पुणे-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवती आघाडीच्या पुणे शहरामधील पहिल्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण पुणे कॅन्टोन्मेंट भागात संत नामदेव चौकात महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर , प्रदेश सचिव प्रियांका मेदनकर , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे , नगरसेवक सुशील मेंगडे , पुणे शहर चिटणीस गणेश घोष ,पुणे शहर युवती आघाडी पुणे शहर प्रमुख डॉ. सायली कुलकर्णी ,पुणे कॅन्टोन्मेंट युवती आघाडी प्रमुख कांचन गायकवाड , पिंपरी चिंचवड प्रमुख तेजस्विनी दुर्गे , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेविका प्रियांका श्रीगिरी , नगरसेविका डॉ. किरण मंत्री , माधुरी गिरमकर , दिनेश नायकू , संतोष इंदूरकर , किरण क्षीरसागर व मेघराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन सांची किशोर सिंगवी , गुणवंती कोठारी , कला सिंगवी , निलम सुराणा , वैष्णवी काटकर , पूजा काटकर , सुमित्रा राजगुरू , पूनम कांबळे , कांचन कांबळे , पुनीत जोशी , प्रतिक देसरडा यांनी केले होते .
या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले कि , महाराष्ट्रात दहा हजार शाखा उघडण्याचे उद्दिष्ट असून त्यामधील आठ हजार शाखाचे उदघाटन झाले आहे . उरलेल्या शाखा आगामी काळात उदघाटन करण्यात येणार आहे . युवा मोर्चाची ताकद राज्यात निर्माण करण्याची असून त्या माध्यमातून युवा शक्तीचा सहभाग राज्याचा विकासासाठी होणार आहे .
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , पुणे कॅन्टोन्मेंट भागात जास्तीत जास्त शाखा खोलून आपण पुणे कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी हातभार लावू .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सांची किशोर सिंगवी यांनी केले तर सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर आभार सुप्रिया राजगुरू यांनी मानले .