पुणे – मी म्हणजेच सत्य ..मी म्हणजेच प्रामाणिकपणा ..मी म्हणजेच सर्व काही असा हमपणा अंगी बाणून इतरांना कमी लेखणे असा स्वभाव असणारी माणसे आम्हास नको .. मन आणि स्वाभिमान कुणा साहेबाकडे गहाण टाकणारे हे शहर नाही असा इशारा देत आता भाजपा मधूनच …गो बॅक मुंडे … ची मोहीम राबविण्यास प्रारंभ होतो आहे . विशेष म्हणजे विरोधी पक्षांनीही त्यांना याकामी सहाय्य करण्याचे ठरविल्याचे चित्र आहे .
महापालिकेचा पीएमपीएमएलमध्ये 60 टक्के वाटा आहे. मात्र, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे मालक असल्यासारखे वागत असून महापौरांना देखील ही जुमानीत नाहीत असा अनुभव पुणे-पिंपरीला आला …. तसेच बस सेवेविषयी एककल्ली कारभार करणारा अधिकारी सुधारणा करू शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत गो बॅक मुंडे … चा निर्णय भाजपच्या प्रमुख नगरसेवकांनी घेतला आहे .मात्र याबाबत नेमका पुढाकार घेणार कोण?पालकमंत्री आणि भाजप शहर अध्यक्ष यांची याबाबत नेमकी काय भूमिका आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही .
पीएमपीएमएलकडून शाळांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय बसच्या भाड्यामध्ये केलेल्या दरवाढीमुळे तुकाराम मुंढे आणि महापालिका पदाधिकारी यांच्यात वादंग होत आहे. मुंढेंची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदन करणारे पदाधिकारी काही महिन्यातच मुढेंना वैतागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पीएमपीएमएलकडून शाळांना पुरवण्यात येणाऱ्या बस सेवेचे दर 61 वरून 141 करण्यात आले आहे. या दरवाढीने एकीकडे पालक आणि दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधा-यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत पीएमपीएमएल संचालकांची बैठक बोलवण्यात अली होती. या बैठकीला मुंढे उपस्थित राहणार होते. मात्र, ऐन वेळी मुंढेंनी बैठकीला दांडी मारली .
यानंतर स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी गो बॅक मुंडे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे .