“पाटलाच्या गावात १२ च्या बाराच्या भावात” चा मुहूर्त
पुणे :-माउली फिल्म प्रोडक्शन निर्मित “पाटलाच्या गावात १२ भावात”या चित्रपटाचा मुहूर्त विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर आळंदी येथे नुकताच पार पडला.
चित्रपटाचे दिग्दर्शक वाजीद शेख हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.जेष्ट अभिनेता जयवंत वाडकर हे ह्या सिनेमात पाटलाची भूमिका साकारणार आहेत.पाटील हा ह्या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट असणार आहे.
माउली फिल्म प्रोडक्शन चे निर्माते रवि कदम यांची हि पहिलीच निर्मिती असून ते मराठी चित्रपटाकडे वळले आहेत त्यांच्याच प्रमुख उपस्थित हा मुहूर्त पार पडला. त्यांच्या हस्ते मुहूर्ताच्या दृश्याची फटमार करण्यात आली.या प्रसंगी जेष्ठ सीनेफोटोग्राफर अशोक राव, लेखक इस्माईल (पापा ),फाईट मास्तर अकबर शरीफ,गीत अप्पा पांचाळ,संगीत दिग्दर्शक अमीर हडकर, सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
यात जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर,जितु गोस्वामी, मनीषा वाघ,प्रेम, राजेश उबाळे आदि कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून लवकर हा चित्रपट तुमचे मनोरंजन करण्यास येत आहे.लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.