पुणे महानगरपालिकेत आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला.
आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात ५७ निवेदने प्राप्त झाली. बांधकाम विभागाशी संबंधित २३ निवेदने प्राप्त झाली तर अन्य विभागांचे ३४ निवेदने प्राप्त झाली.
सुनावणी झालेल्या प्रकरणी अर्जातील माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्यांशी मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तसेच अति.महा.आयुक्त(विशेष) ओमप्रकाश बकोरीया व अति.महा.आयुक्त(इस्टेट) राजेंद्र जगताप यांनी चर्चा केली.
निवेदनातील तक्रारी निहाय विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे आदेश मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रमुख अभियंता विवेक खरवडकर, सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त सुहास मापारी, समाज विकास मुख्य अधिकारी हनुमंत नाझीरकर, उद्यान प्रमुख अशोक दि. घोरपडे, सतीश कुलकर्णी उपायुक्त (भूसंपादन), डॉ. संजय वावरे,महापालिका सहआयुक्त उमेश माळी, प्रभारी अभियंता प्रविण गेडाम, कार्यकारी अभियंता प्रसाद भांगे, अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता मदन आढारी, अधीक्षक अभियंता वि.गो.कुलकर्णी, उपायुक्त अनिल पवार,सहमहापालिका आयुक्त विलास कानडे, उपायुक्त माधव के. जगताप, उपायुक्त मधुकांत वि. गरड, सहमहापालिका आयुक्त विजय दहीभाते, सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते.