पुणे-ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो असा विचार करणाऱ्या खूप कमी संस्था, व्यक्ती असतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अंबरीश दरक आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्या संयुक्त परिश्रमांनी आयोजित करण्यात आलेले मोफत लॅसिक आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर!
कै. श्री. बाळकृष्ण दरक आणि कै. वि. भा. पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉ. अंबरीश दरक यांच्या पुढाकारातून हा उपक्रम १० जून ते ३० जून या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या स्थापनेस १२५ वर्षे पूर्ण झाली यानिमित्त १२५ गरजू रुग्णांवर या उपक्रमांतर्गत मोफत लॅसिक आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. चष्म्याचा नंबर घालवणारी लॅसिक शस्त्रक्रिया ही अतिशय खर्चिक आणि गुंतागुंतीची समजण्यात येते परंतु डॉ. अंबरीश दरक यांच्या ‘व्हिजन नेक्स्ट’ या हॉस्पिटल मध्ये या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.