उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

Date:

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

पुणे, दि २: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जनगणना २०२७’ मध्ये सक्रीय सहभाग नोंदवून आपली स्व-गणना पूर्ण केली आहे.
‘जनगणना २०२७’ ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसेच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते, यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा, याकरीता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे

श्रीमती पवार म्हणाल्या, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र राज्यात १ मे पासून सुरुवात झाली असून ‘स्व-गणना’ प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने https://se.census.gov.in/ संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी या संकेतस्थळाचा वापर करुन आपल्या सोयीनुसार अद्ययावत माहिती भरावी.

स्व-गणनेच्या टप्प्यानंतर
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक गृहभेटी देणार असून जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार असून यावेळी प्रगणकास संपूर्ण सहकार्य करावे. आपण दिलेली माहिती अत्यंत गोपनीय असण्यासोबत ती कायद्याने सुरक्षित असणार आहे. या माहितीचा वापर राज्याच्या विकास आणि नियोजनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे या राष्ट्रीय मोहिमेत राज्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभागी होऊन स्व-गणना करावी, असे आवाहनही श्रीमती पवार यांनी केले.

यावेळी उपायुक्त तथा शहर जन गणना अधिकारी विजय लांडगे, सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...

ड्रोनमुळे बदलणार शेतीचे स्वरूप : अत्याधुनिक शेतीला सुरुवात

माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे 'महाराष्ट्र...

महिला API ला २८ लाखाच्या लाच प्रकरणी पकडले

पुणे :पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली...