‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चा ‘गंगोत्री वार्षिक स्नेहमेळावा संपन्न – ‘तरी असेल गीत हे’ ने दिला शांताबाईं शेळके यांच्या रस संपन्न गीतांना उजाळा !
पुणे :
‘ तरी असेल गीत हे ’ या कार्यक्रमात कवियत्री शांताबाईं शेळके यांच्या रस संपन्न गीतांना ,कवितांना उजाळा देण्यात आला ! डॉ अरुणा ढेरे यांचे ओघवते निवेदन आणि अनुराधा मराठे ,अपर्णा केळकर यांच्या गायनातून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सायंकाळी शांताबाई शेळके यांचे संवेदनशील मन शब्दा- शब्दातून रसिकांच्या भेटीस आले !
निमित्त होते ,‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चा ‘गंगोत्री वार्षिक स्नेहमेळाव्याचे !
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ संस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यामध्ये ‘शब्द सुरांची मैफल’मध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या कविता आणि गीतांवर आधारित कार्यक्रम ‘तरी असेल गीत हे’ आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि निवेदन डॉ. अरुणा ढेरे यांचे होते . कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे आणि अपर्णा केळकर यांनी गायन केले
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता हर्षल हॉल, कासट पेट्रोल पंपाशेजारी, करिष्मा चौक, कर्वे रोड, पुणे येथे शनिवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2015 रोजी सायंकाळी 6.00 ते 7.30 वाजता आयोजित करण्यात आला होता.
‘कवयित्री म्हणून ,गीतकार म्हणून शांताबाई संवेदनशील होत्या ,रस संपन्न शब्द ,पाठांतर ,भारतीय परंपरेचे चिंतन हे त्यांचे वैशिष्ट्य होते . त्यांचे जीवन साधेपणाने बहरलेले होते . चित्रदर्शी वर्णन ,सहज सुंदर ललित लेखन आणि उत्तम संस्कृत ज्ञानातून त्या कवितेची एकेक ओळ जिवंत करतात ‘ अशा शब्दात डॉ अरुणा ढेरे यांनी शांताबाई शेळके यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि काव्याचे वर्णन केले
यावेळी ‘मागे उभा मंगेश ‘, ‘ हे शामसुंदर राजसा ‘,,’जय शारदे वागीश्वरी ‘,’गणराज रंगी नाचतो ‘ अशी एकाहून एक बहारदार गीते सादर करण्यात आली
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चे संचालक मकरंद केळकर ,गणेश जाधव, राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले
यावेळी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाविषयक मार्गदर्शना साठी दालन उभारण्यात आले होते . नागरिकांना राजेंद्र ठाकूरदेसाई,रवि बापट ,नरेंद्र गोहाड या तज्ञांनी मार्गदर्शन केले . नागरिकांनी मोठी गर्दी केली होते