Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चला हवा येऊ द्या च्या मंचावर मराठमोळ्या साजात अवतरली श्रीदेवी

Date:

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपुर आणि सहअभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नववारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

ऐंशी आणि नव्वदचं दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे श्रीदेवी. सदमा, चांदनीमधील संवेदनशील भूमिका असो की चालबाजमधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दुर गेलेल्या श्रीदेवीने दोन वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लीश विंग्लीश चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आणि आता मॉम या चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने श्रीदेवी चला हवा येऊ द्या च्या मंचावर आली होती. यावेळी थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेल्या नागिन चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली. याशिवाय इंग्लीश विंग्लीश सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरविण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसविले. यावेळी नवाझुद्दीन सिद्दीकीचा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्यानेही धम्माल उडवून दिली. याशिवाय पोस्टमन काकाने एका पत्रातून एका मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना वाचून दाखवल्या आणि ते ऐकून श्रीदेवीही हळवी झाली. प्रेक्षकांना ही सगळी धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागांत बघायला मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज

वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय ह. भ. प. योगीराज...

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी...