मुबंई, दि. 21 : कलाकार हा सामान्यांपर्यंत आपल्या कलेचा प्रसार करतो. सुनीता वाधवान यांच्या चित्रांमध्ये असलेली उच्च कलात्मकता म्हणजे आत्म्याचे प्रतिबिंब आहे, असे गौरवोद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिरजी जहाँगीर आर्ट गॅलरीत आयोजित इलेव्हीशन या चित्र प्रदर्शनात काढले.
चित्रकार सुनीता वाधवान व मनिष बोबडे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला ऊर्जामंत्र्यानी आज भेट दिली. यावेळी माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.
सुनीता वाधवान व मनिष बोबडे या चित्रकारांची चित्रकारिता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे. योगा व निसर्ग या विषयावर आधारीत चित्रांमध्ये उच्च दर्जाची कलात्मकता आहे. या दोघा चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जुन या चित्रप्रदर्शनाला भेट दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनात 51 चित्रांचा समावेश असून 27 ऑगस्ट पर्यत हे चित्रप्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले आहे.
यावेळी जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या डॉ. मनिषा पाटील यांचा ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.