पुणे महानगरपालिकेच्या मुख्य भवनात महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात आयोजित
करण्यात आलेल्या लोकशाही दिनात ७७ निवेदने प्राप्त झाली.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिन
संपन्न झाला. या प्रसंगी अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत, अनिरुध्द पावसकर, नरेंद्र साळुंके, प्रवीण गेडाम,
सहा. आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य विधी अधिकारी
रqवद्र थोरात, सह महापालिका आयुक्त क्र. २ ज्ञानेश्वर मोळक, उप आयुक्त सुनिल केसरी, नितीन उदास,
सतीश कुलकर्णी, सुहास मापारी, मधुकांत गरड, तसेच विविध विभागांचे अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित
आज प्राप्त झालेल्या निवेदनांमध्ये ४२ निवेदने शहर अभियंता विभागाशी संबंधित होती व ५६
निवेदने ही करआकारणी व करसंकलन विभाग, उद्यान विभाग, उप आयुक्त क्र. १,२,३ व ४,उप आयुक्त
(तांत्रिक), विधी विभाग, भूमी आणि qजदगी विभाग व अन्य विभागाकडील प्राप्त झाली.
निवेदनातील तक्रारीनुसार निवेदनकाराशी तसेच संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करुन आवश्यक
पाहणी करणे तसेच कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित खाते प्रमुखांना देण्यात आले. तसेच विहीत
मुदतीत कार्यवाही करण्याचे आदेश मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया यांनी संबंधित खाते प्रमुखांना दिले.
क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयातील लोकशाही दिन
महापालिकेच्या ४ क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयात दरमहाचे तिसèया सोमवारी सकाळी १० ते १२ या
वेळात क्षेत्रिय उपायुक्त स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. माहे ऑक्टोबर २०१५ मधील
लोकशाही दिन १६/११/२०१५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
नागरिकांनी कृपया मनपाशी संबंधित नागरी सेवांच्या तक्रारींची निवेदने क्षेत्रिय उपायुक्त कार्यालय
लोकशाही दिनात सादर करावीत. पुढील एक महिन्याच्या आत निवेदनांवर कार्यवाही झाली नाही तर पुढील
महिन्यातील पहिल्या सोमवारी मनपा मुख्य भवनात महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात
आयोजित केल्या जाणाèया लोकशाही दिनाकरिता निवेदने सादर करावीत. तथापि दोन्हीकडील लोकशाही
दिनात लोकशाही दिनापूर्वी किमान १५ दिवस विहीत नमून्यात निवेदने आवश्यक कागदपत्रांसह सादर
अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना :
१. क्षेत्रिय उपायुक्त यांना उद्देशून अर्ज.
२. अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयात
दिलेली अथवा पाठविलेली असणे आवश्यक आहे.
नवीन बदला संदर्भात माहिती व अर्ज नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in. या संकेत
स्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संगणक संकेताक २०१२०९२७१४५१०७०१००