आदेश्वर दादा जैन टेम्पल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Date:

पुणे-वानवडी गावामधील आदेश्वर दादा जैन टेम्पल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये मंदिरात सकाळी अठरा अभिषेक , देवाचे नवीन पाच ध्वज मंदिराच्या कळसावर चढवून ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर जांभुळकर गार्डनमध्ये स्वामी वात्सल्य म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम झाला .

यावेळी रशमीन शहा यांनी सांगितले कि , आदेश्वर भगवानजी स्थापना खूप वर्षांपासूनची आहे . या देवळातील देवाची मूर्ती जैन समाजातील संप्रती महाराज यांच्याहस्ते करण्यात आली आहे . त्यांनी अनेक ठिकाणी देवळांची उभारणी केली आहे . मंदिराच्या ठिकाणी पूर्वी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात होती  . या भागाला वाण्यांची बोळ म्हणत . त्यामुळे या वाण्यांच्या बोळपासून या भागाला वानवडी असे म्हणू लागले . या मंदिराचे देखरेख गोडीजी पार्श्वनाथ टेम्पल ट्रस्टच्या माध्यमातून होते .

या कार्यक्रमांमध्ये अनिल गांधी , रमेश मणिलाल शहा , रशमीन शहा , जयेश शहा , हेमंत शहा , पंकज शहा , भूपेंद्र शहा व शशिकांत मणियार आदी मान्यवर आणि जैन श्वेतांबर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींच्या जॅकेटवरील ‘तिरंगा’ वर सोशल मीडियात चर्चा: रंगांच्या क्रमावरून टोले

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पॉकेट स्क्वेअरची चर्चा; काँग्रेसने उपस्थित...

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन; माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे-भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात...

राष्ट्रहित जोपासणारे विदयार्थी घडवणे हिच काळाची गरज” -आयएएस अधिकारी डॉ.सागर डोईफोडे

चाटे पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पुणे :...

एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शनाचे जाळे5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देशव्यापी...