पुणे-सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील श्रीमंत प्रतिष्ठाण व दीपक मानकर युथ क्लब यांच्या वतीने गणेश नगर वडगावा शेरी येथे भव्य दही हंडी चे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकीचे भान राखून श्रीमंत प्रतिष्ठाण व दीपक मानकर युथ क्लब ने वसंत तांबे ACP खडकी विभाग आणि R J केदार जोशी यांच्या हस्ते व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रशांत साळुंखे, आशिष म्हसाडे, अभिजीत बोडके,
केतन डांगे, अमोल बोडके, अब्दुल शेख, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रतिक बत्ते, वाडिया मावशी, कार्यक्रमाचे आयोजक मयुर शिंदे, केदार जोशी , दिनेश अवचरे, ACP वसंत तांबे साहेब , रमेश साकोरे, राकेश मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ..