Home Blog Page 3297

मुद्रा योजना तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे :  मुद्रा योजना जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. गरजूंना या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर या योजनेचा प्रसार तळागाळा पर्यंत झाला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करा . अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके , आरबीआयचे बी.एम.कोरी, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री पठारे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्री देशमुख ,  उद्योग प्रतिनिधी श्री पानसरे, बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक कदम, उपजिल्हाधिकारी उदय भोसले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, मुद्रा योजना राबवण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. याबद्दल आम्हा लोकप्रतिनिधीना अभिमान वाटतो. बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी  भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. या योजने अंतर्गत आता १० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. मात्र अजूनही या योजनेचा लाभ शेवटच्या गरजूपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनेचा फायदा पोहचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून काम केले पाहिजे.  यामुळे  योजनेचा प्रसार होवून अधिकाधिक लोकांना याचा लाभ होवून या योजनेचा हेतू सफल होईल.

मुद्राचे कर्ज घेण्यासाठी आलेल्यांना त्रास न देता सहकार्य करा.  त्यासाठी व्यावहारिकपणे विचार न करता भावनिक होऊन विचार करा. तसेच जास्ती जास्त लोकांनी हे कर्ज परत करावे यासाठी त्यांचे  प्रबोधन करा. अशा सूचना ही श्री बापट यांनी  बँक अधिकाऱ्यांना दिल्या.  मुद्रा योजना राबवण्यात पुणे जिल्हा देशात अग्रेसर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांनी मरगळ झटकून कामात गतिमानता आणण्याच्या सूचना बँक अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

तोतया कर्मचाऱ्याला कोणाकोणाचे का अभय …?

0

पुणे- महापालिकेतील मिळकत कर विभागातील नागरी सुविधा केंद्रात  रंगेहाथ पकडला गेलेला तोतया गुन्हा दाखल होवून महिना उलटला तरी  अद्यापही पोलिसांना दाद देत नसून या मागे त्याचे साथीदार असलेले पालिकेतील साथीदार आणि मूळ सूत्रधार यांचाच हाथ असल्याचा आरोप होतो आहे . १९ जुलै रोजी हा तोतया मायमराठी च्या सहाय्याने कॉंग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे , अविनाश बागवे यांनी रंगेहाथ पकडला होता. विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी या कारवाईबद्दल संपूर्ण टीम चे अभिनंदन केले होते . तर दुसऱ्या दिवशी २० जुलै ला महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखला करण्याचे आदेश दिले होते .
आज त्या घटनेला महिना होत आहे . पण या तोतया ला अटक झालेली नाही अगर त्याचा साधा जबाब हि पोलिसांनी घेतलेला नाही . या उलट हा तोतया ज्यांच्या सहवासात काम करत होता त्या महापालिका कर्मचाऱ्यांचे जबाब मात्र पोलिसांनी घेतले आहेत . आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर चक्क १५ दिवसांनी आरोपीने रोख रकमेचा अटकपूर्व जामीन घेतला आहे . त्यानंतर आता येत्या रविवारी त्याचा जबाब पोलीस घेणार आहेत .  तपासाची हि पद्धतच बोलकी आहे,
दरम्यान या प्रकरणानंतरज्याठिकाणी हा तोतया पकडला गेला त्या कार्यालातील खुद्द फिर्यादी असलेले प्रशासन अधिकारी गिरीश पत्की, तसेच दयानंद सोनकांबळे ,वैभव कडलग या सर्वांची बदली करून प्रशासनाने मोठा हादरा दिला आहे . या सर्वांच्या बदलीमागे त्यांची इथे 3 वर्षांची सेवा झाल्याचे कारण देण्यात येते आहे . एवढेच नाही तर याच नागरी सुविधा केंद्रातील अन्य 2 महिला आणि काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . यातील काहींच्या बदल्या ९ महिन्यापूर्वीच आरोग्य खात्यात झाल्या होत्या . मात्र बदल्या होवूनही हे बदलीच्या ठिकाणी रुजू न होता बिनपगारी येथे काम करीत होते .मात्र या प्रकरणानंतर तातडीने त्यांनी बदलीच्या ठिकाणी धाव घेतली.
पोलिसांनी अशाच कर्मचाऱ्यांचे जबाब घेवून आरोपीला सहाय्य होईल असे काम सुरु ठेवल्याचा आरोप होतो आहे . गुन्हा दाखल होवूनही १५ दिवस आरोपीला पकडले जात नाही .रंगेहाथ पकडूनही आरोपीला थेट महापालिका प्रशासन  पोलिसांच्या ताब्यात देत नाही. गुन्हा दाखल होवून महिना उलटला तरी आरोपीचा जबाब सुद्धा पोलीस घेवू शकलेले नाहीत . ज्या खात्यात आरोपी पकडला त्या खात्यातील प्रमुखांचा जबाब पोलिसांनी घेतला नाही .या सर्व बाबींमागे पोलिसांची निष्क्रियता आहे कि महापालिकेतील आणि पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या तथाकथित संगनमताचा दबाव आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे .
दरम्यान महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकारी विलास कानडे, तसेच तुषार दौंडकर अशा अधिकाऱ्यांची एक समिती नेमली असून या समितीने अद्याप याप्रकरणी केलेल्या चौकशीची माहिती जाहीर केलेली नाही .

‘एज्यु-सोशिओ कनेक्ट इनिशिएटिव्ह (२०१७)’अंतर्गत पोलिसांचा सत्कार

0

पुणे, : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ने पोलिस, सशस्त्र दले, वीर नारी व वीर पुरुष यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी गेल्या महिन्यात ‘एज्यु-सोशिओ कनेक्ट इनिशिएटिव्ह (२०१७)’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. हा पुढाकार पुढील टप्प्यात नेण्याचा एक भाग म्हणून ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या (एसएनएस) इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी नुकतीच पुण्यातील पोलिसांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजीनगरमधील पोलिस ग्राऊंडवर जाऊन विद्यार्थ्यांनी महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण बघितले आणि त्यांचा सत्कार केला. प्रशिक्षण सत्रादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांची शिस्त आणि समन्वय पाहून हे विद्यार्थी भारावून गेले.

 

वैभवी राऊत या विद्यार्थिनीने मराठीत प्रास्ताविक करुन सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. हा कार्यक्रम कशासंदर्भात आहे, याची माहिती उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी पुरुष पोलिसांना राखी बांधली तर विद्यार्थ्यांनी महिला पोलिसांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. सर्व विद्यार्थ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’मध्ये सुरु असणाऱ्या अल्पकालीन कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देऊ करणारी पत्रे यावेळी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी आपली शैक्षणिक व कौशल्यात्मक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या हेतूने त्यांच्या पसंतीचा यापैकी कोणताही अभ्यासक्रम निवडावा, असे प्रोत्साहनही देण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या समाप्तीस ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांनी पोलिसांची आपल्या समाजातील भूमिका विद्यार्थ्यांना विशद केली. पोलिसांनी नागरिकांच्या कल्याणासाठी घालून दिलेल्या नियमांचे आपण पालन करणे महत्त्वाचे आहे, या मुद्यावर त्यांनी भर दिला.

 

या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल, तसेच सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल पोलिस प्रमुख व अन्य कर्मचाऱ्यांचे पियूष बॅनर्जी याने आभार मानले. डॉ. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांसाठी हा आगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवती आघाडीच्या पुणे शहरामधील पहिल्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण

0

पुणे-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवती आघाडीच्या पुणे शहरामधील पहिल्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण  पुणे कॅन्टोन्मेंट भागात संत नामदेव चौकात महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर , प्रदेश सचिव प्रियांका मेदनकर , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे , नगरसेवक सुशील मेंगडे , पुणे शहर चिटणीस गणेश घोष ,पुणे शहर युवती आघाडी पुणे शहर प्रमुख डॉ. सायली कुलकर्णी ,पुणे कॅन्टोन्मेंट युवती आघाडी प्रमुख कांचन गायकवाड , पिंपरी चिंचवड प्रमुख तेजस्विनी दुर्गे ,  नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेविका प्रियांका श्रीगिरी , नगरसेविका डॉ. किरण मंत्री , माधुरी गिरमकर , दिनेश नायकू , संतोष इंदूरकर , किरण क्षीरसागर व मेघराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे संयोजन सांची किशोर सिंगवी ,  गुणवंती कोठारी , कला सिंगवी , निलम सुराणा , वैष्णवी काटकर , पूजा काटकर , सुमित्रा राजगुरू , पूनम कांबळे , कांचन कांबळे , पुनीत जोशी , प्रतिक देसरडा यांनी केले होते .

या कार्यक्रमामध्ये  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले कि , महाराष्ट्रात दहा हजार शाखा उघडण्याचे उद्दिष्ट असून त्यामधील आठ हजार शाखाचे उदघाटन झाले आहे . उरलेल्या शाखा आगामी काळात उदघाटन करण्यात येणार आहे . युवा मोर्चाची ताकद राज्यात निर्माण करण्याची असून त्या माध्यमातून युवा शक्तीचा सहभाग राज्याचा विकासासाठी होणार आहे .

