्स या निर्मितीसंस्थे अंतर्गत झरी या मराठी चित्रपटात अनोखा प्रयोग केला आहे, या चित्रपटातून पहिल्यांदाच वराडी , तेलगू आणि छत्तीसगडी भाषांचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

खैरलांजीच्या माथ्यावर या ज्वलंत विषयावर चित्रपट देणारे लेखक – दिग्दर्शक राजू मेश्राम याबाबत सांगतात की चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार हा त्रिवेणी संगम झाला आहे. वेगळया राज्यातून येणारी माणसं आपल्याच भाषेत सवांद करतांना दिसावे म्हणुन हा प्रयोग करण्यात आला, सोय म्हणुन चित्रपटाला इंग्रजी सब टाईटल देण्यात आले आहेत, मराठी भाषेसोबत या भाषेतील गोडवा प्रथमच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. वास्तववादी सवांदासोबत चित्रपटाचे लोकेशन देखील यवतमाळच्या वास्तववादी लोकेशनची निवड करण्यात आली होती. वराडी , तेलगू आणि छत्तीसगडी भाषांकारिता त्या त्या भाषेतील काही लेखकांची मदत घेण्यात आली होती, त्यांना इंग्रजी भाषेत सवांद देवुन त्यांच्याकडून ते ह्या भाषेत भाषांतरित करण्यात आले होते, शिवाय त्यांच्या उच्चारांसाठी ते सवांद त्यांच्याकडून रेकोर्ड करून घेवून मराठी कलाकारांच्या आवाजात डबिंग करण्यात आले हे उल्लेखनीय आहे.

चित्रपटात तुकाराम बिडकर, निशा परुळेकर, नम्रता गायकवाड, नागेश भोसले, अनंत जोग, मिलिंद शिंदे, अनिकेत केळकर, डॉ.संदीप पाटील, कमलेश सावंत, विजय सातदिवे, वंदना भगत, डॉ.स्मिता डोंगरे इ. कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

रॉस इंटरनैशनल’ च्या ‘फुंतरू’ चा मुहूर्त संपन्न

0

 

2 3

‘इरॉस इंटरनैशनल’ च्या ‘फुंतरू’ या नवीन चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात शुक्रवारी सायंकाळी एका शानदार समारंभात पार पडला. मराठीतील पहिली ‘सायन्स फिक्शन लव्हस्टोरी’ म्हणून हा चित्रपट ओळखला जाणार असल्यामुळे या चित्रपटाबाबत मराठी चित्रपटसृष्टीत खूप उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय ‘शाळा’ आणि ‘आजोबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्यामुळे या चित्रपटाबाबतच्या रसिकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या गेल्या आहेत. अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा ‘हटके लुक’ हेही या चित्रपटाचे खास वैशिष्ठ्य असणार आहे. ‘इरॉस इंटरनैशनल’ च्या निर्मात्या क्रिशिका लुल्ला यांची ‘फुंतरू’ ही पहिलीच निर्मिती असून ‘तनू वेड्स मनु (रिटर्न्स )’ च्या अभूतपूर्व यशानंतर क्रिशिका लुल्ला आता मराठी चित्रपटाकडे वळल्या आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फुंतरू’ चा मुहूर्तसोहळा पार पडला. क्रिशिका लुल्ला यांच्याच हस्ते मुहूर्ताच्या दृश्याची फटमार करण्यात आली. याप्रसंगी ‘फुंतरू’ चे सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पाईस स्टुडिओज एन्टरटेन्मेन्ट प्रा. लि. आणि अजय ठाकूर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘फुंतरू’ ही एक ‘सायन्स फिक्शन लव्हस्टोरी’ असून तंत्रज्ञानाचा अति वापर केल्यानंतर नेमके काय होऊ शकते त्यावर या चित्रपटात मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा स्वत: सुजय डहाके यांनीच लिहिली आहे. आशयघन कथेला श्रवणीय संगीताची जोड मिळाल्यामुळे ‘फुंतरू’ रसिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास दिग्दर्शक सुजय डहाके यांना वाटतो. ‘फुंतरू’ मध्ये केतकी माटेगावकर, मदन देवधर, शिवराज वायचळ, शिवानी रंगोले, ऋतुराज शिंदे, अंशुमन जोशी, रोहित निकम आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात केतकी माटेगावकर नेमक्या कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार याबाबत प्रचंड उत्सुकता असून त्यासाठी रंगभूषाकार विनोद सरोदे आणि वेषभूषाकार आयुषी दगड यांनी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु केले जाणार आहे.

जुलैमध्ये पुण्यात डेंगीचे 75 रुग्ण सापडले….खबरदारी घ्या …

0
पुणे – शहरात जुलैमध्ये डेंगीचे 75 रुग्ण सापडले असून, गेल्या सहा महिन्यांमध्ये या रोगाचे 113 रुग्ण आढळले आहेत. शहरात गेल्या दिवसांपासून पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावत आहेत. पावसाचे हे पाणी सोसायट्यांच्या, कार्यालयांच्या आवारात पडलेल्या वस्तूंमध्ये साचले जाते. त्यातून डेंगीच्या एडीस इजिप्ती या डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.
घरातील फ्रिजच्या मागील ट्रेमधील आणि फुलदाणीमधील पाणी, सोसायट्यांमधील छोट्या बागा, गच्चीवर ठेवलेल्या वस्तू आणि कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून, डेंगीच्या डासांची अंडी सापडल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. पावसाला सुरवात झाल्यानंतर डेंगीचा उद्रेक वाढतो, हा आत्तापर्यंतच अनुभव आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत डेंगीच्या रुग्णांची संख्या एक आकडी होती. जुलैअखेरपर्यंत ही संख्या वाढल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने धडक मोहिमा सुरू केल्या आहेत. 
“”शहर आणि परिसरात ताप, थंडी आलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गोळ्या औषधे घेऊनही दोन ते तीन दिवस हा ताप कमी होत नाही. अशा वेळी रुग्णाला रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. अशा रक्ताची चाचणी केलेल्या दहापैकी दोन ते तीन रुग्णांना सध्या डेंगी झाल्याचे निदान होते. त्यानुसार त्यांना पुढील उपचार दिला जातो.‘‘ 
शहरातील डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या 
जानेवारी …………… 11 
फेब्रुवारी …………… 8 
मार्च ………………. 4 
एप्रिल .. …………… 1 
मे …………………. 3 
जून ………………. 11 
जुलै ……………….75

नवाझ शरीफ हल्ल्यातून बालंबाल बचावले

0

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ रविवारी रात्री त्यांच्या कार ताफ्यावर झालेल्या हल्यातून बालंबाल बचावले असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार शरीफ त्यांच्या कुटुंबियांसह इस्लामाबादकडे जात असताना त्यांच्या कार ताफ्यात अचानक घुसलेल्या एका संशयास्पद कारने ओव्हरटेक करून शरीफ यांच्या कारला धडक दिली. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्वरीत ही कार थांबवून चालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शरीफ यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

धडक दिलेल्या कारची नंबर प्लेट बनावट होती. चालकाची चौकशी करण्यात येत असून हा हल्ला लश्कर ए झांगवी संघटनेकडून केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या संघटनेचा लीडर मलिक इशाक पोलिसांबरोबर कांही दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत मारला गेला होता. त्याचा सूड म्हणून हा हल्ला झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

जम्मू, राजौरी व पूँछ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांचा रात्रभर गोळीबार

0

श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने रविवारी (ता. 2) रात्रभर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारतातील कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

पाकिस्तानने गेल्या 12 तासांमध्ये दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू, राजौरी व पूँछ जिल्ह्यांमध्ये गोळीबार केला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रथम गोळीबार केला. त्यानंतर रात्रभर गोळीबार सुरू होता. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.

दरम्यान, पाकिस्तानने जुलै महिन्यामध्ये 18 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले असून, 14 जवान जखमी झाले आहेत.

आपले सरकार विरोधकांवर आणि भ्रष्ट ठेकेदारांवर इतके मेहेरबान का आहे ? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र …

0

आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र …वाचा जसेच्या तसे ….

प्रती,

मा.लोकसेवक श्री. देवेंद्र फ़डणवीस,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मंत्रालय

मुंबई

 

विषय – आपले  सरकार विरोधकांवर आणि भ्रष्ट ठेकेदारांवर इतके मेहेरबान का आहे ?

 

महोदय,

 

महाराष्ट्रातीले चिक्की घोटाळ्याबाबत आपण त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. परंतु चिक्कीसह इतरही काही घोटाळ्यांच्या बाबतीत आपल्याच काही सहका-यांच्या तक्रारीवरून पूर्वीच्या शासनाने नेमलेल्या चौकशी समित्यांनी काही केले नाही.पूर्वीच्या शासनाने त्यांच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी केली नाही ही बाब समर्थनीय नसली तरी समजण्यासारखी आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या सरकारनेही त्याबाबतीत काही ठोस पावले उचलण्याऐवजी अशा समित्यांना मुदतवाढी देण्यातच धन्यता मानली आहे.

 

२०१३ साली सालच्या चिक्की प्रकरणाबरोबरच २०१४ साली आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा व वसतीगृहांसाठी सोलर वॉटर हीटर व बायोमेट्रिक यंत्रणा उभारण्यासंदर्भात  आलेल्या घोटाळ्यांच्या चौकशी साठी समिती नेमली होती. सुमारे ३७.५० कोटी रुपयांच्या या खरेदीतील हीटर्स आश्रमशांळांपर्यंत पोहोचलेच नाही. आपल्या सहका-यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर सर्वप्रथम २६ एप्रिल  २०१४ रोजी एकसदस्यीय चौकशी समिती नेमून तीला अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती.नेहमी प्रमाणे चौकशी समितीला चौकशी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये  या समितीला सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. अर्थात या कालावधीत देखील समितीला चौकशी करायला वेळ मिळाला नाही.तो मिळणार नव्हताच.कारण शासकीय अधिकारी मंत्र्यांना आणि अधिका-यांना नेहमीच पाठिशी घालत असतात.शासकीय अधिकारी आपल्या सहका-यांना वाचवण्यासाठी कोणत्या थराला जातात यावर मुंबई उच्च न्यायालयाने विवेक कुलकर्णी विरूद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात फार गंभीर ताशेरे ओढले आहेत

 

त्यानंतर आपले सरकार आले. आपल्याच सहका-यांच्या  आरोपांवरून चौकशी समिती नेमली गेल्याने आपल्या सरकारच्या काळात तरी सदर समितीचा अहवाल तयार होणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही. उलट आपल्या शासनाने या समितीला फेब्रुवारी २०१५ मध्ये सहा महिन्यांची आणखी मुदतवाढ दिली. या मुदतवाढीनंतर १४ जुलै २०१५ पर्यंत या समितीने अहवाल देणे अपेक्षीत होते परंतु अद्याप तरी असा अहवाल दिला गेल्याचे ऐकिवात नाही.

 

या समित्यांवर काही जबादारी असते की नाही? चिक्की प्रकरणातील चौकशी समितीने अहवाल दिलाच नाही. तरीही आपल्या शासनाने ज्या ठेकेदाराची चौकशी चालू होती त्याच ठेकेदाराला चिक्कीचे कंत्राट दिले . वॉटर हीटर घोटाळ्यातीले समितीने १५ महिन्यांनतरही अहवाल दिला नाही. तरीही या समित्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. हा काय प्रकार आहे.एका दिवसात करोडोंची कंत्राटे मंजूर केली जातात. मात्र त्याच कंत्रांटामधील घोटाळ्यांच्या चौकशा वर्षानुवर्षे पुर्ण होत नाहीत.हा प्रकार अजब आहे.

 

चिक्की घोटाळ्यामूळे  आता हे  सिद्ध झाले आहे की  महिला बाल विकास खात्यातील सर्व कंत्राटदारांचा सूत्रधार एकच असावा. अन्यथा चिक़्कीच्या पाकिटावरील फोन नंबर आणि वॉटर  फिल्टरच्या पुरवठादाराचा नंबर एकच कसा निघाला असता.( पहा जोडपत्र ६ आणि ७) या सूत्रधाराने गेली अनेक वर्षे अधिका-यांच्या मदतीने या खात्यात धुमाकूळ घातल्याचे दिसते.पैशाच्या जोरावर हा ठेकेदार मंत्र्यांनाही खिशात घालत असल्याने सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी अशा घोटाळ्यांची चौकशी होत नाही. आपले सरकार याला अपवाद असेल असे वाटले होते .परंतु तसे झाले नाही.

 

आपल्या शासनाच्या चुकांवर पांघरून घालण्याच्या प्रयत्नात आपण मागील सरकारातील मंत्र्यांच्या अपराधांवरही पांघरून घालत आहात .शासकीय अधिका-यांच्या चौकशी समित्या नेमल्याने त्यातून काहीही निष्पन्न होत नाही हा इतिहास आहे.चौकशी समित्या नेमण्याच्या फार्सची सुरूवात जरी आधीच्या सरकारांनी केली असली तरी आपले सरकारही त्या मळलेल्या वाटेने चालत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. त्याचप्रमाणे आपली ही कृती विरोधकांनी त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी केलेल्या प्रमादांवर पाघरून घालण्यासाठी केलेली मदत ठरत आहे याचा कृपया विचार करावा हि विनंती.

Regards,
Vijay Kumbhar

(Surajya Sangharsh Samiti)

www.surajya.org

vijaykumbhar.blogspot.in

09923299199

‘३:५६ किल्लारी’ चित्रपटाच्या ध्वनिफितेचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते अनावरण

0

1 2 3 4 5 6

 

‘३:५६ किल्लारी’ या मराठी चित्रपटाच्या ध्वनिफितेचे अनावरण अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. अभिनेत्री मेघा मांजरेकर व महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे मुख्य मान्यवर होते. तसेच गायिका महालक्ष्मी अय्यर, अभिनेता अनुराग शर्मा, पंकज विष्णू, बालकलाकार गौरी इंगवले, चित्रपट निर्माते गिरीश साठे, दिग्दर्शक विजय मिश्रा व दिपक भागवत, संगीतकार चिनार – महेश याच बरोबर विविध क्षेत्रातील अनेक दिग्जांच्या उपस्थितीत हा सोहळा नुकताच पार पडला.

या चित्रपटात एकूण तीन गीते आहेत. चंद्रशेखर सानेकर यांनी लिहलेल्या गीतांना हरिहरन, महालक्ष्मी अय्यर यांचा स्वर लाभला असून चिनार – महेश यांनी या गीतांना संगीतबद्ध केले आहे. वेगळ्या धाटणीच्या असलेलेल्या गीतांना संगीत देण्याचे आव्हान संगीतकारांनी चांगलेच पेलले आहे.  हे गीते श्रवण करताना आपल्या लक्षात येते.

डी. जी. एस एन्टरटेन्मेंट या संस्थेची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे लेखन – दिपक भागवत यांचे असून छायाचित्रण – विजय मिश्रा, कला दिग्दर्शक – प्रशांत राणे, प्रसिद्धीप्रमुख – रामकुमार शेडगे, संकलन – जयंत जठार यांचे आहे.  या चित्रपट सई ताम्हणकर, जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे व जॉकी श्राँफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

बालकलाकार गौरी इंगवले तसेच हिंदीतील छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला चेहरा अनुराग शर्मा या चित्रपटातून मराठीत पदार्पण करतोय. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित करण्यात येईल असे चित्रपटाचे निर्माते गिरीश साठे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

महाराजस्व अभियान 2015-16 चा शुभारंभ

0

महाराजस्व अभियान 2015-16 चा शुभारंभ
सातारा (जि.मा.का) : महाराजस्व अभियान आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री.प्रमोद यादव यांनी केले.
सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकालात काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्यात महाराजस्व अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये दि.1 ऑगस्ट 2015 पासून राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या अभियानाची अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करतांना अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव बोलत होते.
श्री. यादव पुढे म्हणाले की, अभियानाबाबत शासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे तो सुस्पष्ट असून त्याचे काटेकोरपणे पालन केले तर हे अभियान राबविण्यात आपण निश्चिपणे यशस्वी होऊ. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करताना ज्या काही त्रुटी राहून जातात किंवा ज्या बाबतीत काळजी घेतली जात नाही, ती घेणे कसे आवश्यक आहे ही श्री. यादव यांनी समजावून सांगितले.
सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली व ते कशा प्रकारे राबवावयाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. महाराजस्व अभियानाचे लोकाभिमुख घटक आणि प्रशासकीय कामकाज असे दोन भाग असून त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी अनुक्रमे उपजिल्हाधिकारी (महसूल) व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकाभिमुख घटकांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे करण्याचे अपेक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या बैठकीत उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पराग सोमण तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

1

राष्ट्रीय कृषी विमा योजनेस 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – जितेंद्र शिंदे

0

सातारा (जि.मा.का) : ज्या शेतकऱ्यांनी 31 जूलै 2015 पूर्वी पेरणी करु शकले नाहीत व राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, अशा शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विम्यात सहभागी होण्यासाठी दि. 7 ऑस्टपर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे , अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी विहीत कागदपत्रासह नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक अथवा राष्ट्रीयकृत बँकेकडे संपर्क साधून आपला विमा हप्ता विहीत वेळेत भरणाबाबतचे तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन दि.4 जून 2015 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे खरीप हंगाम 2015 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना पुढे सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली असून हंगामासाठी पीके व क्षेत्र अधिसूचित करणेत आली आहेत. तसेच सदर योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होणेसाठी 31 जूलै 2015 ही अंतिम मुदत निर्धारित करणेत आली होती. राज्यात पावसाने ताण दिल्याने वेळेत पेरणी करणे शक्य झाले नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावा या उद्देशाने उशीराने पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे या योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मिळणेविषयी मागणी करणेत आली होती. 7 ऑगस्ट 2015 पर्यंत पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने खालील अटींसह राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्ट 2015 पर्यंत वाढविणेत आली असल्याचे शासन निर्णयाव्दारे कळविणेत आले आहे.
ही मुदतवाढ 31 जुलै 2015 नंतर पेरणी होणाऱ्या व दि.1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2015 या कालावधीत पेरणी/ लागवड केलेल्या क्षेत्रासाठी लागू राहील, शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्तावासोबत पिकाची स्थिती चांगली असल्याची नोंद करणे आवश्यक आहे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्तावासोबत पेरणीचे क्षेत्र स्पष्टपणे नमूद केलेले विहीत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, विमा संरक्षित रक्कम ही उंबरठा उत्पन्नाचे किमान अधारभूत किमतीनुसार येणाऱ्या रकमेइतकी (सर्वसाधारण विमा संरक्षण) राहील. या कालावधीत अतिरीक्त विमा संरक्षण (150 टक्के) घेता येणार नाही, प्रस्तुत मुदतवाढीसंदर्भात दि.4 जून 2015 च्या शासन निर्णयाव्दारे निश्चित करण्यात आलेल्या इतर सर्व अटी व शर्ती जशाच्या तशा लागू राहतील असेही श्री. शिंदे यांनी कळविले आहे.

लहान मुलामुलीनी लुटला आनंद ” बजरंगी भाईजान “चा

0

1 4 5

मनजितसिंग विरदी फाऊडेशनच्यावतीने  पुणे शहरातील सामाजिक संस्थेतील विशेष  लहान मुलामुलीकरिता बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये कबीर खान दिग्दर्शित प्रसिध्द अभिनेता सलमान खान  यांचा अभिनय असलेला ”  बजरंगी भाईजान   ” या चित्रपटाचा आनंद लुटला .

   यावेळी मनजितसिंग विरदी , विनोद मथुरावाला , हरमिंदरसिंग घई , साईनाथ बाबर , प्रशांत जगताप , इकबाल शेख , कर्नल कौशिक , ब्रिगेडीअर सुरेश पाटील , रंगनाथ गायकर , जयसिंग भोसले , सुशील खंडेलवाल , बंटी कुलतारसिंग , पैलवान निरंजन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .

    या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मनजितसिंग विरदी , मनप्रितसिंग विरदी , मनमितसिंग विरदी , करणसिंग गिल , गुरुमितसिंग गिल , सलमान शेख , सुरज अग्रवाल , राजू राठोड , गोल्डी गिल , कुणाल गिल , महेद्र कांबळे आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भांबुरे व कैलाशकुमार यांनी केले .

गेली १८ वर्षापासून समाजातील समाजातील विशेष मुलासाठी विनामुल्य चित्रपट  दाखविण्याचे आयोजन मनजितसिंग विरदी फाऊडेशन करीत आहे यामध्ये तैयबिया अनाथ आश्रम , संतवना , मतिमंद निवासी शाळा , सेंट मार्गारेट शाळा , महादजी शिंदे शाळा , अंजुमन इस्लाम पीर मोहम्मद ओंरफेनेज , मजदूर कामगारांची मुले , समता सामाजिक संस्था , युवा प्रतिष्ठान , इमान्युअल शाळा , आदी सामाजिक संस्थामधील पाचशे मुले सहभागी झाले होते .  या विशेष खेळामध्ये मुलांना पॉपकॉर्न , चॉकलेट , बिस्कीटस , वेफर्स , सेन्डवीच , चहा , कॉफी यासारखा खाऊ देण्यात आला .

मनजितसिंग विरदी यांनी सांगितले कि , ”  बजरंगी भाईजान   ” या चित्रपटामध्ये लहान मुलीने दोन्ही देशाला एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे . हा संदेश लहान मुलामध्ये देशभक्तीची भावना जागृत करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याकरिता या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे . मनजितसिंग विरदी फाऊडेशनने गेली अठरा वर्षापासून सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे . फाऊडेशनच्यावतीने ”  बजरंगी भाईजान   ” या चित्रपटाचा एकोणिसावा शो होता .