२०११ साली बिल्टेमा फाउंडेशनच्या सहकार्याने टूमारो टूगेदर ह्या शालेय प्रकल्पा अंतर्गत शालेय मुलींना शिष्यवृत्ती देण्यास सुरवात झाली. या उपक्रमाअंतर्गत लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) सातवी पासून ते पदवी पर्यंतच्या गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतो, आणि त्यांना आर्थिकदृष्या समर्थन देतो. एलपीएफ वेळोवेळी समुपदेशन आणि प्रशिक्षण देखील देते. कुशल समुपदेशक व प्रशिक्षक येथे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतात.
ज्या वर्षी ह्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले तेंव्हा ह्यामध्ये फक्त ५ शाळांचा समावेश होता परंतु आता आणखी १४ शाळा ह्यात समाविष्ट झाल्या आहेत म्हणजेच सात वर्षांच्या कालावधीत एकून १९ शाळेतील विद्यार्थिनींना फाऊंडेशनद्वारे मदत दिली जाते. एलपीएफ ने १४८४ मुलींना ३३३० शिष्यवृत्ती दिली आहे, ज्यात ३५६ नविन विद्यार्थीनीं बरोबर ११२८ विद्यमान प्राप्तकत्यांना देखील शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. निवडल्या गेलेल्या मुलींना दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील शिष्यवृत्ती प्रमाणपत्राबरोबरच लिला ज्यूनियर्स ही नवीन ओळख मिळेल.
जुलै महिन्यात पुण्यात ह्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. ह्यावेळी नवीन लीला ज्युनियर्स, त्यांचे पालक, प्रसिद्ध कॉर्पोरेट व्यक्तिमत्त्व आणि नामवंत शिक्षणतज्ज्ञही येथे उपस्थीत राहतील.