पुणे :- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल येथे योगाच्या आंतरशालेय स्पर्धा पार पडल्या. यात ११ शाळांमधील १२ वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अक्षरा इंटरनॅशनल, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल, विद्यानंद स्कूल, साधू वासवानी स्कूल यांसारख्या शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
मुलांच्या गटात अक्षरा इंटरनॅशनलने तर मुलींच्या गटात साधू वासवानी स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले.
यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल,शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवानी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. योग गुरु दिगंबर कदम ,संगीता महाबोले,प्रिया कदम, अपूर्वा सावंत, आदित्य शेडकर यांनी ८०० पेक्षा जास्त मुलांना ध्यानधारणा,अनुलोम विलोम,प्राणायाम चे धडे दिले.
नियमित आणि योग्य योग साधनेमुळे शारीरिक क्षमता वाढते, मानसिक स्थिरता, व्याधी विरहीत शरीर, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक संतुलन, सकारात्मक दृष्टीकोन, उत्साह असे अनेक फायदे आहेत. एखाद्या अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार नियमित योगसाधना करणे सर्वांच्याच दृष्टीने हिताचे आहे असा सल्ला गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी मुलांना दिला.