Home Blog Page 3231

पुणे जिल्हयासाठी 726 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडयास जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

0

पुणे:- पुणे जिल्हा वार्ष्‍िाक योजनेच्या सन 2018-19 या आर्थ्‍िाक वर्षासाठी जिल्हयाकरीता 479  कोटी 75 लाख   रुपयांच्या सर्वसाधारण विकास आराखडयास आज येथील विधानभवन सभागृहात  पुणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 171 कोटी 46 लाख रुपयांच्या तर आदिवासी उपयोजनेंतर्गत 75 कोटी 31 लाख रुपयांच्या अशा एकूण 726 कोटी 52 लाख रुपयांच्या प्रारुप आराखडयास बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव-पाटील, अनिल शिरोळे,  श्रीरंग बारणे,  आमदार सर्वश्री बाबुराव पाचर्णे, विजय काळे, भिमराव तापकीर, संजय भेगडे, योगेश टिळेकर, जगदिश मुळीक, संग्राम थोपटे, राहूल कुल, गौतम चाबुकस्वार, दत्तात्रय भरणे,      शरद सोनवणे, सुरेश गोरे, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ, निलम गो-हे, मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार,    जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, जिल्हयातील लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

                    बैठकीमध्ये कृषि व संलग्न सेवेसाठी 75 कोटी 97 लाख 32 हजार, ग्रामीण विकासासाठी  19  कोटी  15  लाख, पाटबंधारे व पूरनियंत्रणासाठी  26 कोटी 91 लाख  86 हजार, उर्जा विकासासाठी  24 कोटी  90 लाख, उदयोग व खाणकामासाठी 1 कोटी 72 लाख,  वाहतुक व दळणवळणासाठी 70 कोटी 11 लाख 75 हजार, सामान्य आर्थ‍िक सेवेसाठी 12 कोटी 50 लाख, सामाजिक व सामूहिक सेवेसाठी 133 कोटी 82 लाख 62 हजार, सामान्य सेवेसाठी  42 कोटी 68 लाख 7 हजार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 71 कोटी 96 लाख 25 हजार असा एकूण 479 कोटी 74 लाख 88 हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला.

                   यावेळी मागील वर्षी मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री.बापट यांनी घेतला. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला केलेल्या सूचनांबाबत तात्काळ कार्यवाही करावी. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिका-यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेऊन वेळोवेळी कामांची अदययावत माहिती दयावी. प्राप्त निधीतून दर्जेदार कामे करावीत. सर्वसामान्य नागरिक, दिव्यांगांसाठीच्या  योजना राबविण्यासाठी गती दयावी,अशा सूचना केली. ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी समितीच्या कामकाजाची माहिती घ्यावी. हा निधी खर्च करण्यासाठीच्या नियमावलीचा अभ्यास करावा, जेणेकरुन जिल्हयाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळविण्याबरोबरच तो निधी वेळेत खर्च होईल. यावेळी सर्व विभागांच्या  कामांचा आढावा घेण्यात आला.

                उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील विविध समस्या मांडल्या. त्यानुसार संबंधित विभागांनी  दखल घेवून कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.बापट यांनी  यावेळी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची आजची पहिली बैठक असल्यामुळे सर्व सदस्यांचे स्वागत पुस्तिका भेट देऊन करण्यात आले. उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिका-यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोयʼ  या विकासविषयक पुस्तिका भेट देण्यात आल्या. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे प्रारुप आराखडयाबाबतचे सादरीकरण केले. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आभार मानले.

|| दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ || दत्ताच्या परिवाराचा भावार्थ|| दत्त तिर्थक्षेत्रे ||

0

१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया.. २] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण ‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे….’

३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….

दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे, ते सर्व देते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…

५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांचे प्रतीक आहेत.…

६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व अधिक आहे.…

5 दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे आहे.

१] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…

२] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…

३] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…

४] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.…

-:|| दत्त तिर्थक्षेत्रे ||:-

श्री दत्तात्रेय प्रभू आणि त्यांनी मनुष्य रूपामध्ये घेतलेल्या अवतारांची प्रमुख मुळ दत्त तिर्थक्षेत्रे.

१} माहूर(नांदेड)महाराष्ट्र :- हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला.हे क्षेत्र फार प्राचीन आहे.ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुध्दा म्हणतात.ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ शक्ती पीठ सुध्दा आहे.हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते.नांदेड पासून ११० किमी अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे. पुण्या,मुंबई कडील भक्तां साठी औरंगाबाद, जालना, मेहकर, वाशीम,पुसद,माहूर अशी सरळ बससेवा आहे.नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.या ठिकाणी निवासासाठी भक्त निवास आहे.

२} गिरनार(जुनागड)(सौराष्ट्र गुजरात):-हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरा पासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला.हे स्थान उंच पर्वतावर असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात.ह्या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत.इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो.या ठिकाणी जाण्यासाठी सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून जुनागड (गिरनार)साठी नियमीत बससेवा आहे.रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत, अहमदाबाद, राजकोट, जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.

३} पिठापूर – (पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश :-हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे.या क्षेत्रास पादगया सुध्दा म्हणतात.आंध्र प्रदेशमधे पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्या जवळ हे क्षेत्र आहे.आपस्तंब शाखेतील आपलराज,आणि सुमती माता या ब्राह्मण दांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला.सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली.त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला.जीवनात एक वेळेस या क्षेत्रास जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे. हैद्राबाद, विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते तिथे उतरून रिक्षा अथवा बसने (१०किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला जाता येते.या ठिकाणी जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वे आहेत.शिर्डी, विशाखापट्टनम,काकिनाडा एक्सप्रेस या रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई भुवनेश्वर(कोणार्क एक्सप्रेस),तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा- पुरी एक्सप्रेस ही ह्या रेल्वेगाडया सोयीच्या आहेत.या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.पिठापूरला जाणारया भक्तांनी १५ दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची तारिख संस्थानला फोनने कळ्वावी.जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळ्ण्यास अडचण निर्माण होणार नाही. श्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम पिठापूरम- फोन नं.-(०८८६९) २५०३००,२५२३००.

४} कुरवपूर(जि.रायचूर)कर्नाटक:- हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले.श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. मुंबई,बंगलोर(व्हाया गुलबर्गा)या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते.तिथे उतरून रायचूर बसस्थानका वरून बस मार्गाने ३०किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो.होडिने १ किमी प्रवास करून मंदिरा पर्यंत जाता येते.दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बस मार्गावर मतकल नावाचे गाव लागते तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते.नंतर होडिने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरा पर्यंत पोहोचता येते.हा मार्ग अधिक सोयीचा आहे.पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा~यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे.वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे.याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्य नमस्कार घालण्यासाठी येत असत.याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा~यांना भोजना साठी आधी सांगावे लागते. वासुदेव भट्ट पुजारी,श्री क्षेत्र कुरवपूर,जि.रायचूर.फोन नं.-(०८५३२-२८०५७०) मोबाईल नं.-०९७३१८२७५४६,०९७४०३१३८२८

५} लाड कारंजा(दत्त)(वाशिम)महाराष्ट्र :- हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता.त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे.इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत.श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.वाशीम,अमरावती,अकोला,यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून कारंजा हे ६० किमी अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बस सेवा आहे.मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशन वर उतरून बसमार्गाने ३० किमी अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते.इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे. गुरुमंदिर कारंजा- फोन-(०७२२६) २२४७५५, २२२४५५

६} नृसिंहवाडी-(कोल्हापूर,महाराष्ट्र):- हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षां पूर्वी वसले असून सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळ्खले जाते.श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री १२ वर्षे;राहिले.आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी गुरु चरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे.(नृसिंह वाडी पैलतीरी)बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन परत आणली त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे.कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे परमप्रिय शिष्य श्री नृसिंह सरस्वती (दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर,वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे.त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला आहे. नृसिंह वाडीला गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे.हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस ५० किमी. अंतरावर आहे.सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून २२ किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे.सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली- कुरूंदवाड बसने सुध्दा इथे जाता येते.सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे.दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे.काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी “वेदभवन”या वास्तुचे निर्माण केले आहे. ही वास्तु सुध्दा अवश्य पाहावी. श्री नृसिंह सरस्वती दत्त संस्थान,श्रीनृसिंहवाडी,तालुका शिरोळ,जिल्हा कोल्हापूर फोन-(०२३२२),२७००६४,२७०००६,२७०५०१

७} औदुंबर:-(सांगली,महाराष्ट्र):-सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्त क्षेत्र आहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे.या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरु चरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे.याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी,श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरु चरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल.त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील,असे वचन दिले. औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे.सांगली- अंकलखोप या बसने इथे जाता येते.तासगाव- कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे.रेल्वे मार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे,कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते.त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते.या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचे घरी सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान औदुंबर तालुका पुलुस जिल्हा सांगली फोन रामभाऊ पुजारी (०२३४६)२३००५८,९९७०१२९७१३,

८} गाणगापूर(गुलबर्गा,कर्नाटक):- गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे.भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे.या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून,यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगल कारक केला आहे.या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.दत्त भक्तांची अशी भावना आहे की,आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात.येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.मुंबई हैद्राबाद(व्हाया सोलापूर) किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते.तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० किमी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते.बस मार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बससेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान गाणगापूर फोन नं-(०८४७२) २७४३३५,२७४७६८

९} माणिकनगर(बिदर,कर्नाटक):- सोलापूर-हैद्राबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणा पासून १ किमी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे.कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते.सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे.राम नवमीच्या दिवशी सव्यं सद्गुरु दत्त प्रभुंनी बया बाईंना(माणिक प्रभूंची आई)दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेइल असा आशिर्वाद दिला.२२ डिसेंबर १८१७ साली(मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी)दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला.माणिक नगर,बसवकल्य़ाण ,बिदर या परिसरा मध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत.त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते.त्याच प्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते.त्यांचे एक वैशिष्टय होते की,त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते.श्री माणिक प्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते.त्यांचा एकमेकांचा आपसात परिचय होता.त्यांच्या नेहमी भेटी होत असत.श्री माणिक प्रभूंनी सकल संत संप्रदायाची स्थापना करुन १९व्या शतकाच्या मध्यकाळा मध्ये या महान देशाच्या मध्यकाळा मध्ये एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन,निजाम इलाका)हिंदी समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला.पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा उद्घोष केला व महात्मा गांधीनीही हेच तत्व अंगीकारून आपली राष्ट्रीय ऎक्याची इमारत रचली.हे एकमेव असे दत्त क्षेत्र आहे की,ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे.माणिक प्रभू संस्थान आध्यात्मिक कार्या बरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे.अंधशाळा,वेदपाठ शाळा,पब्लिक स्कूल,संगीत विद्यालय,संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिक प्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो.असे दत्त अवतारी पुरुष मार्गशीर्ष शुध्द एकादशी सन १८६५ मध्ये माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये लीन झाले. हे क्षेत्र सोलापूर पासून १४० किमी अंतरावर आहे.गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून हुमानाबादसाठी (माणिकनगरसाठी)नियमित बससेवा आहे.बीदर पासून ४० किमी आणि गुलबर्गापासून ६५ किमी अंतरावर हुमनाबाद (माणिकनगर)आहे.या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास असून दुपारी १ वाजता महा प्रसादाची सोय आहे.श्री माणिक प्रभू संस्थान,माणिकनगर ता.हुमनाबाद जि.बिदर फोन (०८४८३-२०३२४२)०९४४८४६९९१३

१०} अक्कलकोट(सोलापूर,महाराष्ट्र):- अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्द पुरुष होते.पंजाब राज्यात पानिपत जवळ छेली या खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली.त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला.त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली.३०० वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले.एका लाकूड तोड्याने झाड तोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला.त्या मूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले.फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळ्वेढ्यास आले.तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले.अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते.त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे.त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे.त्यावेळचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अल्कार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटन मध्ये गेल्यावर असे जाहीर केले की,आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहे.स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजता समाधी घेतली.अक्कलकोट हे सोलापूरपासून ३५ किमी.अंतरावर आहे.सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त- निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट,अक्कलकोट,जि.सोलापूर (०२१८१)२२०३२१,भक्त निवास-२२१९०९.

११} माणगाव(सिंधुदुर्ग,कोकण महाराष्ट्र) -योगीराज प.पु.वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांचे हे जन्मगाव.दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ.रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी माणगावी स्वामीचा जन्म झाला. ते दत्त अवतारी सिध्द पुरुष होते.कारण गणेश शास्त्रींना गाणगापूरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता.श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ.स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला .त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही.त्यांना सर्व विद्या अवगत होत्या.श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य,मंत्रसिध्द,यंत्र- तंत्रज्ञ,उत्कृष्ट ज्योतिषी,मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी,वक्ते,हठयोगी,उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते.एकच खंत वाट्ते की,त्यांना संसार सुख लाभले नाही.जन्मताच मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते.पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला.स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या.अशा महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४मधे समाधी घेतली.माणगाव हे क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे.सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा लागतो.तिथे उतरून बस मार्गाने ७ किमी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते.सावंतवाडी साठी कोल्हापूरवरून नियमीत बससेवा आहे.या ठिकाणी निवासा साठी भक्त निवास असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.(दत्त मंदिर,माणगाव,ता.कुडाळ,जि.सिंधुदूर्ग कोकण फोन नं.०२३६२-२३६२४५,२३६४२५)

१२} श्री क्षेत्र कडगंची (गुलबर्गा,कर्नाटक):- वेदतुल्य अशा गुरु चरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले.हे स्थान प्रसिध्दीस नव्हते.परंतु आता श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.गाणगापूर पासून ३४ किमी.अंतरावर हे पुण्य स्थान आहे.सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता.त्याच्याच ५ व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला.श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय.गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनाम धारक संवादे असा उल्लेख आहे.त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय.सायंदेवाचे घराचे जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे.येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते.श्री सायंदेव दत्त देवस्थान ट्रस्ट समिती कडगंची,ता.आळंद,जि.गुलबर्गा,कर्नाटक.फोन नं.-०८४७७-२२६१०३,९७४०६२५६७६

१३} मंथनगड(मंथनगुडी)महेबुब नगर(आंध्रप्रदेश) -श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरव्पूरला नवस फेडण्यासाठी जात असता याच ठिकाणी चोरांनी त्त्यास अडवून त्याची हत्या केली.त्यामूळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले,तेच हे ठिकाण हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून हे क्षेत्र १० किमी.अंतरावर आहे.मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात.मतकल- नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथन गड येथून जातात.श्री क्षेत्र कुरवपुरला मतकल मार्गे जातांना अगर येतांना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन घ्यावे.

१४} गरुडेश्वर(नर्मदा,गुजरात):– हे क्षेत्र गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात येते.सुरत-अहमदाबाद या बस मार्गावर अंकलेश्वर हे गाव लागते.तिथे उतरून बस मार्गाने राजपिपला मार्गे गरुडेश्वर ६८ किमी अंतरावर आहे.राजपिपला हे तहसीलचे गाव आहे.शिरपूर-बडोदा,धुळे-बडोदा या बसेस राजपिपला मार्गे बडोद्याला जातात.त्यामुळे महाराष्ट्रातून गरुडेश्चरला जाणारया भक्तांसाठी शिरपूर किंवा धूळे येथून जाणे सोयीचे पडते.या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे.

कुरुंजी (भोर ) येथे ‘बांबू डे’ साजरा

0
बांबूच्या साहाय्याने पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन गरजेचे  :’गृहनिर्मिती साठी बांबूचा कल्पक उपयोग ‘ या परिसंवादातील सूर  
बांबू लागवड,प्रक्रिया  आणि बांधकाम क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ,उद्योजकांचा सत्कार 
​पुणे : ​‘सिनर्जी,कॅज्युअरिना  हॉलिडे व्हिलेज ‘च्या वतीनेरविवारी ​‘बांबू डे​ ​(बांबू दिवस ) या उपक्रमाचे
 आयोजन​करण्यात आले होते​. ‘गृहनिर्मितीमध्ये बांबूचा कल्पक उपयोग’ या विषयांवर तज्ज्ञांचा परिसंवाद,​ ​बांबूपासून केलेल्या घरांच्या प्रतिकृती, ​फर्निचर चे प्रदर्शन,​ ‘​बांबू हाऊस​’ला भेट,​उदघाटन , ​बांबू कलाकारांचा सत्कार,​ बांबू लागवड असे या ‘बांबू डे’चे स्वरूप ​होते. बांबूच्या माध्यमातून​’​पर्यावरणपूरक गृहनिर्मिती​’​ला चालना देणे,​ स्थानिक बांबू कलाकारांच्या कलेला उत्तेजन देणे हा या उपक्रमाचा उद्देश ​होता. बांबूच्या साहाय्याने पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे ,असा सूर या परिसंवादात उमटला .
हा कार्यक्रम रविवारी सकाळी 10 ते 2 या वेळात ‘कॅश्युरिना’ प्रकल्प, कुरुंजी (ता . भोर) येथे आयोजित करण्यात आला​होता​. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, भाटघर धरणाच्या बॅक वॉटरला हा प्रकल्प निसर्गरम्य ठिकाणी आहे​. ​‘बांबू हाऊस’मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू संशोधक,’नेटिव्ह कॉनबेक बांबू प्रा . लिमिटेड ‘ चे व्यवस्थापकीय संचालक  संजीव कर्पे  , ‘बांबू टेल्स ‘संस्थेचे विवेक कोलते, स्थानिक बांबू कलाकार सचिन महाडीक, गडचिरोली येथील बांबू आणि वनहक्क चळवळीतील कार्यकर्ते सुबोध कुलकर्णी ,बांबू​ ​गृहनिर्मिती  क्षेत्रातील उद्योजक मंदार देवगावकर, अपर्णा देवगावकर,राजेंद्र आवटे  यां​च्या परी संवाद ​कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.  संजीव करपे म्हणाले, ‘ जगभर बांबू पासून घरे, फर्निचर, पूल अशा गोष्टी बनाविल्या जात आहेत.बांबूच्या बाबतीत भारतीय संशोधन सर्वोत्कष्ट असून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे.बांबूचा वापर पर्यावरणस्नेही असून ग्लोबल वॉर्मिंगवर देखिल उपयुक्त ठरणार आहे. बांबू आग आणि कीड रोधक करता येतो, त्यामुळे तो गृह बांधणीत निर्धोक ठरतो.’ गोवा ,मालदीव ,हैदराबाद ,जपान ,थायलंड येथे बांबू पासून गृहनिर्मिती आणि शोभिवंत बांधकामे करण्याचे प्रमाण वाढत आहे .  पूर्वोत्तर राज्यात अशी घरे आहेत . मात्र भारतातील उर्वरित राज्यांनी बांबूला आपलेसे करण्याची गरज आहे . शेतकऱ्यांना बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगातून संजीवनी मिळू शकते .  महाराष्ट्र सरकार बांबू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गडचिरोली जिल्हयात उभारत असून वर्षभरात ती पूर्ण होईल असेही करपे यांनी सांगितले राजेंद्र आवटे म्हणाले निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन विकसित करताना बांबू हाऊस उभारणे हे आकर्षण ठरते.म्हणून ‘सिनर्जी ,कॅज्युअरिना हॉलिडे प्रकल्पात संजीव करपे यांच्या मार्गदर्शनाखाली  पर्यावरणपूरक बांबू हाऊस उभारण्यात आली आहेत .  मंदार देवगावकर म्हणाले ,’धरणाजवळच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये १०० मीटर अंतरात बांबू हाऊस निर्मितीला शासनाची परवानगी आहे . त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी पारंपरिक रचना बाजूला ठेवून बांबू हाऊस संकल्पना अंगिकारली पाहिजे .  अमृता  देवगावकर म्हणाल्या ,’पर्यटंकाना बांबू हाऊस आवडत असून त्यातून थंडीत उबदार वातावरण आणि उन्हाळ्यात थंडावा मिळतो . बांबूचे फायदे गृहनिर्मितीमध्ये असून आवड  निर्माण करण्याची गरज आहे ‘ मंदार देवगावकर, अमृता  देवगावकर यांनी बांबू कलाकारांचा सत्कार केला.राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले . गणेश शिरोडे ,श्री .मिरकुटे ,ग्रामस्थ आणि पुण्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोल मिळावा – बुधाजीराव मुळीक.

0
शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणे आणि त्यांना रास्त भाव मिळणे हे आपले उद्दिष्ट – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे -शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीने पिकवलेल्या भाजीपाला,फळे फुले धान्य व इतर मालासाठी योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण शहरात प्रत्येक वार्डात असे शेतकरी आठवडे बाजार सुरु केले जावेत अशी सूचना कृषीभूषण बुधाजीराव मुळीक यांनी केली.तसेच या बाजारात मालाचे वर्णन असणारे पत्रक ही ग्राहकांना दिले जावे असेही ते म्हणाले.हा माल पिकविताना किती कष्ट घ्यावे लागतात याची माहिती व्हावी आणि या पालेभाज्या/कडधान्ये किंवा फळान्मध्ये आपल्या शरीराला उपयोगी पडणाऱ्या किती गोष्टीचा,जीवनसत्त्वांचा भरणा आहे याची माहिती या पत्रकात असावी,अशी पत्रके परदेशात दिली जातात व त्यातून नागरिक अश्या बाजारांकडे आकृष्ट होतात.परदेशात असे आठवडे बाजार हे प्रशासनच भरवते व त्या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम ही ठेवले जातात व त्यास नागरिक प्रचंड गर्दी करतात,असे उपक्रम आपण आपल्या भागातही सुरु करावेत असे सुचवितानाच यासाठी मंजुश्री खर्डेकर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व काही शेतकरी आठवडे बाजारांची उलाढाल शंभर कोटींच्या घरात गेली आहे तसेच आपल्या बाजारास ही यश मिळावे अश्या शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि मयुर पवार यांच्या विंग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या प्रभाग क्रमांक १३ मधील सहवास सोसायटी भागात आयोजित केलेल्या शेतकरी आठवडे बाजाराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,नगरसेवक दीपक पोटे,बाजारासाठी जागा उपलब्ध करुन देणारे शिरीष भुजबळ,कोथरूड मंडल विस्तारक पुनीत जोशी,कोथरूड मंडल सरचिटणीस बापूसाहेब मेंगडे,शहर कार्यकारिणी सदस्य प्रशांत हरसुले,प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे,शुभांगीताई सुदामे,अनुराधाताई एडके,प्रवीण जोशी,जगदीश डिंगरे,शरद लेले,अक्षय सुदामे,संगीताताई आदवडे,प्रमिलाताई फाले,माणिकताई दीक्षीत,शिवराज शिंदे ,छायाताई सोनावणे,श्री राळेरासकर,व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सप्टेंबर महिन्यात पटवर्धन बाग येथे सुरु केलेल्या आठवडे बाजारास प्रचंड प्रतिसाद मिळाला व हा बाजार यशस्वी झाल्यानंतर आता प्रभागात दुसरा आठवडे बाजार सुरु करताना मनस्वी आनंद होत असून शेतकरी बांधवांना त्यांच्या मालास थेट ग्राहकांना विकता येत असल्याने रास्त दर मिळत आहे याचे समाधान लाभत आहे असे या बाजाराच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.या बाजारात ग्राहक आणि शेतकऱ्यांमधे एक नाते निर्माण व्हावे असा आपला प्रयत्न असून अश्या बाजारातून जसे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला थेट ग्राहक आणि रास्त दर मिळतो तसेच ग्राहकांना ही छान ताजा आणि दर्जेदार माल मिळतो हे लक्षात आल्यावर बाजाराला उत्तम प्रतिसाद लाभतो आणि शेतकरी आणि ग्राहकात सुसंवादाचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होते असेही त्या म्हणाल्या.पुढील काळात प्रभागात अन्यत्र आणि कोथरूड च्या विविध भागातही असे बाजार सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
हा बाजार दर शनिवारी सहवास सोसायटी समोरील भुजबळ यांच्या जागेत पेरुच्या बागेजवळ भरणार असून त्यात विविध शेतमाल रास्त दरात उपलब्ध होणार आहे.
या वेळी नगरसेवक दीपक पोटे व नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी ही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी,प्रास्ताविक मंजुश्री खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन मयुर पवार यांनी केले.उपस्थितांचे सत्कार शुभांगी सुदामे,बाळासाहेब धनवे,अनुराधाताई एडके व संगीता आदवडे यांनी केले.

सुना है आज समंदर को बडा गुमान आया है ;उधर ही ले चलो कश्ती जिधर तुफान आया है

0

तुफानाशी थेट पंगा घेत शीड उभं करुन वाट काढणाऱ्या लढवय्यांसाठी आहे यंदाचं सारेगमपचं पर्व..! ‘घे पंगा कर
दंगा’ म्हणत हे आव्हान पेलण्यासाठी जसे स्पर्धक सज्ज होते तसेच परीक्षक, निवेदक, वादक आणि झी मराठी
सुद्धा. झी मराठी सारेगमपच्या आजवरच्या पर्वांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. तब्बल चार वर्षांनी नवं पर्व घेऊन
येताना उत्साह आणि जोश तोच असला तरी यंदाचं पर्व तरुणाईची भाषा बोलणारं आहे. संगीताच्या मैदानात स्पर्धक
एकमेकांशी सुरेल पंगा घेऊन करणार आहेत धमाल दंगा!
चार वर्षांनी सारेगमपचं पर्व घेऊन येताना काय नवं असावं हा विचार करताना घे पंगा कर दंगा ही थीम ठरवण्यात
आली आहे. केवळ सात सूरांची जाण असणारा नाही तर त्या सुरांच्या साथीने आव्हान झेलणारा ताकदीचा सुपरस्टार
शोधणं, हा या पर्वाचा मुख्य उद्देश आहे. सारेगमपच्या लिट्ल चॅम्पसमध्ये ज्याने नेहमीच प्रयोगशीलतेवर भर
ठेवला असा सर्वांचा लाडका तरुण-तडफदार गायक-संगीतकार रोहित राऊत यंदाच्या पर्वात निवेदकाची भूमिका
साकारतोय.
झी मराठी सारेगमपचे परीक्षक हा नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरलाय. अनेक मान्यवरांनी सारेगमपच्या मंचावरून
महाराष्ट्राच्या गानरत्नांना मार्गदर्शन केलं आहे. यंदाच्या युथफुल पर्वासाठीही तरुणाईची भाषा जाणणारे आणि
त्याचबरोबर संवेदनशील मराठी प्रेक्षकांच्या मनाला हात घालणारे परीक्षक लाभले आहेत. ज्याच्या चित्रपटात संगीत
ही नेहमीच जमेची बाजू राहिली आहे असा हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक रवी
जाधव या पर्वासाठी परीक्षक म्हणून आपल्या समोर आला आहे. सुरांनाही जिची मोहिनी पडावी अशी अलबेली बेला
स्पर्धकांना पारखून त्यांच्या गाण्यातले बारकावे सांगून त्याचं मार्गदर्शन करतेय आणि आता या मान्यवरांमध्ये भर
पडली आहे, हिंदी-मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार-संगीतकार-लेखक-गायक राष्ट्रीय पुरस्कार
विजेते स्वानंद किरकिरे! स्वानंद किरकिरे यांच्या एंट्रीमुळे सारेगमपच्या या पर्वाला परिपूर्ण परीक्षकांची टीम लाभली
आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
रवी जाधव आपलं मतं व्यक्त करताना म्हणतो,’;पुढच्या फेरीसाठी निवडण्यात आलेल्या गायकांमधून कोणाचा
आवाज सिनेमाच्या पार्श्वगायनसाठी अधिक योग्य आहे, याचा शोध मी घेत राहणार आहे. बेला स्वतः उत्तम गायिका
आहे, स्वानंद उत्तम लेखक व गायक आहे आणि मी दिग्दर्शक आहे. मला वाटतं की आमची उत्तम टीम जमली आहे –
लेखक, गायिका आणि दिग्दर्शक. जो सिनेमॅटिक आवाज लागतो, त्या आवाजाचे जे मॅजिक असते, ते शोधायचा मी
प्रयत्न करतोय.’
नव्या परीक्षकाच्या भूमिकेतून आपल्याला भेटायला येणारे स्वानंद किरकिरे सांगतात,’मी ऐकलं आहे की खूपच
सुरेल स्पर्धक अवघ्या महाराष्ट्रामधून निवडण्यात आले आहेत आणि त्यांचं परीक्षण करणं, हे माझ्यसाठी नक्कीच
उत्सुकतेचं ठरणार आहे.

बेला शेंडे म्हणतात,’सारेगमप हा फक्त एक सिंगिंग रिऍलिटी शो नसून हा सुरांचा महायज्ञ आहे. आपली कला
जगासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी देणारा, मराठी मनांना आपलासा वाटणारा हा मंच आहे. महाराष्ट्रातल्या
तरुणाईची ही अफाट ऊर्जा पाहून मी थक्क झाले. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना, त्यांचे विचार जाणून घेताना मलाही
खूप शिकायला मिळतंय. परीक्षकाची ही भूमिका मी खरंच खूप एन्जॉय करतेय. या पर्वात स्वरांचा हा दंगा
महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार एवढं मात्र नक्की. “
औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, गोवा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये’;सारेगमप – घे पंगा कर दंगा’;साठी
ऑडिशन झाल्या आणि प्रत्येक शहरातून २५०० ते ३००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक शहरातला
उत्साह आणि टॅलेंट थक्क करणारं होतं. या ऑडिशन दरम्यान जाणवलेली एक चांगली गोष्ट म्हणजे येणारे स्पर्धक
पंगा घेण्याच्या तयारीनेच आले होते. उत्तम गायकांसोबत काही धमाल पात्रही पाहायला मिळाली. त्यामुळे हे ऑडिशन
राऊंड खऱ्या अर्थाने मनोरंजनाची मेजवानी ठरले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडलेल्या ८४ स्पर्धकांना
मुंबईला बोलावलं गेलं. आता खरं चॅलेंज होतं की या उत्तम गायकांमधून सर्वोत्तम ३६ निवडणं. आता सारेगमपची ही
पुढील वाटचाल अधिक रोमांचक आणि चुरशीची होणार यात शंका नाही. महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु होणारा
हा सांगीतिक प्रवास अधिक मनोरंजक होणार आहे. मग दर सोमवार-मंगळवार रात्री ९:३० वाजता, झी मराठीवर
पाहाता येईल , सारेगमप – घे पंगा कर दंगा!

दृष्टीहिन मुलांनी लुटला हास्योत्सवाचा मनमुराद आनंद

0
जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजन ; कोरेगाव पार्क येथील अंध-अपंग शाळेत विशेष कार्यक्रम
पुणे : आयुष्यात येणा-या प्रत्येक आव्हानाचा सामना करीत अंधारात चाचपडत प्रकाशवाटा शोधणा-या चिमुकल्यांना आनंदाचे दोन क्षण हास्योत्सवाने मिळवून दिले. हास्याचे विविध प्रकार समजून घेत त्याप्रमाणे हास्ययोगाचा आनंद घेणा-या दृष्टीहिन मुलांच्या चेह-यावर यावेळी निरागस हसू उमलत होते. जागतिक अपंग दिनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात विशेष मुलांसह सामान्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, आम्ही तुमच्यातीलच एक आहोत, असे सांगत एकोप्याचा संदेशही दिला.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात या कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव पार्क येथील अंध-अपंग शाळेमध्ये करण्यात आले. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, चंद्रशेखर कपोते, प्रशांत सुरसे, संगीता तिवारी, अ‍ॅड. सुरेश बोराटे, चित्रा माळवे, शलाका मरोड, अ‍ॅड.शाबीर खान, निलेश बोराटे, शिलाल रतनगिरी, चेतन आगरवाल, सन्मितसिंग चौधरी, आदी उपस्थित होते. संस्थेतील मुलांना फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
मोहन जोशी म्हणाले, सेवा, कर्तव्य, त्याग या तिन्ही शब्दांचे अर्थ आपल्या अंगी बाणवत संपूर्ण आयुष्यात आपण समाजासाठी काम केले पाहिजे. दृष्टीहिन मुले ही कोणाचा तरी आधार घेऊन आयुष्यात पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची साथ देत त्यांच्या आयुष्यात आनंदाने क्षण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांनी अशा मुलांसोबत संपूर्ण वर्षातील किमान एक दिवस देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, पीयुसी चाचणी शिबीर अशा अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.

कलमाडींचा जनसहभाग वाढतो आहे …फडणवीसांनी घेतली दखल ?

0

पुणे- ‘सबसे बडा खिलाडी’ अशी एकेकाळी ओळख असलेला आणि ‘मी म्हणजे पुणे’ अशी शेखी मिरविलेला पण काळाच्या राजकारणात दूर फेकला गेलेला तथाकथित -नेता सुरेश कलमाडी यांचा अलीकडच्या काळात सणासुदीच्या निमित्ताने वाढणारा जनसहभाग आता केवळ कार्यकर्त्यांचा औत्सुक्याचा भाग राहिला नसून , स्थानिक मंत्री दिलीप कांबळे यांच्या त्यांच्यासमवेत च्या  आणि  ‘ जनसहभागाची ‘ दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे वृत्त आहे .
महम्मदपैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या  मिरवणूकित (जूलुस) मध्ये  सुरेश कलमाडी हे आज  माजी गृहराज्यमंत्री आणि शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे, आणि भाजपचे विद्यमान मंत्री दिलीप कांबळे यांच्या समवेत दिसून आले . अर्थात दिलीप कांबळे हे फार थोडा वेळ कलमाडी यांच्यासमवेत या मिरवणुकीत होते . पण  नगरसेवक अविनाश बागवे व दयानंद अडागळे आक्रमभाई शेख व इतर कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी बराच काळ कलमाडी यांच्या समवेत मिरवणुकीत होते .कॉंग्रेस मध्ये अजूनही स्थानिक पातळीवर कलमाडी यांचे चाहते राजकारणात बरेच आहेत . केवळ कॉंग्रेस मध्येच नाहीत तर अन्य पक्षात हि त्यांचे चाहते आहेत . तत्कालीन नेते विठ्ठलराव गाडगीळ यांना हटविण्यासाठी कलमाडी यांनी निस्वार्थी राजकारणाला व्यवहारिक मार्गावर  नेल्याने सुरुवातीला अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती . पण काळ पुढे सरकला तसा त्यांच्यावर टीका करणारी मंडळी देखील त्यांच्या समवेत दिसू लागली .कलमाडी यांनी राजकारणाची दिशा अशी बदलून ठेवली कि त्याच मार्गावर कलमाडी नसतानाही राजकारण स्थिरावले .आता पुण्याचा नेता कोण ?असा प्रश्न उपस्थित होत असताना ,नेत्या अभावी महापालिकेच्या कारभाराची  दैना होत असताना ,  कलमाडी यांचे जनतेत वाढलेले येणे जाणे अनेकांच्या भुवया उंचावून टाकीत आहेत . २०१९ च्या निवडणुकीसाठी एकीकडे कॉंग्रेस मध्ये मोहन जोशी, अभय छाजेड सारखी मंडळी इच्छुक असताना भाजपा मधून बापटांना तुम्ही आता मंत्रिपद सोडा ,लोकसभेकडे लक्ष घाला ,असा सूर लावला जात असताना पैगंबर जयंतीच्या निमित्ताने कलमाडी यांचे जनतेत मिसळणे राजकीयदृष्ट्या काही रंग उधळणार काय ?अशी निव्वळ चर्चा सध्या तरी राजकीय गप्पांमध्ये करमणुकीचा रंग भरते आहे .

