पुणे – महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कर्जरोख्यांचा प्रारंभ आज मुंबई शेअर बाजारात समारंभ पूर्वक होत असताना ,पुणेकरांच्या डोक्यावर कर्ज करण्याचा सोहळा करता काय ? असा सवाल करीत कर्जाला विरोध करत कॉंग्रेस राष्ट्रवादीने आज मंडई तील टिळक पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन केले. भाजपने पुणेकरांना कर्जाच्या खाईत ढकलल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला .चेतन तुपे,अरविंद शिंदे ,अभय छाजेड ,अविनाश बागवे,सुभाष जगताप ,रवींद्र माळवदकर,अजित दरेकर, काका धर्मावत ,सुजाता शेट्टी, वनराज आंदेकर, चंद्रशेखर कपोते ,रुपाली चाकणकर ,गोपाळ तिवारी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते .
शहर विकासासाठी पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला
प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’चा पाया पुणे महापालिकेने रचला – मुख्यमंत्री
मुंबई, दि. 22 : ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या बॉण्ड्सच्या माध्यमातुन निधी उभारला जाणार आहे. त्याचा पाया पुणे महापालिकेने रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री व श्री. नायडू यांच्या हस्ते शेअर बाजाराच्या परंपरेप्रमाणे बेल वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे महापालिकेसह राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. नागरी प्रशासनाच्या कामात परिवर्तन होताना दिसत आहे. विविध पायाभुत सुविधांच्या विकास प्रकल्पांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी नवीन साधनांची गरज भासते. अशावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, महापालिकेन स्वत:चा निधी उभारण्यासाठी शेअर बाजारात बॉण्ड आणावेत. या आवाहनाला सकात्मक प्रतिसाद देत 2264 कोटी रुपयांच्या बॉण्ड पुणे महापालिकेने गुंतवणुकीसाठी दाखल केले आहेत. पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली असून या बॉण्डच्या माध्यमातून जो निधी उभारला जाईल त्याद्वारे स्मार्ट पुणे शहर निर्माण होईल. पुणेकरांना 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
दृष्टीकोन बदलून शहर विकासाचे प्रकल्प तयार करावेत आणि कार्यक्षम व पारदर्शक पद्धतीने नागरिकांना सेवा द्यावी. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कार्यक्षमतेत अधिकच भर पडणार आहे. देशात म्युनिसिपल बॉण्ड मार्केट विकसित होत आहे. त्याचा पाया पुणे शहराने रचला याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. राज्यात शहरीकरण वेगाने होत आहे. अशावेळेस नागरिकांना अधिक चांगल्या सोयी देण्यासाठी नागरी प्रशासनात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर राहील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
येत्या दोन ते तीन वर्षात पुणे शहरामध्ये घनकचऱ्याचे विलगीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रत्येक थेंबावर प्रक्रिया केली जाईल. मेट्रो आणि सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. पुणेकरांना 24 तास पाणी पुरवठा केला जाईल. जलवाहिन्यांसोबत फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे पुणे देशातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा
– केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू
केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, आज शेअर बाजारात घंटी वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. या घंटीतून निघालेला नागरी सुधारणेचा प्रतिध्वनी देशभर घुमण्यास मदत होणार आहे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा, असे आवाहन करुन श्री. नायडू म्हणाले की, शहरे ही विकासाचे इंजिन आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. केंद्र शासनातर्फे देशभरात शहर विकासाकरीता 4.13 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जातो. विकास प्रकल्पांना वित्तीय सहाय मिळाल्यावर त्याची गती निश्चितच वाढेल. शहर विकासाचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांनी त्यात सहभाग दिला पाहिजे. त्याचबरोबर शहरांनी आणि त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:चा निधी उभारणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांच्या सुधारणांवर भर देण्यात येत आहे. जी शहरे अधिक चांगल्या पद्धतीने विकासाची कामे करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 टक्के निधी देण्यात येईल.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. मेघवाल म्हणाले की, 2017 हे वित्तीय सुधारणांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. देशातील व्यवहार डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आले आहे. देशामध्ये 91 लाख नवीन करदात्यांची यामुळे भर पडली आहे.
श्री. बापट म्हणाले की, नगरविकासाच्या क्षेत्रात पुणे महापालिकेने नवीन विक्रम केला आहे. बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे देशातील पहिल्या क्रमाकांचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्रीमती भट्टाचार्य, ‘सेबी’चे अध्यक्ष श्री. त्यागी, मुंबई शेअर बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची भाषणे झाली. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रास्ताविक केले.
या बॉण्डच्या माध्यमातून 2264 कोटी रुपये पुणे महापालिका उभारणार असून या द्वारे उभारलेल्या निधीतून 24×7 पिण्याचा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पुढील 30 वर्ष पुणेकरांना शुद्ध, स्वच्छ पाणी यामाध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी प्रकल्प, जलवाहिन्या आदी कामे केली जाणार आहे.
या सोहळ्यास पुणे शहरातील स्थानिक लोकप्रतिनीधी, वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवारांच्या ‘ब्राम्हण’ विरोधी राजकारणाचा चेहरा उघड ?
पुणे– तथाकथित ब्राम्हण लेखक, शाहीर यांच्या विरोधात लिखाण करणारे आणि एकूणच आपल्या अनेक पुस्तकातील लेखनाने, वक्तव्याने वादग्रस्त असा चेहरा लाभलेले इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले .. यावेळी पवार यांनी केलेले भाषण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी असे ठरत आहे . या निमित्ताने अनेक प्रश्न हि पवार यांच्या राजकारणावर उपस्थित होत आहेत . पण या भाषणाने ने आता पवारांचा ब्राम्हण विरोधी राजकारणाचा खरा चेहरा उघड झाल्याचे मानले जात आहे काय ? एक छोटेशे व्हिडीओ विश्लेषण..बोलके आणि अबोलके ..असे ..
आदेश्वर दादा जैन टेम्पल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे-वानवडी गावामधील आदेश्वर दादा जैन टेम्पल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये मंदिरात सकाळी अठरा अभिषेक , देवाचे नवीन पाच ध्वज मंदिराच्या कळसावर चढवून ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर जांभुळकर गार्डनमध्ये स्वामी वात्सल्य म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम झाला .
यावेळी रशमीन शहा यांनी सांगितले कि , आदेश्वर भगवानजी स्थापना खूप वर्षांपासूनची आहे . या देवळातील देवाची मूर्ती जैन समाजातील संप्रती महाराज यांच्याहस्ते करण्यात आली आहे . त्यांनी अनेक ठिकाणी देवळांची उभारणी केली आहे . मंदिराच्या ठिकाणी पूर्वी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात होती . या भागाला वाण्यांची बोळ म्हणत . त्यामुळे या वाण्यांच्या बोळपासून या भागाला वानवडी असे म्हणू लागले . या मंदिराचे देखरेख गोडीजी पार्श्वनाथ टेम्पल ट्रस्टच्या माध्यमातून होते .
या कार्यक्रमांमध्ये अनिल गांधी , रमेश मणिलाल शहा , रशमीन शहा , जयेश शहा , हेमंत शहा , पंकज शहा , भूपेंद्र शहा व शशिकांत मणियार आदी मान्यवर आणि जैन श्वेतांबर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
म. गांधी आणि आंबेडकर यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अयोग्य -भाई वैद्य
पुणे- महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल खंत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे जागतिकीकरणाचे परिणाम असल्याचे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले.माझे वडील आणि एस. एम. जोशी या दोन ‘अण्णां’मुळे मी घडलो, अशी भावना देखील यावेळी वैद्य यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि संवाद पुणेतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ९० व्या वर्षांतील पदार्पणानिमित्त भाई वैद्य यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी महापौर अंकुश काकडे, सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, सचिन इटकर आणि सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले ,जनसंघ आणि समाजवादी यांना बरोबर घेऊन स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दल सरकारमध्ये भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते. आमचे मंत्रिमंडळ मोठे गमतीचे असले तरी अडीच वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय त्या काळात झाले. गृह खात्याबरोबरच सामान्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात की नाही याकडे भाईंचा कटाक्ष असायचा. अनेक वर्षे मंत्री राहण्यापेक्षा अल्पकाळच्या मंत्रिपदामध्ये भाईंनी आपल्या कर्तृत्वाचा आणि दृष्टीचा ठसा उमटविला,
ते पुढे म्हणाले ,न आक्रमणाच्या काळात जनतेमध्ये जागृती घडविण्याबरोबरच सामाजिक ऐक्यासाठी महाविद्यालयीन युवकांच्या समितीचे भाई अध्यक्ष होते आणि मी सचिव. माझे सामाजिक कामाचे पहिले पाऊल भाईंच्या नेतृत्वाखालीच पडले, अशी आठवण सांगून पवार म्हणाले, समाजवादी असल्याने त्यांच्या बैठका काकाकुवा मॅन्शनमध्ये चालायच्या, तर आमच्या काँग्रेस भवनमध्ये. एस. एम. जोशी यांचा प्रभाव असलेले भाई तत्त्वाने चालणारे, तर लोकांचे काम करण्यासाठी खुर्चीकडे आमचे लक्ष असायचे. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार कसा करायचा हे भाईंच्या महापौरपदाच्या काळात पुणेकरांनी अनुभवले. राज्याच्या सत्तेमध्ये बदल झाला तेव्हा उत्तमराव पाटील, निहाल अहमद, हशू आडवाणी असे सहकारी होते. आपण कधी मंत्री होऊ हे त्यांना स्वप्नातही वाटले नसते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे संप होत असत. आम्ही केंद्राप्रमाणेच वेतन आयोग लागू केल्यामुळे १९७८ पासून राज्यातील कर्मचाऱ्यांचा कधी संप झालेला नाही.
एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधू दंडवते यांच्याबरोबर भाईंनी दीर्घकाळ काम केले. चंद्रशेखर यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नियोजन भाईंनी केले होते. जगामध्ये समाजवादी विचारांचे पतन झाले असले तरी भाईंची विचारांची निष्ठा ढळली नाही. स्वच्छ, उत्तम चारित्र्य, विविध समाज घटकांविषयी आस्था आणि व्यापक समाजहिताचा निर्णय करणारा नेता म्हणजे भाई वैद्य. उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भाईंचे प्रयत्न अविरत सुरू राहतील, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.
महापौर टिळक यांचा निषेध करीत सेना कॉंग्रेसचा सभात्याग (व्हिडीओ)
पुणे- भिडे गुरुजी प्रकरण वारीत घडल्यानंतर आता जणू त्याचे राजकीय पडसाद हि उमटू लागले आहेत . वारकऱ्यांनी या कार्यकर्त्यांना वारीत आपले बस्तान बांधू न दिल्याने भाजपची काही मंडळी संतापली आणि त्यांनी राजकारण करीत पालिकेच्या सोयीसुविधांवर त्याचा राग काढला असा सूर आवळत भाजपविरोधी पक्षांनी उचल खाण्याचा प्रयत्न आज केला तर भाजपच्या वतीने मात्र हे विरोधकांचे राजकारण अयोग्य असल्याचा दावा करीत अशा राजकीय खेळ्या असभ्य असल्याचा दावा हि करण्यात आला आहे .
नेमके काय घडले पाहू या …
शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे पुणेकर नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. मात्र शहरातील पालखी मुक्कामी महापालिका प्रशासनाच्यावतीने मंडप आणि पाण्याची व्यवस्था केली नाही. या मुद्यावरुन पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत निषेधकरत शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी महापौर मुक्ता टिळक या प्रशासनास पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत सभा त्याग केला. याप्रकरणी राष्ट्रवादीनेही सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.
सत्ताधारी भाजपकडून यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी केवळ ५६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालिकेने पालखीच्या काळात केलेले नियाजन अपुरे आहे, असे सांगत शिवसेना गटनेते संजय भोसले आणि कॉग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सभात्याग करणे पसंत केले. यावेळी राष्ट्रवादीकडूनही निषेध नोंदवण्यात आला. या सर्वसाधारण सभेनंतर विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले की, पालखी सोहळयापूर्वी दरवर्षी बैठक घेतली जाते. मात्र यंदा महापौरांनी तसे काही केले नाही. पालखी शहरात येण्यापूर्वी एक दिवस बैठक घेतली. हे केवळ दाखवण्यासाठी केले. महापौर आणि पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारकरी भाविकांना त्रास सहन करावा लागला.