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , पुणे कॅन्टोन्मेंट भागात जास्तीत जास्त शाखा खोलून आपण पुणे कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी हातभार लावू .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सांची किशोर सिंगवी यांनी केले तर सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर आभार सुप्रिया राजगुरू यांनी मानले .

पीएमपीएल बस प्रवास ;भाजपामुळे ज्येष्ठ नागरिकांना ‘बुरे दिन ‘ पासदरवाढी विरोधात भीक मागो आंदोलन ;आबा बागुल यांचा इशारा

0
पुणे
एकीकडे देशात काय राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देण्यासाठी धोरण राबविण्यात येत आहे ;पण दुसरीकडे पुण्यात मात्र या धोरणाची पायमल्ली करून ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार भाजपने पीएमपीएल  बस प्रवासासाठी पास दर वाढवून केला  असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.
शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पास दर वाढीचा निर्णय घेताना संस्काराची शिदोरी देणारे ,कुटुंब असो किंवा समाज सर्वांना दिशादर्शक ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएलचा  प्रवास दिलासादायक करण्याऐवजी उतारवयात त्यांच्यावर पाससाठी जादा दर लादून सत्ताधारी भाजपने ‘बुरे दिन ‘ चा दाखला दिला आहे. एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करताना ज्येष्ठ नागरिकांना मात्र पीएमपीएल  प्रवासासाठी पासमध्ये आणखी सवलत देण्याऐवजी दर वाढविण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे आबा बागुल यांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांवर पासदर वाढ होऊ देणार नाही वेळ पडली तर रस्त्यावर उतरून विरोध करताना भीक मागो आंदोलन केले जाईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे.यासंदर्भांत  ,मुख्यमंत्री , पालकमंत्री यांच्याकडेही दाद मागण्यात येणार आहे.

महेश मांजरेकरांचा नवा सिनेमा ‘शिवाजी पार्क मुंबई २८’

0

आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दशकानु दशकं रसिकांची सेवा करणारे हे कलाकार आपापल्या परीने चित्रपटसृष्टी सशक्त बनवण्याचं काम करीत आहेत, पण या सर्वांना एकत्र आणून एखादी संवेदनशील कलाकृती तयार करण्याची किमया अद्याप कोणीही केलेली नाही. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी शिवाजी पार्क मुंबई २८ या आगामी चित्रपटात हि किमया साधली आहे.

केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय असलेले दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबत शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी आणि भारती आचरेकर हे ज्येष्ठ कलावंत सुद्धा या चित्रपटात आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क मुंबई २८ हा चित्रपट म्हणजे जणू मराठीतील दिग्ग्ज कलाकारांना एकाच वेळी चंदेरी पडद्यावर पाहण्याची पर्वणीच ठरणार आहे. या जोडीला संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस हे आजच्या पिढीतील तरुण कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. 

महेश वामन मांजरेकर प्रस्तुत व गौरी पिक्चर्स निर्मित शिवाजी पार्क मुंबई २८ या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन करीत असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नेहमीच विविधांगी विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटाचे  दिग्दर्शन करीत आहेत. शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून, चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे.


अभिराम भडकमकर यांनी शिवाजी पार्क मुंबई २८चं लेखन केलं असून, छायांकन करण रावत करीत आहेत. शीर्षकापासूनच नावीन्य जपणाऱ्या शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटात नेमकं काय दडलंय ते अद्याप गुलदस्त्यातच असलं तरी एकंदरीतच सशक्त लिखाण, कुशल दिग्दर्शन तसंच चित्रपटातल्या कलाकारांच्या दमदार फळीमुळे शिवाजी पार्क मुंबई २८या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

चांगल्या कामांसाठी लोकांचा सहभाग आवश्यक : पालकमंत्री गिरीश बापट

0

राष्ट्रीय सीएसआर परिषद : ५०१ सेवाभावी संस्थांच्या परिचय पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : सीएसआर निधीतून अनेक चांगले प्रकल्प सेवाभावी संस्था राबवीत असतात, त्यामुळे अनेक चांगले बदल सामाजात घडून येत आहेत. सरकार प्रत्येकासाठी चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतू प्रत्येकच गोष्ट सरकार करेलच या विश्वासावर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपले योगदान दिले तर सशक्त  समाजासाठी आवश्यक असे कार्य होवू शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सोशल रिस्पोन्सिबिलीटीच्या माध्यमातून राष्ट्रीय सीएसआर परिषदेचे आयोजन पं. भीमसेन जोशी कलामंदीर, औंध येथे करण्यात आले होते. सीएसआर हेल्पलाईन व ५०१ एनजीओच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक श्री. शेखर मुंदडा, भारत विकास ग्रुपचे मुख्य संचालक श्री. हनुमंतराव गायकवाड, पुण्याचे विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी, पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त श्रीमती कांचनगंगा जाधव, हिवरे बाजारचे सरपंच श्री. पोपटराव पवार, कोहिनूर ग्रुपचे मुख्य संचालक श्री. कृष्णकुमार गोयल, दे आसरा फाउंडेशनचे संचालक श्री. एस. आर. जोशी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे श्री. हर्षल विभांडीक, सोशल रिस्पोन्सिबिलीटीचे अध्यक्ष श्री. विजय वरुडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर पूज्य श्री. श्री. रवीशंकरजी गुरुजींनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या एनजीओना ‘एकत्रित’ कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘वसुधैव कुटुंबंम’ असे समजून सर्वांनी समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येवून कार्य करावे, असा संदेश यावेळी गुरुजींनी दिला.

