Home Blog Page 3295

कोंढवा, वानवडी, एनआयबीएम परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत

0

पुणे : मुसळधार व संततधार पावसामुळे वीज वितरण यंत्रणेत एकामागे एक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने रविवारी (20) पहाटे साडेतीनपासून कोंढवा, वानवडी, घोरपडी, एनआयबीएम रोड परिसरात विस्कळीत झालेला वीजपुरवठा रविवारी मध्यरात्रीपर्यंत टप्प्याटप्प्याने तर काही लघुदाब वाहिन्यांवरील सोसायट्या व वैयक्तिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, रास्तापेठ विभाग अंतर्गत वानवडी, घोरपडी, जांभूळकर गार्डन, जगताप चौक, फातिमानगर, टिळेकर वस्ती, लुल्लानगर, साळुंके विहार, एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द व बुद्गुक या परिसर 22 केव्हीच्या 9 वीजवाहिन्यांद्वारे (फिडर) वीजपुरवठा करण्यात येतो. याच परिसरातील चार स्विचिंग स्टेशनमधील तीन इनकमर वाहिन्यांद्वारे या 9 वीजवाहिन्यांना वीजपुरवठा होतो. परंतु तीनही इनमकर वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने नऊ आऊटगोईंग वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद झाला आणि वानवडी, कोंढवा व इतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यातच संततधार व मुसळधार पावसामुळे बर्‍याच ठिकाणी भूमिगत व काही ठिकाणी ओव्हरहेड असलेल्या या 9 वीजवाहिन्यांवर मोठा परिणाम झाला. फातिमानगर, वानवडी पोलीस चौकीसमोर झाडे पडली. तारा तुटल्या. पावसाचे पाणी साचल्याने 22 केव्हीच्या सुमारे 17 ते 18 फिडर पिलरमध्ये पाणी शिरले. त्यात आर्द्गता (मॉईश्चर) निर्माण झाली. हे सर्व तांत्रिक दोष एकामागे एक होत गेल्याने 9 वाहिन्यांमधील वीज वितरण यंत्रणेत गंभीर बिघाड होत गेला.

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रविवारी (दि. 20) पहाटे पाच वाजेपासूनच सुरवात करण्यात आली. तथापि संततधार पावसामुळे या दुरुस्ती कामात मोठे अडथळे आले. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधणे, त्याठिकाणी खोदकाम करणे, वीजवाहिन्यांना जाईंट करणे, मॉईश्चर काढणे, तुटलेल्या तारा जोडणे, पीन इन्सूलेटर बदलणे आदी कामे युद्धपातळीवर व अविश्रांत सुरु करण्यात आली. संततधार पावसात प्रामुख्याने मॉईश्चर काढण्यात मोठे अडथळे आले. इनकमरचे 3 व आऊटगोईंगचे 9 असे एकूण 12 वाहिन्यांची दुरुस्ती करून रविवारी मध्यरात्री 12 ते सोमवारी पहाटे 3 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु काही ठिकाणी लघुदाब वाहिन्या नादुरुस्त झाल्याने काही सोसायट्या व वैयक्तिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. तो आज दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला. या सर्व दुरुस्ती कामात मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. गणेश एकडे यांच्यासह 15 ते 20 अभियंते व सुमारे 60 तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.

5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सिध्देश पांडे, शौर्य पेडणेकर, स्वस्तिका घोष, दिशा हुलावळे, ओंकार तोरगळकर, सृष्टी हलंगडी यांना विजेतेपद

0

 

पुणे, 21 ऑगस्ट 2017: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत  ठाण्याच्या सिध्देश पांडे, मुंबई उपनगरच्या शौर्य पेडणेकर, रायगडच्या स्वस्तिका घोष, ठाण्याच्या दिशा हुलावळे, मुंबई उपनगरच्या ओंकार तोरगळकर,  सृष्टी हलंगडी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत युथ(21 वर्षाखालील)मुलांच्या गटात अंतीम फेरीत ठाण्याच्या दुस-या मानांकीत सिध्देश पांडेने  मुंबई शहरच्या अव्वल मानांकीत शुभम आंब्रेचा11,9 ,11/5, 9/11,11/8, 11/3 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. 19 वर्षीय सिध्देश हा सोमय्या महाविद्यालयात बीएमएसच्या व्दितिय वर्षाला शिकत असून ठाणे येथील बुस्टर क्लब येथे प्रशिक्षक शैलेजा गोहड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे. तर मुलींच्या गटात रायगडच्या बाराव्या मानांकीत स्वस्तिका घोषने ठाण्याच्या तिस-या मानांकीत श्रेया देशपांडेचा 8/11, 11/9, 11/9, 11/7, 9/11, 11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 14 वर्षीय स्वस्तिका ही रामशेट ठाकूर शाळेत नववी इयत्तेत शिकत असून खारघर टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक संदिप घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधी तिने गॉर्डन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.

ज्युनियर (18 वर्षाखालील) मुलांच्या गटात अंतीम फेरीत मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत शौर्य पेडणेकरने ठाण्याच्या दुस-या मानांकीत दिपीत पाटीलचा 14/12, 11/7, 9/11, 11/5, 12/10 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 17 वर्षीय शौर्य हा जमुनाबाई नर्सी इंटरनॅशनल स्कुलमध्ये 12वी इयत्तेत शिकत असून वायएमसीए येथे प्रशिक्षक अॅरीक फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे. तर मुलींच्यागटात  ठाण्याच्या दुस-या मानांकीत दिशा हुलावळेने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सृष्टी हलंगडीचा 6/11, 11/7, 13/11, 4/11, 11/8, 11/9, असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 17 वर्षीय दिशा ही फादर अॅग्नेल महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावी इयत्तेत शिकत असून फादर अॅग्नेल अकादमी येथे चैतन्य उदाने आणि सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तीचे हे या गटातील पहिलेच विजेतेपद आहे.

पुरूष गटात मुंबई उपनगरच्या बिगर मानांकीत ओंकार तोरगळकरने ठाण्याच्या अव्वल मानांकीत सिध्देश पांडेला पराभवाचा 11/5, 11/7, 15/13, 12/10 असा धक्का देत विजेतेपद पटकावले. तर महिलांच्या गटात मुंबई उपनगरच्या सातव्या मानांकीत सृष्टी हलंगडीने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत दिव्या महाजनचा 11/9, 8/11, 6/11, 11/9, 11/7, 9/11, 12/10 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. सृष्टी ही पोदार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावी इयत्तेत शिकत असून दहिसर पीपीएस येथे प्रशिक्षक तरूण गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तीचे या वर्षातील हे तीसरे विजेतेपद आहे.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण बी.यू भंडारी मर्सिडीज बेंझचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतूल कळूसकर आणि नामदेव शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू डॉ.मंदिरा ठीगळे-बसक, सिंबायोसीस विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. एस.एस.ठीगळे, पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव श्रीराम कोणकर, स्पर्धा संचालक राजेश शेलार, एम्स फीनप्रोचे जतिन माळी, सिग्मा वन लॅडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक कपिल गांधी, व्हेरीयंट नेटवर्क प्रोडक्शनचे विक्रम गुर्जर, आदि मान्यवर उपस्थित होते. राहूल क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी- युथ गट(21 वर्षाखालील)मुले

शुभम आंब्रे(मुंबई शहर,1) वि.वि रेगन ए(मुंबई उपनगर, 5) 11/5,11/5,9/11,11/8,11/13,11/8

सिध्देश पांडे(ठाणे, 2) वि.वि रविंद्र कोटीयन(मुंबई उपनगर, 3) 11/8, 11/3, 11/5, 11/9

अंतीम फेरी-सिध्देश पांडे(ठाणे, 2) वि.वि शुभम आंब्रे(मुंबई शहर,1) 11,9 ,11/5, 9/11,11/8, 11/3

 

मुली- स्वस्तिका घोष(रायगड,12) वि.वि सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,1) 11/9,11/9,11/7, 5/11, 11/7

श्रेया देशपांडे(ठाणे,3) वि.वि अश्लेशा त्रेहान(मुंबई उपनगर, 2) 11/3,11/9,7/11,11/8,7/11, 6/11,11/9

अंतिम फेरी- स्वस्तिका घोष(रायगड,12) वि.वि श्रेया देशपांडे(ठाणे,3) 8/11, 11/9, 11/9, 11/7, 9/11, 11/4

 

ज्युनियर गट(18 वर्षाखालील) मुले- उपांत्य फेरी

शौर्य पेडणेकर(मुंबई उपनगर, 1) वि.वि मानव मेहता(मुंबई उपनगर)11/8, 9/11,11/7, 5/11, 11/6,11/6

दिपीत पाटील(ठाणे, 2) वि.वि रेगन ए(मुंबई उपनगर, 3) 11/9, 5/11, 2/11, 11/6, 11/7, 11/9

अंतिम फेरी-शौर्य पेडणेकर(मुंबई उपनगर, 1) वि.वि दिपीत पाटील(ठाणे, 2) 14/12, 11/7, 9/11, 11/5, 12/10

 

मुली- सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,1) वि.वि श्रेया देशपांडे(ठाणे, 4) 11/9, 11/8, 11/9, 11/9

दिशा हुलावळे(ठाणे, 2) वि.वि स्वस्तिका घोष (रायगड,6) 9/11, 11/5, 11/8, 9/11, 11/6, 11/7

अंतिम फेरी- दिशा हुलावळे(ठाणे, 2) वि.वि सृष्टी हेलंगडी(मुंबई उपनगर,1) 6/11, 11/7, 13/11, 4/11, 11/8, 11/9,

 

पुरूष गट- उपांत्य फेरी

सिध्देश पांडे(ठाणे, 1) वि.वि युगंध झेंडे(ठाणे, 5) 11/4, 11/6, 11/9, 7/11, 11/3

ओंकार तोरगळकर(मुंबई उपनगर) वि.वि रविंद्र कोटीयन(मुंबई उपनगर,3)11/3,11/4,7/11,11/13,11/9, 4/11,11/9

अंतिम फेरी- ओंकार तोरगळकर(मुंबई उपनगर) वि.वि सिध्देश पांडे(ठाणे, 1) 11/5, 11/7, 15/13, 12/10

 

महिला गट- उपांत्य फेरी

दिव्या महाजन(मुंबई उपनगर,1) वि.वि ममता प्रभु(मुंबई उपनगर) 9/11,11/7,16/14, 7/11, 11/7, 11/7

सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,7) वि.वि अश्लेशा त्रेहान(मुंबई उपनगर,6) 11/9,11/2,11/8,11/6

अंतिम फेरी- सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,7) वि.वि दिव्या महाजन(मुंबई उपनगर,1) 11/9, 8/11, 6/11, 11/9, 11/7, 9/11, 12/10

वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी फिडर पिलरऐवजी आता रिंग मेन युनिट

0

पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी प्रस्ताव – मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांची माहिती

पुणे, दि. 21 : मुसळधार पाऊस किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्यासाठी प्रामुख्याने 22 केव्ही फिडर पिलर कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सर्व 22 केव्ही फिडर पिलरच्या ठिकाणी आता अद्ययावत तंत्रज्ञानाचे 22 केव्ही रिंग मेन युनिट बसविण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी दिली.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची प्रमुख तांत्रिक कारणे शोधण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणकडून कार्यवाही सुरु आहे. या दोन्ही शहरात असलेल्या 22 केव्हीच्या फिडर पिलरमधील तांत्रिक दोषांमुळेच प्रामुख्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुसळधार पावसामुळे फिडर पिलरमध्ये पाणी शिरणे किंवा आर्द्गता (मॉईश्चर) निर्माण होणे, दरवाजे चोरून नेल्याने सुरक्षा धोक्यात येणे व इतर त्रुटींमुळे तांत्रिक बिघाड वाढण्याचे प्रकार दिसून आले आहे. या कारणांमुळेही कोंढवा, वानवडी, फातिमानगर, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड परिसरात वीजपुरवठा रविवारी (दि. 20) विस्कळीत झाला होता.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या 22 केव्ही फिडर पिलरच्या ठिकाणी 22 केव्ही रिंग मेन युनिट बसविण्याच्या प्रस्तावाची माहिती सोमवारी (दि. 21) मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी मुख्यालयास दिली. वीजयंत्रणा सक्षमीकरणाच्या (सिस्टीम इंप्रुव्हमेंट) कार्यक्रमातून रिंग मेन युनिट बसविण्याचा प्रस्तावाला मुख्यालयाने सकारात्मक प्रतिसाद देत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दोन्ही शहरात 22 केव्ही फिडर पिलरच्या ठिकाणी रिंग मेन युनिट बसविण्याचा प्रस्ताव व डीपीआर तयार करण्यासाठी मंगळवारी (दि. 22) बैठक होणार आहे. सर्व माहिती संकलीत करून रिंग मेन युनिट बसविण्याचा प्रस्ताव व डीपीआर येत्या आठ दिवसांत मुख्यालयास पाठविण्यात येणार आहे. फिडर पिलरमध्ये निर्माण होणारे बहुतांश तांत्रिक दोष हे रिंग मेन युनिट बसविल्यानंतर टाळता येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीमध्ये समावेश असलेल्या पुणे व पिंपरी चिंचवडला अधिक दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे. हा प्रस्ताव मंजुर व आर्थिक निधी उपलब्ध झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व 22 केव्ही फिडर पिलर बदलून त्या ठिकाणी रिंग मेन युनिट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात येणार आहे.

सुनीता वाधवान यांच्या चित्रात आत्म्याचे प्रतिबिंब – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

मुबंई, दि. 21 : कलाकार हा सामान्यांपर्यंत आपल्या कलेचा प्रसार करतो. सुनीता वाधवान यांच्या चित्रांमध्ये असलेली उच्च कलात्मकता म्हणजे आत्म्याचे प्रतिबिंब आहे, असे गौरवोद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिरजी जहाँगीर आर्ट गॅलरीत आयोजित इलेव्हीशन या चित्र प्रदर्शनात काढले.

चित्रकार सुनीता वाधवान व मनिष बोबडे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला ऊर्जामंत्र्यानी आज भेट दिली. यावेळी माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.

सुनीता वाधवान व मनिष बोबडे या चित्रकारांची चित्रकारिता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे. योगा व निसर्ग या विषयावर आधारीत चित्रांमध्ये उच्च दर्जाची कलात्मकता आहे. या दोघा चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जुन या चित्रप्रदर्शनाला भेट दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनात 51 चित्रांचा समावेश असून 27 ऑगस्ट पर्यत हे चित्रप्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले आहे.

यावेळी जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या डॉ. मनिषा पाटील यांचा ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रोहन सोनवणे आणि प्रिया सिंग ठरले मिस्टर आणि मिस सिटाडेल पुणे

0

पुणे: सिटाडेल एक्स्ट्राव्हॅगन्झा २०१७ मोठ्या उत्साहात पार पडले. यासाठीचे ऑडिशन 16 ते 24 या वयोगटातील स्पर्धकांमध्ये झाले होते, ज्यामध्ये सात मुले आणि सात मुलींची निवड पुण्यात नुकत्याच झालेल्या प्रास्तावित कार्यक्रमामध्ये करण्यात आली होती. उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेल्या गूण हे निकष लक्षात घेऊन या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर १४ अंतिम स्पर्धक निवडण्यात आले होते. ह्या स्पर्धेमध्ये रोहन सोनवणे आणि प्रिया सिंग  मिस्टर आणि मिस पुणे ठरले. बॉलीवुड दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि बॉलिवुड अभिनेत्री कीर्ती कुल्हारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. 
 
यापूर्वी देखील या कार्यक्रमाची शोभा वाढवीत अनेक लोकप्रिय व्यक्तींनी सिटाडेल एक्सट्रावेगांझासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुन या स्पर्धेचे परीक्षण केले आहे. या वर्षी सुद्धा या शानदार सोहळ्याचे परीक्षण करण्यासाठी शमा सिकंदर, अभिमन्यु सिंग, सोनाली कुलकर्णी, रशमी झा व नीतू चंद्रा सारखे नावाजलेले कलाकार उपस्थित होते.  मधुर भंडारकर यांच्या हस्ते  सिटाडेल मॅगझीनचे अनावरण करण्यात आले . 
 
या स्पर्धेमध्ये प्रशनोत्तर फेरीमध्ये परीक्षकांनी स्पर्धकांना काही प्रश्न विचारले व स्पर्धकांनी देखील परीक्षकांना प्रश्न विचारले ज्यामुळे या सोहळ्यात उपस्थितांना काही गमतीदार क्षणदेखील अनुभवायला मिळाले. 
 
या सोहळ्यात प्रत्येक स्पर्धकाने अत्यंत रुबाबात व आत्मविश्वासाने परफॉर्म केले. 
शीर्षक विजेते:
 
मिस्टर सिटाडेल पुणे 2017: रोहन सोनवणे
मिस सिटाडेल पुणे 2017: प्रिया सिंग
 
स्पर्धेचे निकाल:
 
फस्ट रनर-अप  सिटाडेल पुणे 2017: प्रभुराज जेडॉन
फस्ट रनर-अप मिस सिटाडेल पुणे 2017: ताशी चौडेन
 
सेकंड रनर-अप मिस्टर सिटाडेल पुणे  2017: योगिंदर सिंह
सेकंड रनर-अप मिस सिटाडेल पुणे 2017: गीतिका सराफ
 
सिटाडेल मिस्टर फिजक 2017: योगिंदर सिंग
सिटाडेल मिस फिजक 2017: प्रिया सिंग 
 
सिटाडेल मिस्टर फोटोजनिक 2017:प्रविन पुरेना
सिटाडेल मिस फोटोजनिक 2017: ताशी चौडेन
 
बालेकिल्ले मिस्टर फोटोजनिक 2017: प्रवीण पुरीना
सिटॅडल मिस फोटोजेनिक 2017: ताशी चौडेन
 
सिटाडेल बेस्ट स्माईल मेल 2017: रोहन सोनावणे
सिटाडेल बेस्ट स्माईल फिमेल 2017: शिरीन कर्मानी

स्त्रीकर्तृत्वाचा सन्मान उंच माझा झोका पुरस्कार

0

सन्मान स्त्रीच्या लढण्याचा , गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन यावर्षीचा उंच माझा झोका पुरस्कार दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तथा आपल्या भरीव योगदानाबद्दल  सुनंदाताई पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अनुताई वाघ यांच्या ‘ग्राममंगल’ या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालाही विशेष गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव ‘उंच माझा झोका पुरस्कार’ देऊन करण्यात येतो. यावर्षी आदिवासींची घरठाणाची चळवळ चालवणा-या डॉ. वैशाली पाटील, दृष्टीहिन तथा गतीमंद मुलामुलींची शाळा चालवणा-या प्रमिला कोकड, रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर, घनकचरा व्यवस्थापन आणि वेस्ट मॅनजमेंटमधून रोजगार निर्मिती करणा-या निर्मला कांदळगावकर, आपल्या अभिजात साहित्याने मराठी साहित्यक्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणा-या अरुणा ढेरे, न्युरोसायन्ससारख्या विषयात आपल्या संशोधनाची पताका फडकविणा-या डॉ. विदिता वैद्य यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा भावोत्कट क्षण ठरला गौरी सावंत यांच्या पुरस्कार प्रदानाचा. समाजासाठी बहिष्कृत असलेल्या किन्नर समाजाचं प्रतिनिधीत्व करत त्यांच्या हक्काचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून गौरी सावंत लढतायत. स्वतः हे भीषण जगणं अनुभवलेल्या गौरीने आपलं मनोगत व्यक्त केलं तेव्हा उपस्थित प्रत्येकजण सुन्न झाला होता. यावेळी गौरी सावंत म्हणाल्या की, “आम्हाला येथील समाजाने कायम चार हात लांब ठेवलेलं आहे. आम्ही सिग्नलवर किंवा ट्रेनमध्ये दिसलो की लोकं आमच्याकडे तिरस्काराने बघतात. ते विचारतात की तुम्ही काही करत का नाही? माझा त्यांना प्रश्न आहे तुम्ही आमच्यासाठी काही का नाही करत? फार काही करु नका फक्त आमच्याकडे सामान्य माणसासारखं बघा एवढं केलं तरी तेच खूप असेल.”

जव्हार मोखाडासारख्या अतिदुर्गम आदिवासीपाड्यात शिक्षणाचं नंदनवन फुलवणाऱ्या प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदा पटवर्धन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील मोही या अतिशय छोट्या गावातल्या ललिता बाबर या धावपटूने आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने रिओ ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठली होती. तिच्या या कार्याचा गौरवही यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात सादर झालेल्या विविध कलाकारांच्या नृत्य सादरीकरणानेही उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक आणि उमेश कामत यांनी तर कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन क्षितिज पटवर्धनने केलं. पुरस्कारांच्या निवड समितीची जबाबदारी ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ.स्नेहलता देशमुख यांनी पार पाडली. येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

देशाचे मनुवादीकरण होते आहे-फिरोज मिठापूरवाला

0
पुणे ः
‘देशातील सद्यस्थिती’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने शनिवारी करण्यात आले होते. अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि सी. ए. अजित जोशी आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठापूरवाला यांनी उद्घाटनाच्या सत्रात मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सुनील तांबे, श्रृती तांबे यांनी मार्गदर्शन केले.
शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुखपाहुणे म्हणून दत्ता बाळसराफ उपस्थित होते. प्रास्ताविक अंकुश काकडे यांनी केले. अशोक राठी यांनी सूत्रसंचालन केले.
हॉटेल ‘तरवडे क्लर्क इन’ येथे झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेला पदाधिकारी, सेल अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुपाली चाकणकर, चेतन तुपे हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
‘भाजपच्या सत्ता काळात देशाचे मनुवादीकरण होत आहे, धर्मनिरपेक्ष पक्षांनी आणि महाराष्ट्राने याचा प्रतिवाद केला पाहिजे.’ असे प्रतिपादन फिरोज मिठापूरवाला यांनी केले. ते म्हणाले, ‘हिंदू धर्मातील सुधारणावादी चळवळीप्रमाणे मुस्लीम धर्मातील सुधारणावादी चळवळीलाही सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा.
अजित जोशी म्हणाले, ‘नोटबंदी आणि जीएसटी हे विषय घिसाडघाईने राबविले गेल्याने झालेले दुष्परिणाम समोर येत असून, त्यावर जनजागृती करणे आवश्यक आहे. अर्थकारणाशी संबंधित विषय सर्वांच्याच जीवनावर परिणाम करत असल्याने राजकीय पक्षांनी त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे आहे.’
दत्ता बाळसराफ म्हणाले, ’देशातील वास्तव परिस्थिती समजून घेऊन सत्य हे समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे.’
सुनील तांबे म्हणाले,‘ देशाच्या भौगोलिक रचनेनुसार परंपरा जोपासल्या गेल्या पाहिजेत. हा देश सर्वसमावेश बनला आहे परंतु ; आज मोदी सरकारच्या काळात एकाच धर्माचा अजेंडा राबविल्यासारखे सरकार काम करीत आहे. त्यामुळे मूळ सर्व समावेशक परंपरेला तडा जात आहे.’
श्रुती तांबे महिला अत्याचार या विषयी भाष्य करताना म्हणाल्या, ‘महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, महिलांचे समाजातील स्थान बदलेले पाहिजे. महिला अत्याचाराविरोधी आवाज उठवणे आवश्यक आहे, याकरीता गणेश मंडळ, युवकांनी समाजसेवा करणे आवश्यक आहे. अत्याचारग्रस्त स्त्रीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू नये. महिला अत्याचार थांबविण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.’
प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी चालू घडामोडींवर आधारित कार्यकर्ता संवाद परिषद या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिबिराच्या समारोप प्रसंगी अशोक राठी यांनी सांगितले. या संवाद परिषदेमध्ये चालू घडामोडींवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 2019 सालापर्यंत वैचारीक, बौद्धिक आणि चांगले वक्तृत्व असणारी कार्यकर्त्यांची टीम तयार होऊ शकणार आहे.  अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

गटचर्चा स्पर्धेत मननकी कस्तुरेचे यश

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस सेकंडरी स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजोमय’ या आंतरशालेय गटचर्चा स्पर्धेत एसपीएम स्कूलच्या मननकी कस्तुरेने प्रथम क‘मांक पटकाविला. सिंबायोसिसच्या अर्णव देशमुख याने दुसरा आणि डीईएस सेकंडरीच्या आदी काळभांडेने तिसरा क‘मांक मिळविला. स्पर्धेत १३ शाळांतील ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उद्योजक बद्रीनाथ मूर्ती यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. शाला समितीचे अध्यक्ष किरण शाळिग‘ाम अध्यक्षस्थानी होते. श्री गणेशन महालिंगम, डॉ. यू. व्ही. लिमये, दिलीप नायडू, शिबू नायर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विद्यार्थ्यांना केवळ मार्कांच्या मागे धावणारे घोडे बनवायचे की देशासाठी आदर्श नागरिक बनवायचे याचा शिक्षण पध्दतीत विचार होणे आवश्यक असल्याचे मत श्री. मूर्ती यांनी यावेळी व्यक्त केले. शहरातील इंग‘जी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा ही आगळीवेगळी व एकमेव स्पर्धा असून, तिला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे मत श्री. शाळिग‘ाम यांनी व्यक्त केले.
मु‘याध्यापिका सुजाता नायडू यांनी स्पर्धेचे संयोजन केले. मंजुश्री बोरावके यांनी सूत्रसंचालन आणि पर्यवेक्षिका ज्योती बोधे यांनी आभार मानले.
टी शर्ट पेंटिंग स्पर्धा
आंतरशालेय टी शर्ट पेंटिंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला. आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या धनश्री खुराडे हिने पहिला, डीईएसच्या श्रेया देशपांडे यांनी दुसरा आणि आचार्य विजय वल्लभ स्कूलच्या कुशल गहेलोत याने तिसरा क‘मांक मिळविला. अकरा शाळांतील २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशांत गोखले यांनी परीक्षण केले.

मूर्ती आमची, किंमत तुमची न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ या अभिनव उपक‘माचे आयोजन केले आहे. या उपक‘माअंतर्गत ११४ विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे प्रदर्शन आणि विक‘ी आज (मंगळवार, ता. २२ ऑगस्ट) सकाळी ११ ते दुपारी १ शाळेच्या आवारात करण्यात येणार आहे.
शाडू मातीपासून गणेश मुर्ती बनविण्याचा उपक‘म शाळेत गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी एसएनडीटी महाविद्यालयातील कलाशिक्षक श्रीकांत पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना आठ दिवस मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. हत्ती गणपती, परशुरामाशी युध्द करणारा गणपती, बाहुबली, महाभारत लिहिणारा गणपती, पर्यावरणाचा संदेश देणारा गणपती, ओरिगामी शस्त्र धारण केलेला गणपती अशा विविधप्रकारच्या मुर्त्या विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत.
एसएनडीटी महाविद्यालयाच्या कला विभागाच्या प्रमुख राजेत्री कुलकर्णी यांनी परीक्षण केले. मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक सुरेश वरंगटीवार, हनुमंत तोडकर यांनी उपक‘म यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

बीएमसीसीत ‘जीएसटी’वर कार्यशाळा

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील (बीएमसीसी) ‘इकॉनॉमिक्स आणि अकाउन्टस’ विभागाच्या वतीने प्रथम वर्ष वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती पाहता सर्व स्तरांवरील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक या कायद्याच्या अंतर्गत मु‘य कर प्रवाहामध्ये येतील, त्यामुळे कर कायद्याची अंमलबजावणी सोपी आणि सुटसुटीत होईल असे मत ज्येष्ठ कर सल्लागार ऍड. महेश भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.
भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक डॉ. अभय टिळक यांनी वस्तू व सेवा कराचा अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती व चलनवाढीचा दर यावर होणार्‍या अनुकुल व प्रतिकूल परिणामांचे विवेचन केले.
जनवित्त अभियानाचे प्रमुख डॉ. अजित अभ्यंकर यांनी करपध्दती, विकास निर्देशांक, नागरिकांना सरकारने द्यायच्या सुविधा याविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशिष पुराणीक, ‘इकॉनॉमिक्स’ विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा देसाई, ‘अकाउन्टस’ विभागाचे प्रमुख यशोधन महाजन यांनी संयोजन केले. या कार्यशाळेला ‘जनवित्त अभियान’चे विशेष सहकार्य मिळाले. महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

भाऊ रंगारींना डावलण्याचे कारस्थान -चक्री उपोषण

0

पुणे-सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६ वे वर्ष असताना देखील पुणे महापालिकेच्यावतीने १२५ वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने आजपासून २३ तारखेपर्यंत चक्री उपोषणास सुरु केले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिला.

मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले, यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६वे वर्ष असून देखील हे सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही. याच्या निषेधार्थ आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव सुरु होण्यास अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून सरकारने भुमिका जाहिर करावी. अन्यथा आमचा लढा अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.. आज भाऊ रंगारी ट्रस्ट चे सुरज रेणुसे यांनी उपोषणाला बसल्यावर मीडियाशी साधलेला संवाद ….
याप्रकरणी यापूर्वी मंडळाकडून मंडई येथिल चौकात काळया फिती बांधून आंदोलन करण्यात आले होते

” शिवसह्याद्री गौरव पुरस्कार ” ने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) संस्था , ज्ञान कि लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे, प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे सन्मानित

0

पुणे-शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनतर्फे यंदाचा शिवसह्याद्री गौरव पुरस्काराने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेस  ,वाचन संस्कृती चळवळीसाठी योगदान देणारे ज्ञान कि लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे , प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांना भारती  विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . यामध्ये भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड , प्रदीप लोखंडे यांची कन्या युगांतीं प्रदीप लोखंडे व  वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आला . भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल कैलास जाधव , सुनील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला . यावेळी दीड कोटी रुपयांचे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले .

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमास शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे , शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविणदादा गायकवाड , लागीर झालं जी या मालिकेतील मराठी अभिनेता निखिल चव्हाण ,  व्यंकटराव गायकवाड , अंकुश आसबे , सुनील कुशीरे , शांताराम कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी भारती  विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , आजच्या काळात नोकऱ्या करण्याचे दिवस संपले असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून युवकांनी पुढे गेलॆ पाहिजे . त्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे . तरुणांनी कोठून आलो आहोत , कुठे आहोत , कुठे जायचे हे कधीही विसरू नये , भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत आणि बेभान होऊन त्या वापरल्या पाहिजेत . भारती विद्यापीठ सुरु करताना आम्हालां अनेक अडचणींचा सामना करावा लागला , परंतु आम्ही डगमगलो नाही , यश अपयश पचवून उभे राहिलो , त्यामुळे भारती विद्यापीठाने दिल्लीमध्ये आपली शिक्षण संस्था उभारू शकली . राजेंद्र कोंढरे हे देखील जिद्दीने अनेक सामाजिक संस्थांमध्ये कौतुकास्पद कार्य करीत आहे .

यावेळी  वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे  यांनी सांगितले कि ,आपल्याकडे  २० टक्के नागरिक भारतात राहतात तर ८० टक्के नागरिक इंडियात राहतात . हा देश मूठभर लोकांच्या हातात चालला आहे . आजच्या तरुणाला लगेच राजकीय आखाड्यात उतरण्याचे वेध लागतात . त्यामुळे आपल्याकडे आय ए एस अधिकारी दिसून येत नाही , पंतगराव कदम व हणमंतराव गायकवाड यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीत देखील आपले विश्व् निर्माण केले . आज कार्पोरेट कंपन्यांमध्ये व सरकारी खात्यामध्ये आपल्या युवकांना नोकऱ्या नाहीत . त्यामुळे येथील युवकांनी करायचे काय ? त्यामुळे युवकांनी नुसत्या राजकारणापेक्षा एखाद्या उद्योगात आपण काय करू शकतो का ? हे पाहिले पाहिजे . शिक्षणाशिवाय तुम्ही कोणत्याही आरक्षणाशिवाय जीवनात पुढे जाऊ शकता  .

यावेळी  भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले कि , लढाई हि प्रत्येकाच्या आयुष्यात आहे . फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे . त्यामुळे आयुष्यात वेगळे करून दाखवा , तुमचा आत्मविश्वास प्रबळ असला पाहिजे . नवनवीनकल्पना आपल्या व्यवसायात राबवा , त्याच तुम्हाला पुढे नेऊ शकतील . काम करीत असताना तुमच्या बरोबरच्या लोकांना मोठे करा तेंव्हा भारत देश हा मोठा होणार आहे . आपण आज प्रतिकूल परिस्थितीमधूनच पुढे आलो आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले तर सूत्रसंचालन अभिषेक मोहोळ यांनी केले तर आभार नितीन साळुंके यांनी मानले .

5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत विपुल नांदकर, ओंकार तोरगलकर यांचा मानांकीत खेळाडूंना पराभवाचा धक्का

0

पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपुर्व फेरीत मुंबई उपनगरच्या ओंकार तोरगलकर, ठाण्याच्या विपुल नांदकर यांनी आपापल्या गटातील मानांकीत खेळाडूंचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्यपुर्व फेरीत युथ मुलांच्या गटात ठाण्याच्या तेराव्या मानांकीत विपुल नांदकरने मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत मंदार हार्डीकरचा 7/11, 5/11, 11/9, 17/15, 11/4, 8/11, 11/7 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. मुंबई शहरच्या अव्वल मानांकीत शुभम आंब्रेने  ठाण्याच्या ओंकार घागचा 11/8, 11/2, 11/8, 11/6 असा पराभव केला.

पुरूष गटात बिगर मानांकीत मुंबई उपनगरच्या ओंकार तोरगलकरने नाशिकच्या सातव्या मानांकीत अजिंक्य शिंद्रेचा 11/4, 11/8, 11/6, 11/2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पुण्याच्या तेराव्या मानांकीत सनत बोकीलचा मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत शुभम आंब्रेने 6/11, 11/8,11/6, 11/8, 11/6 असा पराभव केला.

जुनियर मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या तिस-या मानांकीत आदिती सिन्हाने पुण्याच्या नेहा महांगडेचा 11/4, 11/6, 16/14 असा पराभव करत उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पुण्याच्या आठव्या मानांकीत ईशा जोशीने पुण्याच्याच मृण्मयी रायखेळकरचा 11/6, 11/5, 11/8, असा पराभव करत आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपउपांत्यपुर्व फेरी- युथ गट(21 वर्षाखालील)-मुले

विपुल नांदकर(ठाणे, 13) वि.वि मंदार हार्डीकर(मुंबई उपनगर, 4) 7/11, 5/11, 11/9, 17/15, 11/4, 8/11, 11/7

शुभम आंब्रे(मुंबई शहर, 1) वि.वि ओंकार घाग(ठाणे) 11/8, 11/2, 11/8, 11/6

युगंध झेंडे(ठाणे, 9) वि.वि तेजस कांबळे(ठाणे,8) 11/6, 6/11, 11/5, 11/8, 8/11, 11/7

रेगन ए(मुंबई उपनगर, 5) वि.वि जश दळवी(ठाणे, 12) 13/11, 7/11, 11/6, 9/11, 11/8, 11/6

रविंद्र कोटीयन(मुंबई उपनगर, 3) वि.वि यश देशमुख(ठाणे, 14) 11/4, 11/8, 12/10, 11/4

शौर्य पेडणेकर(मुंबई उपनगर, 6) वि.वि भवितव्य शहा(मुंबई उपनगर, 11) 11/4, 11/6, 11/7, 9/11, 11/7

सनत बोकील(पुणे, 7) वि.वि गौरव लोहपात्रे(पुणे, 10) 11/4, 11/5, 6/11, 8/11, 11/7, 11/6

सिध्देश पांडे(ठाणे,2) वि.वि जितेंद्र यादव (ठाणे) 11/3, 11/6, 11/4, 11/3

 उपउपांत्यपुर्व फेरी -पुरूष गट

ओंकार तोरगलकर(मुंबई उपनगर) वि.वि अजिंक्य शिंद्रे(नाशिक, 7) 11/4, 11/8, 11/6, 11/2

सिध्देश पांडे(ठाणे, 1) वि.वि रेगन ए(मुंबई उपनगर, 16) 11/6, 11/8, 12/10, 11/6

झुबीन तारापोरवाला(ठाणे, 9) वि.वि शौर्य पेडनेकर(मुंबई उपनगर, 8) 10/12, 11/9, 12/10, 6/11, 12/10,4/11, 11/9

युगंध झेंडे(ठाणे, 5) वि.वि मयुरेश केळकर(ठाणे) 11/9, 12/10, 10/12, 11/8, 11/8

शुभम आंब्रे(मुंबई शहर, 4) वि.वि सनत बोकील(पुणे, 13) 6/11, 11/8,11/6, 11/8, 11/6

रविंद्र कोटीयान(मुंबई उपनगर, 3) वि.वि तेजस कांबळे(ठाणे, 14) 11/7, 9/11, 11/13, 11/5, 11/8, 11/8

पुनित देसाई (नाशिक, 6) वि.वि मार्तंड बिनिवाले(पुणे) 11/7, 11/4, 5/11, 11/4, 5/11, 7/11, 11/7

मंदार हार्डीकर(मुंबई उपनगर, 2) वि.वि जश दळवी(ठाणे, 15) 7/11, 9/11, 11/9, 11/5, 11/7, 11/4

जुनियर(18 वर्षाखालील) मुली- तिसरी फेरी

ईशा जोशी(पुणे,8) वि.वि मृण्मयी रायखेळकर(पुणे) 11/6, 11/5, 11/8,

मानसी चिपळूणकर(मुंबई शहर,5) वि.वि रेवती महाजन(ठाणे) 11/5, 11/4, 11/3

विधि धुत(मुंबई उपनगर, 12) वि.वि श्रृती गोळवलकर(ठाणे) 11/6, 11/5, 11/8

साक्षी देवकट्टे(परभणी, 13) वि.वि वैष्णवी बाळुदेव(रायगड) 11/2, 11/4, 11/7

श्रेया देशपांडे(ठाणे,4) वि.वि कादंबरी भांडारकर(नागपुर) 11/1, 11/1, 11/2

आदिती सिन्हा(मुंबई उपनगर, 3) वि.वि नेहा महांगडे(पुणे) 11/4, 11/6, 16/14

डॉ मोहन आगाशे यांना डॉ लुकतुके व डॉ वाटवे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान

0

पुणे: बदलत्या काळात पुढाकार घेऊन काम करणाऱ्यांची कमतरता असून मानसिक आरोग्य क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मनोदय मेंटल हेल्थ फोरमने या क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा जेष्ठ मानसोपचार तज्ञ व सिने अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.

कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे मनोदय मेंटल हेल्थ फोरमच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कार वितरण, समुपदेशन अभ्यासक्रमाचे उद्घाटन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. उल्हास लुकतुके व डॉ. विद्याधर वाटवे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. कर्वे समाज सेवा संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर, फोरम चे सल्लागार डॉ सुप्रकाश चौधरी, कार्याध्यक्ष चेतन दिवाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्र. संचालक प्रा महेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

डॉ मोहन आगाशे यांनी स्वत: अभिनय केलेल्या “आस्तु” व राष्ट्रीय परस्कार वेजेत्या “कासव” या सिनेमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करीत एक मानास्शाश्त्रज्ञ म्हणून असणार्या जबाबदार्यांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, मानसिक आरोग्याच्या जागृतीसाठी माणूस कसा ओळखायचा या कलेपासून मानसशास्त्र शिकण्याची सुरुवात होते तसेच माणसाकडून वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या चित्र, आवाज व भाषा या कलांच्या माध्यमातून उप जागृत व विवेकपूर्ण मनाचा अभ्यास करण्याची कला देखील मानसशास्त्रज्ञामध्ये असते. तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या लोकांनी धीर व स्वीकार या गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन देखील डॉ. मोहन आगाशे यांनी केले.

डॉ. लुकतुके म्हणाले डॉ मोहन आगाशे हे एक अनोखे व्यक्तिमत्व असून त्यांनी अभिनय व मानसिक आरोग्य या  दोन्ही क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असल्याने मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा योग्य गौरव आहे.

डॉ वाटवे  म्हणाले, डॉ आगाशे यांना देण्यात आलेला पुरस्कार हा त्यांचा योग्य सन्मान आहे. पुणे सारख्या शहरामध्ये मानसोपचार क्षेत्राला चांगले दिवस आणण्यासाठी सुरुवातीच्या काळापासूनच प्रयत्न केले असून मानसिक आरोग्याशी निगडीत सर्व संस्था, संघटना व विशेषता त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र इन्सटीटूट ऑफ मेंटल हेल्थ च्या स्थापनेमध्ये त्यांचा सिहाचा वाटा आहे.

संदीप खर्डेकर यांनी विशेष शैलीमध्ये आपले विचार व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले, नेता व अभिनेता यांच्यामध्ये समाजमन ओळखण्याची एक कला असते पण त्याही पेक्षा मोठी जबाबदारी डॉ. आगाशे व  मानसिक आरोग्य क्षेत्रातील इतर व्यक्तींची असून त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर आहोत.

डॉ शिरीष रत्नपारखी, डॉ सुप्रकाश चौधरी, प्रा. संचालक प्रा. महेश ठाकूर यांनी आपली मनोगते व्यक्त करून डॉ आगाशे व समुपदेशन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व मेंटल हेल्थ फोरम च्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी  डॉ सुप्रकाश चौधुरी व प्रा. चेतन दिवान लिखित “सायकीयॅट्री फॉरबिगिनर्स” या पुस्तकाचे तसेच प्रा. महेश ठाकूर व प्रा चेतन दिवान यांनी पुण्यातील जवळ-जवळ २६० संस्थांची इत्यंभूत माहिती असणार्या “संस्था मार्गदर्शिका” चे प्रकाशन डॉ मोहन आगाशे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दिप्प्रज्वालानाने करण्यात आली. प्रा. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, राजेश अलोणे, स्नेहल सस्ताकारव प्रा  दादा दडस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चेतन दिवाण यांनी केले. सूत्रसंचालन अनुपमा जोशीराव यांनी तर आभार शिल्पा तांबे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल कुटे, पल्लवी भागवत, सबनीस आढाव, प्रेमला घोरपडे, स्वाती पाध्ये, शीला संचेती, संदीप मोटे, अनिता सातव, तेजस घाडगे श्वेता बोंबे, प्रज्ञा थोरात यांनी परिश्रम घेतले

अंनिसचं सरकारविरोधात ‘जबाव दो’ आंदोलन

0

पुणे-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट 2017 रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंनिसच्यावतीने आज दिवसभर जवाब दो आंदोलन सुरु आहे.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभुमीवर  पुण्यात महाराष्ट्र अंनिसकडुन ‘जवाब दो’ आंदोलन आणि कँडल मार्चचं आयोजन करण्यात आलं .

दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष होऊनही मारेकरी पकडले गेले नाही आहेत. सनातनवर चार्जशीट दाखल असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आणखी किती विचारवंतांच्या हत्यांची वाट सरकार बघतंय? असे अनेक प्रश्न हमीद दाभोळकर यांनी उपस्थित केले आहेत.अंनिसच्या मोर्चात कार्यकर्त्यांसह असंख्य  तरुण, लेखक सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट 2017 रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी महाराष्ट्र अंनिसकडून सोशल मीडियातून मोठी मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेतून विवेकवाद्यांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल सरकारला जाब विचारला जाणार आहे. #JawabDo या हॅशटॅगचा वापर करत, 20 ऑगस्ट 2017 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सरकारला जाब विचारला जात आहे.अंनिसच्या या मोहिमेला विविध क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुभाष वारे यांसारख्या मान्यवरांनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवत फेसबुक-ट्विटरवर हॅशटॅग वापरुन पोस्ट केल्या आहेत