पुणे -लष्कर भागातील भोपळे चौकाजवळील हिंद तरुण मंडळास श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाच्या वर्षीचा ” जय गणेश भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल लष्कर भागात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी लष्कर भागात मंडळास मिळविलेल्या पुरस्कार स्मृतीचिन्हांची भव्य मिरवणूक काढण्यात आली . मंडळास दोन स्मृती चिन्हे आणि एक लाख रुपयांचा धनादेश मिळाला.
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या , भगवे उपरणे घालून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते . यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या . मंडळास मिळालेली रक्कम मंडळाने पुणे कॅन्टोन्मेंट भागात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पंचवीस हजार रुपये व फुरुसुगी येथील येथील शहिद कुटुंबीयास पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहेत . अशी माहिती हिंद तरुण मंडळ ट्रस्टचे विश्वस्त दिलीप गिरमकर यांनी दिली .
मंडळास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परिमंडळ दोनचे पोलिस आयुक्त डॉ. प्रविण मुंडे यांच्याहस्ते हिंद तरुण मंडळ ट्रस्टचे विश्वस्त दिलीप गिरमकर . मंडळाचे अध्यक्ष गणेश तिप्पापुरकर , कार्याध्यक्ष अक्रम शेख यांचा पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात आले