पुणे कॅम्प नवा मोदीखाना भागातील कुंभारबावडी भाजी मार्केट जवळील लोकवस्तीमधील सिलेंडरच्या स्फोट झाल्याने तीन घरे जळाली . दुपारी बाराच्या सुमारास हा सिलेंडर स्फोट झाला . त्यावेळेस जवळील भाजी विक्रेत्यांना धूर आणि आगीचे लोट दिसले . विक्रेत्यांनी आरडा ओरड केल्याने त्यांनी तात्काळ वस्ती मधील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढले . तो पर्यंत आगीने बाजूकडच्या घरांना घेरले होते , त्यामुळे बाजूची घरे जाळून खाक झाली , सर्व घरातील सामानाचे कोळसा झाला होता . यामध्ये रमेश कोपेल्लू , किसन बनसोडे , संदीप जगताप आदीची घरे जळाली . किसन बनसोडे यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला होता . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमनच्या दोन्ही गाड्यांनी आग विझविली तर अग्निशमन कर्मचारी यांनी बाजुकडच्या घरातील सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. यावेळी घटनास्थळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक अतुल गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते निलेश कणसे , बिल्लू सारवान , संजय जाधव , शिल्पा कांबळे , मार्शल जेकब आदींनी सामान सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले