Home Blog Page 3315

44 व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेस उद्यापासून प्रारंभ

पुणे, 2 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेस उद्यापासून(3जुलै)प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाला असून मुलांच्या संघाचे नेतृत्व मुंबईच्या नील रॉय याच्याकडे, तर मुलींच्या संघाचे त्रिशा कारखानिसकडे सोपविण्यात आले आहे.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे दि.3 ते 6 जुलै 2017 या कालावधीत हि स्पर्धा पार पडणार आहे. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात नील रॉय,  वेदांत खांडेपारकर, अॅरन फर्नांडिस, धनायुश राणींगा, सुश्रुत कापसे, मिहीर आंब्रे, दिवीज टेकावडे, प्रसाद कंडुल, सत्यजित कुमठेकर, अनिकेत चव्हाण, करण धर्माधिकारी, अभिनंदन दळवी, आर्यन केदारे, अथर्व देशमुख यांचा तर मुलींच्या गटात त्रिशा कारखानीस, रायना सलढाणा, जिस्पा दोशी, युक्ता वखारीया, साध्वी धुरी, शॅरन साजु, आर्या राजगुरू, साची शेट्टी, ऋतुजा तळेगावकर, सिद्धी कोतवाल, युगंधरा शिर्के, कारवी गायकवाड, अहिल्या चव्हाण यांचा समावेश आहे.

14 वर्षाखालील संघात मुलांच्या गटात आर्यन भोसले, वेदांत बापना, अमान सिक्का, सफवान शेख, सुदर्शन हस्तक, श्रीश मौलिक, अंगथ सादनाह, साहिल गणगोटे, मनिष खोमणे, आर्यन वेर्णेकर, यश गुल्हाने, शिवाजी राऊत, यश सोनाक, ध्रुव पटेल, कृष्णा गडाख, जरेश घाग, ऋग्वेत पाटील यांचा तर, मुलींच्या गटात केनिशा गुप्ता, आकांक्षा शहा, सई पाटील, आएका चात्रा, सिया बिजलानी, अनन्या पांडे, ख़ुशी पटेल, अंतरा कोठारे, सुहानी बक्षी, वैष्णवी मोरे, शाल्मली वाळुंजकर, रिया ताओरी, कनिष्का शौकीन, पायल श्रीराव, हिमानी फडके यांचा समावेश आहे. तसेच, राष्ट्रीय कुमारांच्या स्पर्धेदरम्यान वॉटरपोलो स्पर्धादेखील होणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेतील महाराष्ट्र संघाची यादी खालीलप्रमाणे
17वर्षाखालील संघ: मुले: नील रॉय,  वेदांत खांडेपारकर, 
अॅरन  फर्नांडिस, धनायुश राणींगा, सुश्रुत कापसे, मिहीर आंब्रे, दिवीज टेकावडे, प्रसाद कंडुल, सत्यजित कुमठेकर, अनिकेत चव्हाण, करण धर्माधिकारी, अभिनंदन दळवी, आर्यन केदारे, अथर्व देशमुख;
मुली: त्रिशा कारखानीस, रायना सलढाणा, जिस्पा दोशी, युक्ता वखारीया, साध्वी धुरी, शॅरन साजु, आर्या राजगुरू, साची शेट्टी, ऋतुजा तळेगावकर, सिद्धी कोतवाल, युगंधरा शिर्के, कारवी गायकवाड, अहिल्या चव्हाण;

14 वर्षाखालील संघ: मुले: आर्यन भोसले, वेदांत बापना, अमान सिक्का, सफवान शेख, सुदर्शन हस्तक, श्रीश मौलिक, अंगथ सादनाह, साहिल गणगोटे, मनिष खोमणे, आर्यन वेर्णेकर, यश गुल्हाने, शिवाजी राऊत, यश सोनाक, ध्रुव पटेल, कृष्णा गडाख, जरेश घाग, ऋग्वेत पाटील;

मुली: केनिशा गुप्ता, आकांक्षा शहा, सई पाटील, आएका चात्रा, सिया बिजलानी, अनन्या पांडे, ख़ुशी पटेल, अंतरा कोठारे, सुहानी बक्षी, वैष्णवी मोरे, शाल्मली वाळुंजकर, रिया ताओरी, कनिष्का शौकीन, पायल श्रीराव, हिमानी फडके

“जब हैरी मेट सेजल” के अगले गीत “बीच बीच में” को डिस्को क्लब में लॉन्च करेंगे शाहरुख और अनुष्का!

फ़िल्म के पहले ट्रैक “राधा” को बड़े ही अनोखे तरीके से दर्शको के सामने पेश किया गया था जिसे दर्शको ने खूब पसंद भी किया और अब अनुष्का और निर्देशक इम्तियाज अली के साथ शाहरुख को एक क्लब से दूसरे क्लब का लुत्फ उठाते हुए देखा जाएगा क्योंकि पूरी टीम अब फ़िल्म का अगला गीत रिलीज करने के लिए तैयार है।

पहली बार हम इन तीनों को बॉम्बे के सबसे बेहतरीन क्लबों की सेर करते हुए देखेंगे। फ़िल्म का अगला ट्रैक “बीच बीच मे” पब और लाउंज के लिए एक आदर्श गीत का अनुभव देता है, इसलिए टीम ने इसे उसी तरीके से लॉन्च करने का फैसला किया। इस गीत में शाहरुख और अनुष्का एक बेहद ही आकर्षक तरीके से डांस करते हुए नज़र आएंगे।

शाहरुख, अनुष्का और इम्तियाज शहर और उपनगरों में स्थित क्लबों का रुख करेंगे। 3 जुलाई को ये तिकड़ी एक क्लब से दूसरे क्लब की जा कर धमाल करेंगे। इसके अलावा, “बीच बीच मे” क्लब से वक़्त निकालकर ये तिकड़ी मीडिया से भी खास मुलाकात करेगी।

अपने पसंदीदा सितारों को एक क्लब से दूसरे क्लब में यू मस्ती करता देख सभी प्रशंसकों के लिए निश्चित रूप से ये किसी सपने से कम नही होगा!

जब हैरी मेट सेजल के निर्माता, इस तरह के प्रचार के जरिये एक अद्वितीय विपणन का सही उदाहरण पेश कर रहे है। फ़िल्म के कुछ दृश्य को मिनी ट्रेल के जरिये पेश करने के बाद अहमदाबाद जा कर असली सेजल से मुलाकात करने के बाद अब बारी है क्लब में कुछ मस्ती करने का।

फिल्म ने निर्माताओं द्वारा जारी की गई कहानी ने दर्शको के आस-पास बहुत सारी चर्चाएं बटोर ली है।

फ़िल्म 4 अगस्त को रिलीज होगी।

 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त

राळेगणसिद्धी ता. १: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच अन्न व औषध विभागात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. या विभागात संगणीकृत योजना राबवून पारदर्शी व्यवहार करण्यात येत असल्याबद्दल अण्णांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगर जिल्ह्यातील पहिल्या ई पॉस मशीनचे उद्घाटन राळेगणसिद्धी येथे त्यांच्या हस्ते करून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष धान्यवाटप  करण्यात आले.

यावेळी मंत्री बापट म्हणाले, अण्णांनी सर्व सामान्य लोकांना धान्य मिळण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे मंत्री झाल्यानंतर मी अण्णांना भेटण्यासाठी आलो होतो. अण्णांनी सर्व सामान्यांना धान्य मिळावे तसेच कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी माझ्या विभागाकडून करण्यात येत आहे.  या विभागात काही अपप्रवृत्ती शिरल्या होत्या. यामुळे धान्याचा काळाबाजार होत होता. यामुळे गरजू पर्यंत धान्य पोहचत नव्हते. त्यामुळे काळाबाजार थांबवून या विभागात पारदर्शकता आणण्याचे आव्हान आमच्यापुढे होते. त्यामुळे हे थांबवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संगणीकृत प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामुळे धान्याचा ट्रक गोदाम  मधून भरून शेवटच्या रेशनिंग दुकानात रिकामा होई पर्यंत सर्व माहिती उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्याला बायोमेट्रिक पद्धतीने धान्य देण्यात येत असल्याने लाभार्थ्याला त्याच्या गरजे पुरते धान्य उपलब्ध होते. त्याला नको असलेले धान्य दुकानात शिल्लक राहते मात्र त्याचा काळा बाजार होत नाही. याबरोबरच रेशनिंग दुकानदारांनाही फायदा होणार आहे. यासाठी त्यांचे कमिशन वाढवून देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.त्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांना भाजी पाला , बी बियाणे तसेच इतर धान्य विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. बँकेचे स्थानिक  प्रतिनिधी म्हणून देवाण घेवाण करण्याची सुविधा ई पॉस मशीन वापरून केल्यास दुकानदारास उत्पन्नाचा वेगळा मार्ग उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे दुकांदारांचाही फायदा होणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. यावर अण्णांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, अशा प्रकारच्या योजना राबवल्यामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत धान्य पोहचेल. पर्यायाने   महाराष्ट्रात अन्न सुरक्षा योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे शक्य होईल.