प्रत्यक्षात आपण हि मुख्यसभा फेसबुक वरील मायमराठी च्या पेजवर पाहू शकाल जशीच्या तशी …
इथे
यासंदर्भात पहा हा एक व्हिडीओ रिपोर्ट
पुण्यात ‘हज हाऊस’ करण्यासाठी प्रयत्न करू : शरद पवार
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला- मुलींसमवेत साजरा केला योगा दिवस…
पुणे–
भारताच्या पुढाकाराने जगभरात सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने अमृता
फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ‘दिव्यज फौंडेशन’च्या माध्यमाने दिनांक २१ जून २०१७ रोजी
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी योगा सेशन्स आयोजित करण्यात
आले होते. भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे शिक्षण घेत असलेली
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ४०० मुलं-मुली व मेळघाट-ठाणे परिसरातील २०० आदिवासी विद्यार्थी
अशा एकूण ६०० विद्यार्थ्यांना अमृता फडणवीस यांनी मुंबई दर्शन व योगा दिवस साजरा करण्याची
संधी उपलब्ध करून दिली.
मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी आज दिनांक २१ जून
२०१७ रोजी सकाळी ८ वाजता नॅशनल स्पोर्ट्स क्लब वरळी, मुंबई येथे विद्यार्थांबरोबर आंतरराष्ट्रीय
योगा दिवस साजरा केला. यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यार्थ्यांबरोबर संवाद
साधला असून त्यांच्या हस्ते इयत्ता दहावीमध्ये ८० % पेक्षा अधिक गुण मिळविलेले ३ विद्यार्थी व
मागील वर्षभरात खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर विशेष प्राविण्य मिळविलेल्या ६ विद्यार्थ्यांचा सत्कार
केला. त्याचबरोबर "आरोग्य सांभाळायचे असेल, तर रोज योगा करण्याशिवाय पर्याय नाही. तन आणि
मन दोघांनाही आराम प्राणायमनेच मिळतो. तुम्ही समृद्ध भारताची पुढची पिढी आहात तुम्हाला
स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आज योगा दिनाच्या निमित्ताने सर्वांनी मनाशी ठरवा
की आज पासून रोज कमीत कमी १५ मिनिटं तरी स्वतःसाठी काढून योगासने आणि प्राणायम कराल."
असे सर्व विद्यार्थ्यांना आव्हाहन देखील केले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिजात व्यक्तिमत्त्व जॅकी श्रॉफ, मराठी चित्रपट सृष्टीतील
स्वप्नील जोशी, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यांनी देखील सर्व मुलांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. तर ताणग्रस्त वातावरणातही
शांत राहून समोरील परिस्थिती कशी हाताळावी यासाठी त्यांना धडे दिले.
स्वनिल जोशीने आपल्या अनोख्या अंदाजात गाणं गाऊन, डान्स करून सर्व मुलांचे मनोरंजनाद्वारे
स्वागत करून स्वतःच्या आरोग्यासाठी, मनः शांतीसाठी कशी काळजी घ्यावी हे शिकविले. तर जॅकी श्रॉफ आज सर्व मुलांसाठी मार्गदर्शक ठरले. श्वास घ्यावा तर कासवासरारखा अगदी हळू-
हळू. योगा करत रहा श्वास घेत राहा. हा अमूल्य सल्ला देत जॅकी श्रॉफनी सर्व मुलांमध्ये बसून हसत
खेळत त्यांना योगाचे, प्राणायमचे महत्त्व समजावले.
सहकार क्षेत्र संशोधन व क्षमता विकास संबंधित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे पुण्यात उद्घाटन
पुणे: सहकार चळवळीच्या इतिहासात एक विशेष क्षण म्हणून नोंदवला जाईल असा एक पुढाकार नुकताच घडून आला. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींमध्ये प्रवर्तक ठरेल असा एक सामंजस्य करार घडून आला. त्यानुसार या दोन्ही संस्था समाजातील तळाचा वर्ग असलेल्या ग्रामीण व निम-नागरी लोकसंख्येच्या हितासाठी सहकार क्षेत्र चळवळीला अधिक चालना देणार असून संयुक्तपणे नेतृत्वही करणार आहेत. एखादी शिक्षण संस्था आणि सहकार क्षेत्रातील संस्था यांच्यातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच व अनोखा सहयोग करार आहे. त्याचाच भाग म्हणून या दोन्ही संस्थांनी सहकार क्षेत्र संशोधन व क्षमता विकास संबंधित सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले आहे. गेले काही महिने या केंद्राची उभारणी सुरु होती.
बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नेतृत्व संघात मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे व पुणे विभागीय व्यवस्थापक धनंजय पाटील यांचा समावेश आहे, तर विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्या नेतृत्व संघात अध्यक्ष भरत आगरवाल, कुलगुरु प्रा. डॉ. सिद्धार्थ जबडे, उपकुलगुरु प्रा. डॉ. शैलेश कासंडे यांचा समावेश आहे. शिरीष देशपांडे व भरत आगरवाल यांच्या हस्ते, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना शिरीष देशपांडे म्हणाले, “ब्रॅक्ट्स ट्रस्ट व विश्वकर्मा ग्रुपचे सामाजिक कार्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रशंसनीय आहे. ग्रामीण व निम-शहरी लोकसंख्येच्या हितासाठी व सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी शैक्षणिक व सहकारी संस्थांमधील सहयोगाचे अद्वितीय प्रारुप असलेल्या या सेंटर ऑफ एक्सन्सच्या माध्यमातून आम्हाला वित्तीय साह्य, कौशल्य विकास आणि सामाजिक सुधारणांसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.”
विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष भरत आगरवाल म्हणाले, “बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सहयोगाने सहकार क्षेत्र संशोधन व क्षमता विकासाशी संबंधित असे सेंटर ऑफ एक्सलन्स हे अशा स्वरुपाचे पहिलेच केंद्र सुरु करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. ब्रॅक्ट्स ट्रस्ट व विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स यांनी गेल्या ३५ वर्षांत शिक्षण, समाज कल्याण व जबाबदारी या क्षेत्रांत प्रचंड काम केले आहे. या नव्या केंद्राने राष्ट्र, तसेच समाजाच्या तळाच्या वर्गासाठी काम करावे, अशी माझीही अपेक्षा आहे.”
विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्रा. डॉ. सिद्धार्थ जबडे म्हणाले, “ ग्रामीण व निम-शहरी भागांतील कमी उत्पन्न गटांच्या विकासासाठी यासारखे अनोखे सहयोग घडून येण्याची खूप गरज आहे. उत्पादकता वाढवणे व आर्थिक शाश्वतता यासाठी नवे तंत्रज्ञान व रचनांचा वापर करण्यास हे केंद्र उत्तेजन देईल. पुण्यात प्रथमच सहकार क्षेत्रातील संस्था व शैक्षणिक संस्था एकत्रितपणे काम करुन उत्पादकता व आर्थिक शाश्वतता वाढवण्यासाठी ग्रामीण व निम-शहरी लोकसंख्येला सक्षम करण्याच्या हेतूने पर्याय शोधून काढत आहेत, हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.
या केंद्राचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे :
· येथे ग्रामीण व निम-शहरी लोकसंख्येला सक्षम बनवून त्यांची रोजगार क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी सहकार क्षेत्र संबंधित विषयांचे खास पदविका/पदवी अभ्यासक्रम दिले जातात.
· हे केंद्र उत्पादकता, कौशल्य व क्षमता वाढवण्याच्या हेतूने समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी कार्यक्रम, कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन करते.
· हे केंद्र समाजाच्या गरजांची पूर्तता करते आणि कमी उत्पन्न गटांचा समावेशक व शाश्वत विकास, तसेच राष्ट्राची प्रगती घडण्यासाठी लघु उद्योग व स्वयं-सहाय्यता गटांना सक्षम करते.
नियमित योगसाधनेने सकारात्मक विचार क्षमता वाढते मारुती पाडेकर; एमआयटीमध्ये तिसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये योगाच्या आंतरशालेय स्पर्धा संपन्न
पुणे :- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल येथे योगाच्या आंतरशालेय स्पर्धा पार पडल्या. यात ११ शाळांमधील १२ वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अक्षरा इंटरनॅशनल, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल, विद्यानंद स्कूल, साधू वासवानी स्कूल यांसारख्या शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
मुलांच्या गटात अक्षरा इंटरनॅशनलने तर मुलींच्या गटात साधू वासवानी स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले.
यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल,शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवानी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. योग गुरु दिगंबर कदम ,संगीता महाबोले,प्रिया कदम, अपूर्वा सावंत, आदित्य शेडकर यांनी ८०० पेक्षा जास्त मुलांना ध्यानधारणा,अनुलोम विलोम,प्राणायाम चे धडे दिले.
नियमित आणि योग्य योग साधनेमुळे शारीरिक क्षमता वाढते, मानसिक स्थिरता, व्याधी विरहीत शरीर, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक संतुलन, सकारात्मक दृष्टीकोन, उत्साह असे अनेक फायदे आहेत. एखाद्या अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार नियमित योगसाधना करणे सर्वांच्याच दृष्टीने हिताचे आहे असा सल्ला गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी मुलांना दिला.
जॉब फेअरमध्ये ३० हून आघाडीच्या कंपन्यांतर्फे नोकरीची संधी
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने www.freshersjobfair.in च्या सहकार्याने येत्या शनिवारी (२४ जून) आपल्या बावधन कॅम्पसमध्ये (सर्व्हे नं. ३४२, पाटील नगर, बावधन, चांदणी चौक – पाषाण रोड) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत ‘जॉब फेअर’ या नोकरी मेळ्याचे आयोजन केले आहे. करिअर विकास पुढाकारांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व नोकरीचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने या उपक्रमाचे खास आयोजन केले आहे. सर्व आयटीआय/डिप्लोमा/पदवीपूर्व/पदवी
या मेळाव्यात ३० हून अधिक आघाडीच्या कंपन्या नोकरी देऊ करण्यासाठी सहभागी होणार असून त्यात इन्फोसिस, एचसीएल, एचडीएफसी बँक, युरेका फोर्ब्ज, कोटक महिंद्र बँक, एल अँड टी फायनान्स, सीड इन्फोटेक, एफआरआरफॉरेक्स, इक्विटास मायक्रो फायनान्स, अपोलो आदींचा समावेश आहे. मानवी साधनसंपत्ती (एचआर), वित्त, विक्री, माहिती तंत्रज्ञान विकास, यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य, बीपीओ केपीओ आयटीईएस आदी क्षेत्रांतील रोजगार संधींचा लाभ इच्छुकांना घेता येईल. (कंपन्यांचे नाव, पद, अनुभव, उमेद्वारी पात्रता याचा सविस्तर तपशील सोबत जोडला आहे.)
शून्य ते तीन वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या आणि कमाल २९ वयोमर्यादा असलेल्या इच्छुक उमेद्वारांना या मेळ्यासाठी आमंत्रित केले जात असून त्यांनी आपल्यासोबत किमान ८ ते १० रेझ्युमे आणावेत आणि मेळ्याच्या ठिकाणी सादर करावेत. नोकरी मिळाल्यास त्यांना पात्रता व अनुभव यानुसार महिन्याला १२ हजार रुपये ते १८ हजार रुपये आणि १८ हजार रुपये ते ३० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणे अपेक्षित आहे. आतापर्य़ंत २००० इच्छुकांनी या जॉब फेअरसाठी नावनोंदणी केली आहे. नावनोंदणीसाठी प्रत्येकी २०० रुपये शुल्क आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आपल्या करिअर विकास पुढाकाराचा भाग म्हणून अशी जॉब फेअर दरवर्षी आयोजित करते. गेल्या वर्षी तर त्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत फ्रेशर्स जॉब.इन व टाइम्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने २ जॉब फेअरचे आयोजन केले होते.
सूर्यदत्ता ही नोकरीची संधी सर्व इच्छुकांना, प्रत्येकाला आणि प्रत्येक वर्षी मिळवून देते. या मेळ्यात ४००० हून अधिक विद्यार्थी व काम करणारे व्यावसायिक भाग घेत आहेत. या नोकरी मेळ्यात कंपनीच्या धोरणानुसार सुयोग्य उमेद्वारांना जागीच नियुक्तीपत्रे मिळतात, तर पात्र उमेद्वारांची निवड यादी बनवली जाते.
सर्व विद्यार्थ्यांसाठी (बारावी उत्तीर्ण/पदवीपूर्व/पदव्युत्तर विद्यार्थी व काम करणारे व्यावसायिक) हा नोकरी मेळा घेण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे त्यांना एकाच छत्राखाली विविध नोकरी संधी मिळवून देणे, हा आहे.
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसआयएमएमसी) या संस्थेला सलग २ वर्षे (२०१५ – २०१६ व २०१६ -२०१७) प्लॅटिनम श्रेणीमध्ये मानांकन मिळाले आहे.
नोकरभर्ती करणाऱ्या सर्व संस्थांना अशा मेगा जॉब फेअर आयोजित करण्यासाठी सूर्यदत्ताचा बावधन कॅम्पस हे प्राधान्याने पसंतीचे ठिकाण ठरले आहे. अशा मेळ्यांसाठी आवश्यक असलेल्या ऑडिओ व्हिडिओ क्लासरुम्स, १००० प्रेक्षक क्षमतेचे सभागृह, शाकाहारी कॅफेटेरिया, भरपूर क्षमतेचा वाहनतळ, विशाल खुल्या लॉबीज व जागा, कंपन्यांच्या एचआर विभागांशी समन्वय साधण्यासाठी उत्साही कर्मचारीवर्ग व विद्यार्थी अशा सुविधा सूर्यदत्ता ग्रुपकडे उपलब्ध आहेत.
सर्व विद्यार्थी, काम करणारे व्यावसायिक अथवा नोकरीस इच्छुक उमेद्वार यांनी या जॉब फेअरसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन सूर्यदत्ताचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले आहे.
डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत डेक्कन इलेव्हन अ, बीईजी संघांचे विजय
पुणे-पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात डेक्कन इलेव्हन अ, बीईजी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
बीईजी येथील फुटबॉल मैदानवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन इलेव्हन अ संघाने संगम यंग वन्स संघाचा २-० असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच डेक्कन इलेव्हन संघाच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण स्वीकारले. ८व्या मिनिटाला डेक्कन इलेव्हन संघाच्या जीवन नलगे याने चेंडूचा ताबा मिळाल्यानंतर शुभम बिबवेकडे पास दिला. शुभम बिबवे याने चेंडू नियंत्रित केला व मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर संगम संघाने जम बसवायला सुरुवात केली. संगमच्या सोमेश सिंग, आरिष शेख यांना संघाला आघाडीवर नेण्याची संधी मिळाली होती, पण डेक्कन इलेव्हन संघाची बचावफळी भेदू शकली नाही. १२व्या मिनिटाला लिऑन नायर याने दिलेल्या पासवर साहिल भोकरे याने संधी साधत गोल नोंदवून डेक्कन इलेव्हन संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हि स्थिती कायम होती. उत्तरार्धातील खेळ सुरु झाल्यानंतर संगम यंग वन्सला आघाडीची प्रतीक्षा राहिली. अमेय तलगांवकर, सोमेश सिंग यांनी डेक्कन इलेव्हनच्या गोलकक्षात वेळोवेळी धडक मारत होते, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश येत होते. डेक्कन इलेव्हनने बचावावर जास्त लक्ष केंद्रित करताना संगम यंग वन्सची आक्रमणे सफल ठरणार नाही याकडे लक्ष दिले. सामन्याच्या शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत डेक्कन इलेव्हन अ संघाने संगम यंग वन्स संघावर २-० असा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात बीईजी संघाने डेक्कन रोव्हर्स अ संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. बीईजी कडून प्रेमानंद सिंग(३,१५,७०,८५मि.) याने चार गोल, सिमॉन अॅनलने दोन गोल, तर रिठा अॅनल आणि आर.जे.सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डेक्कन इलेव्हन अ: २(शुभम बिबवे ८मि.पास-जीवन नलगे, साहिल भोकरे १८मि.पास-लिऑन नायर)वि.वि.संगम यंग वन्स: ०;
बीईजी: ८(प्रेमानंद सिंग ३,१५,७०,८५मि.,सिमॉन अॅनल ११, ७९मि.,रिठा अॅनल ३०मि.,आर.जे.सिंग ३७मि.)वि.वि.डेक्कन रोव्हर्स अ: ०.
ह. भ. प. मंगला फुके यांना माऊली पुरस्कार प्रदान
पुणे-
अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट आणि अभिषेक साप्ते स्मृती फाऊंडेशनतर्फे शंकरराव साप्ते यांच्या स्मरणार्थ ह. भ. प. मंगला फुके यांना माऊली पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार ,माजी उपमहापौर दीपक मानकर, अशोक कोकाटे, चंद्रकांत सणस, माजी नगरसेवक दत्ता सागरे, अशोक जाधव, दिपक साप्ते, पंडितराव रोकडे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्कारचे स्वरुप होते.
दीपक मानकर म्हणाले, वारीमधून आचार-विचारांची शिकवण मिळते. वारी करणे म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. परमेश्वराची सेवा करताना ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक लागत नाही. त्यामुळे वारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार झालेले असते. यामध्ये सामील झालेल्या वारक-यांमध्ये भगवंत स्वत: ऊर्जा निर्माण करून देतो.
अशोक जाधव म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये अखंडित वारी आणि मनोभावे विठ्ठलाची सेवा करणाºया वारकºयाचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात येतो. ह.भ.प. मंगला फुके या अतिशय समर्थपणे ५०० लोकांची दिंडी चालवत आहे. अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची परंपरा त्या पार पाडत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. दिपक काळे यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व जाधव यांनी आभार मानले.
परस्पर स्कुलबस चा दर दुप्पट केल्याने मुंढे विरोधात संताप
पुणे- तुकाराम मुंढे नावाचे अधिकारी पीएमपीएमएल ला आले म्हणजे पुण्यातील वाहतुकीचे सर्व काही सुरळीत झाले असे अजून तरी कोणी मानत नाही . आणि नव्याची नवलाई संपून , मुन्ढेचे कोडकौतुक करण्याचे दिवस आता सरलेत हेच खरे .. परस्पर हेकट वृत्ती दाखवून स्कूलबस चा दर दुप्पट केल्याने तुकाराम मुंढे विरोधात आता संतापाची लाट उसळते आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या सुपुत्राला मुंढे नी दिलेली वागणूक सर्वांना ठाऊक आहे , शिरोळे आपले सोज्वळ म्हणून मिटले सारे ..पण पुढे पुढे मुंढे यांची हेकटशाही वाढते कि काय ? असा प्रश्न निर्माण होईल अश घटना घडताना दिसत आहेत .लोकप्रतिनिधींना फाट्यावर टाकून परस्पर निर्णय घेण्यात जणू यांना स्वर्गीय सुखाचा आनंद प्राप्त होतो असे आता बोलले जावू लागले आहे .
याचाच भाग म्हणून कि काय ; शाळांना पुरवण्यात येणाऱ्या बससेवेचे दर दुपटीने वाढवताना संचालक मंडळाला विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे पीएमपीएमएलचे मालक असल्यासारखे वागत असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी आज केली.
पुणे शहरामध्ये शाळांना पीएमपीएमएलकडून पुरवण्यात येणाऱ्या बससेवेचा दर 61 वरून 141 रुपये करण्यात आला असून हा निर्णय घेताना मुंढे यांनी संचालक मंडळाला विश्वासात घेतले नाही. हा निर्णय धोरणात्मक नसून प्रशासकीय असल्याचे सांगत मुंढे यांनी या निर्णयापासून लोकप्रतिनिधींना दूर ठेवले, मात्र यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींना तोंड द्यावे लागत आहे, अशी आगपाखडही मोहळ यांनी केली.
मोहळ म्हणले की, मुंढे यानी निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. महापालिकेच्या सभांना सुध्दा ते येत नाहीत. आपण पीएमपीएमएलचे मालक असल्यासारखे ते वागत आहेत. महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. महापालिका पीएमपीएमएल कंपनीमध्ये भागधारक आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त हे संचालक मंडळाचे सभासद आहेत. त्यामुळे त्यांना सुध्दा महत्वाच्या निर्णयामध्ये सहभागी करुन घेतले पाहिजे.
मुंढे यांनी अचानकपणे शाळांच्या बस बंद केल्या. शाळा सुरु झाल्या असून मुलांचे हाल होत आहेत. अचानक पैसे वाढवल्यामुळे शाळांना पर्यायी व्यवस्था सुध्दा करता आली नाही. मनमानी पध्दतीने मुंढे काम करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केला आहे.









