Home Blog Page 3542

विकासासंदर्भात श्रेयस आणि प्रेयस गोष्टींची पुनर्मांडणी करण्याची वेळ :डॉ गिरीश बापट

0
‘सम्यक विकासाच्या दिशेने :भूतान आणि क्युबा ‘ पुस्तकाचे प्रकाशन 
पुणे :
‘आर्थिक वाढ म्हणजे विकास ‘ हा या प्रचलित समीकरणाला  अपवाद असणाऱ्या भूतान आणि क्युबा देशातील सम्यक विकासाचा वेध घेणाऱ्या ‘सम्यक विकासाच्या दिशेने :भूतान आणि क्युबा ‘ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी इंद्र धनुष्य पर्यावरण आणि नागरिकत्व केंद्रात ज्ञान प्रबोधिनी चे संचालक गिरीश बापट ,राजहंस प्रकाशन चे संपादक आनंद हर्डीकर ,पर्यावरण अभ्यासक भरत मन्साटा,लेखक दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते झाले
‘सततच्या अमर्याद विकासाला ब्रेक लावला पाहिजे किवा दिशा वळवली पाहिजे याचे  भान असलेले क्युबा आणि भूतान या देशाच्या विकसन तत्वज्ञानाचा अभ्यास मांडणारे हे पुस्तक महत्वपूर्ण असून दिशादर्शक आहे . जगाला विकासासंदर्भात श्रेयस आणि प्रेयस गोष्टींची पुनर्मांडणी करण्याची वेळ आली आहे ‘ असे प्रतिपादन यावेळी ज्ञान प्रबोधिनी चे संचालक डॉ गिरीश बापट यांनी केले
विकासाचे पर्यावरण आणि मानवता पूरक प्रारूप शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे ‘ असे आनंद हर्डीकर यांनी सांगितले
नागरिक आणि देशाच्या आनंदी असण्याचे प्रमाण हे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यापेक्षा महत्वाचे आहे हे भूतान ने जगाला दाखवून दिले तर क्युबाने भांडवलशाही नंतर शेतीचे सेन्द्रीयकरण ,शहरी शेती ,उत्तम संशोधने आणि महासत्तेच्या विरोधात जाउन मानवी विकासाची पर्यावरण पूरक वाट दाखवली ‘ असे मनोगत पर्यावरण अभ्यासक आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले
पौर्णिमा कुलकर्णी यांनी आभार मानले
unnamed

चार्ल्स शोभराज काही दिवसातच तुरुंगाबाहेर … -अभिनेता रणदीप हुड्डा ची माहिती

0

unnamed1

पुणे-
चार्ल्स शोभराज हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असला तरी त्याची खरी कहाणी मांडण्याचा प्रयत्न
मैं और चार्ल्स‘ या चित्रपटातून केला आहे मात्र हा त्याचा जीवनपट नाही असे सांगत
शोभराज हा लवकरच कारागृहाबाहेर पडणार आहे . त्याने स्वतः या चित्रपटाला शुभेच्छ्या  देखील दिल्या आहेत असे आज येथे या चित्रपटाचा नायक अभिनेता रणदीप हुड्डा याने वक्तव्य केले आहे यामुळे चार्ल्स शोभराज विषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढेल , आणि गुन्हेगाराला हिरो बनविण्याचा प्रयत्न होईल असे प्रश्न मात्र यावेळी रणदीप आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवाळ रामन यांनी फेटाळून लावले . यावेळी अभिनेता आदिल हुसेन हि उपस्थित होते

ते म्हणाले , चार्ल्स शोभराज याच्या जीवनातला केवळ २० ते २५ वर्षाचा काळ यात घेतला आहे १९८६ मध्ये १७० रक्षकांना  झुलवून तिहार तुरुंगातून पसार झालेला शोभराज च्या गुन्हेविषयक कृत्यांचे कोणतेही समर्थन करीत नाही मात्र या काळातील त्याच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे

रणदीप म्हणाला , हायवे या चीत्रापाताहून आणि एकूणच कारकिर्दीतील माझी हि भूमिका माझ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण  आहे हि भूमिका करण्यासाठी मी महत्प्रयासाने त्याला कारागृहात भेटलो हि आणि या चित्रपटाचे ३ पोस्टर त्याच्यापर्यंत पोहोचविले त्यापैकी २ पोस्टरवर त्याने सह्या केल्यात आणि तिसरे पोस्टर त्याच्या कारागृहातील बऱ्याक मध्ये लावले आहे य़ेत्य ३ नोव्हेंबर ला बहुधा त्याची न्यायालयाची तारीख असावी आणि त्यानंतर लवकरच त्याची शिक्षाही संपेल आता तो ७० ते ७५ वर्षाचा आहे . ३० -३५ वर्षे तो जेल मध्ये आहे तसे पाहता जन्मठेप हि १४ वर्षांची असते . हा चित्रपट पाहून लोकांना शोभराज बनावेसे वाटेल काय ? या प्रश्नाचे हि त्याने खंडन केले , तो म्हणाला कोणाला दिल्लीतील पोलिस अधिकारी अमोधकांत हि बना वेसे वाटेल . या चित्रपटातील शोभराज ला पकडणाऱ्या  महारष्ट्रातील पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांची भूमिका मराठी कलावंत नंदू माधव यांनी अत्यंत सुरेखपणे साकारली आहे मात्र यावर चित्रपट बनवावा अशी कदाचित त्यांची इछ्या नव्हती म्हणून त्याबाबत त्यांच्याकडून फारसी माहिती घेतली नाही असेही त्यांनी सांगितले


दिवाळी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

0

 

‘ स्फूर्ती महिला मंडळ  आणि  ‘स्माइल ‘ संस्थेच्या  वतीने महिला बचत गटांनी दिवाळी साठी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार एड . वंदना चव्हाण यांच्या हस्ते विश्राम बाग वाडा येथे रविवारी दुपारी झाले . यावेळी हेमंत चव्हाण ,प्रदीप्ता कुलकर्णी उपस्थित होते

सात लोकांनी बनविला ७० मिनिटांचा सिनेमा द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल

0

 

पुणे(प्रतिनिधी):- द गोल्ड पिरामिड पिक्चर्स निर्मित “द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल”हा चित्रपट प्रेक्षकांच्या  लवकरच भेटीला येत आहे. ह्या चित्रपटाची  निर्मिती  द गोल्ड पिरामिड  पिक्चर्स पुण्यातील नव्याने उभ्या असलेल्या चित्रनिर्मिती संस्थेने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक व संकलन सुशील महाजन तसेच कथा,पटकथा, लेखन डॉ अमित कांबळे  केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट  असे कि, हा चित्रपट सात लोकांनी बनवला असून यातील जे कलाकार चित्रपटात पडद्यावर दिसतात त्यांनीच या चित्रपटाच्या तांत्रिक बाबींची म्हणजे केमेरा,साउंड, लाईट,एडिटिंग,अशा सर्व  बाबींची पूर्तता केली असून सर्व कलाकार डॉ,इंजिनिअर्स,प्रोफेसर आहेत. 
    चित्रपटाचे पूर्ण चित्रीकरण पुण्यातील खानापूर येथे १३ दिवसात पार पडले असून सिंक साउंड तंत्राण्यानाचा या सिनेमात करण्यात आला आहे.संपूर्ण सिनेमा ५.१ साउंड मध्ये बनला आहे.या चित्रपटात सस्पेन्स,थ्रिलर,अक्शन,यांचा समावेश आहे. 
या चित्रपटात अनिकेत सोनावणे,दिनेश पवार,सुरज दहिरे,शिवाजी कापसे,दीप्ती इनामदार,सोमनाथ जगताप,निखिल ओडयरहल्ली,हृषीकेश वाईकर या कलाकारंचा समावेश आहे. 

जागतिक मधुमेह दिनानिमित ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजच्यावतीने मधुमेहांसाठी लागणारे फुटवेअर सवलतीच्या दरात उपलब्ध

0

जागतिक मधुमेह दिनानिमित ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजच्यावतीने  मधुमेहांसाठी लागणारे फुटवेअर  सवलतीच्या  दरात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजचे संचालक गिरीष डबीर यांनी सांगितले . जर्मन कंपनीचे असणारे  फुटवेअरमध्ये बूट , सेंडल्स , कृत्रिम अवयवांचा  समावेश आहे . यामुळे रुग्णांना अत्याधुनिक साधनांची उपलब्ध झाल्याने आरामदायक जीवन जगता येईल . संपर्कासाठी – ओर्थोपेडिक इंडस्ट्रीज

२८० , नारायण पेठ , माती गणपती जवळ , न चि केळकर रोड , पुणे – ४११०३०,

 गिरीष डबीर – मोबाईल – ९८२२२७४४४४

लोकशाही दिनात ९८ निवेदने सादर

0

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य भवनात महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात आयोजित

करण्यात आलेल्या लोकशाही दिनात ७७ निवेदने प्राप्त झाली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिन

संपन्न झाला. या प्रसंगी अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत, अनिरुध्द पावसकर, नरेंद्र साळुंके, प्रवीण गेडाम,

सहा. आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य विधी अधिकारी

रqवद्र थोरात, सह महापालिका आयुक्त क्र. २ ज्ञानेश्वर मोळक, उप आयुक्त सुनिल केसरी, नितीन उदास,

सतीश कुलकर्णी, सुहास मापारी, मधुकांत गरड, तसेच विविध विभागांचे अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित

आज प्राप्त झालेल्या निवेदनांमध्ये ४२ निवेदने शहर अभियंता विभागाशी संबंधित होती व ५६

निवेदने ही करआकारणी व करसंकलन विभाग,  उद्यान विभाग, उप आयुक्त क्र. १,२,३ व ४,उप आयुक्त

(तांत्रिक), विधी विभाग, भूमी आणि qजदगी विभाग  व अन्य विभागाकडील प्राप्त झाली.

निवेदनातील तक्रारीनुसार निवेदनकाराशी तसेच संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करुन आवश्यक

पाहणी करणे तसेच कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित खाते प्रमुखांना देण्यात आले. तसेच विहीत

मुदतीत कार्यवाही करण्याचे आदेश मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया यांनी संबंधित खाते प्रमुखांना दिले.

क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयातील लोकशाही दिन

महापालिकेच्या ४ क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयात दरमहाचे तिसèया सोमवारी सकाळी १० ते १२ या

वेळात क्षेत्रिय उपायुक्त स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. माहे ऑक्टोबर २०१५ मधील

लोकशाही दिन १६/११/२०१५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.

नागरिकांनी कृपया मनपाशी संबंधित नागरी सेवांच्या तक्रारींची निवेदने क्षेत्रिय उपायुक्त कार्यालय

लोकशाही दिनात सादर करावीत. पुढील एक महिन्याच्या आत निवेदनांवर कार्यवाही झाली नाही तर पुढील

महिन्यातील पहिल्या सोमवारी मनपा मुख्य भवनात  महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात

आयोजित केल्या जाणाèया लोकशाही दिनाकरिता निवेदने सादर करावीत. तथापि दोन्हीकडील लोकशाही

दिनात लोकशाही दिनापूर्वी किमान १५ दिवस विहीत नमून्यात निवेदने आवश्यक कागदपत्रांसह सादर

अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना :

१. क्षेत्रिय उपायुक्त यांना उद्देशून अर्ज.

२. अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयात

दिलेली अथवा पाठविलेली  असणे आवश्यक आहे.

नवीन बदला संदर्भात माहिती व अर्ज नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in. या संकेत

स्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संगणक संकेताक २०१२०९२७१४५१०७०१००

महावितरणची भरती पारदर्शक प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहन -नागपुरात अज्ञातांविरुद्ध गुन्हा

0

पुणे, दि. 02 : महावितरणमध्ये 1648 विविध पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून अत्यंत

पारदर्शीपणे होत आहे. यात निवडीचे प्रलोभने दाखविण्यात येत असल्यास उमेदवारांनी त्यास बळी पडू नये, असे आवाहन

महावितरणने केले आहे.

दरम्यान, नागपूर येथे भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना निवडीचे प्रलोभन दाखविणार्‍या काही अज्ञात व्यक्तींविरोधात

महावितरणकडून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

rsz_1logo-for-portal

वेगळ्या क्लुप्तीद्वारे 16 लाखांची वीजचोरी मुंढव्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पुणे : वीजमीटरला वेगळा उच्चदाबाचा पुरवठा जोडून डिस्प्ले बंद करून रिडींग नाहीसे करण्याची मुंढवा येथील

वाणिज्यिक वीजग्राहकाकडील क्लुप्ती महावितरणने उघडकीस आणली आहे. यात 1,01,280 युनिट्‌सच्या 15 लाख 87

हजार 880 रुपयांची वीजचोरी उघड झाली. याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध

सोमवारी (दि. 2) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, बंडगार्डन विभाग अंतर्गत मुंढवामधील जहागिर नगर येथे फ्लेक्स प्रिटींगसाठी अरुणा प्रवीण

लुंकड यांच्या नावे वाणिज्यिक वीजजोडणी दिलेली आहे. या वीजजोडणीचा वापर कुणाल जैन यांच्याकडून केला जात होता.

वीजवापराच्या नोंदीबाबत अनियमितता आढळून आल्यामुळे सदर ग्राहकाकडे नवीन वीजमीटर लावण्यात आले व जुने

मीटर तपासणीसाठी चाचणी विभागाला पाठविण्यात आले. तथापि फेरफार केल्याचा संशय बळावल्याने हा वीजमीटर

तपासणीसाठी नवी दिल्ली येथे पुरवठादाराकडे पाठविण्यात आला. यात महावितरणच्या वीजपुरवठ्यासह आणखी वेगळा

उच्चदाबाचा वीजपुरवठा ( ॄ ) जोडून वीजमीटरचा डिस्प्ले बंद करण्यात आल्याचे निदर्शनात आले. वीजमीटरचा रिडींग

डिस्प्ले बंद करून वीजवापराची नोंद होणार नाही या हेतुने मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे दिसून आले. यात

1,01,280 युनिट्‌सच्या 15 लाख 87 हजार 880 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले.

या वीजचोरीप्रकरणी वीजग्राहक अरुणा प्रवीण लुंकड व वीजवापरकर्ता कुनाल जैन यांच्याविरुद्ध रास्तापेठ (पुणे)

येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 व 138 अन्वये सोमवारी (दि. 2)

गुन्हा दाखल करण्यात आला.

CRIME_jpg_475x310_q85

———————————————–

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला संघटकपदी रेखा आखाडे यांची नियुक्ती

0

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला संघटकपदी रेखा आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे  अध्यक्ष आमदार अड. जयदेवराव गायकवाड यांनी दिले .

  रेखा आखाडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षा , भारत विकास परिषदवर महिला बालकल्याण विभाग प्रांतीय अध्यक्ष , साध्वी सावित्रीबाई फुले महिला मंडळावर सदस्या , अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या ,पोलिस फ्रेंडस परिषद ऑल इंडिया पुणे शहर अध्यक्षा आदी संस्थावर कार्यरत आहेत .

  सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करणार असून महिला प्रवाहात आणणार आहोत . ग्रामीण भागातील महिलांच्या कार्यशाळा घेणे आदी काम करणार असल्याचे रेखा आखाडे यांनी  सांगितले .

rekha

“पाटलाच्या गावात १२ च्या बाराच्या भावात” चा मुहूर्त

0

 

पुणे :-माउली फिल्म प्रोडक्शन निर्मित “पाटलाच्या गावात १२  भावात”या चित्रपटाचा मुहूर्त विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर आळंदी येथे नुकताच पार पडला.
चित्रपटाचे दिग्दर्शक वाजीद शेख हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.जेष्ट अभिनेता जयवंत वाडकर हे ह्या सिनेमात पाटलाची भूमिका साकारणार आहेत.पाटील हा ह्या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट असणार आहे.
  माउली फिल्म प्रोडक्शन चे निर्माते रवि कदम यांची हि पहिलीच निर्मिती असून ते मराठी चित्रपटाकडे वळले आहेत त्यांच्याच प्रमुख उपस्थित हा मुहूर्त पार पडला. त्यांच्या हस्ते मुहूर्ताच्या दृश्याची फटमार करण्यात आली.या प्रसंगी जेष्ठ सीनेफोटोग्राफर  अशोक राव, लेखक इस्माईल (पापा ),फाईट मास्तर अकबर शरीफ,गीत अप्पा पांचाळ,संगीत दिग्दर्शक  अमीर हडकर, सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
यात जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर,जितु गोस्वामी, मनीषा वाघ,प्रेम, राजेश उबाळे आदि कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून लवकर हा चित्रपट तुमचे मनोरंजन करण्यास येत आहे.लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.
unnamed

कलात्मकतेच्या कक्षा रुंदाविण्याची गरज सोनाली कुलकर्णी

0



पुणे,  आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तीव‘ स्पर्धा आहे, त्यामुळे संवाद साधायलाही लोकांना वेळ नाही. सकारात्मक दृष्टीने कलेकडे पाहण्यासाठी संस्कार आणि परंपरेतून आपला कलेविषयी दृष्टिकोन निर्माण झालेला असतो. हा पूर्वग‘हदूषित दृष्टिकोन दूर ठेवून आपल्या कलात्मकतेच्या कक्षा रुंदावण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
राजहंस प्रकाशनतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्‍चिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना सोनाली कुलकर्णी बोलत होत्या. प्रकाशक सदानंद बोरसे उपस्थित होते. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ कवियत्री डॉ. अरुणा ढेरे, गायिका सावनी शेंडे, प्रकाशक दिलीप माजगावकर यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेले होते.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. त्यामध्ये कळत नकळतपणे प्रत्येकाला सहभागी व्हावेच लागते. कलेच्या क्षेत्रातही स्पर्धा असावी पण ती नकारात्मक नसावी, संगीत, गायन, वादन या कला आपण लहानपणापासून ऐकत असतो, त्याचा संस्कार आपल्या मनावर होतो. त्यामुळे आपल्याला ठराविक कलाकार आपलेसे वाटतात आणि इतर कलांविषयी दुरावा निर्माण होतो. हा दुरावा कमी केला तर आपण कलेचा अधिक चांगल्या पध्दतीने आवद घेऊ शकतो.’
डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले, ‘केवळ चांगले दिसण्याने किंवा सादरीकरणाने कलाकार मोठा होत नाही. त्यामध्ये त्याचा आत्मा आणि परिश्रम उतरावे लागतात. पाश्‍चात्य संगीताकडे परकेपणाने न पाहता आपल्या कलेचा आवाकार वाढविला पाहिजे.’
या प्रसंगी डॉ. जावडेकर यांनी पॉप, जॅझ, भावसंगीत, नाट्यसंगीतावर आधारीत कार्यक‘म सादर केला. सदानंद बोरसे यांनी प्रास्ताविक केले.

खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण जपान अभ्यास दौर्‍यावर

0
 
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण पाच दिवसांच्या जपान अभ्यास दौर्‍यावर गेल्या आहेत. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज’ आयोजित दौर्‍यात 4 खासदारांचे शिष्टमंडळ तेथे गेले आहे. दि. 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2015 या दरम्यान हा दौरा आहे. या खासदारांसमवेत ‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या दोन सदस्यांचा समावेश आहे.
भारत-जपान व्यापार आणि राजकीय संबंध या विषयावर चर्चा, भेटी, रेल्वे पर्यटन, वाहतूक सुविधांची पाहणी जपान संसदेला भेट, पर्यावरण विषयक बदलांवर जपानच्या उपाययोजनांची माहिती घेणे याचा अभ्यासदौर्‍यात समावेश आहे. भारत-जपान संवाद प्रकल्प या विषयावर हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहेत. त्यासाठी ‘सासाकावा पीस फाऊंडेशन’ ने निमंत्रण दिले आहे. खासदार व्ही. पी. सिंग बडनोर हे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी डेंग्यू विषयक जागृती मोहिम

0

 

पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’मध्ये डेंग्यू विषयक जागृती मोहिम आयोजित करण्यात आली होती. डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छते बाबतीत कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत किटकनाशकांची फवारणी करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या सरंक्षणासाठी ही किटकनाशक फवारणी करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका आयेशा शेख यांनी सांगितलेे.
या मोहिमेत पुणे कॅन्टेानमेंट बोर्डातील श्री. खानंडरे, व श्री. ए. दरोडे तसेच नगरसेवक श्री .ए.गायकवाड यांनी सहकार्य केले.
unnamed

 

‘हृदया’साठी धावा – केम्बर्लि शाह

0
 
पुणे: “आपले हृदय स्वस्थ आणि निरोगी ठेवायचे असेल तर चालणे, धावणे आणि व्यायाम करणे हेच  एकमेव पर्याय असू शकतात.” असे अमेरिकेतील प्रख्यात फीटनेस ट्रेनर केम्बर्लि शाह हिने आज सूसरोड, पाषाण येथील  मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या लोकांना सांगितले.
फिट आणि निरोगी राहण्यासाठी. तसेच त्याचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अवरबाउन्स’ या जीम व फिटनेस संस्थेने आज  मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये २ वर्षांच्या मुलांपासून ते ७० ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत जवळ जवळ हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते. जवळ जवळ २१ किलोमीटर धावणे हे लक्ष्य येथे ठेवण्यात आले होते. या मॅरेथॉनला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेची प्रख्यात फिटनेस ट्रेनर केम्बर्लि शाह ही खास अमेरिकेहून या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती. तसेच धावणे हे आपल्या हृदयासाठी गरजेचे आहे याचे महत्वही तिने यावेळी सांगितले.
“माणसाला चालणे आवडो किंवा न आवडो त्याने कमीत कमी ७ ते ८ किलोमीटर चाललेच पहिजे. आताची जीवनशैली अतिशय तणावपूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याचा ताण लगेच आपल्या हृदयावर पडतो. आजकाल ३० ते ३५ वयातील लोकांनाही हृदयविकार होतात. आपले हृदय आपणच निरोगी ठेवू शकतो, त्यासाठी औषधी घेण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला तर ते आपल्याच हिताचे आहे.” असे आवाहन केम्बर्ली हिने यावेळी तेथे सहभागी झालेल्या नागरिकांना केले. तसेच फिट राहिल्यामुळे आपला आत्मविश्वास आणि तग धरण्याची क्षमता वाढते त्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे असेही तिने सांगितले.
‘अवरबाउन्स’ या फिटनेस जिम संस्थेमधील मैदानी उपक्रमांपैकी मॅरेथॉन हा एक उपक्रम आहे. हा उपक्रम दरवर्षी ‘जागतिक हृदय दिवस’ या निमित्ताने राबविला जात असतो. ‘अवरबाउन्स’ या संस्थेचे संस्थापक दीपक अवटे यावेळी म्हणाले की, “मॅरेथॉन हा एक फक्त उपक्रम नसून सामाजिक संमेलनाचा एक भाग आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक व्यक्तीला धावण्यासाठी प्रोत्साहन तर मिळतेच तसेच त्याची धावण्याची क्षमतादेखील वाढते. आम्ही या उपक्रमात कुठल्याही व्यक्तीला विजेतेपद देणार नाही आहोत. कारण मुळात हा उपक्रम आम्ही धावण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आयोजित करीत असतो. लोकांना व्यायाम, चालणे किंवा धावणे याविषयी कुठलीही भीती वाटू नये यासाठी राबवीत असतो.” जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिटनेस चे महत्व पोहोचले पाहिजे हा एकमेव उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

‘आय एम इन लव ’ अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

0

मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका असे गुण सर्व गुण संपन्न असणाऱ्या रेणू चौधरी यांचा ‘आय एम इन लव’ हा गीतांचा नविन अल्बम लवकरच बाजारात दाखल होणार आहे. असे  रेणू चौधरी यांनी सांगितले. आर. आर. आर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या अल्बममध्ये एकूण सहा गीते असून या गीतांना संगीत आणि गायन देखील रेणू चौधारो यांचे आहे. यात प्रेम गीत, विरह गीत आणि नृत्याला हि प्राधान्य दिले आहे.

लहानपणापासूनच रेणू चौधरी यांना गायनाची आवड असल्याने त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून गायिकी सुरु केली सुरवातीला त्यांनी भक्ती गीतांना प्राधान्य देत ती गीते गायली. त्यांनंतर टेलिव्हिजन वरती काही शो केले आणि आता स्वतःच्याच अल्बमसाठी गायन करत आहेत. आगामी काळात चित्रपटांसाठी गायन करणार असल्याचे रेणू यांनी सांगितले.

रेणू म्हणाल्या, कि हिंदी गीतांबरोबर मला अन्य भाषेतील गीते गायाला आवडतील. त्यात प्रामुख्याने मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली गीते मला गायाला आवडतात. या गीतांवर मी जमेल तसा रियाज पण करत असते. काही विविध भाषेतील चित्रपटांच्या  गायनासाठी माझ्याशी बोलणे देखील झाले आहे. लवकरच मी आपणाला मी अन्य भाषेत गायन करताना दिसेल. माझ्या येणाऱ्या ‘आय एम इन लव’ अल्बम कडून खूप अपेक्षा आहेत. रसिकांनी मला भरभरून साथ द्यावी असे हि रेणुकाने तिच्या मनातील इच्छा व्यक्त करून दाखवली.