श्री अय्यपा धर्म परिषदेच्यावतीने दीपावलीनिमित रास्ता पेठमधील शिराळशेठ चौकातील अय्यपा मंदिरात महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई आणि दिवाळी फराळ देण्यात आला . यावेळी श्री अय्यपा धर्म परिषदेचे अध्यक्ष जनार्दन पोदवाल , उपाध्यक्ष सुब्रमन्यम अय्यर , सचिव मधु नायर , सहसचिव महेश पोदवाल , कार्यकारिणी सदस्य राजेश पोदवाल ,जयंती नायर , रघु नायर , महेश राजमणी , विजय नायर , विनोद नायर , स्वरनम विश्वनाथन , उमा नायर , आदी उपस्थित होते .
पिंपरी व सांगवीमधील 32 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा- नवीन 22 केव्ही वीजवाहिनी कार्यान्वित
पुणे, दि. 15 : अतिभारित झालेल्या पिंपरी उपकेंद्गाचा 50 टक्के वीजभार कमी करण्यासाठी रहाटणी 132 केव्ही उपकेंद्गातून नवीन 22 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी रविवारी (दि. 15) कार्यान्वित करण्यात आली. या नवीन वीजवाहिनीमुळे पिंपरी व सांगवी परिसरातील सुमारे 32 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
पिंपरी येथील 22/22 केव्ही उपकेंद्गातून पिंपरी व सांगवी परिसराला वीजपुरवठा केला जातो. पिंपरी उपकेंद्गातून निघणार्या एचए-1 या 22 केव्ही वीजवाहिनीद्वारे 12 मेगावॉट वीजपुरवठा केला जात होता. विजेची वाढती मागणी, नवीन वीजजोडण्या आदींमुळे पिंपरी उपकेंद्ग व एचए-1 ही 22 केव्ही वीजवाहिनी अतिभारित झालेली होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी रहाटणी 132 केव्ही उपकेंद्गातून नवीन 22 केव्ही वीजवाहिनी प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि रस्ते खोदाईच्या अडचणींमुळे नवीन वाहिनीच्या कामास विलंब होत गेला. सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या या नवीन वीजवाहिनीचे काम कार्यकारी अभियंता श्री. धनंजय औंढेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. धवल सावंत यांनी पिंपरी महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने नुकतेच पूर्णत्वास नेले. काही ठिकाणी ओव्हरहेड तर काही ठिकाणी ही वाहिनी भूमिगत आहे. रहाटणी 132 केव्ही उपकेंद्गातून निघालेल्या या नवीन 22 केव्ही वाहिनीद्वारे 6 मेगावॉटचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आता पिंपरी उपकेंद्गाचा व या उपकेंद्गातून निघालेल्या 22 केव्ही एचए-1 वीजवाहिनीवरील 6 मेगावॉटचा वीजभार कमी झाला आहे.
कार्यान्वित झालेल्या नवीन वीजवाहिनीमुळे पिंपरी गाव परिसरातील वाघेरे वस्ती, पिंपरी गाव, पिंपरी मार्केट या परिसरातील 12 हजार तसेच सांगवी परिसरातील काशिद पार्क, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, गुलमोहर कॉलनी, लक्ष्मीनगर, जवळकरनगर, भैरोनाथनगर परिसरातील सुमारे 20 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यासोबतच पिंपरी उपकेंद्गातील वीजभार निम्मा झाल्याने या उपकेंद्गातून निघणार्या श्रीनगर वाहिनी, जवळकरवस्ती वाहिनी, गणेशम वाहिनी, वाघेरे वाहिनी, पिंपरी गाव वाहिनीवरील वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.
शहराच्या विकासाकरिता खाजगी कंपन्याचा सहभाग कौतुकास्पद-महापौर दत्तात्रय धनकवडे
पुणे- शहराच्या विकासाकरिता शहरातील विविध संस्था कंपन्या, कॉर्पोरेट सेक्टर्स एकत्रित येऊन ‘पुणे सिटी
कनेक्ट’ या संस्थेच्या मार्फत शहरात करवायाच्या विविध नागरी सुविधांकरिता एकत्रित येऊन नागरी विकास कामे
करणार आहेत अशा प्रकारचा सहभाग हा अत्यंत कौतुकास्पद असून पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत मह्त्त्वाची घटना आहे.
नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यानुसार नागरिक सुविधांवरही मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मनपास
अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. विविध विकासकामे एकत्रित व मोठ्या प्रमाणावर करण्याकरिता अडचणी येत
असतात. मात्र कॉर्पोरेट, सोशल रिस्पोसिबिलीटी(CSR) अंतर्गत पुढे आलेल्या संस्थाच्या माध्यमाने पुणे शहराचा विकास
झपाट्याने होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. प्रामुखाने घनकचरा प्रकल्प स्वच्छता, शिक्षण, टुरिझम या
क्षेत्रातील विकास होणे अत्यंत आवश्यक असल्याने त्यांनी सांगितले. पुणे सिटी कनेक्ट व पुणे महानगरपालिका यांच्यात
सामंजस्य करार संपन्न झाला. पुणे महानगरपालिकेच्या वतीने मा.महापालिका आयुक्त कुणाल कुमार व पुणे सिटी कनेक्ट
संस्थेचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन यांनी सामंजस्य सामंजस्य करारावर (MOU) सह्या केल्या. सदरचा कार्यक्रम
सेनापती बापट रस्त्यावरील जे डब्लू मेरियट येथे संपन्न झाला.
सदर सामंजस्य करारच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले की सर्व शहरांमध्ये देश,
परदेशात वाढत्या नागरीकारणामुळे नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. समस्यांची सोडूवणूक
करण्यासाठी आवश्यक नागरीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व एकूण शहर विकासाच्या दृष्टीने सर्वत्र पब्लिक
पार्टनरशिप(PPP) सारख्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वाढत्या नागरीकीकारणामुळे देण्यात येणाऱ्या सुविधांवर ताण येत आहे. प्राप्त परिस्थितीत उपलब्ध निधी अशा
अनेक बाबीमुळे मर्यादा येतात. मात्र पब्लिक पार्टनरशिप द्वारे यातून समस्या निराकरण करण्यास मोठ्या प्रमाणावर मद्दत
होते. पुणे शहराची ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहेत. पुण्यात विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ, सल्लगार शहरविकासाकरिता
पुढ्ये येणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचप्रमाणे विविध संस्था, संघटना, स्वंयसेवा संस्था, कंपन्या मोठ्या
प्रमाणावर पुढ्ये येत आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थरावर कंपन्या पुढ्ये येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पुणे सिटी कनेक्ट
संस्थेच्या माध्यमाने पुणे शहर विकासाकरिता ही उत्तम संधी आलेली आहे. याचा शहरविकासाकरिता नक्कीच फायदा
होणार असल्याने सामंजस्य कराराच्या रूपाने विकासाचे पाउल टाकले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे सिटी कनेक्ट संस्थ्येचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन यांनी सांगितले की शहरविकासाच्या दृष्टीने कॉर्पोरेट,
सोशल रिस्पोसिबिलीटी (CSR) च्या माध्यमाने अनेक संस्था कंपन्या पुढे येत आहेत. मात्र शहरात एकाच कामासाठी
एकाच प्रकल्पासाठी विविध कंपन्यानी खर्च न करता विविध कामासाठी व नियोजनबद्ध निधीचा वापर व्हावा. योग्य
नियोजन व्हावे तसेच विविध कंपन्या व मनपा यांच्यात समन्वय राखून यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी व्हावी
याकरिता पुणे सिटी कनेक्ट ही संस्था महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील
कंपन्याची खर्च करण्याची तयारी त्यांचे व कंपनीचे एकत्रित नियोजन, शहर विकसाकरिता ध्येय, दूरदृष्टी यांचा विचार
करून एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे सिटी कनेक्ट(PCC) हे उद्योगांकडून चालविले जाणारे एक
व्यासपीठ आहे. आणि एक खरी सार्वजनिक-खाजगी लोकांची भागेदारी(PPP) करण्याचे विचाराधीन आहे. आपल्या
शहरास डिजिटल, स्वच्छ, सुविधा पुणे मध्ये वेगाने परिवर्तीत करण्यासाठी पुण्याच्ये कॉर्पोरेटर्स नागरिक आणि स्थानिक
शासन यांच्या वैयक्तिक प्रयत्नाचा आणि लावण्यतेच्या चैतन्याचा पुरेपूर लाभ घेणे हा या व्यासपीठाचा उद्देश आहे.
पुणे सिटी कनेक्ट(PCC) मध्ये कॉर्पोरेट, सामाजिक जबाबदारीच्या (CSR) यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून या
दृष्टीकोणाची अंमलबजावणी करण्याची जबरदस्त क्षमता या उद्योगांमध्ये आहे असा आमचा विश्वास आहे ही क्षमता
कामाला लावण्यासाठी समान व्यासपीठ असावे असा आमचा उद्देश आहे. पुण्यात अस्तित्वात असलेले कॉर्पोरेटस त्यांच्या
वैयक्तिक कार्यक्षमते मध्ये लक्षात येण्याजोगे रीतीने सक्रीय आहेत. यावर आमचा विश्वास आहे. या प्रयत्नांमध्ये समन्वय
साधून या चांगल्या पद्धती द्वारे उपक्रमाचे सहनियोजन करून मोठ्या प्रमाणातील आणि शाश्वत प्रभाव पाडणे शक्य
होईल. पुढील काळामध्ये पुणे सिटी कनेक्ट(PCC) ची जबाबदारी डिजिटल स्वच्छ सुविधा पुणे पेक्षाही अधिक विस्तारित
याप्रसंगी उपस्थित विविध वृत्तपत्रांचे संपादक व विविध कंपन्याचे प्रतिनिधी यांनी शहरविकासाच्यादृष्टीने
भवितव्यात होणाऱ्या नियोजन व विकासकामा संदर्भात विविध प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला.
या प्रसंगी मा.स्थायी समिती अध्यक्षा सौ.अश्विनी कदम, विरोधी पक्ष नेते मा.अरविंद शिंदे, सभागृह
नेते मा.बंडू उर्फ शंकर केमसे, मा.बाबू वागस्कर, मा.अशोक हरणावळ, मा.महेंद्र पठारे शिक्षण मंडळ
अधिकारी बबन दहिफळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या श्रीमती किशोरी गद्रे, विविध वृतापत्राचे
मा.संपादक विविध कंपन्याचे प्रतिनिधी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे सिटी कनेक्ट च्या
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुची माथूर यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले व आभार मानले.
बारा दिवसांत एक लाखांपेक्षा अधिक एलईडी बल्बचे वितरण शहरात 30 ठिकाणी वितरण…
पुणे, : गेल्या 12 दिवसांत पुणे शहरात महावितरणच्या वीजग्राहकांनी मंगळवार (दि. 10) पर्यंत 1,03,306 एलईडी
बल्ब खरेदी केले आहेत. दरम्यान एलईडी बल्ब वितरणासाठी एनर्जी एफिशियंसी सर्व्हीसेस लिमिटेडचे (ईईएसएल) 30
ठिकाणी वितरण केंद्रे सुरु झाली आहेत.
केंद्र सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम अंतर्गत महावितरणच्या घरगुती
वीजग्राहकांना प्रत्येकी 10 एलईडी बल्ब वितरणाच्या योजनेला पुणे शहर व भोसरीमध्ये सुरवात झाली आहे. यात गेल्या 12
दिवसांत 1,03,306 एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात 28 ठिकाणी वितरण सुरु
झालेले आहेत तर पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विभागात दोन ठिकाणी ही केंद्र कार्यान्वित झाली आहे. पिंपरी
चिंचवडमध्ये इतर ठिकाणीही टप्प्याटप्प्याने वितरण केंद्रची संख्या वाढविण्यात येत आहे.
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी एलईडी बल्बबाबत माहिती देण्यासाठी पुणे शहरासाठी ईईएसएल कंपनीने कॉल
सेंटर सुरु केले असून त्याचा क्रमांक 7841929103 (रास्तापेठ, बंडगार्डन, पर्वती, नगररोड, पद्मावती विभागासाठी) व
9657884191 (कोथरूड, शिवाजीनगर, पिंपरी व भोसरी विभागासाठी) असा आहे.
एलईडी बल्ब वितरण केंद्गांच्या ठिकाणांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात वितरणकेंद्र ) – महावितरणची रास्तापेठ येथील
प्रशासकीय इमारत, रविवार पेठ शाखा कार्यालय, सोमवार पेठ शाखा कार्यालय, कसबा पेठ उपविभाग कार्यालय, वानवडी
शाखा कार्यालय, एनआयबीएम शाखा कार्यालय, कोंढवा शाखा कार्यालय, नानापेठ शाखा कार्यालय, मंगळवार पेठ शाखा
कार्यालय (जुना बाजारजवळ), नगररोड विभाग कार्यालय (कल्याणीनगर), नगररोड उपविभाग कार्यालय (शास्त्रीनगर),
वडगाव शेरी उपविभाग कार्यालय, विश्रांतवाडी उपविभाग कार्यालय, इऑर्बिट मॉलजवळ, पद्मावती विभाग कार्यालय
(सातारा रोड), पर्वती विभाग कार्यालय (पु. ल. देशपांडे उद्यानजवळ, सिंहगड रोड), जनता वसाहत (पानमळा, सिंहगड
रोड), शिवाजीनगर उपविभाग कार्यालय (गणेशखिंड), शिवाजीनगर ग्राहक सुविधा केंद्र (चतुश्रृंगी मंदिरासमोर), खडकी
शाखा कार्यालय, वडारवाडी, बावधन, औंध उपविभाग कार्यालय, बाणेर शाखा कार्यालय, बंडगार्डन विभाग कार्यालय,
रामटेकडी शाखा कार्यालय (ताडीवाला रोड), कोथरुड विभागअंतर्गत वारजे उपविभाग कार्यालय, कोथरूड उपविभाग
कार्यालय, भोसरी विभाग अंतर्गत प्राधिकरण उपविभाग कार्यालय (काचघर चौक) व भोसरी उपविभाग कार्यालय (लांडेवाडी
चौक) अशा 30 ठिकाणी केंद्ग सुरु झालेले आहेत. यातील काही ठिकाणी दोन ते तीन वितरण केंद्र सुरु आहेत. विशेष म्हणजे
शहरातील वीजग्राहक सोयीच्या कोणत्याही ठिकाणी जाऊन बल्ब खरेदी करू शकणार आहे.
प्रत्येक वीजग्राहकास प्रत्येकी 100 रुपयांचा एक बल्ब असे एकूण 10 बल्ब मिळतील. हे 10 बल्ब रोक्ष्ख रक्कमेतून
एकाच वेळी खरेदी करता येईल. तर 10 बल्बपैकी जास्तीत जास्त 4 एलईडी बल्ब हे प्रत्येकी 10 रुपये अॅडव्हॉन्स भरून
खरेदी करता येईल व उर्वरित प्रत्येकी 95 रुपये 10 हप्त्यांत देता येईल. बल्ब खरेदी केल्यानंतर त्याची पावती घेण्याचे
आवाहन महावितरणने केले आहे. तसेच या बल्बची तीन वर्षांची वारंटी आहे. वारंटीच्या कालावधीत बल्ब खराब झाल्यास
बल्ब बदलून देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील ‘कालचक्र प्रगतीचे’ हा कार्यअहवाल आता www.ncppune.com या संकेतस्थळावर उपलब्ध, जास्तीत जास्त नागरिकांनी संकेतस्थळाला भेट देण्याचे खासदार अॅड.वंदना चव्हाण यांचे आवाहन
गोखलेनगरमध्ये साकारली लोहगडाची प्रतिकृती
पुणे, ता. १० ः दुर्मिळ किल्लांची प्रतिकृती साकारण्याची परंपरा असणार्या गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने या वर्षी लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. मळवलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असणार्या या किल्ल्याचा इतिहास, पाहाण्यासारखी ठिकाणे, गडावर जाण्याच्या वाटा यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. किल्ला पाहाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गणेश ओरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मयुर काटे, मिलिंद येद्रे, आशीष माने, नीलेश मांडवकर, पराग कानिटकर, रोहन भवारी, आदेश काळे, शुभम वाईकर यांनी किल्ल्या साकारला.
