‘३:५६ किल्लारी’ या मराठी चित्रपटाच्या ध्वनिफितेचे अनावरण अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. अभिनेत्री मेघा मांजरेकर व महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे मुख्य मान्यवर होते. तसेच गायिका महालक्ष्मी अय्यर, अभिनेता अनुराग शर्मा, पंकज विष्णू, बालकलाकार गौरी इंगवले, चित्रपट निर्माते गिरीश साठे, दिग्दर्शक विजय मिश्रा व दिपक भागवत, संगीतकार चिनार – महेश याच बरोबर विविध क्षेत्रातील अनेक दिग्जांच्या उपस्थितीत हा सोहळा नुकताच पार पडला.
या चित्रपटात एकूण तीन गीते आहेत. चंद्रशेखर सानेकर यांनी लिहलेल्या गीतांना हरिहरन, महालक्ष्मी अय्यर यांचा स्वर लाभला असून चिनार – महेश यांनी या गीतांना संगीतबद्ध केले आहे. वेगळ्या धाटणीच्या असलेलेल्या गीतांना संगीत देण्याचे आव्हान संगीतकारांनी चांगलेच पेलले आहे. हे गीते श्रवण करताना आपल्या लक्षात येते.
डी. जी. एस एन्टरटेन्मेंट या संस्थेची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे लेखन – दिपक भागवत यांचे असून छायाचित्रण – विजय मिश्रा, कला दिग्दर्शक – प्रशांत राणे, प्रसिद्धीप्रमुख – रामकुमार शेडगे, संकलन – जयंत जठार यांचे आहे. या चित्रपट सई ताम्हणकर, जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे व जॉकी श्राँफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
बालकलाकार गौरी इंगवले तसेच हिंदीतील छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला चेहरा अनुराग शर्मा या चित्रपटातून मराठीत पदार्पण करतोय. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित करण्यात येईल असे चित्रपटाचे निर्माते गिरीश साठे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.