कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत शिक्षेची मागणी – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मूक मोर्चा
पालकमंत्र्यांचा ‘लक्ष अंत्योदयचा’ नारा – मतदार संघातील कार्यकर्त्यांशी अनौपचारिक गप्पा
पुणे : लोकांनी तुम्हाला त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजनांचा अभ्यास करून या योजना सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी राबवाव्यात. लोककल्याणासाठी तुम्ही कार्यरत राहिला तर जनताही तुम्हाला विसरत नाही. असा कानमंत्र देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या आजवरच्या राजकीय जीवनातील यशस्वी वाटचालीचे गमक उलगडले. आज कसबा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या व त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, योगेश समेळ,धीरज घाटे, अजय खेडेकर,आरती कोंढरे,सुलोचना कोंढरे, हेमंत रासने, सुहास कुलकर्णी, दिलीप काळोखे, सम्राट थोरात यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, निवडणुका ही एक लढाई आहे. ती लढाई आपण लढू तसेच जिंकूही पण येत्या दोन वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे पक्षबांधणीच्या दृष्टीने येणारी दोन वर्ष महत्वाची आहेत. येत्या निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांकडे पाहून लोकांनी मते दिली पाहिजेत. यासाठी या लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवला पाहिजे. पक्ष आणि पक्षसंघटनेला प्राधान्य देऊन पक्षाने ठरवून दिलेल्या ध्येय धोरणाप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकांसाठी कार्यक्रम राबवा अशा सूचना ही त्यांनी यावेळी केल्या. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे . त्यांनी लोकांच्यात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात संपर्क कार्यालय सुरु करावे. दैनंदिन कामाचे नियोजन करून दिवसातील काही वेळ या संपर्क कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी देत आपल्या राजकीय यशाच गमक केल्या.
आजपर्यंत पक्षाला जे यश मिळाले ते कार्यकर्त्यांमुळे मिळाले आहे. गेले अनेक महिने निवडणुकांची लगबग सुरु असल्याने कार्यकर्त्यांशी बोलता आले नव्हते. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ही बैठक बोलवली होती. विधनासभा, लोकसभा तसेच महानगर पालिकेच्या निवडणुकीत लोकांनी विश्वास ठेवून भाजपला भरभरून प्रेम दिले. लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वास सार्थ करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही आपापले मतभेद विसरून सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले पाहिजे. असेही ते म्हणाले.
गणेशोत्सवाचे जनक कोण ? महापौर आणि माजी महापौरांमध्ये कलगीतुरा ..(व्हिडीओ)
पुणे- सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकच आहेत. त्याविषयीचे संदर्भ ‘श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट’नेच तपासून पहावेत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.तर गणेशोत्सवाचे जनक हे भाऊसाहेब रंगारी हेच आहेत असा दावा करीत खोटा इतिहास मांडू नये असे आवाहन माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केल्याने गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून आता पालिकेतही कलगीतुरा रंगणार आहे हे स्पष्ट झाले आहे . दरम्यान शिवसेनेचे संजय भोसले यांनी मात्र आपल्याला जनक कोण यापेक्षा गणेश उत्सव कसा चांगला होईल यात रस असल्याचे म्हटले आहे तर कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांनी मात्र उत्सवाच्या बोध चिन्हावर टिळकांबरोबर भाऊसाहेब रंगारी यांचाही फोटो लावावा अशी सामोपचाराची भूमिका घेणारी मागणी महापौरांकडे केली आहे .
भाऊ रंगारींनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचे अनेक दाखले आहेत. याशिवाय राज्यसरकारनेही ते मान्य करून त्या विषयीचा अहवाल दिला आहे, असे असताना सार्वजनिक गणेशोत्सवाला मागील वर्षीच 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा 125 वे वर्ष साजरे करण्याचे काहीच कारण नाही, असा युक्तीवाद करत महापौरांनीच हा वाद उकरून काढल्याचा आरोप ‘श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट’चे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता आणि खजिनदार अनंत कुसुरकर यांनी केला होता.
या संदर्भात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना आणि महापौरांनाही पत्र दिले आहे. तावडे यांना ट्विटरवरून, इमेलद्वारे कळवले आहे. तसेच मागील वर्षी आणि यावर्षी देखील या संबंधीचे सर्व पुरावे दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारनेच या संबंधीचे पत्र दिले आहे आणि सरकारच आता 125 वे वर्ष साजरे करत आहे आणि त्यासाठी तरतूद केली आहे. जर सरकारने स्वत: दिलेले पत्र खोटे असेल तर सरकारनेच स्वत: चुकल्याचे सांगावे, अशी या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
मात्र, महापौरांनी हा विषय मान्य केला नाही. ज. स. करंदीकर यांनी टिळकांवरील लिहिलेल्या पुस्तकातही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचा संदर्भ आहे. इंग्रजी शिक्षण आणि बोलण्यात शिथिलता येत असल्याचे लक्षात आल्याने ती घालवण्यासाठी धर्माचा आधार घेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे महापौर म्हणाल्या.
द रिअल हिरो कथा समृद्धीच्या कार्यक्रमात अॅड. उज्ज्वल निकम
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रवास उलगडणारा द रिअल हिरो कथा समृद्धीच्या हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर नुकताच सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची निर्मिती व सूत्रसंचालन अशी दुहेरी जबाबदारी अॅड. समृद्धी पोरे यांनी सांभाळली असून कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. आता दुसऱ्या भागात प्रख्यात कायदेतज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांचा धाडसी प्रवास उलगडणार आहे.
अॅड. उज्ज्वल निकम यांचा आजवरचा प्रवास, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांनी लढवलेले खटले अशा नानाविध गोष्टींचा पट या मुलाखती दरम्यान उलगडणार आहे. उज्ज्वल निकम यांच्या पोतडीतील समृद्ध अनुभवांचा खजिना जाणून घ्यायचा असेल तर रविवार १६ जुलैला सकाळी ११.३० वा. प्रसारित होणारा हा कार्यक्रम अवश्य पाहा.
भैय्यू महाराजांनी काळिमा फासणारे काम करू नये– संभाजी ब्रिगेड
पुणे-कोपर्डीतील हत्याकांड अमानवी आहे. कोपर्डी प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. परंतु आता कथित संत भैय्यू महाराज कोपर्डीत पीडितेचे स्मारक उभे करत आहे. परंतु स्मारके हे शौर्याचे व पराक्रमाची आठवण करून देणारी असतात. कोपर्डीत जे घडले ते पाहून प्रत्येक माणसाची मान शरमेने खाली गेली आहे. म्हणून अशा प्रसंगाचे स्मारक उभारून माणुसकीला काळीमा फासण्याचे काम भैय्यू महाराज यांनी करू नये, असे सांगत कोपर्डीत निर्भयाच्या उभारल्या जाणा-या स्मारकाचा संभाजी ब्रिगेडने तीव्र निषेध केला.
कोपर्डी घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. घटनेच्या निषेधार्थ व निर्भयाच्या त्यागाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने झाशीची राणी चौक, बालगंधर्व येथे श्रद्धांजली सभा व कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी एक ज्योती निर्भयासाठी… म्हणत कँडल पेटवून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, सुरेखा जुजगर, संजय चव्हाण, सचिन कदम, मयूर शिरोळे, महाडिक, अक्षय शिंदे, तन्मय गोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी कोपर्डीत स्मारक बांधून कुणासाठी आदर्श निर्माण करायचा आहे…? हे तपासले पाहिजे. याला चळवळीतील कार्यकर्ता व जागृत व्यक्ती म्हणून तीव्र विरोध करण्यात आला. जिजाऊ, सावित्री, अहिल्याच्या महाराष्ट्रात ‘स्त्री स्वातंत्र्याला’ मिळणारा सन्मान हा या सध्याच्या वासनांध व विकृत घटनेने मोडकळीस आलेला आहे. विकृत पुरुषी मानसिकता ठेचून काढली पाहिजे. हे या घटनेने दाखवून दिले. म्हणून अशा नराधमांना तात्काळ फाशीच दिली पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शासन करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, वर्ष झाले, या विरोधात लाखोचे मोर्चे महाराष्ट्रभर निघाले परंतु सरकारवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. याचाही संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध करण्यात आला.
महापालिकेचे ३०० कोटी हडपण्याचा डाव (व्हिडीओ)
पुणे- पुण्याला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली … काढल्या गेलेल्या १७०० कोटीच्या टेंडर प्रक्रियेत ३०० कोटीचा घोटाळा करण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात रिंग झाल्याचा आरोप आज महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील यांनी संयुक्त रित्या केला आहे .
या प्रकाराबद्दल आपण पूर्वी हि जाहीरपणे हे घोटाळे होत असल्याचे सांगूनही त्यात काहीही फरक न होता .. टेंडर प्रक्रिया राबविली जाते आहे असे सांगून शिंदे यांनी तसेच तुपे पाटील यांनी ,’ आता पारदर्शक कारभाराची शपथ आणि हवाला देणारे मुख्यमंत्री यात लक्ष घालून कारवाई करतील काय ? असा सवाल केला आहे …. पहा नेमके ते काय म्हणाले ….
पुणेकर चुपचाप महिनाभरापासून पिताहेत माचकट पाणी ..(व्हिडीओ)
पुणे- धरणातला पाणी साठा काही अगदीच तळांवर ठेपलेला नाही , गढूळ पाणी येत नाही , मग माचकट,वेगळ्या चवीचे,वासाचे पाणी पुणेकरांना गेली महिनाभर पाजले जाते आहे ? ते कसे ? नेमके या मागे दडले आहे काही रहस्य ? कोणी घेणार आहे याचा शोध ? याबाबत आज महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांच्या साधलेला हा संवाद पहा आणि ऐका …
तळजाई वरील ‘पोरस ब्लॉक’ ने बनविलेल्या जॉगिंग ट्रॅकचे उद्घाटन
पुणे- शहराचा विस्तार जसा वाढत आहे त्याच प्रमाणात सिमेंटचे जंगल वाढत आहे. शहरातील रस्ते देखील सिमेंटचे झाले आहेत. यामुळे पाणी जमिनीत झिरपणे कमी झाल्याने शहरातील पाण्याची पातळी खालावत आहे. यावर उपाय म्हणून पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी जमिनीत झिरपण्याच्या उद्देशाने आता रस्त्यालगत ‘पोरस ब्लॉक’ बसविण्याचा प्रयोग पुणे महापालिका प्रशासनाने पुण्याचे फुफुस म्हणून गणल्या जाणाऱ्या तळजाई पठारावर केला आहे.याद्वारे केलेल्या विशेष जॉगिंग ट्रॅकचे १४ जुलै रोजी नगरसेवक सुभाष जगताप हे उद्घाटन करणार आहेत . तळजाई वर चालण्याचा व्यायाम करायला येणाऱ्या एका सदस्याकडून म्हणजे तळजाई भ्रमण मंडळाच्या सदस्याकडून हे उद्घाटन करण्यात येणार आहे . मात्र याच वेळी तळजाई चा रस्ता हा रायडींग ट्रॅक बनू नये याची दक्षता घेण्यात यावी अशी मह्ग्नी येथे फिरायला येणाऱ्या मंडळीकडून होते आहे . तळजाई विकासाच्या नावाखाली जंगलाचे काँक्रिटीकरण,टेकडी फोड होऊ नये . येथे अनेक उनाड मुले भरधाव वेगाने वाहने पळवत असतात , अशा तक्रारीकडे स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे .
पुणे शहर हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे शहर झाले आहे. शहरातील मोकळी मैदाने, टेकड्या, झाडांची संख्या गेल्या काही वर्षात घटली आहे. यामुळे शहरातील पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. यातच पुणे परिसरातील नव्याने पाचशेहून अधिक किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात अली आहे. या रस्त्यांमुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचतात. यामुळे नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो तसेच रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघाताच्या घटनाही घडतात.
या सर्वांवर उपाय म्हणून पोरस ब्लॉक’चा पर्याय निवडण्यात आला आहे. याचा पहिला प्रयोग तळजाई टेकडी येथे करण्यात आला आहे. त्याठिकाणी हे पोरस ब्लॉक बसवण्यात आले असून पुढील काही महिने यावर अध्ययन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील विविध भागात हे ब्लॉक्स बसवण्याचा महापालिकेचा मानस आहे.
५ हजार झाडे लावण्याचा शुभारंभ एमआयटी एटीडी व युवराज मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपण
विश्वराज हॉस्पिटलतर्फे ट्रॅफिक पोलिसांना रेनकोट वाटप
पुणे- २४ तास जनतेची तत्पर सेवा व सर्व सामान्यसाठी दिवस-रात्र पावसात सुरक्षेसाठी तैनात असलेल्यालोणी काळभोर क्षेत्रातील सर्व पोलीस व ट्रॅफिक पोलिस यांना एमआयटी विश्वराज हॉस्पिटलतर्फे रेनकोट वाटप करण्यात आले. या वेळी लोणी काळभोरचे पीएसआय बी. आर .पाटील व विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. आशिषकुमार दोषी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारेे असा विश्वराज हॉस्पिटलचा नावलौकिक आहे. सोलापूर हायवेलगत असलेल्या विश्वराज मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख हॉस्पिटल या पुरस्कारानने गौरविण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक महिन्यात सर्वांसाठी २-३ मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे आईला कन्यारत्न प्राप्त झाल्यास नॉर्मल व सिझेरिअर बिलावर ५० टक्के सवलत दिली जाते. तसेच सी.टी. स्कॅन, एक्स-रे, सर्व प्रकारच्या लॅब तपासण्या माफक दारात केल्या जातात.
विश्वराज मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल हे पूर्व हवेलीतील सर्वात मोठे अत्याधुनिक ६५ बेडचे, अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक १० सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक कॅथलॅब, डायलिसिस विभाग, कार्डियाक, अॅम्ब्यूलन्स, औषधे, अग्रगण्य तज्ज्ञ डॉक्टर या सर्व सुविधांनी युक्त असे हे हॉस्पिटल आहे.
अॅक्सिस बँकेची इंटर अमेरिकन इव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (आयआयसी) बरोबर भागीदारी
- भारतातील बँकांमध्ये अशा प्रकारे पहिलीच भागीदारी
- आय़आयसी, इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँक (आयडीबी) ग्रूपचे सदस्य, ही लॅटिन अमेरिका आणि कॅरिबानमधील डेव्हलपमेंट वित्तीय स्रोतातील अग्रणी कंपनी आहे.
मुंबई, जुलै १२, २०१७ : अॅक्सिस बँक, या भारतातील खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठ्या बँकेने, इंटर-अमेरिकन कॉर्पोरेशन (आयआयसी)बरोबर संलग्नितपणे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबानबरोबर व्यापारी सुविधा देण्यासाठी भागीदारी जाहीर केली आहे. अॅक्सिस बँक ही पहिली भारतीय बँक आहे, जी ट्रेड फायनान्स फॅसिलिटेशन प्रोग्रॅम (टीएफएफपी)ला पुष्टीकरण देणारी बँक आहे.
आयआयसी आयडीबीच्या वतीने, प्रदेशातील सर्वात प्रामाणिक बँकेसारखी कृती करत आहे. खासगी क्षेत्राचा अनुभव एकत्रित घेण्याची क्षमता असल्यास मूल्य मिळतात, याबरोबर तज्ज्ञांचे ज्ञान आणि खासगी क्षेत्राची क्षमताही कामी येते.
लॅटिन अमेरिका, गेल्या काही दशकांपासून भारतातील आय़ात-निर्यातीच्या बाजारपेठेत उत्कर्ष करत आहे आणि आफ्रिका खंडातही ती इतर विकास करत आहे. या दोहोंतील व्यापारी संबंधांत वाढ व्हावी आणि एकूणच अर्थयंत्रणांसाठी त्यांच्या क्षमता गृहित धरल्या जाव्यात, याबरोबर द्विपक्षीय व्यापारी संबंध सुलभ व्यवहारांमुळे पुढे जावेत, असे या भागीदारीचे ध्येय आहे.
याविषयी अॅक्सिस बँकेते कॉर्पोरेट बँकिंग आणि ट्रान्झॅक्शन बँकिंग ग्रूपचे कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ राठ म्हणाले की, “लॅटिन अमेरिकेतील आयआयसीबरोबरील आमची भागीदारी जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या भागीदारीमुळे या प्रदेशातील आमच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे सबलीकरण होणार आहे. परदेशात आमच्या ट्रेड फायनान्सिंगचा विकास होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही ग्राहकांना अधिक चांगली सेवा देऊ याकडे आणखी एक पाऊल टाकणार आहोत. तसेच या भागीदारीमुळे भारत आणि दक्षिण अमेरिका खंडातील व्यापारी संबंधांना चालना मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.’’
अॅक्सिस बँकेबद्दल थोडेसे
अॅक्सिस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. अॅक्सिस बँक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट, एसएमई, शेती आणि रिटेल व्यवसाय यातील ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा देते.
बँकेच्या देशभरात 3,304 देशांतर्गत बँक शाखा (एक्सटेन्शन काउंटरसहित) आणि 14,163 एटीएम आहेत, 31 मार्च 2017पर्यंत अॅक्सिस बँकेचे नेटवर्क 1,946 शहरे आणि नगरे येथे पसरलेले आहे, उत्पादने आणि सेवा यांची विविध श्रेणी यांच्यासह बँक मोठ्या प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोचली आहे. याशिवाय बँकेची सिंगापूर, हाँग काँग, दुबई (डीआयएफसी), शांघाई आणि कोलंबो आदी नऊ ठिकाणी कार्यालये आहेत, शिवाय दुबई, अबु धाबी आणि ढाका येथे प्रतिनिधी कार्यालये आहेत, आणि लंडन आणि यूके येथे परकीय उपकंपन्याही आहेत. बँकेच्या विविध उत्पादने आणि सेवांबद्दल www.axisbank.com या वेबसाईटवर तपशीलात माहिती उपलब्ध आहे.
इंटर-अमेरिकन इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (आयआयसी)बद्दल
इंटर-अमेरिकन इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (आयआयसी) ही इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँक ग्रूप (आयडीबी ग्रूप)ची सदस्य असून, ही एक मल्टिलॅटरल डेव्हलपमेंट बँक लॅटिन अमेरिका आणि कॅरिबानमधील खासगी क्षेत्राला पाठिंबा देते. आयआयसी फायनान्सेस सस्टेनेबल एंटरप्राइजेस आणि प्रकल्प वित्तीय प्रमाण प्राप्त करते, ज्यामुळे प्रदेशातील जास्तीत जास्त सामाजिक आणि पर्यावरणीय विकास शक्य होतो. सध्या व्यवस्थापनाअंतर्गत 11 अब्ज यूएस डॉलर्सचा पोर्टफोलिओ असून, 21 देशांमध्ये 350 ग्राहक आहेत, आयआयसी संपूर्ण क्षेत्रभर नावीन्यपूर्ण वित्तीय उपाययोजना आणि सल्लागार सेवा पुरवतात, यामुळे ग्राहकांच्या गरजांची पूर्ती होण्यास मदत होते.
टीएफएफपीबद्दल
द ट्रेड फायनान्स फॅसिलिटेशन प्रोग्रॅम (टीएफएफपी) लॅटिन अमेरिका आणि कॅरिबान (एलएसी) बँकांना पाठिंबा देते, यामुळे गँरेंटी, कर्ज, सल्ला सेवा आणि माहिती उत्पादने आंतरराष्ट्रीय व्यापारी बाजारपेठांना उपलब्ध होतात. उपक्रमामुळे प्रदेशातील विकासाला आणि आर्थिक विकासाला चालना मिळते, विस्तार आणि व्यापाऱ्यातील स्रोतांची विविधता यामुळे एलएसी बँकांना वित्त उपलब्ध होते आणि बाजारपेठांतील अस्थिरतेच्या काळात लिक्विडिटीची खात्री देता येते.
31 डिसेंबर 2016पर्यंत टीएफएफपीमध्ये 104 लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबान फानान्शिअल इंटरमेडिअरिजचा 21 एलएसी देशांमध्ये समावेश आहे.
खाद्यजगत खूप मोठे ,सतत शिकणे हाच यशाचा मंत्र ! -विष्णू मनोहर
‘फुलपाखरू’चा नायक बनला गायक!!!
मालिकेतील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या प्रयत्नात असतात. कोणी दिग्दर्शन, छायांकन तर कोणी फोटोग्राफी किंवा चित्र काढून अभिनयाव्यतिरिक्त असणारे कलागुण जोपासत असतात. असाच एक नवीन गुण प्रेक्षकांसमोर आणला आहे झी युवाच्या ‘फुलपाखरू’ मालिकेतील मानस म्हणजेच यशोमान आपटे याने. अभिनयासोबतच आता स्वतःच्या मालिकेसाठी एक गाणं गात गायक यशोमान प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मालिकेत मानस-वैदेही यांच्यासाठी एक रोमँटिक गाणं कंपोज केलं असून यशोमानने स्वतःसाठी प्लेबॅक केलं आहे. सिनेमात अनेकदा हिरोने स्वतःसाठी प्लेबॅक केल्याचं आपण बघितलं आहे. पण मालिकेसाठी मात्र असं अपवादानेच घडतं.
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यशोमान आपटेने आपली छाप पाडली आहेच. डहाणूकर कॉलेजमधून बीकॉम झालेल्या यशोमानने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली दखल घ्यायला भाग पडले आहे. झी युवा वाहिनीने या युवा टॅलेंटला हेरून आपल्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आणले. सध्या ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. यशोमान साकारत मानस या तरुणाईच्या मनात घर केले आहे . झी युवामुळे यशोमानच्या सोशल मीडिया फॅन फॉलोअर्समध्येही कमालीची वाढ झालीय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे यशोमनने काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत शूट होणाऱ्या एका गाण्यासाठी गायचं ठरवलं. गायिका कीर्ती किल्लेदारसोबत गाण्याची संधी यशोमानला मिळाली. विशाल-जगदीश या संगीतकार जोडीने गाणं संगीतबद्ध केलं आहे. यशोमानचा गाण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल यशोमान म्हणाला, ‘मला गाणी ऐकायला आणि गुणगुणायला आवडतात. पण असा प्रयत्न आपण कधी करू शकतो असं वाटलं नव्हतं. मला प्रयोगशील राहायला आवडतं. त्यामुळे गाण्याचा हा देखील प्रयत्न मी करून पहिला. यासाठी मला माझी सहगायिका कीर्ती किल्लेदारची खूप मदत झाली. तिने माझ्याकडून गाऊन घेतलं असंच मी म्हणेन.’
मुलीला जन्म दिलेल्या मातांचा रुग्णालयातच सन्मान
पुणे- शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील प्रसूती वॉर्डमध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलीला व तिच्या आईचा औषधांचा खर्च व त्या लहान मुलीला कपडे भेट देउन असा सामाजिक उपक्रम राबवला.या सामाजिक उपक्रमातून ” बेटी पढाओ,बेटी बचाव” हा सामाजिक संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास विक्रम जाधव, चेतन शिवले, विकी वाघे, ऋषभ वाळुजंकर, अजय पवार,रोहित थोरात,विराज काकडे, निरंजन म्हेत्रे,आदित्य यादव,यश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजक पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे उपाध्यक्ष विशाल मोरे यांनी केले होते .
मला काहीच प्रॉब्लेम नाही – साठी स्पृहा ची बॅटींग…
फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित मला काहीच प्रॉब्लेम नाहीया ११ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात
प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशन्सला आता सुरूवात झाली आहे. भविष्याच्या मागे धावता धावता
आपण वर्तमानात जगायचंच विसरतो याची जाणीव करून देण्यासाठी वेळात वेळ काढून स्पृहा आणि
गश्मीर समवेत ;मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटाच्या संपूर्ण टीम ने त्यांच्या छोट्या तनय म्हणजेच
आरश गोडबोले याच्या इच्छेखातर नागपूर पँथर्स विरुद्ध कोकण वॉरिअर्स अशी जोमदार क्रिकेटची मॅच
खेळवली.
नागपूर पँथर्स विरुद्ध कोकण वॉरिअर्स नावातूनच नागपूर विरुद्ध कोकण असा सामना रंगलेला होता
हे कळतं. असं का बरं असावं? तर त्याच कारण म्हणजे, मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणतं असलेला
अजय म्हणजेच गश्मीर नागपूर चा तर केतकी म्हणजेच स्पृहा कोकणची असल्यामुळे ते आपापल्या
परिवारासह आपल्या गावांना प्रतिनिधित्व करत होते. एकीकडे विजय निकम, स्नेहलता वसईकर,
साहील कोपर्डे, करण भोसले यांची गश्मीरला तगडी साथ होती तर दुसरीकडे सीमा देशमुख, सुरभी
हेमंत, आरश गोडबोलेच नव्हे तर चित्रपटाचे निर्माते रवि सिंग आणि रिचा सिन्हा यांचा स्पृहावर गाढ
विश्वास. स्पृहाच्या कोकण वॉरिअर्सला सपोर्ट करत मास्टर आरशने टॉस केला. गश्मीर ने टॉस जिंकून
पहिली बॅटिंग घेऊन ६ ओव्हर्स मध्ये ८६ धावा काढल्या. तर पूर्णपणे आत्मविश्वासाच्या बळावर खेळत
असलेल्या स्पृहाने ३ वेळा आऊट होऊन, गश्मीरच्या बॉलिंगने जखमी होऊन देखील ६ ओव्हर्स मध्ये
तब्बल ३८ धावा घेत आपल्या टीमला पुढच्या मॅच मध्ये आपणच जिंकणार असल्याचं आश्वासन दिलं.
ह्या सर्वांत घडलेली मजेशीर गोष्ट म्हणजे मॅचच्या सुरूवातीला आईला सपोर्ट करणारा त्यांचा छोटा
तनय म्हणजेच आरश गोडबोलेने मॅच च्या अखेरीस स्वतःची टीम बदलून तो बाबांच्या टीम मध्ये
गेला.


