मनजितसिंग विरदी फाऊडेशनच्यावतीने पुणे शहरातील सामाजिक संस्थेतील विशेष लहान मुलामुलीकरिता बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये कबीर खान दिग्दर्शित प्रसिध्द अभिनेता सलमान खान यांचा अभिनय असलेला ” बजरंगी भाईजान ” या चित्रपटाचा आनंद लुटला .
यावेळी मनजितसिंग विरदी , विनोद मथुरावाला , हरमिंदरसिंग घई , साईनाथ बाबर , प्रशांत जगताप , इकबाल शेख , कर्नल कौशिक , ब्रिगेडीअर सुरेश पाटील , रंगनाथ गायकर , जयसिंग भोसले , सुशील खंडेलवाल , बंटी कुलतारसिंग , पैलवान निरंजन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मनजितसिंग विरदी , मनप्रितसिंग विरदी , मनमितसिंग विरदी , करणसिंग गिल , गुरुमितसिंग गिल , सलमान शेख , सुरज अग्रवाल , राजू राठोड , गोल्डी गिल , कुणाल गिल , महेद्र कांबळे आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भांबुरे व कैलाशकुमार यांनी केले .
गेली १८ वर्षापासून समाजातील समाजातील विशेष मुलासाठी विनामुल्य चित्रपट दाखविण्याचे आयोजन मनजितसिंग विरदी फाऊडेशन करीत आहे यामध्ये तैयबिया अनाथ आश्रम , संतवना , मतिमंद निवासी शाळा , सेंट मार्गारेट शाळा , महादजी शिंदे शाळा , अंजुमन इस्लाम पीर मोहम्मद ओंरफेनेज , मजदूर कामगारांची मुले , समता सामाजिक संस्था , युवा प्रतिष्ठान , इमान्युअल शाळा , आदी सामाजिक संस्थामधील पाचशे मुले सहभागी झाले होते . या विशेष खेळामध्ये मुलांना पॉपकॉर्न , चॉकलेट , बिस्कीटस , वेफर्स , सेन्डवीच , चहा , कॉफी यासारखा खाऊ देण्यात आला .
मनजितसिंग विरदी यांनी सांगितले कि , ” बजरंगी भाईजान ” या चित्रपटामध्ये लहान मुलीने दोन्ही देशाला एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे . हा संदेश लहान मुलामध्ये देशभक्तीची भावना जागृत करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याकरिता या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे . मनजितसिंग विरदी फाऊडेशनने गेली अठरा वर्षापासून सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे . फाऊडेशनच्यावतीने ” बजरंगी भाईजान ” या चित्रपटाचा एकोणिसावा शो होता .