———————————————-

ठाई ठाई माझी विठाई…

आषाढवारीचा सोहळा ऐन भरात आला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. ‘आली आषाढी एकादशी…चला करू पंढरीची वारी…माझी विठ्ठल रखुमाई!’ असं म्हणत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांसाठी ही वारी म्हणजे आत्मानंदाचा अनुभव असतो. हाच अनुभव विठ्ठला शप्पथ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घ्यायची संधी मिळणार आहे. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

 

विठ्ठला शप्पथ या चित्रपटाची कथा, पटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवादलेखन चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद यांचे आहेत. पंढरीच्या विठ्ठलाची महती सांगणारे, गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील भक्तीगीत नुकतंच ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे.

 

झळही नसे मज तापल्या उन्हाची… घरकुल सावरी सावली कुणाची

म्हणे तुका नामा जनाई… ठाई ठाई माझी विठाई…

 

मंगेश कांगणे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला चिनार-महेश यांचा संगीतसाज लाभला आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ ही म्युझिक कंपनी या चित्रपटातील गाणी प्रकाशित करणार आहे.

 

माळ तुळशीची टिळा चंदनाचा भाळी… शिणला हा देह जरी थकली ना टाळी

सोडवून सारी अंधाळाची जाळी… दिस नवा येई तुझी ऐकण्या भूपाळी

आभाळाला देई निळाई… ठाई ठाई माझी विठाई…

 

अशा अतिशय समर्पक शब्दात विठ्ठल भक्तीचं यथार्थ वर्णन करणारे हे गीत सगळ्यांनाच समाधानाची अनुभूती देईल.

‘सुन जा दिल की दास्ता’ द्वारे उलगडला हिंदी चित्रपट युगाचा पट

 

पुणे- मूक चित्रपटांपासून बोलपटांपर्यंतचा इतिहास… विसाव्या दशकापासून ते पन्नासाव्या दशकापर्यंत भारतीय

चित्रपटांमध्ये झालेली स्थित्यंतरे…..संगीतकारांची काम करण्याची पद्धत व स्वभाव वैशिष्ट्ये….आणि या सर्व काळातील

गाजलेल्या गाण्यांच्या चित्रफितीच्या माध्यमातून केलेल्या सादरीकरणाने रसिकांना तृप्त केले. निमित्त होते ‘सुन जा दिल

की दास्ता’…सिने संगीत एक परीकथा या दृकश्राव्य कार्यक्रमाचे.

पूना गेस्ट हाऊस, सिने गप्पा आणि सिनेमंच यांच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालायामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन

करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या संयोजिका सुलभा तेरणीकर यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

त्यांनी हिंदी चित्रपटाच्या युगाचा पट उलगडत जुन्या आठवनींना उजाळा दिला. आठवणींबरोबरच या संगीतकारांच्या

त्या काळातील गाण्यांचे चित्रफितीद्वारे केलेल्या सादरीकरणाने रसिकांचे कान व डोळे तृप्त झाले. उस्मान शेख व वंदना

कुलकर्णी यांनी त्यांना साथ दिली. हा कार्यक्रम संगीतकार सज्जाद हुसेन यांना समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाच्या

सुरुवातीला सुलभा तेरणीकर यांच्या हस्ते अनिल भोळे, अनिल दामले आणि किशोर सरपोतदार यांचा सत्कार करण्यात

आल्या.

सुलभा तेरणीकर म्हणाल्या, नानासाहेब सरपोतदार हे स्टुडिओचे मालक तर होतेच परंतु ते लेखक, दिग्दर्शक व

संगीतकारही होते. कलावंतांची हलाखीची स्थिती बघून त्यांनी पूना गेस्ट हाऊस सुरु केले असे त्यांनी सांगितले. केशवराव

भोळे हे सिनेमा संगीताचे आद्य प्रवर्तक होते असे गौरोद्गार त्यांनी काढले.

सज्जाद हुसेन हे उत्कृष्ट संगीतकार होते. त्यांच्या चाली या अभिजात असायच्या. त्यांनी कलाकारांना टाळले मात्र,

आपल्या प्रतिभेशी कोणाला ढवळा ढवळ करू दिली नाही.त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्या हा कार्यक्रम समर्पित

करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

दादासाहेब फाळकेंनी मुक चित्रपटाद्वारे एक नवीन दालन कलाकारांना उपलब्ध करून दिले. २० व्या दशकात सामाजिक,

पौराणिक चित्रपटांमुळे संगीत रंगभूमी हळूहळू संपली. मूकपट हे सर्व भारतीयांना एकत्र आणणारी गोष्ट होती मात्र

बोलपट सुरु झाल्यावर भाषेमुळे पुन्हा वेगळे झाले असे सांगून तेरणीकर म्हणाल्या, प्रादेशिक अस्मिता वेगळी झाली तरी

हिंदी भाषेने एकतेची ओळख करून दिली. पार्श्वसंगीत बोलपंटामध्ये आले आणि संगीत रंगभूमीवरील लोक सिनेमात

आले. सिनेमामध्ये पार्श्वगायनाचा प्रयोग झाला आणि तो एक इतिहास झाला.

त्या म्हणाल्या, ३० व्या दशकापर्यंत स्थिर चित्रण आणि शांत गाणी होती मात्र १९४१ ला सिनेमाची परिभाषा बदलत

गेली. त्यानंतर पंजाबी ठेका आला. गुलाम हैदर यांनी इतिहास घडविला. त्यानंतर संगीतकाराला प्रतिष्ठा मिळू लागली.

१९४७ ला देशात स्थित्यंतरे घडली फाळणीच्या ज्वाळा या सिनेक्षेत्राला लागल्या त्यामुळे नूरजहाँ, सैगल, गुलाम हैदर हे

निघून गेले. हिंदी चित्रपटात नवनिर्मिती घडली दिलीप कुमार, देवानंद व राजकपूर आले आणि लता मंगेशकर यांच्या

रूपाने मोठी देणगी मिळाली असे त्यांनी सांगितले.

दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रत्येक गाण्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘हृदयांतर’ चित्रपटाचा ‘मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमिअर!

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये होणा-या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. १० ते २२ ऑगस्ट २०१७ दरम्यान मेलबर्नमध्ये आयोजित होणा-या ह्या फिल्म फेस्टिव्हलव्दारे हृदयांतरचा वल्ड प्रीमिअर होणार आहे.

 

बहूप्रतिक्षित चित्रपट हृदयांतरव्दारे विक्रम फडणीस दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. ह्या कौटुंबिक भावनिक चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसतील.

 

हृदयाला भिडणा-या ह्या सिनेमाचा ट्रेलर बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनच्या हस्ते झाला. तर सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्याला सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन उपस्थित होती.

 

मेलबर्नला होणा-या ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विक्रम फडणीस आपला चित्रपट प्रस्तूत करतील. तसेच आपला फॅशन डिझाइनर ते फिल्ममेकर हा प्रवास ‘कॅटवॉक टू सिनेमा’ ह्या मास्टरक्लासव्दारे चित्रपटरसिकांसमोर मांडतील.

 

ह्या सन्मानाने आनंदित झालेले विक्रम फडणीस प्रतिक्रिया देताना म्हणाले, “हृदयांतर चित्रपटाला अशा पध्दतीने एक जागतिक व्यासपिठ मिळणे हा आमचा सन्मानच आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिनेरसिकांसमोर आणि मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझ्या सिनेमाचे सादरीकरण करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्यासारखा एखादा नवोदित फिल्ममेकर ह्यापेक्षा अधिक काय मागू शकेल.”  

 

ह्या भारतीय फिल्म महोत्सवात ‘हृदयांतर’ शिवाय अ बिलीयन कलर स्टोरी (इंग्रजी), आसामपता (बंगाली), चोर- द सायकल (आसामी) क्रॉनिकल्स ऑफ हरी (कन्नडा) अ डेथ इन दि गंज (इंग्रजी). डॉ. रखमाबाई (मराठी), पूर्णा- करेज हॅज नो लिमीट्स (हिंदीं) आणि बाहूबली- बाहूबली २ हे चित्रपट दाखवले जातील.

 

टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ आहे. या चित्रपटात  मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, अमित खेडेकर आणि मीना नाईक  मुख्य भूमिकेत आहेत.

ताराचंद रुग्णालयातील डॉक्टरांचा सन्मान

पुणे-डॉक्टर दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघातील प्रभाग क्र १७ मधील ताराचंद रुग्णालयातील डॉक्टरांचा स्थानिक नगरसेविका सुलोचना  तेजेंद्र  कोंढरे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देउन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाच्या संयोजनसाठी  चेतन जाधव , किरण थोरवे , विनायक फाळके , निखिल यादव , राहुल कोंढरे , निखिल काकडे , तुषार खंडागळे , आदेश पंडित , निखिल जाधव , निमेश संघवी , सागर कोंढरे , मंथन महाडिक , अनिकेत मराठे , ओंकार आटाळे , सिद्धार्थ शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले

पाऊले चालती पंढरीची वाट…२०१७ या आषाढी वारी विशेषांकांचे प्रकाशन

बारामती-साप्ताहिक प्रविण चा पाऊले चालती पंढरीची वाट…२०१७ या आषाढी वारी विशेषांकांचे  प्रकाशन बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई वैभव तावरे यांचे हस्ते संपन्न झाले .                   
साप्ताहिक प्रविण चा पाऊले चालती पंढरीची वाट…२०१७ या आषाढी वारी विशेषांकांचे  प्रकाशन बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई वैभव तावरे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेविका सौ.सीमाताई चिंचकर,सौ.अनघाताई जगताप,श्री.योगेश चिंचकर ,श्री.वैभव तावरे अलीअसगर बारामतीवाला,श्री.अजिंक्यजगताप,संपादक डॉ.विजय भिसे, विशाल मेहता हे उपस्थित होते.नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे यांच्या वाढदिवसा दिवशीच त्यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.आषाढी वारीतील विविध छायाचित्रासह सेवा उपक्रमांची माहितीचा अंक असल्याचे डॉ.विजय भिसे यांनी सांगितले.

40 लाख नाही फक्त 4.5 लाख शेतक-यांचाच सातबारा कोरा होणार-सचिन सावंत

पुणे –

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकारकडून राज्यातील शेतक-यांची प्रतारणा सुरु असून कर्जमाफीच्या नावाखाली राज्य शासनाने शेतक-यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. खोट्या आकड्यांच्या भुलभुलैय्यात अनेक शेतक-यांच्या आशा अकांक्षा भरडल्या जात आहेत. राज्यातील शेतक-यांना 34 हजार कोटींची नाही तर फक्त 5 हजार कोटी रूपयांचीच कर्जमाफी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या 89 लाख नव्हे तर 15 लाखांपेक्षाही कमी शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात पुणे येथे पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना सावंत म्हणाले की, राज्य सरकारने माफ करण्याकरिता प्रायोजित केलेल्या पीक कर्ज व मध्यम मुदतीच्या कर्जाचा कालावधी हा 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 असा ठेवला आहे. यामुळे 2008 च्या कर्जमाफीनंतर 1 एप्रिल 2012 पर्यंत पुन्हा थकबाकीत गेलेले 2012 पर्यंतचे अल्प व बहुभुधारक शेतकरी कर्जमाफीच्या परिघाबाहेर जाणार आहेत. याचबरोबर 30 जून 2017 रोजी थकबाकीदार झालेल्या शेतक-यांना या कर्जमाफीचा एक रूपयाचाही फायदा मिळणार नाही.

राज्यस्तरीय बँकर कमिटीकडून राज्य शासनाने राज्यातील कर्जधारक शेतक-यांच्या संदर्भातील अहवाल मागितला होता. त्या अहवालानुसार दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत राज्यात 1 कोटी 36 लाख 42 हजार 166 खातेदार शेतकरी असून 89 लाख 75 हजार 198 शेतक-यांना आजतागायत कर्ज पुरवठा परिघात आहेत. तसेच 9 मार्च 2017 पर्यंत राज्यात 40 लाख 1159 शेतक-यांचे एकूण 34 हजार कोटी 67 लाख थकित कर्ज आहे असे सांगितले आहे. ही आकडेवारी ही संपूर्णपणे 2008 च्या कर्जमाफीनंतरची असून राज्य शासन ही 2012 नंतरची दाखवण्याचा प्रयत्न करित आहे. त्यामुळे आकडे दाखविण्याकरिता गेल्या 10–12 वर्षाचे दाखवायचे मात्र कर्जमाफीचा कार्यकाळ फक्त चार वर्षाचा ठेवायचा अशा त-हेचा छद्मी उद्योग शासनाने केला आहे. या चलाखीमुळे या योजनेचा लाभ हा केवळ 15 लाख लोकांना देणारा, 34 हजार कोटी नव्हे तर निव्वळ पाच हजार कोटी रूपयांवर शेतक-यांची बोळवण करणारा आणि 40 लाख नव्हे तर केवळ 3 ते 4 लाख शेतक-यांचा सातबारा कोरा करणारा हा निर्णय आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार सन 2012-13 या वर्षात कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतक-यांपैकी जे शेतकरी दिनांक 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. राज्यस्तरीय बँकर कमिटीच्या अहवालानुसार एकूण 34 हजार कोटी थकीत कर्जापैकी 10 लाख शेतक-यांच्या 10  हजार कोटी रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले आहे. तसेच 26 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार कर्ज पुनर्गठनाचे हप्ते भरण्यात सवलत व मुदतवाढ दिल्याने दिनांक 30 जून 2016 रोजी एकही कर्ज पुनर्गठन झालेला शेतकरी थकबाकीदार होऊच शकत नाही. त्यामुळे कर्ज पुनर्गठन झालेले शेतकरी कर्जमाफीतून आपसूकच वगळले जात असल्याने जवळपास दहा लाख शेतकरी थेट वगळले जाणार आहेत. सदर शेतक-यांच्या कर्जाच्या हप्त्याची मुदत ही 30 जून 2017 आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी थकबाकीदार होतील आणि त्यांना कर्जमाफी द्यावी लागेल म्हणून राज्य शासन 30 जून 2016 चीच मर्यादा घालत आहे, 30 जून 2017 ची नाही.

राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार 9 मार्च 2017 पर्यंत राज्यात एकूण 13 लक्ष 88 हजार 230 शेतक-यांचे जवळपास साडेबारा हजार कोटींपेक्षा अधिक एनपीए असल्याचे सांगितले आहे. राज्यातील पुनर्गठीत आणि एनपीए या दोघांचीही संख्या 34 हजार कोटींच्या रकमेत सामाविष्ठ असून एनपीए हे बहुसंख्येने 2008-2014 या कालवधीतील आहेत. त्यातील 2012 पर्यंतचे एनपीए शासन विचारात घेत नाही. 2014-15 आणि 2015-16 या वर्षात कर्जाचे पुनर्गठन झालेले असल्याने त्यांना कर्जमाफी देणार नाही. केवळ 2012-13 आणि 2013-14 या दोन वर्षाचा एनपीए कर्जमाफी योजनेत सामाविष्ठ आसेल. या दोन वर्षात 26 एप्रिल 2016 रोजी कर्ज पुनर्गठनाच्या निर्णयावेळी शासनाने जी आकडेवारी जाहीर केली त्यामध्ये 2012-13 व 2013-14 मध्ये केवळ 4.5 लाख शेतकरी आहेत असे जाहीर केले होते. यातून एवढ्याच शेतक-यांचा सातबारा होणार हे स्पष्ट आहे.

शासनाकडून सातत्याने विधाने बदलली जात आहेत. आपल्या पहिल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारकांचे सरसकट कर्ज तात्काळ रद्द होईल असे सांगितले असताना तो शब्द ही फिरवला आहे. हमीभाव कायदा आणि राज्य कृषीमुल्य आयोग याबाबत आता कुठलीही चर्चा केली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी दुस-या पत्रकारपरिषदेत दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या 25 टक्के किंवा दीड लाख रूपये यापैकी कमीत कमी लाभ देण्याचे सांगितले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आवाज उठवल्याने कमीत कमीची अट काढून दीड लाखांचा लाभ देण्याचे मान्य केले आहे.  राज्यातील कर्जमाफीचा हा भुलभुलैय्या काँग्रेस पक्षाला मान्य नसून राज्य सरकारकडून सातत्याने वेगवेगळे आकडे सांगून राज्यातील शेतक-यांची फसवणूक सुरु आहे.  काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध करत असून राज्यातील सर्व शेतक-यांना कुठल्याही काल आणि रकमेच्या मर्यादेशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी या भूमिकेवर ठाम आहे. राज्यातील सर्व सहकारी वित्त संस्थांनी शेत-यांकडून दामदुपटीने मुद्दलीपेक्षा अधिक व्याज लावू नये असे राज्य शासनाचे परिपत्रक आहे. त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी केली. तसेच अर्बन बँका, पतसंस्था आणि मायक्रोफायनान्स कडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफी द्यावी अशी मागणी सावंत यांनी केली.

महावितरण राज्यभरातील कार्यालयात 70 हजार वृक्षाची लागवड करणार

0

मुंबई :-

        महावितरणच्यावतीने राज्यभरातील विविध कार्यालयात सुमारे 70 हजारपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. 

1 जुलै ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे.  या संकल्पात महावितरणच्यावतीने मोठे योगदान देण्यात येत असून त्यांतर्गत राज्यभरातील 16 परिमंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयात 70 हजारापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महावितरणच्यावतीने मागीलवर्षीही संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मागीलवर्षी केलेल्या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला एका झाडाच्या संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावर्षीही वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडाचे कर्मचारी संगोपन करणार आहेत.

प्रकाशगड मुख्यालयात आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात महावितरणचे संचालक सर्वश्री सुनिल पिंपळखुटे, दिनेशचंद्र साबू आणि कार्यकारी संचालक सर्वश्री शंकर शिंदे, सचिन ढोले, श्रीकांत जलतारे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी मुख्यालयातील अभियंते, अधिकारी कर्मचारी यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

पाणी बचतीचा संदेश देत ‘मेघदूता’चे सादरीकरण

पुणे, ता. १ – कविश्रेष्ठ कालिदासरचित ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून ‘प्रवेश’ या संस्थेने नाट्यस्वरुपात सादर केला होता.
पाणी हे जीवन आहे. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी ‘मेघदूत’सार‘या नाटकांचे प्रयोग महत्वाचे असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. कोथरुड मतदारसंघात पाणी बचतीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबविण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात केली. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पाण्याचे महत्व सांगून पाणी बचत करण्यासाठी सर्वांनी कटिबध्द होण्याचे आवाहन केले.
इ. स. चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान ‘मेघदूता’ची निर्मिती झाली. नृत्य व संगीत स्वरूपात विविध भाषांमध्ये त्याचे प्रयोग सादर केले गेले. ‘प्रवेश’ संस्थेने पहिल्यांदाच १११ कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ अशा दोन भागात नाटक स्वरूपात सादरीकरण केले.
रामगिरीतील विरह व्याकुळ यक्षाने अलकापुरीला जाऊन आपल्या प्रेयसीला आपले क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची वर्षा ऋतूतील मेघाला केलेली विनंती, या मार्गातील डोंगरदर्‍या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर याचे वर्णन पूर्वमेघात करण्यात आले आणि उत्तरमेघात यक्षाने विरहवण्यात होरपळणार्‍या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केला.
भरत नाट्यम व कथक अशी मिश्र नृत्य शैली आणि सारंगी, सतार, सरोद, तबला, पखवाज अशा केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर हे या नाटकाचे एक वैशिष्ट्य होते. प्रथम पटवारी यांनी लेखन केले असून, निखिल शेटे निर्माता व दिग्दर्शक आहे. जयदीप वैद्य आणि शमिका भिडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रसिकांनी या प्रयोगाला मोठी गर्दी केली होती.

सर्वांना हक्काचे घर देण्यासाठी कटिबद्ध : पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : सर्वांना  हक्काच घर मिळवून देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे.  झोपडपट्टी पुनर्वसन योजना सर्वाना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आहे. या योजनेत काही तांत्रिक अडचणी असल्यास येणाऱ्या काळात त्या नक्कीच दूर करू अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. कोंढवा येथील कमेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमीपूजन समारंभावेळी ते बोलत होते.

 

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, शिक्षण तज्ञ पी.ए इनामदार, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक हाजीभाई पठाण,हाजी गफूर शेख,नंदा लोणकर,आरती बाबर,कलिंदी पुंडे,स्थायी समितीचे माजी सभापती रशीद शेख,झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी पांडुरंग पोळे,उद्योजक कृष्ण कुमार गोयल, विकसक रोहित जोशी, विनीत गोयल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, १२ वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली. मात्र या योजने अंतर्गत फक्त १८  हजार घर बांधण्यात आली आहेत. हे प्रमाण अत्यल्प असून निराशाजनक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काच घर मिळवून देण्याचे स्वप्न  पहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्हीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. झोपडपट्टी वासीयांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी एसआरए सारख्या योजना राज्य सरकारच्यावतीने राबवल्या जातात. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होऊन सर्व सामान्य लोकांना हक्काचं घर प्राप्त व्हावं यासाठी आमच्या सरकारने नेहमीच प्रयत्न केले आहेत. भविष्यातही या योजनेच्या अंमलबाजावणीमध्ये अडचणी आल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले.

 

झोपडपट्टी पुनर्विकास अधिकारी पांडुरंग पोळ यांनी सर्वाना हक्काची घर मिळून देऊन लवकरात लवकर या योजनेचे अस्तित्व  संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शिक्षण तज्ञ पी.ए इनामदार यांनी हा प्रकल्प पुण्यातला आदर्शवत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोफत लॅसिक आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाचे आयोजन

पुणे-ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो असा विचार करणाऱ्या खूप कमी संस्था, व्यक्ती असतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अंबरीश दरक आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्या संयुक्त परिश्रमांनी आयोजित करण्यात आलेले मोफत लॅसिक आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर!

कै. श्री. बाळकृष्ण दरक आणि कै. वि. भा. पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉ. अंबरीश दरक यांच्या पुढाकारातून हा उपक्रम १० जून ते ३० जून या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या स्थापनेस १२५ वर्षे पूर्ण झाली यानिमित्त १२५ गरजू रुग्णांवर या उपक्रमांतर्गत मोफत लॅसिक आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. चष्म्याचा नंबर घालवणारी लॅसिक शस्त्रक्रिया ही अतिशय खर्चिक आणि गुंतागुंतीची समजण्यात येते परंतु डॉ. अंबरीश दरक यांच्या ‘व्हिजन नेक्स्ट’ या हॉस्पिटल मध्ये या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.