——
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखेच्या वतीने शॉर्ट फिल्म फेस्टिवल संपन्न…
नवी मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखेच्या वतीने शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते, संपूर्ण महाराष्ट्रातून ६५ हुन अधिक शॉर्ट फिल्म यात सहभागी झाल्या होत्या, आज ऐरोली येथे त्याचा पुरस्कार वितरण सोहळा मोठया जल्लोषात संपन्न झाला, अध्यक्ष विजय चौगुले, अभिनेते कमलेश सावंत, दिग्दर्शक प्रविण कारळे, अदिती सारंगधर, अशोक समर्थ, लेखिका मनीषा कोरडे, दिग्दर्शक राजू मेश्राम, संजय क्षेममकल्याणी, संदीप जंगम, रमेश वाणी यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
पुरुषोत्तम बेर्डे, अमित राय, विजू माने, कैमरामैन राजा फड़तरे परिक्षक असलेल्या या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट १० शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग करण्यात आले, आणि त्यातून आयडेंटिटी, सारथी आणि मुंबई एरर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच याशिवाय अभिनेता अशोक समर्थ यांचा अभिनय प्रवास उलगडणारी प्रदीर्घ मुलाखत घेण्यात आली. फ़िल्म रायटर्स असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरी आणि प्रसिद्ध लेखिका मनीषा कोरडे (मालामाल विकली, बिल्लू बार्बर इ.) यांनी उपस्थित फ़िल्म मेकर्ससोबत पटकथा आणि सवांद यावंर चर्चा केली, आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. खैरलांजीच्या माथ्यावर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी चित्रपट आणि सैंसोर यावर चर्चा केली, अधिकाधिक शाब्दिक वापर करून दृश्यपरिणाम साधता येवू शकतो असेही मेश्राम यांनी सांगितले.
नुक्कड़ मालिकेतून घराघरात पोहचलेले हिंदी चित्रपट अभिनेते पवन मल्होत्रा यांनी सांगितले की, शॉर्ट फिल्मचे प्रमाण भारतात सध्या वाढत असून नवोदितांना आपली प्रतिभा दर्शवण्याची संधी मिळते, त्यातून सिनेसृष्टीला नविन प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक, कलाकार मिळतील. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या रोड टू संगम चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अमित राय यांनी या शॉर्ट फ़िल्म फेस्टिवलचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते,
नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली, नवोदितांना प्रेरणा देणारा हा शॉर्ट फ़िल्म फेस्टिवल असून नवी मुंबईत होतोय याचा मला अभिमान आहे…बोलताना त्यांनी आपला जीवनप्रवास देखील सांगतांना भरपूर हशा पिकवला.
अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले की, नवी मुंबईत सांस्कृतिक चळवळ सुरु व्हावी यासाठीच आम्ही शॉर्ट फ़िल्म फेस्टिवलचे आयोजन केले होते, ज्याला खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
‘त्रिदल’ पुणे -पुण्य भूषण ‘ च्या ‘दिवाळी पहाट’मध्ये रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी यांच्या प्रातःकालीन संगीत मैफलीने पुणेकरांची जिंकली मने !
धर्मांध शक्तींच्या पराभवाने आम्हाला आनंद … अभय छाजेड
पुणे- बिहार मध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर पुणे शहर काँग्रेस ने पेढे-लाडू वाटत -फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला . या दिवाळीत बिहारच्या जनतेने धर्मांध शक्तींना त्यांची जागा दाखविली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे यावेळी शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड यांनी म्हटले .हा धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय आहे असेही त्यांनी नमूद केले . रमेश बागवे , चंद्रशेखर कपोते , गोपाळ तिवारी , संजय बालगुडे , मंदा चव्हाण , सुधीर काळे ,मोहन जोशी आदी कार्यकर्त्यांनी या आंदोत्सावासाठी तातडीने कॉंग्रेसभवन येथे जमा होवून जल्लोष केला .
दिवाळी चे आकर्षण -प्रेम रतन धन पायो.. चा पहा ट्रेलर …
बाजीराव मस्तानी १८ डिसेंबरला … पहा ट्रेलर …
Distributor: Eros International























