शिक्षणाचा फायदा स्वकीयांसाठी करण्याचे विसरू नका -आ. उदय सामंत

Date:

पुणे- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहराने भरभरून शिक्षण दिल्यानंतर या शहराला ,या राज्याला आणि या देशाला विसरू नका ,तर स्वकीयांसाठी या शिक्षणाचा उपयोग होईल असे कार्य स्वदेशातच करत राहा असा सल्ला देत शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या कार्याचे कौतुक आज शिवसेनेचे संपर्कप् रमुख आमदार उदय सामंत यांनी येथे केले .
अॅड.अश्विनी संजय भोसले आणि संजय भोसले यांनी आयोजित केलेल्या १० वि आणि १२ वि च्या उत्तीर्ण ,गुणवंत कौतुक सोहळ्यात आ. सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ९५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. संजय भोसले यांच्या सातत्याने २५ वर्षांपासून होणाऱ्या अशा महत्वाकांक्षी उपक्रमाचे कौतुक  करून यावेळी ते म्हणाले, कोणतीही निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हे शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरु ठेवले आहे . अशा स्थानिक लोकांचाच विधानसभेला विचार शिवसेनेत होत असतो . हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे .
संजय भोसले यांनी यावेळी आपल्या भाषणातून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि वातावरण निर्माण करून देणाऱ्या पालकांची प्रशंसा केली आणि या उपक्रमाबाबत माहिती दिली.
या वेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर नंदू मोझे, ,माजी नगरसेवक हरणावळ , नगरसेविका संगीता ठोसर ,विशाल धनवडे,पल्लवी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते .येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...