विकासकामे होत नसतील तर, महापालिकेत लक्ष घालणार – खासदार काकडे

0
पुणे : नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत. शहरातील नियोजीत व सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची माहिती त्यांना मिळालीच पाहिजे. शिवाय त्यांच्या प्रभागातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली पाहिजेत. याकामी महापालिका आयुक्त व प्रशासन यांची सहकार्याचीच भूमिका असली पाहिजे. ते होत नसल्याचे नगरसेवकांनी आजच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे यापुढे शहर विकास व नगरसेवकांच्या प्रश्नांसाठी महापालिकेच्या कारभारात लक्ष घालू. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही नगरसेवकांचे म्हणणे आपण मांडणार आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी सांगितले.दरम्यान महापालिकेत ठप्प पडलेल्या विकासाच्या योजना आणि काकडे यांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे पुण्याच्या कारभारात स्थानिक नेतृत्वाचीच उणीव भासत असल्याचे स्पष्ट झाले आहे . निष्ठा ,जातीयवाद आणि लक्ष्मी यांच्या वास्तववादी व्यवहारीक लढाईत स्थानिक नेतृत्वाची रुबाबदार छबी जणू नाहीसी झाल्याने  महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी याचीही पंचाईत होत असल्याचे बोलले जात आहे .
           महापालिका आयुक्त व प्रशासन नगरसेवकांची अडवणूक करीत असल्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी खासदार काकडे यांनी आज नगरसेवकांची बैठक बोलाविली होती. त्यास सुमारे 40 नगरसेवकांनी उपस्थिती लावली. खासदार काकडे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले व यापुढे महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालून नगरसेवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही हे प्रश्न मांडू व त्यावर तोडगा काढू असा विश्वासही त्यांनी यावेळी नगरसेवकांना दिला.
चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या योजनेची माहिती देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली. पूर्वीची निविदा रद्द केल्यानंतर आता कोणत्या पद्धतीने निविदा काढल्यात व त्यातील अटी व शर्थी काय आहेत? पाण्याचे मीटर व ऑप्टिकल फाइबर डक्ट स्मार्ट सिटीअंतर्गत बसविले जाणार असतानाही महापालिका त्यावर पुणेकरांचे 194 कोटी रुपये का खर्च करीत आहे? यासंदर्भातील माहिती नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत मागितली. परंतु, ती देणे प्रशासनाने टाळले. पुणेकरांनी विकासासाठी भाजपाला सत्ता दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पक्षाचाही विकासाचाच अजेंडा आहे. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांना विकास कामांची माहिती दिली जात नाही. त्यांच्या प्रभागातील प्रश्न सुटत नसतील तर, महापालिका आयुक्त व प्रशासनाच्या या आडमुठेपणाची दखल घावीच लागेल. शहराच्या विकासाविषयी भाजप आग्रही असेन, असेही खासदार काकडे म्हणाले.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने मराठवाडा विभागात राबविली वीजचोरीविरुध्द मोहिम

0

मुंबई : वीजहानीचे प्रमाण जास्त असलेल्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, जालना, लातूर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक श्री. अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 27 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत धडक कृती कार्यक्रम राबविण्यात आला.

          या धडक कृती कार्यक्रमात वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी प्रामुख्याने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, लॉज यांची तपासणी करून या मोहिमेत एकूण 1 हजार 421 वीजसंचांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 269 वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून अनधिकृत वीजवापर करणाऱ्या 53 वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय 153 वीज ग्राहकांच्या मिटर्सची कार्यप्रणाली संशयास्पद आढळून आल्याने सदर मीटर्स अंतिम चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर सदर ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सदर मोहिमेत कोंकण, पुणे व नागपूर परिक्षेत्र कार्यालयातील उपसंचालक सर्वश्री सुमित कुमार, शिवाजी इंदलकर आणि मंगेश वैद्य यांनी भाग घेतला तर औरंगाबाद विभागाचे उपसंचालक श्री. बत्तलवाड यांनी या मोहिमेचा नोडल ऑफीसर म्हणून कार्यभार सांभाळला. या मोहिमेत महाराष्ट्रातील 36 भरारी पथके व संबंधित संचलन व सुव्यवस्था मंडल कार्यालयात कार्यरत असलेले 46 सहाय्यक अभियंते प्रामुख्याने सहभागी झाले होते. यापुढेही महाराष्ट्रात सुरक्षा व अंमलबजाणी विभागाच्या धडक मोहिमा अधिक जोमाने राबवून वीजचोरांवर जरब बसविण्यात येईल असे कार्यकारी संचालक श्री. अरविंद साळवे यांनी यावेळी सांगितले.

मराठी उद्योजकांनी उलगडला “ब्रँडनामा’ चा प्रवास

0
अभिजित जोग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन 

पुणे –  मराठी माणूस उद्योगविश्वात मोठा झाला आहे परंतु स्वतःचा ब्रँड निर्माण करू न शकल्याने आपला प्रभाव पाडू शकलेला नाही, उद्योग , व्यवसाय कुणीही निर्माण करू शकतो मात्र ब्रँड निर्माण कारण्यासाठी जिद्द, चिकाटी याबरोबरच हुशारी आवश्यक असते. अशी  भावना व्यक्त  करत व्यवसायात स्वःतचा ब्रँड निर्माण केलेल्या उद्योजकांनी त्यांच्या ‘ब्रँडनामा’ चा प्रवास शनिवारी उलगडला 
निमित्त होते, रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रॅंडनामा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई -आवृत्तीचे प्रकाशन झाले. याप्रसंगी सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, परांजपे स्किम्स्‌चे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, चितळे बंधूचे श्रीकृष्ण चितळे आणि पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ या चार ब्रँड निर्माण केलेल्या उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. या उद्योजकांच्या यशाचे गमक चित्रपट लेखक क्षितीज पटवर्धन यांनी मुलाखतीतून उलगडले. 
गौतम ठाकूर म्हणाले, लोकांना वाटते  फक्त उत्पादनालाच ब्रँड, जाहिरात करण्याची आवश्यकता असते परंतु  हीच बाब सेवा क्षेत्रालाही लागू पडते. जनते समोर आपला प्रेझेंस सतत दिसला पाहिजे तरच लोक आपल्याकडे येतात यामुळे ब्रँड मध्ये गुंतवणूक आवश्यक ठरते. 
चितळे म्हणाले, मला एमबीए करायचे होते मात्र त्याकाळी नोकरी करायची असेल तर त्याला महत्व होते, स्वःतच्याच व्यवसायात जायचे तर त्याची काय गरज असे लोकांनी म्हटल्यामुळे मी थेट व्यवसायात आलो. व्यवसाय वृद्धी साठी ब्रँड आणि ट्रेडमार्क आवश्यक ठरतो. 
गाडगीळ म्हणाले, लहानपणापासून दुकानात जायचो. त्याच व्यवसायात जायचे की नाही, हे ठरविले नव्हते. पण मी एमबीएचे शिक्षण घेत असताना, आमच्या व्यवसायात दक्षिण आशिया आणि सिंगापुरमध्ये काही तरी प्रश्न निर्माण झाला आणि तो सोडवायला जाऊ का? असे मी दाजीकाकांना विचारले आणि तेथून मी व्यवसायात उतरलो. ब्रँडचे म्हणाल तर ब्रँडला कोणत्याही मर्यादा नसतात तसेच ते व्यक्ती पासून वेगळा करता येत नाही आणि ब्रॅडिंग मध्ये चांगले किंवा  वाईट असे काही नसते.
परांजपे म्हणाले, “सचोटी आणि गुणवत्ता हा आमचा वारसा होता. पण नव्या पिढीला आपलेसे करण्यासाठी आम्ही काही दशकापुर्वी ‘प्रेरणा नव्या भारताची’ ही संकल्पना रुजवली. आपली संस्कृती जपलीच पाहिजे, त्यासोबत जगभरातील चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात. असे फ्यूजन असायला हवे. 
सचिन खेडेकर म्हणाले, जाहिरातबाजीला महत्व न दिल्याने आपण मागे  पडलो असे झाले नाही मात्र प्रभाव पाडण्यात कमी पडलो असे म्हणण्यास वाव आहे. 
लेखक अभिजीत जोग यांनी ब्रँडनामा या पुस्तकामागील आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिश जोग आणि योगेश नांदुरकर यांनी केले, तर शैलेश  नांदुरकर यांनी आभार मानले.

हाडांची ठिसूळता तपासणी शिबीर संपन्न

0

पुणे-

नाना पेठमधील क्वार्टर गेट चौकातील मातृसेवा हॉस्पिटल व वूमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची ठिसूळता तपासणी शिबीर संपन्न झाले . या शिबिराचे उदघाटन पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . यावेळी महापौर मुक्ता टिळक यांची तपासणी करण्यात आली . या शिबिराचे आयोजन डॉ. यशराज शहा , डॉ. किशोर शहा , डॉ. स्वाती शहा , डॉ. स्नेहा शहा व वूमेन्स फोरमच्या अध्यक्षा हेमांगिनी शहा यांनी केले होते . या शिबीरात २०० जणांची मोफत हाडांची ठिसूळता तपासणी करण्यात आली .

यावेळी डॉ. यशराज शहा यांनी सांगितले कि , हाडांची ठिसूळता तपासणीमध्ये आपल्या शरीरामधील हाडांची मजबूत किती आहे ते समजते , तसेच , हाडांमधील कॅलिशमचे प्रमाण समजते . भारतीयांच्या जीवनशैलीप्रमाणे हाडांमध्ये कॅलिशम व व्हिटॅमीन डीची कमी आढळते . त्यासाठी आहार , विहार व व्यायामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी मोफत फिजियोथेरपी देखील करण्यात आली .  फिजियोथेरपिस्ट तेजस्विनी वाळके यांनी मोफत फिजियोथेरपी केली . मोफत हाडांची ठिसूळता तपासणी मोहम्मद नैमुद्दीन व विद्याधर पडवळ यांनी केली .

यावेळी महापौर मुक्त टिळक यांनी सांगितले कि , मातृसेवा हॉस्पिटल व वूमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची ठिसूळता तपासणी शिबीर हा उपक्रम कौतुकास्पद आहे . आपला वैद्यकीय कौशल्य समाजासाठी देणे हे सामाजिक कार्यच आहे .

स्वातंत्र्यासाठी तर नाहीच पण ६० वर्षात केवळ हाफ चड्डीवरून फुल पँटीत येण्याचेच यांचे योगदान – अशोक चव्हाण यांची सरकारवर टीका (व्हिडीओ)

0
पुणे : माध्यमे आणि राजकीय नेते पक्ष यांच्यावर दबाव टाकणे याबरोबर शालेय शिक्षणातून महात्माजींचे नाव, इंदिराजींचे नाव पुसणे, राजीव गांधीना बदनाम करण्याचे उद्योग भाजपाने सुरु केले आहेत. याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यात ,विकासात भाजपाचे योगदान नाही मात्र ६० वर्षात केवळ हाफ पँट ते फुल पँट इतकेच काय ते यांचे  योगदान आहे.असा आरोप भाजपा सरकारवर करीत   देशातील नव्या पिढीला महात्मा गांधींची कारकिर्द, इंदिरा गांधींचे योगदान सांगून कॉंग्रेसशी रिकनेक्ट करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद््घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात कनेक्ट कॉंग्रेस या अभियानाचा प्रारंभ देखील झाला. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे ,मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर,दिप्ती चवधरी,उल्हास पवार, शरद रणपिसे, आमदार अनंत गाडगीळ, रामदार फुटाणे, अविनाश बागवे , अरविंद शिंदे, आबा बागुल, सदानंद शेट्टी,संगीता तिवारी ,नीता रजपूत ,कैलास कदम, सोनाली मारणे आदी उपस्थित होते. सप्ताहाचे यंदा १३ वे वर्ष आहे. कार्यक्रमात कनेक्ट कॉंग्रेसच्या फेसबुक पेजचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते झाले.
अशोक चव्हाण म्हणाले, देशामध्ये भाजपाने सुरु केलेले वैचारिक प्रदूषण वाढत चालले आहे. प्रसार माध्यमांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकावर दबाव आणण्याचे काम सुरु आहे. नुकतेच राज्य सरकारने ३० टक्के नोकरकपात घोषित केली आहे. त्यात आर्थिक नियोजन नसल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल महाग झाले आहे. त्यामुळे हे डिसकनेक्ट झालेले सरकार असून कायमस्वरुपी काम करणा-या कॉंग्रेसला जनतेशी रिकनेक्ट करण्याची वेळ आली आहे. तरच सन २०१९ मध्ये देशात आणि राज्यात पुन्हा एकदा कॉंग्रेसचे सरकार येईल. मी लाभार्थी या जाहिरातीमधील खरे लाभार्थी हे सरकारमधीलच आहे. खोटं बोल, रेटून बोलं ही पद्धती अवलंबिली जात आहे. त्यामुळे सेवा, कर्तव्य, त्यागासोबतच जबाबदारपणे आपण कॉंग्रेसला पुढे न्यायला हवे.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कॉंग्रेसच्या काळात तरुणांना नोक-या देण्याचे काम आम्ही केले. मात्र, भाजपाने नोटाबंदी करुन तरुणांच्या नोक-या घालविण्याचे काम केले आहे. आजपर्यंत ४० लाख तरुणांच्या नोक-या गेल्या आहेत. गुजरात निवडणुकांकरीता नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या मतदारसंघात दर दिवसाआड बैठका घेतल्या. राहुल गांधींच्या गुजरातमधील मुसंडीला घाबरुन या बैठका होत आहेत. कॉंग्रेसने तलवारीने नाही, तर नेहमीच विचार, सेवा, कर्तव्य आणि त्यागाने लढा दिला आहे. त्यामुळे कनेक्ट कॉंग्रेससारख्या उपक्रमातून पुन्हा एकदा तरुणाईला जोडायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
मोहन जोशी म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने गेल्या ६० वर्षांच्या काळात व्यापक प्रमाणात देशउभारणी केली. स्व.राजीव गांधी यांच्या काळात डिजिटलायझेशन आणि संगणकीय युगाची पायाभरणी झाली. परंतु सध्या, कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षांत काहीही केले नाही, असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे या कॉंग्रेसी योजनांचा लाभ घेऊन पुढे आलेली युवा पिढी आणि दूर गेलेला सुशिक्षीत वर्ग या अपप्रचाराला बळी पडला. त्यांना पुन्हा कॉंग्रेसकडे वळविण्याकरीता कॉंग्रेस कनेक्ट हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे. कार्यक्रमात कनेक्ट कॉंग्रेसच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सई देशमुख, हर्ष खुनगर, यशपाल जुडावत, विशाल ढोरे, यशराज पारखी, विशाल मांढरे या तरुणाईने देखील मनोगत व्यक्त केले. डॉ.विकास आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत सुरसे यांनी आभार मानले.

एमआयटी विद्यापीठात शिवराज चाकूरकर व पं.ह्दयनााथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत होणार “कबीरवाणी” ग्रंथाचे 5 डिसेंबरला प्रकाशन

0

पुणेर : पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्यावतीने येत्या 5 डिसेंबर रोजी संत कबीर यांच्या वैश्‍विक विचारांच्या मानवताधर्मी साहित्याचे रसग्रहण करणारा सरदार जाफरी संपादित व साहित्यिक व विचारवंत आचार्य रतनलाल सोनग्रा अनुवादति “कबीरवाणी” या ग्रंथाचे प्रकाशन लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व थोर संगीतकार पं. ह्दयनाथ मंगेशकर तसेच एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. विश्‍वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष राहूल कराड तसेच कुलसचिव ग्रुप कॅप्टन यप्रा. दिपक आपटे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. कोथरूड येथील एमआयटी कॅपसमधील संत ज्ञानेश्‍वर सभागृहात हा कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पं. ह्दयनाथ मंगेशकर व माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर हे संत कबीरांच्या वैचारिक योगदानावर भाष्य करणार आहेत. या कार्यक्रमाचा साहित्यरसिकांनी व संत साहित्यअभ्यासकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचेवतीने लीबरल आर्टस, सायन्स व कॉमर्सचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. महेश आबाळे व प्राचार्या डॉ. माधुरी कुलकर्णी व संयोजक प्रा. राधिका पुजारी यांनी केले आहे.

फुकरे गैंगचं “लुखा” रेस्टोरेंट!

0
फुकरोंची ही टीम खुप वेगळी आणि मस्तमोली आहे. फुकरे गंगसारखीच मस्तीखोर आजची युवा पीढ़ी आहे.
ह्या  युवा पिढीला लक्षात ठेऊन आता फुकरे गैंगच्या डोक्यात एक खुराफ़ाती प्लॅन आहे ते म्हणजे फुकरे गैंग मुंबईमध्ये एक रेस्टॉरंट उघडण्याच प्लान करत आहे जो सर्व फुकर्यांचा अड्डा असेल.
आजकाल प्रत्येक युवकांचे  स्वतःचे आवडते अड्डे असतात जिथे ते  त्याच्या मित्रांसह काही वेळ घालवतात आणि हेच  लक्षात ठेऊन आता हनी, चूचा, लाली आणि ज़फर ने अशा एक “लुखा” अड्डा उघडण्याची योजना आखली आहे
एवढेच नाही तर या हॉटेलचा मेन्यू देखील तरुणांना लक्षात ठेऊन ठरवला जाईल म्हणजे  प्रत्येक फुकरा या ठिकाणी येऊन दिलख़ुलासपणे फुकरपंती करू शकतो, आणि  आपल्या या सुंदर क्षणांना आयुष्यभर जिवंत ठेवू शकतो.
चित्रपट ट्रेलर, फुकर कमर्शियल आणि गाणे प्रेक्षकांन द्वारा खूप  पसंत केली जात आहेत आणि ह्या फुकरपंती  ला  मोठ्या पडद्यावर बघायला सर्वे प्रेकशक फारच उत्सुकत आहेत
चार वर्षांनंतर, फुकरे  गैंग  भोली पंजाबन आणि हनी, चूचा,लाली और ज़फर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत. फुकरे रिटर्न ह्या वर्षातील सर्वात विचित्र आणि मजेदार चित्रपट म्हणून पहिली जात आहे आणि वर्षाच्या अखेरीस, यापेक्षाही चांगली चित्रपटांची निर्मिती होऊ शकली नसती.
8 दिसंबर 2017  ला रिलीज होणारी ही एक्सेल एंटरटेनमेंट बैनरची फिल्म  फरहान अख्तर आणि रितेश सिंधवानी द्वारा सह-निर्मित आहे. मृदिप सिंह लांबा ने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे।

सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह ; राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि १६७ शाळांतील १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

0

कॅनव्हासवर रंगांची उधळण करीत बालचित्रकारांनी दिला सामाजिक संदेश

पुणे : स्मार्ट सिटी, वाहतूक समस्या, रक्तदान श्रेष्ठदान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या सामाजिक विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. बालचित्रकारांसोबतच उपस्थित मान्यवरांनी देखील चक्क विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्र काढत त्यामध्ये रंग भरल्याचे दृश्य पाहून उपस्थितांना देखील प्रोत्साहन मिळाले. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द.मि.कै.सि.धों.आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिल्पकार विवेक खटावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ.विकास आबनावे, प्रकाश आबनावे, दिलीप आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, पी.डी.आबनावे, डॉ. छाया आबनावे, कल्याणी साळुंखे, इंद्राणी रानडे, नीता गुमास्ते, चेतन आगरवाल, आयुब पठाण, प्रशांत वेलणकर, अविनाश अडसूळ, उमेश काची, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष आहे.
विवेक खटावकर म्हणाले, चित्रकला स्पर्धांमधून भावी चित्रकार व शिल्पकारांची पिढी घडत असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कोणाची ना कोणाची सेवा करायला हवी. मग ती देवाची, आई-वडिलांची, गुरुजनांची किंवा कलेची असो. जीवनामध्ये सेवेचे महत्त्वाचे स्थान आहे. लहान वयातच मुलांमध्ये सेवा आणि कर्तव्याची भावना रुजल्यास आयुष्यात पुढे ते अनावश्यक गोष्टींचा त्याग करुन गरजूंना मदतीचा हात देऊ शकतील. याकरीता पालकांनी मुलांना तशी शिकवण द्यायला हवी.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, मराठीसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तब्बल ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके विज्येत्यांना देण्यात येणार आहेत. सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला असून हे यंदाचे वैशिष्टय आहे, असेही त्यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे. ओरिएंटल इन्शुरन्स, वेंकीज आणि पंजाब नॅशनल बँकेने या उपक्रमात सहभाग घेत सहकार्य केले आहे. इंद्राणी रानडे यांनी सूत्रसंचालन केले. रुची कुलकर्णी यांनी आभार मानले.