पुणे- तुकाराम मुंढे नावाचे अधिकारी पीएमपीएमएल ला आले म्हणजे पुण्यातील वाहतुकीचे सर्व काही सुरळीत झाले असे अजून तरी कोणी मानत नाही . आणि नव्याची नवलाई संपून , मुन्ढेचे कोडकौतुक करण्याचे दिवस आता सरलेत हेच खरे .. परस्पर हेकट वृत्ती दाखवून स्कूलबस चा दर दुप्पट केल्याने तुकाराम मुंढे विरोधात आता संतापाची लाट उसळते आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या सुपुत्राला मुंढे नी दिलेली वागणूक सर्वांना ठाऊक आहे , शिरोळे आपले सोज्वळ म्हणून मिटले सारे ..पण पुढे पुढे मुंढे यांची हेकटशाही वाढते कि काय ? असा प्रश्न निर्माण होईल अश घटना घडताना दिसत आहेत .लोकप्रतिनिधींना फाट्यावर टाकून परस्पर निर्णय घेण्यात जणू यांना स्वर्गीय सुखाचा आनंद प्राप्त होतो असे आता बोलले जावू लागले आहे .
याचाच भाग म्हणून कि काय ; शाळांना पुरवण्यात येणाऱ्या बससेवेचे दर दुपटीने वाढवताना संचालक मंडळाला विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे पीएमपीएमएलचे मालक असल्यासारखे वागत असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी आज केली.
पुणे शहरामध्ये शाळांना पीएमपीएमएलकडून पुरवण्यात येणाऱ्या बससेवेचा दर 61 वरून 141 रुपये करण्यात आला असून हा निर्णय घेताना मुंढे यांनी संचालक मंडळाला विश्वासात घेतले नाही. हा निर्णय धोरणात्मक नसून प्रशासकीय असल्याचे सांगत मुंढे यांनी या निर्णयापासून लोकप्रतिनिधींना दूर ठेवले, मात्र यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींना तोंड द्यावे लागत आहे, अशी आगपाखडही मोहळ यांनी केली.
मोहळ म्हणले की, मुंढे यानी निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. महापालिकेच्या सभांना सुध्दा ते येत नाहीत. आपण पीएमपीएमएलचे मालक असल्यासारखे ते वागत आहेत. महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. महापालिका पीएमपीएमएल कंपनीमध्ये भागधारक आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त हे संचालक मंडळाचे सभासद आहेत. त्यामुळे त्यांना सुध्दा महत्वाच्या निर्णयामध्ये सहभागी करुन घेतले पाहिजे.
मुंढे यांनी अचानकपणे शाळांच्या बस बंद केल्या. शाळा सुरु झाल्या असून मुलांचे हाल होत आहेत. अचानक पैसे वाढवल्यामुळे शाळांना पर्यायी व्यवस्था सुध्दा करता आली नाही. मनमानी पध्दतीने मुंढे काम करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केला आहे.