हिवरे बाजारचे सरपंच श्री. पोपटराव पवार म्हणाले की, आजच्या घडीला पर्यावरणाच्या बाबतीत जनजागृती होताना दिसून येते, ही चांगली बाब आहे. मात्र, पाणी आडवा, पाणी जिरवा यांच्या बरोबरीने उपलब्ध असलेले पाणी विवेकाने वापरणे आवश्यक आहे. यासाठी पाण्याचा ताळेबंद राखणे ही खरी काळाची गरज आहे.

विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी म्हणाले की, कॉर्पोरेट आणि एनजीओ यांच्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. एनजीओला काम करताना नक्की कोणत्या अडचणी येतात, हे कॉर्पोरेट जगताने  समजावून घेताना त्यांना मदत करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. याचबरोबरीने अशा कार्यामध्ये महापालिकेला देखील निश्चितच सामाविष्ट करून घेता येवू शकेल.

धर्मादाय सहआयुक्त श्रीमती कांचनगंगा जाधव म्हणाल्या की, सर्वच एनजीओना नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे सीएसआर निधी मिळविण्यासाठी मदत होते, तसेच याविषयीच्या मार्गदर्शनासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी भारत विकास ग्रुपचे संचालक हनुमंतराव गायकवाड म्हणाले की, अनिवासी भारतीय नागरिक भारताच्या विकासासाठी आपले योगदान देण्यासाठी तत्पर असतात. परंतू त्यांच्याकडे त्या त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एनजीओची माहिती उपलब्ध नसते. संकेतस्थाळाच्या माध्यमातून आपण ही माहिती उपलब्ध करून दिल्यास याचा फायदा निश्चितच होईल.

यावेळी बोलताना कोहिनूर ग्रुपचे मुख्य संचालक श्री. कृष्णकुमार गोयल म्हणाले की, समाजातील चांगल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारे अनेक लोक आहेत. परंतू, आपला निधी नीट वापरला जातोय ना, याबाबत ते साशंक असतात. अशा वेळी एनजीओने आपल्या कामाचा ठसा उमटविला तरच असे निधी उपलब्ध करून देणारे अनेक लोक या कार्यात आनंदाने सहभागी होतील.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक श्री. शेखर मुंदडा यावेळी म्हणाले की, पूज्य गुरुजींच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेतून ही एनजीओ व कॉर्पोरेट यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आम्ही मांडली. या संकल्पनेला एनजीओ व कॉर्पोरेट या दोन्ही घटकांनी चांगला पाठींबा दिल्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी एनजीओसाठी ९टी (9T) ही संकल्पना शेखर मुंदडा यांनी मांडली.  या कार्यक्रमात भारत विकास ग्रुप, सुमेरू बेव्हरेजेस व कोहिनूर ग्रुप यांनी मोलाचा वाटा उचलला. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री. शेखर मुंदडा यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुधीर गाडगीळ यांनी तर आभारप्रदर्शन सोशल रिस्पोन्सिबिलीटीचे अध्यक्ष श्री. विजय वरुडकर यांनी केले. ‘वंदे मातरम’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

खर्‍या शांतीसाठी न्यायाची अधिक आवश्यकता – जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारोह प्रसंगी मौलाना रिझवी यांचे विचार

0

पुणे: “सर्वांना शांती हवी असेल तर त्यासाठी न्यायाची अधिक अवश्यकता आहे. आपण असे म्हणू शकतो, की शांती ही खरी व खोटीसुद्धा असू शकते. कारण ज्या ठिकाणी जे लोक हवे, ते नसल्यामुळे या देशात अशांतीचे वातावरण पसरलेले आहे”असे विचार समाजसुधारक मौलाना सय्यद कल्बी रशीद रिझवी यांनी काढले.
‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ (एमआयटी डब्ल्यूपीयू) पुणेतर्फे .‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारोहामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल वि.कराड, कायदे पंडीत व विचारवंत शिराज कुरेशी, भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष वाय. सुदर्शन राव, डॉ.जेनिफर रिटर, थर्ड आसाइटचे संस्थापक व प्रमुख देवांशू दत्ता, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन आणि अग्नेय आशियाच्या आंतरराष्ट्रीय विकास प्रमुख डॉ.भूमिका गुप्ता, भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ.एस.आर.भट्ट, औद्योगिक प्रशिक्षक संतोष जोशी व भारतातील अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महासंचालिका रंजना खन्ना सन्माननीय अतिथी म्हणून होत्या व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी आपटे हेही उपस्थित होते.
मौलाना सय्यद कल्बे रशीद रिझवी म्हणाले,“भारत ही आमची माता आहे. या देशात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आम्हाला बलिदान देण्याची वेळ आली, तरी ती आनंदाने स्विकारू. देशावर होणार्‍या हल्यांना आम्ही चोख उत्तर देवू. या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या प्रमुख जागी जे नको आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात हीच स्थिती निर्माण झाल्यामुळे देेशात अराजकता पसरत आहे. अशावेळेस देशात शांती निर्माण करण्यासाठी युवकांना पुढाकार घ्यावा लागेल. अशा महान कार्यासाठी या विद्यापीठाची महत्वपूर्ण भूमिका असवाी, अशी अपेक्षा आहे.”
शिराज कुरेशी म्हणाले,“हिंदूस्तान, इन्सान आणि इन्सानियत या गोष्टींच्या विषयी सम्मानाबरोबर ते जीवनात प्रत्यक्ष उतरविल्यावर खर्‍या शांतीचा अनुभव येवू शकतो. जोपर्यंत मणुष्याला शिक्षणाची आवड आहे, तो पर्यंत त्यात अध्यात्म जीवंत असतेे. क्षणा क्षणाला शिकण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असावी. जीवनासाठी शिक्षण आणि माणुसकी आवश्यक आहे. संस्कृती आणि परंपरेचा सुगंध भारतातील प्रत्येक क्षेत्रातून दरवळतो.”
रंजना खन्ना म्हणाल्या, “अर्जुनांला ज्या प्रमाणे फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, त्याप्रमाणे
प्रत्येकाने शांतीचे उद्दिष्ट निर्धारित केल्यावर ही सृष्टी शांतीपूर्ण होईल. येथे प्रत्येकांने मणुष्याला जोडण्याचे कार्य करावे.”
डॉ.भूमिका गुप्ता म्हणाल्या,“शिक्षण हे जीवनात परिवर्तन घडविणारे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विश्‍वशांतिला अनुकूल अशी विद्यार्थ्याची मानसिकता तयार करता येवू शकते.”
सुदर्शन राव म्हणाले,“ज्ञान आणि विज्ञान यूांच्या संगमातून सरस्वती प्रकट होते. यामध्ये भारताची व येथील शिक्षणपद्धतीची भूमिका सृजनात्मक आहे.”
यानंतर डॉ.एस.आर.भट्ट, देवांशू दत्त आणि संतोष जोशी यांनी विश्‍वशांती स्थापनेसाठी सर्वाचे योगदान किती महत्वपूर्ण आहे यावर विचार प्रकट केले.
प्रा.राहुल वि.कराड यांनी प्रस्तावनेत नव्या विद्यापीठाची संपूर्ण माहिती दिली. एमआयटी डब्ल्यूपीयूचा दृष्टिकोन सर्व जगात शांतीचा प्रसार व्हावा असा आहे. आजची परिषद हीसुद्धा या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच एक भाग आहे.
वेस्ट मिन्स्टरचे विद्यार्थी वेरा लवलेस, लिह हॉपके व एमआयटीची नलिनी देवी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रेयांश खंडेलवाल, अंकित बन्सल, अक्षय ठाकूर आणि अंकित पाटील या विद्यार्थ्यांना एमआयटी डब्ल्यूपीयू मधील शांती दलाचे सैनिक म्हणून घोषित करण्यात आले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी.पी आपटे यांनी आभर व्यक्त केले.

 

श्रीमंत प्रतिष्ठाण व दीपक मानकर युथ क्लब यांच्या वतीने व्हीलचेअरचे वाटप

0
पुणे-सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील श्रीमंत प्रतिष्ठाण व दीपक मानकर युथ क्लब यांच्या वतीने  गणेश नगर वडगावा शेरी येथे भव्य दही हंडी चे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकीचे भान राखून श्रीमंत प्रतिष्ठाण व दीपक मानकर युथ क्लब ने   वसंत तांबे  ACP खडकी विभाग आणि R J केदार जोशी यांच्या हस्ते व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रशांत साळुंखे, आशिष म्हसाडे, अभिजीत बोडके,
केतन डांगे, अमोल बोडके, अब्दुल शेख, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.  प्रतिक बत्ते, वाडिया मावशी, कार्यक्रमाचे आयोजक मयुर शिंदे,  केदार जोशी , दिनेश अवचरे, ACP वसंत तांबे साहेब , रमेश साकोरे, राकेश मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ..

तावडेंचे अहिल्याबाईंबद्दलचे विधान अपमानास्पद : तत्काळ माफी मागावी

0
पुणे- “अहिल्याबाई होळकरांचे नांव सोलापूर विद्यापीठास दिल्यास जातीय तेढ निर्माण होईल व विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा होईल” असे राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी विधानसभेत नामविस्ताराच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. ज्या अहिल्याबाई होळकरांनी आपल्या राज्याच्या सीमा ओलांडुन संपुर्ण देशभर अवाढव्य लोकोपयोगी निर्माणकार्ये केली, ज्यांचा देशातच नव्हे तर जगभर गौरव केला जातो अशा प्रजाहितदक्ष अहिल्याबाईंच्या नांवामुळे जातीय तेढ निर्माण होईल असे विधान करुन त्यांचा घोर अपमान केला आहे. हे विधान श्री. तावडे यांनी तत्काळ माफी मागत मागे घेऊन सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीवर कारवाई करावी अशी मागणी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी केली.
अहिल्याबाई होळकर जरी आदिवासी धनगर समाजात जन्माला आल्या असल्या तरी त्यांचे जीवन हे जाती-धर्मापार जाणारे होते. तत्कालीन मुस्लिम राजे-रजवाड्यांनीही धर्म मधे न आणता त्यांना आपल्या राज्यात मंदिरे, धर्मशाळा, घाट, बारवा आदि जनोपयोगी वास्तू उभारू दिल्या. भारताचा मानबिंदू असलेले सोमनाथही त्यांनी पुन्हा उभारले. त्यांच्याबद्दल आदर नाही असा कोणी संपुर्ण देशात सापडणार नाही. भारतातील सर्व महापुरुष व महानायिका दुर्दैवाने कोणत्या ना कोणत्या जातीत जन्माला आलेले असतात पण कर्तुत्वाने जातीपार जात त्यांनी हा देश घडवला आहे. अहिल्याबाईंचे नांव दिल्याने अहिल्याबाई मोठ्या होत नाहीत तर त्यातून आपली कृतज्ञता व्यक्त होते. इतरांचे नांव दिल्याने जातीय तेढ निर्माण होत नाही पण अहिल्याबाइंचे नांव दिल्याने मात्र होते असा जावईशोध व्यवस्थापन समितीने लावावा व श्री. तावडेंनी आपण इतिहासात कच्चे असून आपणच जातीयवादी व स्त्रीद्वेष्टे असल्याचे सिद्ध करीत विधानसभेत तीच री ओढत अहिल्याबाईंचा अपमान करावा या संतापजनक विधानाचा प्रतिष्ठान सर्व समाजांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहे.
 विद्यापीठाला अथवा अन्य कोणत्या वास्तुला कोणाचे नांव द्यावे की नाही हा अत्यंत वेगळा व चर्चेचा मुद्दा असून अहिल्याबाईंच्या नांवामुळे जातीय तेढ निर्माण होईल या विधानामुळे समस्त अहिल्याप्रेमी समाजांत संतापाची लाट उसळली आहे. श्री. तावडे यांनी तत्काळ हे विधान मागे घ्यावे, विधानसभेच्या पटलावरून ते विधान वगळावे व अहिल्याबाईंची माफी मागावी अशी मागणी प्रतिष्ठान करीत आहे असे सोनवणी म्हणाले.

इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

0

पुणे- नेत्रदीपक विद्युत रोषणाई, भव्य मंडप, स्वयंसेवकांची
लगबग, विविध प्रकारचे स्टॉल्स, रांगोळ्यांची आणि विविध प्रकारच्या
फुलांची मनमोहक आरास, आध्यात्मिक पुस्तके आणि महाप्रसादाचे
वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, राधा कृष्णाच्या विग्रहांचा
आकर्षक शृंगार, टाळ मृदंगाचा गजर आणि सुमधुर कीर्तनाचे
आवाज………. अशा प्रकारच्या भक्तिमय वातावरणात इस्कॉनच्या कात्रज
कोंढवा रोड आणि कॅम्प येथील मंदिरात पुणेकरांनी दिव्य अशा श्रीकृष्ण
जन्माष्टमी सोहळ्याचा अनुभव घेतला आणि प्रत्येक पुणेकर
भक्तीभावामध्ये अक्षरशः न्हाऊन निघाला.
पहाटे ४:३०वा. मंगल आरतीने या सोहळ्याची सुरुवात
झाली, यावेळी सुमारे ३००० भाविकांनी उपस्थिती लावली. या नंतर
मंदिराचे अध्यक्ष श्रीमान राधेश्याम प्रभू यांचे श्रीकृष्ण जन्माष्टमी या
विषयावर प्रवचन झाले. त्यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्णांचा जन्म

हा एक अंधःकारमय तुरुंगात झाला, परंतु त्यांचा जन्म झाल्यावर तोच
तुरुंग दिव्य प्रकाशाने व्यापून गेला आणि तेथील बंद दरवाजे उघडले आणि
साखळ्या, ज्यामध्ये देवकी आणि वासुदेवाना कैद करून ठेवण्यात आले
होते त्या तुटून पडल्या. त्याच प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सोहळा कोणी
साजरा करतो तेंव्हा त्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधःकार नाहीसा
होतो आणि तो मनुष्य मायेच्या बंधनातून मुक्त होतो.
दोन्ही मंदिरामध्ये दिवसभर नागरिकांची रीघ लागली
होती. मंदिरामधील विविध स्टॉल्स, कीर्तन, प्रवचन, संगीत, सांस्कृतिक
कार्यक्रम, महाप्रसाद आणि भगवंतांच्या दिव्य दर्शनाचा जवळपास एक
लाखाच्यावर भाविकांनी लाभ घेतला.
इस्कॉनच्या सर्व मंदिरांमध्ये परंपरे प्रमाणे जन्माष्टमीच्या
दिवशी भगवान श्रीकृष्णांचा दिव्य अभिषेक केला जातो, त्यामध्ये सुमारे
५० प्रकारच्या अभिषेक सामाग्रींचा वापर केला जातो. सुमारे पाच हजार
लोकांनी हा अभिषेक केला. मंदिरातील भक्तांनी तसेच बाल गोपाळांनी
भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांवर आधारित नृत्य, गायन, नाटिकांचे
सादरीकरण केले. इस्कॉनचे संस्थापकचार्यांच्या जीवनावरील आधारित
प्रदर्शनी, लहान मुलांच्या संस्कारांशी संबंधित स्टॉल्स, अध्यात्मिक
पुस्तकांचे स्टॉल्स आणि गीतेतील तत्त्वज्ञान समजावून देणारे देखावे
पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मंदिरामध्ये वृंदावन
आणि गोवर्धनची प्रतिकृती आणि तेथील कृष्णलीलांचे प्रदर्शन जणू साक्षात
वृंदावनात गेल्याची अनुभूती करून देत होते.
या सोहळ्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन
करमाळकर, पुणे पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला, पुणे महानगर
पालिकेचे आयुक्त श्री कुणाल कुमार, पुणे कॅन्टोन्मेट बोर्डाचे प्रमुख
कार्यकारी अधिकारी श्री डी. एन. यादव, पुणे पोलीस उपायुक्त श्री
सुधाकर पठारे, पुणे महानगर पालिकेचे सह आयुक्त श्री विलास कानडे,

नगरसेविका सौ. संगीताताई ठोसर, माजी महापौर श्री प्रशांत जगताप,
श्री मिलिंद एकबोटे, युवसेना अध्यक्ष श्री किरण साळी तसेच पुणे
शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक
मान्यवरांनी हजेरी लावली.
या दरम्यान अत्यंत शिस्तबध्द वाहतूक व्यवस्था, मुबलक
पार्किंगची सोय आणि सुव्यवस्थित दर्शनाची सोय यामुळे सर्व नागरिकांना
कार्यक्रमाचा लाभ घेता आला. वाहतूक शाखा आणि पुणे पोलिसांचे या
कार्यक्रमासाठी फार मोठे सहकार्य लाभले.

 

स्थायी समितीच्या सभेत अनेक महत्वाच्या विषयांना मंजुरी

0

पुणे-
नागरी सुविधांबाबत अनेक प्रस्तावांना आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पुणे शहरातील नळस्टॉप चौकामध्ये लॉ कॉलेज रोड, कर्वे रोड, म्हात्रे पुलाकडून येणारा रस्ता व पौड रोडवरून होणारी वाहतूक मिळते. यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या कर्वे रोड परिसरात निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नळस्टॉप येथे उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रस्तावित असणाऱ्या वनज ते रामवाडी मेट्रो मार्गावर मेट्रो आणि या उड्डाणपुलाचे एकत्रित विचार करून पुलाची निर्मिती महामेट्रोने करावी आणि त्याचा खर्च पुणे महापलिका करेल, असा प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरासह एकूण सहा नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवन येथे स्वच्छताविषयक कामे करण्याच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामासाठी दरमहा सर्वसाधारणपणे 1 लाख 20 रुपये खर्च येणार आहे. याविषयी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पहा आणि ऐका काय सांगितले ….

‘त्या’खासदारांनी म्हटल्याप्रमाणेच यांचा कारभार -बाईक रॅलीवर नगरसेवक कदम यांची टिका (व्हिडीओ)

0

पुणे-  भाजपच्या एका खासदाराने महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांना बावळट म्हटले होते … हाच धागा पकडून आज राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी ..बाईक रॅली च्या मुद्द्यावरून सर्व पदाधिकाऱ्यांना शालजोडीतला टोला लगावला आहे . पहा आणि ऐका नेमके नगरसेवक प्रकश कदम यांनी काय म्हटले आहे …

असंबंध कार्यक्रमांमुळे महापौर अडचणीत …(व्हिडीओ)

0

पुणे -महापालिकेतर्फे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांचे आयोजन करताना अनेक चुकीच्या व्यक्तींचे सल्ले ऐकल्याने महापौर मुक्ता टिळक या स्वतः अनेकदा अडचणीत येत असल्याचे दिसत आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अक्षरशः त्यांना काढता पाय घ्यावा लागला.
५००० ढोल वादनाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्या नंतर शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव मध्ये आता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये 1000 दुचाकी सहभागी होणार असून या माध्यमातून पर्यावरण विषयक संदेश देणार आहे, असे महापौरांनी सांगितले. मात्र, एवढ्या मोठया प्रमाणात दुचाकी रस्त्यावर उतरल्याने होणार्‍या प्रदुषणाला जबाबदार कोण या प्रश्नाला उत्तर देणे टाळत महापौरांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला. 

यंदाचे सार्वजनिक गणेश उत्सवाचे १२५/१२६  वे वर्ष असून यानिमित्त महिना भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एक भाग म्हणून २०तारखेला दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत, आरोग्य, पर्यावरण आदीबाबतीत संदेश देण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेने नुकताच जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालातून दुचाकीचे प्रमाण वाढल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. असे असताना दुचाकी रॅलीकडून प्रदुषणात भर टाकून कशा प्रकारे प्रदुषणाबाबत संदेश दिला जाणार आहे, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर या प्रश्नावर उत्तर देणे टाळत महापौरांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला.

अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते दही-हंडी फोडली; मंजुषा नागपुरे यांचा उपक्रम’

0

पुणे-केदार फ्रेंड्स सर्कल,हिंगणे व नगरसेविका.सौ.मंजुषा नागपुरे यांनी आयोजित केलेल्या दही हंडी उत्सवामध्ये अंध विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून, दही हंडी फोडण्याचा आनंद लुटला. किष्किंधा प्रतिष्ठान संचलित अंध वसती गृहातील 25 अंध विद्यार्थ्यांनी हा आनंद लुटला. ‘चलो जलाए दीप जहाँ, अब भी अंधेरा हे’ ही संघ संस्काराने दिलेली शिकवण, म्हणूनच अंध विद्यार्थ्यांमध्ये आनंद वाटण्यासाठी, त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी या हंडीचे आयोजन केल्याचे सौ.नागपूरे म्हटल्या.यावेळी, या विद्यार्थ्यांना हंडी फोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी, श्री.दीपक  नागपुरे व आयोजक श्री.समीर महाडिक यांनी उपस्थित लोकांना चायनीज वस्तू न वापरण्याची शपथ दिली. चालू विकृत स्वरूपाला फाटा देऊन, एक नवीन आदर्श उपक्रम सिंहगड रस्त्यावर सुरू केल्याबद्दल केदार फ्रेंड्स सर्कल चे लोकांनी आभार मानले व समाधान व्यक्त केले .यावेळी, अभिनेते गिरीश परदेशी उपस्थित होते.त्यांनी  केदार च्या या उपक्रमाचे कौतुक केले .शिवशार्दूल ढोल ताशा पथकाचे वादन हे देखील कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  उमेश चव्हाण उपस्थित होते .
कार्यक्रम हिंगणे खुर्द, सिंहगड रोड येथे संपन्न झाला . कार्यक्रमाची मुख्य दही हंडी बारामती गोविंदा पथकाने फोडली । कार्यक्रमाची सांगता सामूहिक शिववंदना ने करण्यात आली. महेश वैद्य, मयूर पांगारे, ओंकार वैरणकर, विशाल अवघडे, संदीप कदम, मंगेश बुजवे , आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत  घेतली