‘त्रिदल’ पुणे -पुण्य भूषण ‘ च्या ‘दिवाळी पहाट’मध्ये रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी यांच्या प्रातःकालीन संगीत मैफलीने पुणेकरांची जिंकली मने !
पुणे :
‘त्रिदल’ पुणे, ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात मंगळवारी रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी, यांनी प्रातःकालीन संगीत मैफली मध्ये रसिक पुणेकर श्रोत्यांची मने जिंकली
दि. 10 नोव्हेंबर 2015 रोजी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला
बासरीवादक रोणू मुझुमदार आणि ड्रम वादक तौफिक कुरेशी यांना रामदास पळसुले, रोहित कुलकर्णी यांनी अनुक्रमे तबला, की-बोर्ड वर साथसंगत केली . मंगल भैरव रागाने सुरुवात झालेली ही प्रात :कालीन मैफल उतरोत्तर रंगत गेली . रोणू मुजुमदार यांचे फ्युजन आणि तौफिक कुरेशी यांचा रिदम मैफलीचा कळसाध्याय ठरला !
या कार्यक्रमात 5 पक्क्या पुणेकरांचा सन्मान करण्यात आला . त्यात राजकुमार आगरवाल (बन्सीलाल स्टोर ), दत्तोबा पाचंगे (चौघडा वादक), बाळासाहेब गांजवे (कोहिनूर आर्ट्स), भारत गायन समाज, शरद मोरे (शौकिन पान) यांचा समावेश होता .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान आयकर आयुक्त आर के मिश्र , पालकमंत्री गिरीश बापट, माजी खासदार सुरेश कलमाडी ,जगदीश देशपांडे ,‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अधिकारी वर्ग उपस्थित होते
पुण्युभूषण आणि त्रिदल च्या वतीने डॉ सतीश देसाई यांनी स्वागत केले . ‘ ३० वर्षापासून हा उपक्रम सुरु असून तो आता जगभर गेला आहे ‘ असे त्यांनी सांगितले . सुरेश धर्मावत यांनी सूत्र संचालन केले
‘पुणे ने जाना तो दुनिया ने माना ‘ अशी पुणेकर रसिकांची ख्याती असून दिवाळीत या श्रोत्यांच्या भेटीला येता आले ,हा अनमोल क्षण आहे ‘ असे सांगून रोणू मुझुमदार यांनी पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .
‘सतीश देसाई हे चांगले संघटक असून त्यानी आता पुणेकरांचे किस्से लिहावेत ‘ असे मनोगत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले