विश्‍वराज हॉस्पिटलतर्फे ट्रॅफिक पोलिसांना रेनकोट वाटप

Date:

पुणे- २४ तास जनतेची तत्पर सेवा व सर्व सामान्यसाठी दिवस-रात्र पावसात सुरक्षेसाठी तैनात असलेल्यालोणी काळभोर क्षेत्रातील सर्व पोलीस व ट्रॅफिक पोलिस यांना एमआयटी विश्‍वराज हॉस्पिटलतर्फे रेनकोट वाटप करण्यात आले. या वेळी लोणी काळभोरचे पीएसआय बी. आर .पाटील व विश्‍वराज हॉस्पिटलचे डॉ. आशिषकुमार दोषी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारेे असा विश्‍वराज हॉस्पिटलचा नावलौकिक आहे. सोलापूर हायवेलगत असलेल्या विश्‍वराज मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख हॉस्पिटल या पुरस्कारानने गौरविण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक महिन्यात सर्वांसाठी २-३ मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे आईला कन्यारत्न प्राप्त झाल्यास नॉर्मल व सिझेरिअर बिलावर ५० टक्के सवलत दिली जाते. तसेच सी.टी. स्कॅन, एक्स-रे, सर्व प्रकारच्या लॅब तपासण्या माफक दारात केल्या जातात.
विश्‍वराज मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल हे पूर्व हवेलीतील सर्वात मोठे अत्याधुनिक ६५ बेडचे, अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक १० सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक कॅथलॅब, डायलिसिस विभाग, कार्डियाक, अ‍ॅम्ब्यूलन्स, औषधे, अग्रगण्य तज्ज्ञ डॉक्टर या सर्व सुविधांनी युक्त असे हे हॉस्पिटल आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...