लता मंगेशकर यांच्यावरील ‘स्वरलता’ कॉफी टेबल बुक अमेझॉनवर उपलब्ध

पुणे :
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरील ‘स्वरलता ‘ हे स्पेशल एडिशन कॉफी टेबल बुक आता ‘अमेझॉन’ वर रसिकांना उपलब्ध करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांचे फॅन असलेले पुण्यातील युवक रिदम वाघोलीकर यांनी या कॉफी टेबल बुकची निर्मिती केली आहे. अविनाश गवई  यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून लतादीदींची भाची रचना शहा या पुस्तकाच्या अतिथी संपादक आहेत. एप्रिल महिन्यात या पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर आणि मीना खडीकर यांच्या हस्ते दीदींच्या निवासस्थानी झाले होते. जगात प्रथमच ग्रामोफोनच्या तबकडीच्या आकारात हे पुस्तक छापले गेले असून, त्यात दिलीपकुमार, हरिप्रसाद चौरासिया, बाबासाहेब पुरंदरे, माधुरी दीक्षित, राज ठाकरे अशा विविध क्षेत्रातील ३८ नामवंतांचे लेख आहेत.
अमेझॉन वेबसाईटवर  http://www.amazon.in/dp/B0738QFV1/ref=cm_sw_r_wa_awdo_3C.szbVD926H4 या लिंकवर हे पुस्तक रसिकांसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती रिदम वाघोलीकर यांनी दिली.
या पुस्तकाबद्दल रिदम वाघोलीकर म्हणाले ‘लहानपणापासून पाहिलेले स्वप्न आज पुस्तकाच्या रूपाने पूर्ण झाले आहे. हे कॉफी टेबल बुक म्हणजे लतादीदींना एका फॅन कडून भेट आहे,  हा ठेवा मौल्यवान आहे .’
दस्तुरखुद्द दीदींनी या संग्राह्य कॉफी टेबल बुकवर आशीर्वादपर संदेश लिहिला आहे. ‘मी भारावून गेले आहे आणि फार फार आभारी आहे’ असे त्यांनी या संदेशात लिहिले आहे.
प्रकाशन कार्यक्रमाला रिदम वाघोलीकर यांचे कुटुंबीय सुधीर वाघोलीकर, अनुराधा वाघोलीकर, आशय वाघोलीकर तसेच अविनाश गवई, रचना शाह उपस्थित होते.

गहिवरते कधी… कधी …नगरसचिव कार्यालय …

पुणे-जिथे येतात रुबाबदार आणि जोरात पावले,जिथे होते हजारांपासून ते अब्जावधींच्या विकासकामांच्या फायलींची वर्दळ ,जिथे होतो राजकीय कुरघोड्यांचा आखाडा ..आंदोलनांचा गदारोळ … कार्यकर्त्यांचा आणि भल्याभल्या राजकारण्यांचा असतो जिथे राबता … अशा सर्व गदारोळात ..प्रत्येकाला पाणी ,चहा देण्यासाठी , फायलींची ने आण करण्यासाठी अगदी निस्पृह पणे काही हाथ सदैव राबताना पाहिलंय अनेकांनी .. अशा तब्बल ३२ वर्षे राबणारे काही निस्पृह हाथ आज सेवेतून निवृत्त झाले .
‘निवृत्ती’चा हा गहिवर कदाचित नेहमीच राजकीय वर्दळीत अलगद विरून जातो .
असाच गहिवर आज याच कार्यालयात पुन्हा एकवार दिसून आला .
पुणे महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयातील सेवक भास्कर जाधव आणि सुरेश भोसले आज सेवेतून निवृत्त झाले . त्यांची पावले आज महापालिकेतून बाहेर पडताना निश्चितच जड होत होती …निवृत्तीचा हा गहिवर तसा नेहमीच दिसतो अन पुन्हा राजकीय वर्दळीत विरून जातो .

.त्यांच्या दीर्घकालीन सेवेला  सलाम करीत त्यांचे  निवृत्तीनंतरचे  भावी आयुष्य देखील अशाच कुठल्या तरी चांगल्या सेवेत रममाण होवो ..अशीच इछ्या यावेळी  सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त करीत त्यांचा गौरव केला . त्यांच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा छोटेखानी समारंभ नगरसचिव कार्यालयात 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे .