हॉटेल मेनेजमेंट ‘ अभ्यासक्रमात शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगळा अभ्यासक्रम हवा :पोष्ट कार्ड अभियानावर मनेका गांधी यांची स्वाक्षरी
पुणे :
हॉटेल मेनेजमेंट ‘ अभ्यासक्रमात शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगळा अभ्यासक्रम हवा ‘ या मागणीवर शनिवारी पोष्ट कार्ड अभियानावर मनेका गांधी यांनी स्वाक्षरी केली .
‘राईट टू एजुकेशन :डिग्री फॉर व्हेजीटेरीयन्स इन हॉटेल मेनेजमेंट ‘ अभियानाचे प्रणेते पुण्यातील सी ए चंद्रशेखर लुणीया यांनी शनिवारी पुण्यात मनेका गांधी यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मागणीसाठी पोष्ट कार्ड लिहिण्याचे अभियान सुरु असल्याची माहिती दिली . त्यावर मनेका गांधी यांनी पोष्ट कार्ड वर स्वाक्षरी केली आणि अभियानाला पाठींबा दिला
या अभियानात पंत प्रधानांना ५ हजार पत्रे लिहिण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे