पुणे-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट 2017 रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंनिसच्यावतीने आज दिवसभर जवाब दो आंदोलन सुरु आहे.
दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष होऊनही मारेकरी पकडले गेले नाही आहेत. सनातनवर चार्जशीट दाखल असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आणखी किती विचारवंतांच्या हत्यांची वाट सरकार बघतंय? असे अनेक प्रश्न हमीद दाभोळकर यांनी उपस्थित केले आहेत.अंनिसच्या मोर्चात कार्यकर्त्यांसह असंख्य तरुण, लेखक सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट 2017 रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी महाराष्ट्र अंनिसकडून सोशल मीडियातून मोठी मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेतून विवेकवाद्यांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल सरकारला जाब विचारला जाणार आहे. #JawabDo या हॅशटॅगचा वापर करत, 20 ऑगस्ट 2017 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सरकारला जाब विचारला जात आहे.अंनिसच्या या मोहिमेला विविध क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुभाष वारे यांसारख्या मान्यवरांनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवत फेसबुक-ट्विटरवर हॅशटॅग वापरुन पोस्ट केल्या आहेत