पुणेर : पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्यावतीने येत्या 5 डिसेंबर रोजी संत कबीर यांच्या वैश्विक विचारांच्या मानवताधर्मी साहित्याचे रसग्रहण करणारा सरदार जाफरी संपादित व साहित्यिक व विचारवंत आचार्य रतनलाल सोनग्रा अनुवादति “कबीरवाणी” या ग्रंथाचे प्रकाशन लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व थोर संगीतकार पं. ह्दयनाथ मंगेशकर तसेच एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष राहूल कराड तसेच कुलसचिव ग्रुप कॅप्टन यप्रा. दिपक आपटे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. कोथरूड येथील एमआयटी कॅपसमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पं. ह्दयनाथ मंगेशकर व माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर हे संत कबीरांच्या वैचारिक योगदानावर भाष्य करणार आहेत. या कार्यक्रमाचा साहित्यरसिकांनी व संत साहित्यअभ्यासकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचेवतीने लीबरल आर्टस, सायन्स व कॉमर्सचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. महेश आबाळे व प्राचार्या डॉ. माधुरी कुलकर्णी व संयोजक प्रा. राधिका पुजारी यांनी केले आहे.
एमआयटी विद्यापीठात शिवराज चाकूरकर व पं.ह्दयनााथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत होणार “कबीरवाणी” ग्रंथाचे 5 डिसेंबरला प्रकाशन
Date: