महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला संघटकपदी रेखा आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आमदार अड. जयदेवराव गायकवाड यांनी दिले .
रेखा आखाडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षा , भारत विकास परिषदवर महिला बालकल्याण विभाग प्रांतीय अध्यक्ष , साध्वी सावित्रीबाई फुले महिला मंडळावर सदस्या , अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या ,पोलिस फ्रेंडस परिषद ऑल इंडिया पुणे शहर अध्यक्षा आदी संस्थावर कार्यरत आहेत .
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करणार असून महिला प्रवाहात आणणार आहोत . ग्रामीण भागातील महिलांच्या कार्यशाळा घेणे आदी काम करणार असल्याचे रेखा आखाडे यांनी सांगितले .