गोविंद निहालाणी यांचा ‘ती आणि इतर’
पाठदुखी आहे? प्राॅस्टेट कॅ्न्सरचे निदान करा
इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सर बाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने ५० वर्षे वयानंतरच्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर अाढळतो. हा कॅन्सर जगभरातील पुरुषांच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण ठरला आहे. आणि दुर्देवाची बाब म्हणजे प्रत्येक सहावा पुरुष प्राॅस्टेट कॅन्सर बाधीत आहे.
आज जगभरातील विकसीत देशांमध्ये डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन (बोटाद्वारे गुद्वारतुन आणि पीएसएच्या) च्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जागरूकता होत आहे मात्र भारतात प्राॅस्टेट कॅन्सरबाबत आज देखील तितकीशी जागरूकता नाही. जवळपास ६० टक्के रुग्ण डाॅक्टरला भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात.
यासाठी इन्स्टिट्यूट फाॅर प्राॅस्टेट कॅन्सर (IPC) मागील ३ वर्षांपासून प्रॉस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागकृता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी १०० पेक्षा अधिक शिबीरांच्या माध्यमातून २२,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती केली.
कॅन्सरची प्राथमिक लक्षणे : वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे ही आहेत. कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो. भविष्यात प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फाॅर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे.
जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५० वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. पूर्व निदानद्वारे प्रॉस्टेट कॅन्सर असल्याचे कळाले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयुएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोआॅप्सी समजली जाते. एमआरआयद्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते.
मोफत शिबीर- ३ ते १३ जुलै २०१७, पुर्व नियोजीत वेळेनुसार
अर्जुन कपूर और इलियाना ने ‘हवा हवा’ गाने को फिर से जगाया
पाकिस्तानी पॉप हसन जहांगीर के हवा हवा गाने की पुनर्निर्मित संस्करण अनीस बज्मी की आगामी फिल्म मुबारका से वापसी कर रहां हैं।
केवल भारत में 15 मिलियन प्रतियां बेची जाने वाली इस एल्बम के अधिकार टी-सीरीज के पास थे, जिन्हें अनीस की फिल्म के संगीत का अधिकार भी हैं।
भूषण कुमार द्वारा फिर से लिखे गए इस गीत को बॉस्को मार्टिस द्वारा कोरियोग्राफ किया गया है। इस नए गीत में अर्जुन कपूर एक लड़ाई के बाद अपनी ऑनस्क्रीन प्रेमिका इलियाना डी’क्रूज को मनाने की कोशिश करते हुए नज़र आएंगे।
अनीस ने बताया कि,”यह एक शरारती, ग्रूवी गीत है जिसे भव्य, रंगीन सेट-अप पर फिल्माया गया है।” साथ ही अनीस ने स्वीकार करते हुए कहा कि उन्होंने मूल रूप से चंडीगढ़ की सड़कों पर फिल्माने की योजना बनाई थी, लेकिन 200 से अधिक समन्वय करना और एक बड़ा नृत्य सेट अप करना मुश्किल था। “इसका मतलब होगा कि पूरी सड़क को अवरुद्ध करना होगा। ऐसा ना हो इसिलए हमने फिल्मसिटी स्टूडियो में एक सेट बना दिया था।”
हाल में जारी पोस्टर और टाइटल ट्रैक ने दर्शकों की उम्मीद को दोगुना बढ़ा दिया है और अब प्रसंशक फ़िल्म को देखने के लिए उत्सुक है।
फिल्म में अर्जुन कपूर को दोहरी भूमिका में नज़र आएंगे, जिसमें से एक पगड़ी के साथ होगा और अन्य पगड़ी के बिना होगा। साथ ही अनिल कपूर भी पगड़ी धारण किये हुए दिखाई देंगे।
मुबारकान का निर्माण सोनी पिक्चर्स नेटवर्क प्रोडक्शंस और अश्विन वर्दे और मुराद खेतान के सिने 1 स्टूडियोज द्वारा किया गया है और यह फ़िल्म 28 जुलाई 2017 को दुनिया भर में रिलीज के लिए तैयार है।
पुरस्काराची रक्कम हिंद तरुण मंडळ देणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना
पुणे -लष्कर भागातील भोपळे चौकाजवळील हिंद तरुण मंडळास श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाच्या वर्षीचा ” जय गणेश भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल लष्कर भागात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी लष्कर भागात मंडळास मिळविलेल्या पुरस्कार स्मृतीचिन्हांची भव्य मिरवणूक काढण्यात आली . मंडळास दोन स्मृती चिन्हे आणि एक लाख रुपयांचा धनादेश मिळाला.
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या , भगवे उपरणे घालून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते . यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या . मंडळास मिळालेली रक्कम मंडळाने पुणे कॅन्टोन्मेंट भागात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पंचवीस हजार रुपये व फुरुसुगी येथील येथील शहिद कुटुंबीयास पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहेत . अशी माहिती हिंद तरुण मंडळ ट्रस्टचे विश्वस्त दिलीप गिरमकर यांनी दिली .
मंडळास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परिमंडळ दोनचे पोलिस आयुक्त डॉ. प्रविण मुंडे यांच्याहस्ते हिंद तरुण मंडळ ट्रस्टचे विश्वस्त दिलीप गिरमकर . मंडळाचे अध्यक्ष गणेश तिप्पापुरकर , कार्याध्यक्ष अक्रम शेख यांचा पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात आले
लीला पूनावाला फाऊंडेशनतर्फे सातव्या बॅचसाठी शालेय शिष्यवृत्ती जाहीर
चला हवा येऊ द्या च्या मंचावर मराठमोळ्या साजात अवतरली श्रीदेवी
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपुर आणि सहअभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नववारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.
ऐंशी आणि नव्वदचं दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे श्रीदेवी. सदमा, चांदनीमधील संवेदनशील भूमिका असो की चालबाजमधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दुर गेलेल्या श्रीदेवीने दोन वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लीश विंग्लीश चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आणि आता मॉम या चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने श्रीदेवी चला हवा येऊ द्या च्या मंचावर आली होती. यावेळी थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेल्या नागिन चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली. याशिवाय इंग्लीश विंग्लीश सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरविण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसविले. यावेळी नवाझुद्दीन सिद्दीकीचा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्यानेही धम्माल उडवून दिली. याशिवाय पोस्टमन काकाने एका पत्रातून एका मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना वाचून दाखवल्या आणि ते ऐकून श्रीदेवीही हळवी झाली. प्रेक्षकांना ही सगळी धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागांत बघायला मिळणार आहे.
हिमालयाचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी
पुणे- ज्येष्ठ चित्रकार किशोर रणदिवे यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या हिमालयातील चित्रांचे ‘हिमालयन ओडिसी’ हे प्रदर्शन १ ते ७ जुलै या कालावधीत भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत भरविण्यात येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ आहे.
रशियन चित्रकार निकोलस रोरीक यांची हिमालयावरील चित्रे जगभरात प्रसिध्द आहेत. त्या धर्तीवर रणदिवे यांनी चित्रांची मालिका साकारावी अशी सुचना इंडियाआर्टचे संचालक मिलिंद साठी यांनी दहा वर्षांपूर्वी केली होती. तेव्हापासून काढलेल्या चित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.
हिमालयाची उत्तुंग, सुंदर, संरक्षक, संस्कृती आणि देवांचे वास्तव्य असणारी शिखरे कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतील. जलरंग आणि तैलरंग या माध्यमात कॅनव्हासवर चित्र काढण्यात आली आहेत. श्री. रणदिवे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आहेत. सुप्रसिध्द चित्रकार शंकर पळशीकर आणि गजानन हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलेचा अभ्यास पूर्ण केला.
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांना सुवर्णपदक
पुणे: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 34व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 50मी बॅकस्ट्रोक मुलांच्या गटात महाराष्ट्रच्या उत्कर्ष गोरने 34.30 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुल मध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून हार्मनी क्लब येथे प्रशिक्षक नरेंद्र आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात 50मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या वेदीका अमिनने 36.49सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर कर्नाटकच्या समारा चाको व महाराष्ट्राच्या अपेक्षा एफ यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावले.
मुलीच्या गटात 100मी बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्रच्या संजिति शहाने 1.07.77सेकंद असा वेळ ,नोंदवत सुवर्ण पदक पचकावले तर महाराष्ट्रच्या पलक धामीने 1.08.82सेकंद वेळेसह रौप्य पदक पटकावले.
200मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात तामिळनाडूच्या शक्ती बी हीने 2.19.15सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकाले. महाराष्ट्रच्या आन्या वालाने 2.20.88सेकंद तर महाराष्ट्रच्याच अपेक्षा एफ हीने 2.21.54सेकंदासह अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
4X50 मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन या संघाने 1.59.40सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले तर मुलांच्या गटात उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास या महाराष्ट्राच्या संघा 2.09.55सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारात मुलांच्या गटात एसएससीबीच्या सौरव देबनाथने सुवर्ण पदक मिळवले मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या भाविका पिंगळे हिने सुवर्ण पदक पटकावले. या गटातील या वर्षातील हे तिचे ६वे सुवर्णपदक आहे. भाविका रमेश व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ऑक्टोबर मध्ये होणा-या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ती मध्यप्रदेशचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:(प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार)
50मी बॅकस्ट्रोक मुले- (9ते 10 वयोगट)-1. उत्कर्ष गोर(महाराष्ट्र, 34.30 से), 2.एस. अथुबा(मणिपुर, 36.06से), 3. रिषभ दास(महाराष्ट्र, 36.19से)
50मी बॅकस्ट्रोक मुली- (9ते 10 वयोगट)-1. रिदिमा कुमार(कर्णाटक, 35.51से), 2. जहानबी कश्यप(आसाम, 37.04से), 3. आश्ना एएम(कर्नाटक, 37.43से)
50मी फ्रीस्टाईल मुले(9-10 वयोगट)-1. उत्कर्ष गोर(महाराष्ट्र, 30.55से), 2. अहमद बसीत(आसाम, 31.40से), 3. एस. अथुबा(मणिपुर 32.30से)
50मी फ्रीस्टाईल मुली(9-10 वयोगट)-1. जाहानबी कश्यप(आसाम, 30.88से), 2.रिदिमा कुमार(कर्नाटक, 30.91से), 3. हसिनी पी(तामिळनाडू, 32.65से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुले(9-10 वयोगट)-1. सुराबीन रियान(त्रिपुरा, 35.06से), 2. सुरज चौहान(उत्तर प्रदेश, 35.68से), 3. रेहान मिर्झा(आसाम, 36.57से)/जशुआ थॉमस(तामिळनाडू, 36.57से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुली(9-10 वयोगट)-1. वेदीका अमिन(महाराष्ट्र, 36.49से), 2. समारा चाको(कर्नाटक, 36.98से), 3. अपेक्षा एफ(महाराष्ट्र, 37.85से)
100मी बटरफ्लाय मुले(11-12 वयोगट)- 1. सोहन गांगुली(गोवा, 1.02.75से), 2. अनुभव पराशर(आसाम, 1.03.63से), 3. साहिल लष्कर(पश्चिम बंगाल, 1.03.84से)
100मी बटरफ्लाय मुली(11-12 वयोगट)- 1. संजिति शहा(महाराष्ट्र,1.07.77से), 2. पलक धामी(महाराष्ट्र, 1.08.82), 3. शक्ती बी(तामिळनाडू, 1.12.46से)
200मी फ्रीस्टाईल- मुली(11ते 12 वयोगट)- 1. शक्ती बी(तामिळनाडू, 2.19.15से), 2. आन्या वाला(महाराष्ट्र, 2.20.88से), 3. अपेक्षा एफ(महाराष्ट्र, 2.21.54से)
200मी फ्रीस्टाईल- मुले(11-12 वयोगट)-1. सोहन गांगुली(गोवा, 2.08.48से), 2. मयंक सोलंकी(दिल्ली, 2.15.81से), 3. कृष्णा पी(तामिळनाडू, 2.18.19से)
4X50 मी फ्रीस्टाईल- मुली(11-12 वयोगट)-1. संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन(महाराष्ट्र, 1.59.40से), 2. संहिता आर, जेदिया ए, लतीशा मंदना, निना व्यंकटेश(कर्नाटक, 2.02.52से), 3. आस्था बोर्दोलोई, लवलीन दास, मनाली मिश्रा, अश्रीता गोस्वामी(आसाम, 2.05.30से)
4X50 मी फ्रीस्टाईल- मुली(9-10 वयोगट)-1. उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास(महाराष्ट्र, 2.09.55से), 2. संस्कार भुयान, भुप्रती बुर्जोईंग, बसित अहमद, अंशुमन कश्यप(आसाम, 2.10.01से), 3. सक्षम पांवर, रॉबीन सेन, रणबिर सिंग, भाग्य गहलोत(दिल्ली, 2.14.23से)
हाय बोर्ड- मुले गट 1(16ते18 वयोगट)
- सौरव देबनाथ(एसएससीबी, 378.65से), 2. निहाल गिरम(महा, 269.05से), 3. दक्ष बाजपई(उत्तर प्रदेश, 254.70से)
मुली- 1. भाविका पिंगळे(मध्य प्रदेश 223.80), 2. आश्णा चेवली(गुजरात, 212.85), 3. मैप्रिया मित्रा(पश्चिम बंगाल 203.20)
स्प्रिंग बोर्ड- मुले 2(14ते 15 वयोगट)- 1. एन. विल्सन सिंग(एसएससीबी, 326.20), 2. सतिश कुमार प्रजापती(एसएससाबा, 299.75),3. ओम अवस्थि(महाराष्ट्र, 269.95)
मुली- 1.तितिक्षा मराठे(मध्य प्रदेश, 224.10), 2. बिल्वा गिरम(महाराष्ट्र, 200.15), 3. ईशा वाघमोडे(महाराष्ट्र, 181.35)
सामाजिक समतेसाठी प्रयत्नशील राहूया -सामाजिक न्याय मंत्री बडोले
पुणे: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समानतेचे विचार रुजवून त्यांना अभिप्रेत असणारी सामाजिक समता समाजात निर्माण करुया, असे प्रतिपादन सामाजिक न्याय, विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्म दिनानिमित्त विभागीय सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय, विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, नगरसेविका कालिंदा पुंडे, मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर, समाज कल्याण विभागाचे आयुक्त मिलींद शंभरकर, प्रादेशिक उपआयुक्त पी.एस.कवटे, सहाय्यक आयुक्त हरिष डोंगरे आदि उपस्थित होते.
श्री.बडोले म्हणाले, पुरोगामी विचार आत्मसात करुन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राजर्षी शाहु महाराजांनी करवीर संस्थानात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, मागासवर्गीयांना आरक्षण असे विचार कृतीतून मांडले. मागासवर्गीयांना सक्षम बनविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग विविध योजना राबवित असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
श्री.कांबळे म्हणाले, समाजातील गरजू मागासवर्गीयांना आर्थिकदृष्टया मदत करण्यासाठी शासन सदैव पाठीशी राहील. यावेळी मुक्ता पुणतांबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अमृत कटकम, अतुल माने, धनश्री कदम, अजित आढाव आदि सत्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या तसेच शारिरीकदृष्टया सक्षम असणाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तींशी विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार श्री.बडोले व श्री.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अनुसूचित जातीच्या परदेशी व देशांतर्गत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून यशस्वी झालेल्या, 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळविलेल्या दिव्यांग व गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. याबरोबरच विविध मंडळांकडून अनुदान घेवून यशस्वी झालेल्या व्यावसायिकांचा, शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पी.एस.कवटे यांनी प्रास्ताविक केले तर कोल्हापूरचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी आभार मानले यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, लाभार्थी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
फुले, शाहु आंबेडकरांचा वारसा पुढे चालवा -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
पुणे : ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांनी वसतीगृहाचा योग्य उपयोग करुन फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा पुढे चालवावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
समाज कल्याण विभागाच्या येरवडा (गोल्फ क्लब) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या इमारत उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा.अनिल शिरोळे, विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, विधानसभा सदस्य जगदिश मुळीक,पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, समाज कल्याणचे प्रादेशिक आयुक्त पी.एस.कवटे, कार्यकारी अभियंता एन.ए.तेलंग, सहाय्यक आयुक्त एच.डी.डोंगरे उपस्थित होते.
हे वस्तीगृह 216 विद्यार्थी क्षमतेचे असून हडपसर येथील 120 विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह या इमारतीत स्थालांतरीत करण्यात येणार आहे. या वसतीगृहात स्वच्छतागृहसह 54 खोल्या आहेत. यामध्ये 3 अभ्यासिका कक्ष, 2 बहुउदे्दशीय कक्ष, 2 गृहपाल निवासस्थान, 2 गृहपाल कार्यालय, 1 अभ्यासकक्ष, दोन भोजनकक्ष, 2 खेळाची मैदाने, जॉगींग ट्रॅक, उद्यान, कार्यक्रमासाठी खुला मंच व वाहनतळ आहे.
श्री.बडोले म्हणाले, ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षण घेण्यास येणाऱ्या प्रत्येक मागास व गरजू विद्यार्थ्याने या वसतीगृहाचा योग्य उपयोग करुन स्वत:ला सक्षम करावे. तसेच फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार पुढे न्यावेत. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणत्याच प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिष्यवृत्ती योजनेसाठी देशभरात आता एकच वेबपोर्टल होणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार लोकांपर्यंत पोहचवावा हाच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा उद्देश असून त्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री श्री.कांबळे म्हणाले,मोठया महानगरांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रयत्नशील आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारची अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतील व या योजनांचा योग्य उपयोग करुन विद्यार्थ्यांनी स्वत: सह घरची आणि समाजाची सुधारणा करावी,
असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त पी.एस.कवटे यांनी तर आभार समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एच.डी.डोंगरे यांनी मानले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंडे प्रकरणी आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर- चेतन तुपे पाटील(व्हिडीओ)
पुणे- पुणेकरांच्या हितासाठी म्हणून तुकाराम मुंडे प्रकरणी आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर राहू असे येथे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे पाटील यांनी म्हटले आहे . पहा आणि एका नेमके तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे .
…गो बॅक मुंडे … अखेर पुण्यातूनही होणार गच्छंती ?
पुणे – मी म्हणजेच सत्य ..मी म्हणजेच प्रामाणिकपणा ..मी म्हणजेच सर्व काही असा हमपणा अंगी बाणून इतरांना कमी लेखणे असा स्वभाव असणारी माणसे आम्हास नको .. मन आणि स्वाभिमान कुणा साहेबाकडे गहाण टाकणारे हे शहर नाही असा इशारा देत आता भाजपा मधूनच …गो बॅक मुंडे … ची मोहीम राबविण्यास प्रारंभ होतो आहे . विशेष म्हणजे विरोधी पक्षांनीही त्यांना याकामी सहाय्य करण्याचे ठरविल्याचे चित्र आहे .
महापालिकेचा पीएमपीएमएलमध्ये 60 टक्के वाटा आहे. मात्र, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे मालक असल्यासारखे वागत असून महापौरांना देखील ही जुमानीत नाहीत असा अनुभव पुणे-पिंपरीला आला …. तसेच बस सेवेविषयी एककल्ली कारभार करणारा अधिकारी सुधारणा करू शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत गो बॅक मुंडे … चा निर्णय भाजपच्या प्रमुख नगरसेवकांनी घेतला आहे .मात्र याबाबत नेमका पुढाकार घेणार कोण?पालकमंत्री आणि भाजप शहर अध्यक्ष यांची याबाबत नेमकी काय भूमिका आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही .
पीएमपीएमएलकडून शाळांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय बसच्या भाड्यामध्ये केलेल्या दरवाढीमुळे तुकाराम मुंढे आणि महापालिका पदाधिकारी यांच्यात वादंग होत आहे. मुंढेंची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदन करणारे पदाधिकारी काही महिन्यातच मुढेंना वैतागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पीएमपीएमएलकडून शाळांना पुरवण्यात येणाऱ्या बस सेवेचे दर 61 वरून 141 करण्यात आले आहे. या दरवाढीने एकीकडे पालक आणि दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधा-यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत पीएमपीएमएल संचालकांची बैठक बोलवण्यात अली होती. या बैठकीला मुंढे उपस्थित राहणार होते. मात्र, ऐन वेळी मुंढेंनी बैठकीला दांडी मारली .
यानंतर स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी गो बॅक मुंडे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे .
तुकाराम मुंडेंची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार -महापौर
पुणे- पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांचा अवमान करणारे धोरण अवलंबून मनमानी कारभार सुरु ठेवल्याने त्यांची तक्रार आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत असे येथे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले ..पहा आणि ऐका नेमके महापौर काय म्हणाल्या..
मुंडेंच्या दांडीने महापौरांचा अवमान …
पुणे- वादग्रस्त म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंडेंनी ‘मी फक्त कामालाच महत्व देतो असे अधोरेखित करत ,लोकप्रतिनिधींना टार्गेट करत अफाट प्रसिद्धी मिळविली . याच मुंडे यांनी पुण्यात पीएमपीएमएल ला आल्यावरही हाच धडाका सुरु ठेवला आहे . स्कूलबसच्या दरात वाढ करून आता त्यांनी पुण्यातील लोकप्रतीनिधींचा रोष ओढवून घेतला आहे . मुंढे कोणाचेच ऐकत नाही ..हे सोडा… पण ते कोणालाही विचारात न घेता स्वतः ला वाटेल तेच निर्णय घेतात आणि त्याबाबत स्पष्टीकरण देणेही बंधनकारक मानत नाही असा त्यांचा स्वभाव स्कूल बस दरवाढीच्या प्रकारातून दिसून आला आहे . काल महापलिकेत विद्यार्थ्यांचे या दरवाढीविरोधात आंदोलन झाले . मुख्य सभेत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी मुंडे यांच्या मनमानीवर ताशेरे ओढले ..तेव्हा आज सायंकाळी 4 वाजता महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीएमएल ची बैठक बोलाविली होती . या बैठकीस मुंडे यांना उपस्थित राहण्याचे कळविले होते . पण ऐनवेळी मुंढे यांनी मला काम आहे असे सांगत स्वारगेट येथील कार्यालयातच ठिय्या मांडून राहिले आणि आपले प्रतिनिधी येतील त्यांच्याशी बोला असे सांगत अवघ्या 1 महिन्यानंतर निवृत्त होणारे धारूरकर आणि वाहतूक व्यवस्थापक गवळी यांना पाठविले . अखेर यांच्याशी चर्चा न करता महापौर ,तसेच उपमहापौर सिद्धार्थ धेंडे ,स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हि बैठक आटोपती घेतली .
‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचने आली मैफिलीला रंगत!
फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचं कथासूत्र यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या आगामी ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ सिनेमाचं म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले.
सिनेमाचे निर्मात्या रिचा सिन्हा, रवी सिंघ त्याचबरोबर स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख आणि इतर कलाकार यांच्याबरोबर लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. इंडस्ट्रीतले इतर अनेक नामवंत कलाकार आवर्जून ह्या सोहळ्यास उपस्थित होते. या सोहळ्याच्या सुरुवातीलाच ;तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी; या रोमँटिक गाण्यावरील गश्मीर- स्पृहाच्या सादरीकरणाने वातावरण गुलाबी केले ज्याला आपला मधुर आवाज दिला होता जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी. अभय जोधपूरकर आणि प्रियांका बर्वे यांचे ‘विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना’या चित्रपटातील गाणे प्रियांका बर्वे ने सादर केलेल्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या हृदयस्पर्शी गाण्याने मैफिलीला चार चांद लावले. त्यानंतर बेला शेंडे हिच्या आवाजातील
‘तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो’; या कोकणी गाण्याच्या सादरीकरणाबरोबरच विडिओ ही लाँच करण्यात आला. या सोहळ्याचा शेवट जसराज जोशी आणि श्रुती आठवले यांच्या मधुर आवाजातील ‘मौनातूनी ही वाट चालली पुढे’ या गाण्याने झाला आणि हा म्युझिक लाँच सोहळा पार पडला.
मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत संगीत दिग्दर्शक हृषीकेश-सौरभ आणि जसराजनी, गीतकार गुरु ठाकूर लिखित तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो, आणि ;विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना; तर वैभव जोशी लिखित ;मौनातूनी ही वाट चालली पुढे; आणि;तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी अशी एकूण ४ गाणी संगीतबद्ध केलेली आहेत.




